नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला.
या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी :
१. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच.
२. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे.
३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच.
माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात...
काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते.
त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते.
बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता.
केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते.
इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल.
मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला.
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत.
आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत.
परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वाचने
134078
प्रतिक्रिया
637
मिसळपाव
प्रतिक्रिया
टोलनाके ?
In reply to टोलचा झोल ? by डॉ सुहास म्हात्रे
डिमॉनेटायझेशनच्या कारवाईतून
In reply to टोलचा झोल ? by डॉ सुहास म्हात्रे
आताचा डेटा स्वतः टोलवाले देत
In reply to डिमॉनेटायझेशनच्या कारवाईतून by मार्मिक गोडसे
डिमॉनेटायझेशनमुळे काही जण
:))
In reply to डिमॉनेटायझेशनमुळे काही जण by डॉ सुहास म्हात्रे
Maid - working from home
In reply to :)) by पैसा
Maid - working from home
In reply to :)) by पैसा
Maid - working from home
In reply to :)) by पैसा
डिजीटल ट्रान्सफर्स
कायप्पावर फिरणारा एक विनोद
मला आज 'आरबीआय' कडून एक इमेल
पाकिस्तानात नोटाबंदीचा पहिला बळी
खरी असावीशी वाटते
In reply to पाकिस्तानात नोटाबंदीचा पहिला बळी by धर्मराजमुटके
एस गुरुमुर्ती यांच डीमोनेटाईझेशनवरच भाषण
ठाणे तेथे काय उणे
यावरून सद्याची बँकातली गर्दी
In reply to ठाणे तेथे काय उणे by धर्मराजमुटके
गूड पॉइंट.
In reply to यावरून सद्याची बँकातली गर्दी by डॉ सुहास म्हात्रे
डिमॉनेटायझेशन ही एकुलती एक
तुमचा आशावाद बघुन भारावुन गेलो आहे
In reply to डिमॉनेटायझेशन ही एकुलती एक by डॉ सुहास म्हात्रे
"exceeded expectations" हा
In reply to तुमचा आशावाद बघुन भारावुन गेलो आहे by अर्धवटराव
सरकारने पुढच्या काही कारवाया सुरु केल्या आहेत, किंचित तर्कशक्ती वापरली तर भविष्यात अजून बर्याच फॉलो अप अॅक्शन्स आणि बर्याच नवीन भ्रष्टाचारविरोधी कारवाया येतील...असे आणि...ही तर नुसती सुरुवात आहे, अजून ३१ डिसेंबरला १५ दिवस आहेत ! आणि त्यानंतर सरकारच्या भात्यातून काही विशेष बाण बाहेर येणे अपेक्षित आहे ;) :)असे म्हटले आहे. हे इतके स्पष्ट आहे की त्यामुळे अधिक टीप्पणीची गरजच नाही :)ते तुमच्या मुद्दा ३९ बद्धल
In reply to "exceeded expectations" हा by डॉ सुहास म्हात्रे
३९. The government has told
In reply to ते तुमच्या मुद्दा ३९ बद्धल by संपत
३९. The government has told the Supreme Court that banks have received Rs 12 lakh crores in demoentised currency, and this has exceeded its expectations.अच्छा हे होय ? याबाबत, सरकार असे म्हणत आहे की, जुन्या (डिमॉनेटाईझ्ड) नोटांच्या स्वरूपात बँकांत जमा झालेले १२ लाख कोटी रुपये त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहेत. यापेक्षा कमी पैसे बँकांत जमा होतील असा त्यांचा अंदाज होता.शब्दशः अर्थ कळला हो सर.
In reply to ३९. The government has told by डॉ सुहास म्हात्रे
मग असे सुरुवातीलाच सरळ न
In reply to शब्दशः अर्थ कळला हो सर. by अर्धवटराव
अहो खरच आहे ते
In reply to मग असे सुरुवातीलाच सरळ न by डॉ सुहास म्हात्रे
२० टक्के नोटा कमी जमा होतील
In reply to अहो खरच आहे ते by अर्धवटराव
१ टक्का नोटा कमी जमा झाल्या
In reply to मग असे सुरुवातीलाच सरळ न by डॉ सुहास म्हात्रे
इन्फोसिस संस्थापकांपैकी एक
प्रभूंना रेल्वेमंत्री केले
In reply to इन्फोसिस संस्थापकांपैकी एक by डॉ सुहास म्हात्रे
काळाबाजार्यांनो सावधान !
करविभागातील पूर्व वरिष्ठ
विनोदी चित्रफीत. IPC 378
In reply to करविभागातील पूर्व वरिष्ठ by डॉ सुहास म्हात्रे
आयकरविभागाच्या एका वरिष्ठ
In reply to विनोदी चित्रफीत. IPC 378 by मार्मिक गोडसे
अजून एक मनोरंजक बातमी...
In reply to विनोदी चित्रफीत. IPC 378 by मार्मिक गोडसे
या माहितीवर एकदम भयाण शांतता
In reply to अजून एक मनोरंजक बातमी... by डॉ सुहास म्हात्रे
विष्णूबंधू गुप्ता : काही रत्ने
In reply to करविभागातील पूर्व वरिष्ठ by डॉ सुहास म्हात्रे
विडिओ बघाच
In reply to विष्णूबंधू गुप्ता : काही रत्ने by पिजा
तो बोलतोय ते १००% सत्यच आहे
In reply to विष्णूबंधू गुप्ता : काही रत्ने by पिजा
सर, अत्यंत हुकलेला माणूस आहे
In reply to करविभागातील पूर्व वरिष्ठ by डॉ सुहास म्हात्रे
सरकार आजपावेतो किती पैसे जमा
(अ) अजून ३० डिसेंबर २०१६ ही
In reply to सरकार आजपावेतो किती पैसे जमा by पुंबा
म्हात्रे काका, मी
In reply to (अ) अजून ३० डिसेंबर २०१६ ही by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या भावना समजू शकतो. पण,
In reply to म्हात्रे काका, मी by पुंबा
३१ तारखेचे आकडे अखेरचे नसून
In reply to म्हात्रे काका, मी by पुंबा
सरकार आजपावेतो किती पैसे जमा
In reply to सरकार आजपावेतो किती पैसे जमा by पुंबा
काळा पैसा केवळ नोटा आल्या
In reply to सरकार आजपावेतो किती पैसे जमा by पुंबा
+१००
In reply to काळा पैसा केवळ नोटा आल्या by अनुप ढेरे
पण ढेरेशास्त्री, बँकेत पैसे
In reply to काळा पैसा केवळ नोटा आल्या by अनुप ढेरे
बरोबर. सो यशापयश इन्कम
In reply to पण ढेरेशास्त्री, बँकेत पैसे by पुंबा
अर्र.. गायब झाला प्रतिसाद.
In reply to बरोबर. सो यशापयश इन्कम by अनुप ढेरे
पैसा बँकेत गेला म्हणजे तो
नोटाबंदी अयशस्वी झाली आहे असा अपप्रचार करत असलेल्यांसाठी काही खास बातम्या...
१. I-T dept’s black money cell flooded with calls, emails कोणाला काळाबाजारासंबंधी माहिती असल्यास ती सरकारला कळविण्यासाठीचा इमेल अॅड्रेस : blackmoneyinfo@incometax.gov.in २. Cashless means less cash, not no cash: Arun Jaitley ३. Demonetisation not last action against corruption: NITI Ayog chief hints at more schemes ४. People who were claiming that demonetization will not lead to any effective action against black money, should keep track of their claims’ laughable futility in the following continuously updated blog…आणि नवीन वर्षानिमित्त येणार्या महत्वाच्या सुवार्तांपैकी पहिली !!!
Law against 'benami' properties to be operationalised soon: PM Modi "अजून पुढे काय करणार, अजून पुढे काय करणार ?" असे विचारणार्यांना त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे एक एक करत मिळत जातील असे दिसू लागले आहे ;) :)अरे..
In reply to पैसा बँकेत गेला म्हणजे तो by डॉ सुहास म्हात्रे
४९ दिवस झाले
नाही मिळाले तरी चालतील ..
In reply to ४९ दिवस झाले by कपिलमुनी
एकीकडे म्हणतात नोटाबंदीमुळे
In reply to नाही मिळाले तरी चालतील .. by चौकटराजा
भूतपूर्व प्लॅनिंग कमिशन मेंबर
नोटाबंदीमुळे बॅकांमध्ये जमा
नोटबंदी व सरकारच्या बाजूने
In reply to नोटाबंदीमुळे बॅकांमध्ये जमा by मार्मिक गोडसे
नरेंद्र जाधवांचे विचार
In reply to नोटबंदी व सरकारच्या बाजूने by संदीप डांगे
आपल्या विरोधी बाजूच्या मतांवर
In reply to नोटबंदी व सरकारच्या बाजूने by संदीप डांगे
या प्रतिसादाचे उत्तर खुद्द
In reply to आपल्या विरोधी बाजूच्या मतांवर by डॉ सुहास म्हात्रे
नोटबंदी आत्ताच कशाप्रकारे करणे गरजेचे
In reply to या प्रतिसादाचे उत्तर खुद्द by संदीप डांगे
व्हिक्टीम कार्ड कि काय ते
In reply to नोटबंदी व सरकारच्या बाजूने by संदीप डांगे
एक्झॅक्टली.. हा पैसा जो जमा
In reply to नोटाबंदीमुळे बॅकांमध्ये जमा by मार्मिक गोडसे
सौरा जी,
In reply to एक्झॅक्टली.. हा पैसा जो जमा by पुंबा
मान्य. लोकांनी, मोदींच्या
In reply to सौरा जी, by विशुमित
जर खरंच कायदा सुव्यवस्थेचा
In reply to सौरा जी, by विशुमित
आतापर्यंतचं जाऊ द्या, पण
In reply to जर खरंच कायदा सुव्यवस्थेचा by हतोळकरांचा प्रसाद
होऊ शकतोच कि, नाकारण्यासारखं
In reply to आतापर्यंतचं जाऊ द्या, पण by पुंबा
परिस्थिती बिघडलेली होती असे
In reply to होऊ शकतोच कि, नाकारण्यासारखं by हतोळकरांचा प्रसाद