मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक कोपरा

वेल्लाभट · · दिवाळी अंक
एक कोपरा असा जिथे की मांडियला संसार एक कोपरा जिथे मिळाला ह्र्दयाला आधार धुंडाळुनिया देवळे मला मनात मग सापडला एक कोपरा असा जिथे की झाला साक्षात्कार त्या दिवशी तो राव भयाने व्याकुळलेला दिसला शोधित होता एक कोपरा होऊनिया लाचार घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती असावा परि एक कोपरा जुळती जेथ विचार विश्वामध्ये येती सारे घेऊनिया आकार उरती होऊन एक कोपरा आणि पाकळ्या चार त्या गर्दीतच मला उमगले या जगताचे सार एक कोपरा माझा आणिक माझ्यातुन साकार उजळून गेल्या जगी अपूर्व शोध कशाचा घेशी एक कोपरा जिथे मिळावा हक्काचा अंधार २५-२-१३ अपूर्व ओक.
दिवाळी अंक वर्ष

वाचने 4080 वाचनखूण प्रतिक्रिया 8

मिसळलेला काव्यप्रेमी 01/11/2013 - 14:13
धुंडाळुनिया देवळे मला मनात मग सापडला एक कोपरा असा जिथे की झाला साक्षात्कार
हे खासचं.

अनन्न्या 03/11/2013 - 16:12
धुंडाळुनिया देवळे मला मनात मग सापडला एक कोपरा असा जिथे की झाला साक्षात्कार मस्त!

psajid 07/11/2013 - 15:32
"विश्वामध्ये येती सारे घेऊनिया आकार उरती होऊन एक कोपरा आणि पाकळ्या चार" हा जीवनाचं सार सांगणारा शेर खूप आवडला ! वाह ! क्या बात है !