काळाच्या घावाने
फरफटत जावे,
धडपडून उठावे
मन म्हणते आहे !!
ती सोनेरी क्षणे
जिवास ओलावे,
डोळ्यात गुंतावे
मन म्हणते आहे !!
जे राहिले चित्र कोरे
काही रंग भरावे,
कुंचल्यास उचलावे
मन म्हणते आहे !!
तुला शौक सुगंधाचा
विश्व गंधाळुनी यावे,
चंदनासवे झिजावे
मन म्हणते आहे !!
भ्रमराचे ओठ अन
कळीने खुलावे,
गीत होऊन जगावे
मन म्हणते आहे !!
रात्रीस धास्तावले ते
तुझ्या नजरेचे काजवे,
पहाट बनून जावे
मन म्हणते आहे !!
- साजीद यासीन पठाण
(९९७०५७५७६६)
मु : दह्यारी. तालुका : पलूस,
जिल्हा : सांगली ( महाराष्ट्र )
दिवाळी अंक वर्ष
वाचने
3425
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
वा व्वा !
भ्रमराचे ओठ अन कळीने खुलावे,
मस्त कविता.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
आवडली कविता.जे राहिले चित्र
जे राहिले चित्र कोरे काही रंग भरावे, कुंचल्यास उचलावे मन म्हणते आहे !!हे सर्वात आवडले.