Skip to main content

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 14/11/2016 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !

वाचने 134078
प्रतिक्रिया 637

प्रतिक्रिया

गुरुमुर्तीम्नी दिलेल्या सल्ल्या प्रमाणे ४ जणांच्या फॅमिलीत २.५ लाख प्रत्येकी प्रमाणे १० लाख बँकेत डिपॉझीट करु शकतील .

पुणे: मोस्टली कॅशलेस व्यवहार करत असल्यामुळे अजूनतरी फारसा त्रास नाही. घरासमोरच SBI ATM असल्यामुळे आणि कधी नाही ते त्यात वेळोवेळी पैसे लोड होत राहिल्यामुळे ऐकून ४ हजार काढल्येत. रांगेतला एकूण वेळ १ तास. लोकही शांतपणे रांगेत उभे होते. त्यामुळे लोकांचा सपोर्ट दिसतोच आहे. आता गावाकडची परिस्थिती(मराठवाड्यतातलं तालुक्याचं ठिकाण): तीन nationalized बँका. तीन ATM . दिवाळीच्या ४ दिवसात हे तीनही ATM बंद होते. आजूबाजूच्या दोन तालुक्याच्या ठिकाणची हीच परिस्थिती. ह्यावरून आताची कल्पना करता यावी. ८ तारखेनंतर मार्केट कमिटीत सोयाबीन/कापसाचे व्यवहार बंद. व्यापारर्यांकडे कॅश नाही(आठवड्याला काही हजाराची लिमिट, ती तर नुसत्या उचल देण्यातच जाईल) अन शेतकरी cheque घ्यायला तयार नाहीत. इतरत्र हजाराचे ८०० मात्र करून मिळत होते. बहुदा पुढच्या आठवड्यात नगरपालिकेचे election झाल्यावर सुरु होतील असा अंदाज. नगरपालिकेच्या निवडणुका सुरु आहेत, त्याचा लेटेस्ट अपडेट : प्रत्येक वॉर्डात १५ लाखाचा खर्च, प्रभागात ५० (२ ते ३ हजाराचा रेट).तर ह्यांच्याकडे पैसे आले कुठून? ज्याला manage करायला जमलंय तो नव्या २ हजाराच्या वाटतोय, बाकीच्ये हजार, पाचशेच्या जुन्या वाटतायत. हे बघितल्यावर काळ्या पैश्याचं काही होईल असं वाटत नाही. पुढे बघूया काय होतंय, पुण्यात महापालिकेच्या अन आमच्याकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेतच. ह्यावरून एकच दिसतंय, नितीश कुमारांनी म्हटल्याप्रमाणे मोदी वाघावर बसयेत, त्यांना आता आपल्याला ह्या कडीचं त्या कडीला नेल्याशिवाय गत्यंतर नाही.

हे खरे असेल तर मात्र प्रकरण गंभीर आहे.... खोटे असेल तर बरेच आहे.. खरे असेल तर किती जणांना माहीत होते ही विचार करण्यासारखी गोस्ट असेल. खोटे असेल तर बरेच आहे... http://currentnews.in/bjp-knew-demonetizing-deposited-huge-amounts-banks-cpm-sena-warns-modi-peoples-anger/ If Mr. Dubey knew this, question is how many more knew this... Though the Centre has claimed that the decision to demonetise Rs 500 and Rs 1,000 notes were known only to a handful of people, the story was broken by a Kanpur-based Hindi journalist almost a fortnight before the dramatic late evening announcement by the Prime Minister. Brajesh Dubey of the Hindi daily Dainik Jagran is gleefully accepting congratulatory telephone calls and envious looks from his peers for his story of October 27 that also confidently reported that Rs 2,000 notes would be issued as a replacement. Talking over the phone, Dubey, who is on the business beat for the Hindi daily, did not reveal his source for the story citing the “ethics of journalism”, but said it came from “informed and long-standing sources”. It was done routinely, he said and did not draw attention even from colleagues, forget readers, until the November 8 “surgical strike” on black money — an event that was so “top secret” that ministers were reportedly “quarantined” after the cabinet meeting where they were informed of the decision. Dubey is happy now that the story has not only been confirmed by subsequent developments but also that his byline has been noticed by the fraternity everywhere. “It is a normal yet a good feeling to have filed a story which subsequently was confirmed by the announcement of the Prime Minister,” he said. Sources in the newspaper, however, contended that Dubey got a whiff of the coming event on the sidelines of the board meeting of the Reserve Bank of India (RBI) — the first under new Governor Urjit Patel — which was held on October 20 in Kanpur. Opposition parties have been accusing the ruling Bharatiya Janata Party (BJP) of having leaked news of the impending demonetisation to those close to it.

In reply to by जयंत कुलकर्णी

2000 हजाराची नोट येणार हे खरंच बरेच दिवस आधीपासून माहित होते माध्यमात.. खरेतर आरबीआय ने याचे सूतोवाच खूप आधीच रघुराम राजन असताना केले होते,

आता फक्त हेच सांगायचे शिल्लक होते. ______________________________________________________ नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात सध्या चलन कलह सुरु आहे. विरोधकांनी सभागृहात मोदी सरकारला धारेवर धरले असताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला मुस्लिमांशी जोडत सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा सर्वात जास्त त्रास हा मुस्लिमांना होत असल्याचे वक्तव्य सिब्बल यांनी लखनऊमध्ये केले. मी दिल्लीच्या चांदनी चौक परिसरात राहतो आणि तेथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे, मी मुस्लिमांशी जोडला गेलो असल्याने मला याबाबत माहिती आहे असे सिब्बल म्हणाले. बहुतांश मुस्लिमांचे बँकेत खाते नसल्यामुळे सरकारच्या नोटाबंदीमुळे या समाजावर सर्वात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी लखनऊमध्ये अल्पसंख्यांकांच्या बैठकीला संबोधित करताना सिब्बल यांनी नोटाबंदीच्या निर्णय हा मुस्लिमांशी जोडल्याचे वृत्त ‘आजतक’ने दिले आहे. मुस्लीम समुदायातील छोटा किंवा मोठा व्यापारी व्याज मिळविण्याच्या हेतूने कमवत नसल्यामुळे तो बँकेत खाते उघडत नसल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांचा पैशाशी काहीही संबंध नसतो, असे सांगत या निर्णयामुळे दहशतवादाला आळा घालण्यास कोणतीही मदत होणार नाही, असेही सिब्बल म्हणाले. तसेच सरकारने घेतलेल्या नोटबंदीमुळे गरिबांनाही कोणताच फायदा होणार नाही त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सरकारने उचलले घातक पाऊल अाहे, असे ते म्हणाले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/muslims-are-facing-more-proble…

पुढच्या पायर्‍या... मागच्या जनधन योजना, करचुकव्यांना माफीयोजना, इत्यादींनंतर आलेल्या डिमॉनेटायझेशन या पायरीनंतर तिच्यातून मिळणारे धागेदोरे पकडून अर्थगुन्हेगारांना कसे पकडले जाईल या पुढच्या पायर्‍यांचे संकेत येऊ लागले आहेत... १. करविभागाने २.५ लाखापेक्षा जास्त रोख रक्कम खात्यात जमा केलेल्यांना नोटीसा पाठवणे सुरू केले आहे. आजतागायत काही लाख नोटीसा लोकांपर्यंय पोचल्या आहेत. यात पांढरा पैसा असलेले लोक त्याचा पुरावा देवून मोकळे होतील. ज्यांच्याकडे तसा पुरावा नाही त्यांना (अ) कर+दंड भरावा लागेल आणि/किंवा (आ) दुसर्‍या करता आपले खाते मजूरीने दिले असल्यास त्या दुसर्‍या मोठ्या चोराचे नाव द्यावे लागेल... याने मोठे मासे आपोआप सबळ पुराव्यासह गळाला लागतील. २. बँकांत बसवलेल्या सीसीटीव्हीच्या रेकॉर्डची तपासणी, बँकेचे ट्रांझॅक्शन रेकॉर्ड व इतर प्रकारे मिळालेल्या माहितीवरून (आयकर इंटेलिजन्स) बँकेत केलेल्या "घोळदार व्यवहार" उघडकीसा आणले जावू लागले आहे. त्यातली ही एक बातमी... I-T cell finds Rs 40 crore deposit in banned notes at Delhi bank अश्या एका बँक मॅनेजरला पकडले की त्याच्याकडून बर्‍याच संखेने लहानमोठे "गंदे मासे" गळाला लागतील. ३. जुन्या नोटा घेऊन सोने विकणार्‍या सोनारांवर तर पहिल्यापासून डोळा आहेच ! अजून बरीच हुकुमाची पाने हळू हळू उघड होतील असे दिसते आहे. हा चोर पोलिसांचा खेळ काळाबाजरवाल्यांनी तो खूप काळापूर्वी सुरू केला आणि आता तो सरकारने आपल्या अटींवर संपवावा (पक्षी : तो नगण्य करण्याइतपत ताब्यात आणावा) ही अपेक्षा आहे.

डॉ म्हात्रे अचुक बोललात !! पंतप्रधानांनी ह्या सर्वांची सुरुवात केलेली आहे. नोटाबंदीची सुरुवात करताना गोपनियता राखणे महत्वाचे होतेच कारण आपल्या ईथे कुंपण शेत जास्त खाते. बँकेतले लोक, शासकीय खात्यातले लोक सरकारच्या नाका खालीच गैर प्रकार करतात, सरकारच्या ह्या बोल्ड मुव्ह मुळे सामान्य नागरीकांत एक जोश आलेला आहे, बर्याच ठिकाणी ५००/१००० च्या नोटाबद्दल गैरप्रकार सुरु आहेत अशी माहीती / टिप ही सामान्य जनतेनेच पुढे येऊन दिलेली आहे. आता सुद्धा जनतेने जागरुक राहुन अश्या संभावित प्रकाराची माहिती असल्यास सरकारच्या निदर्शनास आणावी.

29 तारखेपासून खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा पूर्णपणे शिथिल करण्यात आली आहे. आता पाहिजे तितकी रक्कम खातेधारक काढू शकतील. https://m.rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=10752&Mode=0

In reply to by संदीप डांगे

फक्त नवीन किंवा चालू नोटांमध्ये केलेले डिपॉजीट्स असतील तर काढण्यासाठी लिमिट नाही.

नोटाबंदी कारवाईचे अधिकाधिक परीणाम पुढे येत आहेत... १. Demonetisation leads to highest ever surrender of Maoists in a month नोटाबंदीनंतर आतापर्यंत ४६९ माओवादी किंवा त्यांचे पाठिराखांनी समर्पण केले आहे. यामागे त्यांच्या शस्तास्त्रे, दारूगोळा, औषधे आणि इतर सामुग्री मिळविण्यासाठी मिळणारा पैसा बंद झाला आहे हे महत्वाचे कारण आहे. त्याशिवाय, त्यांच्या स्थानिक भागांत होत असलेला विकासही या समर्पणामागे आहे. २. बँकात रु५०० व रु१००० च्या जुन्या नोटाम्च्या स्वरूपात जवळ जवळ रु८.५ लाख कोटी (नोटा खात्यात टाकणे : रु८,११,०३३ कोटी + नोटा बदल : रु३३,९४८ कोटी) जमा झाले आहेत व रु२,१६,६१७ कोटी नकद चेक किंवा एटीएमने काढली गेली आहे. म्हणजे, पूर्वीपेक्षा रु६ लाख कोटीपेक्षा जास्त पैसे बँकिंग व्यवस्थेत खेळू लागले आहेत. ३. यापुढे जुन्या नोटा फक्त आरबीआयच्या तडक देखरेखीखाली असलेल्या ठिकाणांवरच स्विकारत असलेल्याने त्या नोटा काळाबाजार्‍यांना काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरणे कठीण असल्याने, बँकांतून पैसे बाहेर काढण्यावरच्या सीमा उठवलेल्या आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

४. सशस्त्र सीमा बलाने झारखंडमधिल नक्षल अतिरेक्यांकडील, जुन्या नोटांच्या स्वरूपातले, रु३१ लाख पकडले.

In reply to by मोदक

फरक आहे... भारतीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत एकून पाच सशस्त्र पोलिस दले आहेत. त्यांना एकत्रितपणे "केंद्रिय सशस्त्र पोलीस बल उर्फ Central Armed Police Forces (CAPF)" असे म्हटले जाते. सीमा सुरक्षा बल उर्फ Border Security Force (BSF) : हे दल मुख्यतः शांतता काळात (युद्ध जाहीर केलेले नसताना) भारताच्या सीमेची व 'लाईन ऑफ कंट्रोल'चे रक्षण व तेथिल अवैध आंतरराष्ट्रीय माल वाहतूक (तस्करी) थांबवणे, ही कामे करते. हे बल भारताच्या सीमेवरची "फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स" आहे आणि जगातले सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल आहे. सशस्त्र सीमा बल उर्फ Sashastra Seema Bal (SSB) : हे दल भारत-नेपाळ सीमेचे रक्षण आणि तेथिल अवैध माल वाहतूक (तस्करी) थांबवणे, ही कामे करते. केंद्रिय राखीव पोलिस दल उर्फ Central Reserve Police Force (CRPF) : या दलाचे मुख्य काम देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यास केंद्र व राज्यसरकारांना मदत करणे हे आहे. याच्यात The Rapid Action Force (RAF) व Commando Battalion for Resolute Action (COBRA) हे विभागही सामील आहेत. केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल उर्फ Central Industrial Security Force (CISF) : हे दल भारतीय औद्योगीक व व्यापारी महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचे काम करते. हे दल विमानतळांच्या सुरक्षेचे काम करताना बहुतेकांनी पाहिले असेलच. जरूर पडल्यास, हे दल आपत्तीकालातील मदतीसाठी (डिझास्टर मॅनेजमेंट) आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाची मदत करण्यास पाचारण केले जाते. भारत-तिब्बत सीमा पुलिस बल उर्फ Indo-Tibetan Border Police (ITBP) : १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर, भारत-चीन (मुख्यतः चीनचा तिबेट प्रांत) सीमेचे रक्षण करण्यासाठी हे दल उभारले गेले. या दलाला नैसर्गिक आपत्तीकालात काम करण्याचे व त्यातल्या काही तुकड्यांना न्युक्लिअर, बायॉलॉजिकल व केमिकल आपत्तीकालात काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

महत्त्वाची माहिती आहे. कृपया मराठी विकि मध्ये डकवण्यास परवानगी देता येईल का? किंवा तुम्हीच लावली तर अतिशय उत्तम! हा दुवा आहे. https://mr.wikipedia.org/wiki/पोलीस

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मात्र ते काम करताना "राज्य पोलिस दल (जे राज्य गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असते)" आणि "केंद्रिय पोलिस दले (जी केंद्रिय राज्यमंत्रालयाच्या अखत्यारीत असतात)" यांच्यातला फरक स्पष्ट होईल असे पहा. म्हणजे वाचकांच्या मनात या दोन स्वतंत्र व्यवस्थांबद्दल गोंधळ होणार नाही.

मी आज अशा मेडिकल शॉपच्या शोधात गेलो जिथे स्वाईप आहे. दोघा तिघा कडे नव्हते. त्याना सांगितले बघा आपल्याकडे सोय नसल्याने दुसरीकडे जातोय. कार्डावर औषधे मिळाली.

In reply to by चौकटराजा

म्हणजे कार्ड नसल्याने दुसरीकडे जातो म्हटल्यावर त्यांनी लपवलेले मशीन बाहेर काढले की दुसरीकडे कोठे कार्ड असलेल्या दुकानात खरेदी केलीत ?

Modi asks BJP MPs, MLAs to submit bank transaction details to Amit Shah हे धाडसी पाऊल उचलणारा दुसरा कोणता नेता भारतीय राजकारणात झालेला नाही. इतर देशांतही असे कधी झाले असे ऐकले-वाचलेले नाही ! पंतप्रधान मोदींनी भाजपच्या सर्व केंद्रस्तरीय व राज्यस्तरीय निर्वाचीत सदस्यांना त्यांच्या ०८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडातले बँक ट्रांझॅक्शन्सचे तपशील पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे देण्याचे आदेश दिले आहेत. मोदींच्या भ्रष्टाचारविरोधी कारवायांच्या प्रामाणिक हेतूंवर आता तरी विश्वास ठेवायला हरकत नाही. जमल्यास इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनीही अशीच कारवाई करून "भष्टाचाराला आमचाही विरोधच आहे" या त्यांच्या दाव्याला सक्रिय पुष्टी द्यायला हवी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हो पण काही पोटदुखे म्हणत आहेत की "भाजपचे खासदार सर्व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करायला दुधखुळे थोडीच आहेत?"

In reply to by खटपट्या

खटपट्या शेट मोदी साहेबानी खासदारांना आपले हिशेब सादर करायला कशासाठी सांगीतले आहे याचे मला वाटणारे विश्लेषण असे आहे. जे खासदार स्वच्छ आहेत असे लोक कोण आहेत याची यादी करणे आणि त्यांना पुढच्या अडीच वर्षात विधायक कामाला लावणे आणि जे खासदार संशयास्पद परिस्थितीत आहेत त्यांना सध्या आहेत तसेच बेंच वर ठेवणे आणि २०१९ च्या निवडणुकात तिकीट न देणे यासाठी आहे. त्याचा आयकर आणि इतर भ्रष्टाचार इ शी संबंध नाही. (ही मला आतून वाटणारी भावना (GUT FEELING) आहे. श्री अमित शहा याना कोणतेही मंत्रिपद न देता केवळ पक्षाच्या अंतर्गत कार्यकारिणीवर मजबूत पकड बसवण्यासाठी ठेवले आहे ते उगाच नाही. बाकी लोक त्याच्यावर कितीही कावकाव करू द्या. काही मिपाकर त्याच्या वर एवढी धुळवड खेळत आहेत त्याचे मला हसूच येते.

वरील बातमी म्हणजे 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंम्बर (अजून महिना बाकी आहे) ह्या काळातला सगळ्यात मोठा विनोद असावा.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

बातमी पूर्ण शब्द आणि शब्द वाचा, वेगळ्या पूराव्याची गरज नाही, तसेच असंच काँग्रेस किंवा आप ने केलं असतं तर काय प्रतिक्रिया असत्या त्याचाही अंदाज लावावा, ;) 1. राहुल गांधीने आपल्या पक्ष सदस्यांना आपले बँक अकाउंट व्यवहार सोनिया गांधीना सादर करायला सांगितले, 2. केजरीने आपल्या पक्ष सदस्यांना आपले बँक अकाउंट व्यवहार पक्ष अध्यक्षांकडे सादर करायला सांगितले, जोक कळला नसेल तर इस्कटून सांगावा असे तुम्ही तरी नाही .

In reply to by संदीप डांगे

काँग्रेस किंवा आप ने केलं असत तर नक्कीच गहजब झ्हाला असता असे आपले म्हणणे दिसते. म्हणजे ममा मॅडम अथवा केजर्याच्या भ्रष्टाचाराची असण्याची आपल्याला इतकी खात्री आहे का ?

In reply to by संदीप डांगे

मला खरंच कळलं नाही कि यात आक्षेप घेण्यासारखं काय असू शकतं. एक राजकीय पक्षाने त्यांच्या अंतर्गत विषयावर (अंतर्गत याअर्थाने कि त्यांच्या आमदार/खासदार वगैरे लोकांचे बँक व्यवहार कसे आहेत किंवा असावेत) काही निर्णय घेतला आहे. शिवाय त्यांनी असेही म्हटलेले नाही कि आम्हाला तपशील दिला कि झाले, त्यानंतर आयकर विभाग काही करणार नाही. हि समांतर पायरी नाहीये का? आणि विशेष म्हणजे - मोदींनी हि माहिती कशासाठी गोळा करायची ठरवली आहे याबद्दल "तथाकथित सूत्रांनी" काहीही स्पष्ट केलेले नाही. म्हणजे हि माहिती या काळात कोणीकोणी कसे कसे पैसे पांढरे केले यासाठी आहे कि आमदार/खासदार लोकांच्या संपत्तीचा बेंचमार्क आहे ज्यावर इथून पुढे लक्ष ठेवण्याचे ठरवले आहे? म्हणजे मला असं म्हणायचं आहे कि, समजा हि माहिती जमवून मोदींनी ३१ डिसें. नंतर काहीच केले नाही तर हा मुद्दा नक्कीच त्यांच्या विरोधात वापरता येईल कि, घाई कशाला? असं घाईघाईने डायरेक्ट ह्या निर्णयाला विनोद वगैरे ठरवणे मला तरी पटत नाही, बायस्ड ठरणार नाही का ते? आणि केजरीवाल आणि राहुल गांधींचं म्हणाल तर - त्यांनीहि असे निर्णय घेतले तर आनंदच आहे. केजरीवालांनीही त्यांची फंडींग त्यांच्या संकेतस्थळावर घोषित केली होतीच कि, पण नंतर काही लोकांनी त्यांची माहिती तिथे नसल्याचा दावा केल्यावर संशय निर्माण झाला. म्हणजे काय तर कोणीही करू द्याकी हो, फलनिष्पत्ती नाही झाली तर तो त्यांच्या विरोधातला मुद्दा बनेलच की!

In reply to by संदीप डांगे

का विनोद आहे हे स्पष्टपणे सांगता का? का बॅंक स्टेटमेंट मागितल्यावर भाजप चे लोक सगळे पुरावे नष्ट करतील अथवा ८ नोव्हेम्बर पूर्वीच त्यांना हे सर्व माहीत होते असे आपले नाकी म्हणणे आहे काय ? असे छातीठोक पणे सांगता ? खरंच इथले अनेक सदस्य म्हणत आहेत त्याप्रमाणे उगीचच लोकांची दिशाभूल करू नका

मोदींच्या भ्रष्टाचारविरोधी कारवायांच्या प्रामाणिक हेतूंवर आता तरी विश्वास ठेवायला हरकत नाही. जमल्यास इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनीही अशीच कारवाई करून "भष्टाचाराला आमचाही विरोधच आहे" या त्यांच्या दाव्याला सक्रिय पुष्टी द्यायला हवी.
हे व्हायलाच हवे, फक्त जानेवारी २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंतच्या बँक ट्रांझॅक्शन्सचा तपशील द्यावा. अर्थात सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी.

In reply to by मार्मिक गोडसे

जानेवारी २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंतच्या बँक ट्रांझॅक्शन्सचा तपशील द्यावा. अर्थात सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी. याला १०० टक्के पाठींबा. किंबहुना मी पुढे जावून असे म्हणेन की... (अ) कोणत्याही स्तरांच्या निवडणूकीचा अर्ज भरताना, अर्जला उमेदवाराच्या गेल्या पाच वर्षांचा आर्थिक लेखाजोखा जोडणे जरूर असावे व ती माहिती निवडणूक आयोगाच्या संस्थळावर प्रसिद्ध व्हावी व आयकर विभागाकडे अधिकृरित्या जावी; आणि (आ) निवडून आल्यावर दर वर्षीचा आर्थिक लेखाजोखाही निवडणूक आयोगाच्या संस्थळावर प्रसिद्ध व्हावा व आयकर विभागाकडे अधिकृरित्या जावा. === मात्र सद्या परिस्थिती अशी आहे की, राजकीय पक्ष त्यांच्या आवक-जावकीचा लेखाजोखा आयकत विभागाला आणि निवडणूक आयोगाला देण्यात टाळाटाळ करतात. मुख्य म्हणजे तसे करता यावे यासाठी सोईचे कायदे त्यांनीच गेले ७० वर्षे बनवलेले आहेत. या पार्श्वभूमीवर स्वत:च्या पाठीराख्यांना, त्यांनी गोलमाल केली असल्यास, ती उघडी पडेल अशी कृती करायचा आदेश देणे, हे धाडसाचेच पाऊल म्हणावे लागेल. हे पहिले पाऊल असावे व त्यानंतर पुढची पाऊलेही उचलली जातील अशी आशा ठेवायला जागा आहे. बघुया, १००० किमीची वाटचाल पहिल्या पावलानेच सुरू होते असे म्हणतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उमेदवारांचा लेखाजोखा निवडणुक आयोगाकडे वा आयकर विभागाकडे जावा हे उत्तम, पण संस्थाळावर तो प्रदर्शीत होऊ नये. आर.टी.आय. वगैरेच्या मार्फत अशी माहिती ज्याला हवी आहे त्याने ति जरुर मिळवावी, पण आपली सांपत्तीक स्थिती सार्वजनीक करण्यास कोणालाही बाध्य करु नये.

In reply to by अर्धवटराव

सार्वजनिक कामासाठी आयुष्य झोकून देत असल्याचे दावे करणार्‍या आणि जनतेच्या कराचे शेकडो/लक्ष पटींनी जास्त पैसे हाताळायच्या संधीसाठी हिरीरीने झगडणार्‍या लोकांनी आपले वैयक्तीक अर्थिक व्यवहार सार्वजनिक ठेवायला काय हरकत असावी ? आर टी आय ने जेवढी मिळू शकते तेवढी तरी माहिती संस्थळावर ठेवून आपले व्यवहार पारदर्शक आहेत हे सिद्ध करायला त्यांचा विरोध का असावा ? थोडक्यात, कर नाही त्याला डर कशाला ? या एकाच निर्णयाने राजकारणातली बहुतेक घाण साफ होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

निवडणुकीला उभं राहाताना सगळ्यांना आपापले आर्थीक अ‍ॅसेट्स आयोगापुढे डिल्कीअर करावेच लागतात बहुतेक. बँक खाते व इतर वैध मार्गाने मिळवलेली संपत्ती २४ तास आय.टी. डिपार्टमेण्टच्या समोर हजर असते. त्यामुळे आवष्यक त्या एजन्सीपुढे आवषयक ति माहिती सादर असते. त्या माहितीला पब्लीक प्रॉपर्टी बनवु नये. लोकांनी नेत्यांचं मुल्यमापन त्यांचे निर्णय व काम बघुन करावं, त्यांची संपत्ती बघुन नाहि. सांपत्तीक स्थितीच्या परिक्षणाला काहि लिमीट नाहि. आज बँक खातं उघड करा, उद्या सगळ्या कुटुंबाचा लेखाजोखा द्या, परवा शेअर्सचे परतावे डिक्लीअर करा, त्याउपर हा स्टॉकचा व्यवहार कुठलंही लॉबींग/आतली माहिती मिळवण्याचा प्रयत्न न करता केला आहे हे सिद्ध करा... जनसामान्यांना कुणाच्याच बाबतीत इतकं नाक खुपसायची पर्मीशन देऊ नये. या व्यवहारांचं परिक्षण करायला ज्या अधिकृत संस्था आहेत त्यांनी आपली रेग्युलर प्रोसेस म्हणुन, व ज्यांना त्यातलं काहि कळतं त्या लोकांनी आपले आर.टी.आय वगैरे सेवा वापरुन हि परिक्षणं करावी. अन्यथा कॉमनमॅनला नेत्यांच्या सांपत्तीक स्थितीवरुन जोखायची सवय लाऊ नये असं मला वाटतं.
या एकाच निर्णयाने राजकारणातली बहुतेक घाण साफ होईल.
घाण करण्याएव्हढी ताकत कमावलेले राजकारणी बँक व्यवहारांचे ट्रॅप अगदी सुरुवातीला तोडुनच पुढे येत असावेत. अन्यथा कुणिही सामान्य बँक मॅनेजर या नेत्यांना आपल्या तालावर नाचवेल.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोण करतंय? ज्यांचे डोळे उघडे आणि मेंदू विचार करण्यायोग्य आहे त्यांची दिशाभूल शक्य नसते. १. स्वतः आपल्या खासदार आमदारांना बॅन्केच्या व्यवहारांचा तपशील मागणे फक्त 'शोबाजी' आहे. (हे काम आयकर विभाग, ईडी किंवा तत्सम सरकारी विभाग करु शकतो की... आवश्यकता असेल तेव्हा.) २. आपले खासदार आमदार आपला काळापैसा आपल्याच बॅन्क अकाउंटमधे ठेवतात असे समजणे भाबडेपणाची शंभरावी लेवल असावी. ३. ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान खासदार-आमदार आपल्याच बॅन्क खात्यातून गडबडीचे व्यवहार करतील असे समजणे भाबडेपणाची हजारावी लेवल असावी. खासदार-आमदार एवढे मूर्ख असतील असे कुणाला वाटत असेल तो मूर्खांच्या नंदनवनात सुखी राहो. ४. आमदार-खासदारांनी आपले बॅन्क व्यवहार तपशील आयकर विभागाकडे नव्हे तर पक्षाध्यक्षाकडे सादर करावे - पक्षाध्यक्ष कोण लागून गेलेत? भारताचे ऑडिटर जनरल का काय? कोण्या पक्षाचा पक्षाध्यक्ष हा सरकारी अधिकारी व सरकारी माणूस नसतोय. आपलाच पक्षाचा माणूस आपल्याच पक्षाच्या माणसाचे डिटेल्स तपासणार आणि त्याला क्लिनचीट देणार? हे तर अक्षरशः 'केजरीवाल छाप' झालं. केजरीविरोधी लोकांनी केजरीच्या असल्या क्लिनचीट प्रकरणांच्या उडवलेल्या रेवड्या आठवत आहेत. सैंया भये कोतवाल तो डर काहे का ही म्हणही आठवत आहे. ५. माध्यमांमधे फक्त हेडलाईन्स वाचल्या जातात, कोण जास्त तपशीलात जात नाही, सामान्य माणूस तर नाहीच. "मोदींनी आपल्या खासदार आमदारांना आपले बॅन्क व्यवहार सादर करायला सांगितले" एवढंच सगळीकडे फिरतंय, त्यावर भक्तभाट व स्वयंघोषित निष्पक्ष लोकांची बुद्धीभ्रम करणारी भाषा असेल तर क्या कहने. भक्तभाट लोकांची दिशाभूल होत नसते हे वरील काही प्रतिसादांवरुन लक्षात आलेच. सारासार विचार करण्याची क्षमता हरवलेल्यांना काय समजवायचे. ज्यांना दुसरीही बाजू बघायची आहे त्यांच्यासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी ज्याच्यात्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करुन निर्णय घ्यावा. माझे मत एवढेच आहे की अशी शोबाजी करण्यापेक्षा सर्व पक्षांच्या सर्व आमदार-खासदार-नेत्यांच्या गेल्या दहा वर्षातल्या व्यवहारांची, संपत्तीची चौकशी करावी. जसा भुजबळ आत टाकला तसे सर्वांना आत टाकावे. तेव्हा प्रामाणिकपणाचे, साफ नियतचे गोडवे गायला भाट लोकांची अजिबात गरज नसेल.

In reply to by संदीप डांगे

तुम्ही मिपाकरांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन (भक्तभाट / भाट) टीका करत आहात. सरकारच्या पुढील सर्व धोरणांचा फक्त तुम्हालाच फर्स्टहॅन्ड अंदाज आहे आणि बाकी सगळे लोक बावळट आहेत या थाटाचे प्रतिसाद लिहून तुम्ही स्वतःचे (आणखी) हसे करून घेत आहात. सरकारच्या प्रत्येक धोरणावर इथे बालिश टीका करण्यापेक्षा सरकारी पोर्टल वापरा आणि सरकारला जी काही सुधारणेची आवश्यकता आहे ती सुचवा. (तुम्हाला फक्त गोंधळ उडवून देण्यात रस असल्याने तुम्ही विधायक मार्ग स्वीकारणार नाही याची खात्री आहे) मोठे व्हा.

In reply to by मोदक

तुम्ही मिपाकरांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन (भक्तभाट / भाट) टीका करत आहात. >> कोणत्याही मिपाकरावर कोणतीही टिका केली नाही, वाट्टेल ते ऐकून घेणार नाही. सरकारच्या पुढील सर्व धोरणांचा फक्त तुम्हालाच फर्स्टहॅन्ड अंदाज आहे आणि बाकी सगळे लोक बावळट आहेत या थाटाचे प्रतिसाद लिहून तुम्ही स्वतःचे (आणखी) हसे करून घेत आहात. >> मला काय म्हणायचे आहे ते मी म्हटले. तुम्हाला हसायचे असेल तर हसा की. सरकारच्या प्रत्येक धोरणावर इथे बालिश टीका करण्यापेक्षा सरकारी पोर्टल वापरा आणि सरकारला जी काही सुधारणेची आवश्यकता आहे ती सुचवा. >> मी काय करावे, नाही करावे ह्याबद्दल तुम्हाला सल्ले द्यायला मी नियुक्त केलं नाही. (तुम्हाला फक्त गोंधळ उडवून देण्यात रस असल्याने तुम्ही विधायक मार्ग स्वीकारणार नाही याची खात्री आहे) >> आपली खात्री आपल्याजवळ ठेवा. गोबेल्स निती वापरुन सूर्य उगवायचा राहत नाही मोदकशेठ! मोठे व्हा. >> तुम्ही झालात तेव्हढं पुरेसं आहे.

In reply to by संदीप डांगे

कोणत्याही मिपाकरावर कोणतीही टिका केली नाही, वाट्टेल ते ऐकून घेणार नाही. भक्तभाट लोकांची दिशाभूल होत नसते हे वरील काही प्रतिसादांवरुन लक्षात आलेच हे कुणाला उद्देशून आहे..? मिपावरच्याच प्रतिसादाबद्दल बोलत आहात ना..? मला काय म्हणायचे आहे ते मी म्हटले. तुम्हाला हसायचे असेल तर हसा की. तेच सांगतोय, तुम्ही जे काही म्हणत आहात त्याला काहीतरी बेस असावा किंवा लॉजीक असावे इतकेच. तुम्हाला वाट्टेल ते बोलायला आणि सरकारवर फक्त टीका करायला काँग्रेसने नियुक्त केले असले तर तसे खुलेपणाने मान्य करा - मग कोणी काही विचारणार नाही किंवा सल्ले देणार नाही. मी काय करावे, नाही करावे ह्याबद्दल तुम्हाला सल्ले द्यायला मी नियुक्त केलं नाही. ब्वॉर, संभाषणामध्ये एखाद्याने एखादी सुचना दिल्यानंतर त्यावर किमान विचार व्हावा हा सर्वमान्य संकेत आहे. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि तुम्हाला कोणत्याही सुचनेची आवश्यकता नाही हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. संस्थळासारख्या ठिकाणी व्यक्त व्हायचे असेल तर चार लोकांच्या / पब्लीकच्या सुचना येणारच. त्या नको असतील तर स्वत:चा ब्लॉग काढा आणि आपले एकांगी विचार तेथे लिहा. (बघा - परत एक सल्ला आलाच..!) सामान्य माणसाचा बुरखा पांघरून संस्थळावर व्यक्त होत असाल तर असे सल्ले आणि सूचना स्वीकारण्याची तयारी ठेवा. आपली खात्री आपल्याजवळ ठेवा. ब्वॉर..! गोबेल्स निती वापरुन सूर्य उगवायचा राहत नाही मोदकशेठ! अहो तो गोबेल्स परवडला. तुमच्यासारखे फक्त काळा चष्मा घालून दिसेल त्या मुद्द्यावर टीका करून बुद्धीभेद करणारे लोक जास्ती धोकादायक आहेत. अशी विखारी आणि खोटी टिका करून जर तुमचा काही वैयक्तीक फायदा होत असल्यास तो तुमच्यापर्यंत मर्यादित राहणार मात्र संस्थळाच्या लोकप्रियतेचा फायदा घेवून तुम्ही निर्माण करत असलेले गोंधळाचे वातावरण मोठ्या जनसमुदायाची धोकादायक दिशाभूल करणार नाही का..? (तरी लोकं पुरावे मिळाल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवत नाहीत ही एक चांगली बाब आहे!) बादरायण संबंध जोडून आणि चुकीचे मुद्दे सतत बोलून खोटी टीका करण्यामागे तुमचा आणखी काय उद्देश असू शकतो..? "हेच मुद्दे सरकारपर्यंत पोहोचवा" असे म्हटले तर ते ही तुम्हाला नीटपणे स्वीकारता येत नाहीये. मग आणखी काही उद्देश असल्यास जरूर सांगा. अशी टीका करून खरोखरी काही विधायक बदल होणार असल्यास पहिला मला कळवा, मी नक्की तुम्हाला मदत करेन. :) ************************************ सरकारच्या धोरणांवर टीका करण्यापूर्वी हा हतोळकरांचा प्रतिसाद पुन्हा वाचा. मला खरंच कळलं नाही कि यात आक्षेप घेण्यासारखं काय असू शकतं. एक राजकीय पक्षाने त्यांच्या अंतर्गत विषयावर (अंतर्गत याअर्थाने कि त्यांच्या आमदार/खासदार वगैरे लोकांचे बँक व्यवहार कसे आहेत किंवा असावेत) काही निर्णय घेतला आहे. शिवाय त्यांनी असेही म्हटलेले नाही कि आम्हाला तपशील दिला कि झाले, त्यानंतर आयकर विभाग काही करणार नाही. हि समांतर पायरी नाहीये का? आणि विशेष म्हणजे - मोदींनी हि माहिती कशासाठी गोळा करायची ठरवली आहे याबद्दल "तथाकथित सूत्रांनी" काहीही स्पष्ट केलेले नाही. म्हणजे हि माहिती या काळात कोणीकोणी कसे कसे पैसे पांढरे केले यासाठी आहे कि आमदार/खासदार लोकांच्या संपत्तीचा बेंचमार्क आहे ज्यावर इथून पुढे लक्ष ठेवण्याचे ठरवले आहे?

In reply to by मोदक

अपेक्षित थयथयाट! इतका वैयक्तिक विखाराने भरलेला प्रतिसाद का द्यावा लागतोय तुम्हाला? काय मजबुरी आहे? मुद्देसूद प्रतिसाद करता येत नाहीत तर व्यक्तिगत हल्ले करण्याची नीती...

In reply to by संदीप डांगे

अपेक्षित थयथयाट! थयथयाट कुठे..? सरळ साधा उपाय सुचवला होता. तुम्हाला तो मान्य नाही म्हणून आणखी एक उपाय सुचवला. काय मजबुरी आहे? मला कसलीही मजबुरी नाही. तुम्हालाच मजबुरी आहे. म्हणून खोट्या लिंका द्याव्या लागतात. सरकारच्या धोरणावर ओढून ताणून टीका करावी लागते आणि अनेकदा मांडलेल्या मुद्द्यांवरून सपशेल घुमजाव करावे लागते. याचे पुरावे हवेत का..? मुद्देसूद प्रतिसाद करता येत नाहीत तर व्यक्तिगत हल्ले करण्याची नीती प्रतिसाद नाही हो, "प्रतिवाद" मुळात प्रतिवाद करायला तुमच्या प्रतिसादामध्ये मुद्दे आहेत का..? आहे तो विखारी द्वेष आणि नेहमीप्रमाणे गंडलेले लॉजीक. हतोळकरांचा प्रतिसाद वाचलात का..? वाचल्यावर नीट समजुन घ्या आणि थोडा विचार करा. ..आणि हल्ल्यांचे म्हणत असाल तर अशी व्हिक्टीम मेंटॅलिटी गळे काढायला सोपी असते. त्याने लोकांची कांहीकाळ दिशाभूल करता येते. नेहमी नक्राश्रू ढाळत बसलात तर उरलीसुरली विश्वासार्हताही धुळीस मिळेल.

In reply to by मोदक

मोदक जी, तुम्ही जर कुबेरांचे अग्रलेख नियमितपणे वाचत असाल तर तुम्हाला हा प्रश्न पडायला नको होता.बुद्धिभेद हे शस्त्र गेले अनेक वर्षे वापरले जाते आहे. ज्यांची सारासार विचार करण्याची क्षमता आहे त्यांना वैचारिक गोंधळात टाकून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा हा डाव काही नवीन नाही.

In reply to by तेजस आठवले

कुबेरांचे अग्रलेख पूर्वी वाचत होतो. ते नोकरदार आहेत त्यांना अग्रलेख लिहिण्याचा पगार मिळतो. इथे संदिप डांगे थेटपणे सांगूदेत की त्यांना असे खोटे लिहायचे आणि ओढून ताणून टीका करायचे पैसे मिळतात म्हणून. मी त्यांच्या प्रतिसादांचा प्रतिवाद करणे बंद करतो. इथे मारे तत्ववेत्त्याच्या थाटात कॉमन मॅनचा बुरखा पांघरून यायचे आणि अजेंडा राबवत लोकांची दिशाभूल करायची याला काय अर्थ आहे..?

In reply to by मोदक

बरोबर, अगदी मनातले बोललात. मी पण कुबेरांचे अग्रलेख आता रोज वाचणे सोडून दिले आहे. याकूब मेनन चा अग्रलेख तर आहेच. अगदी मागच्या आठवड्यातल्या अग्रलेखात पण काश्मीर समस्येबाबत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना काहीतरी करून दाखवणे गरजेचे होते अशा थाटाचे विधान केलेले होते.त्यामुळे भारतीय पंतप्रधानांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या पातळीवर आणून ठेवल्यासारखे झाले. त्यामुळे शोबाजी हा शब्द खटकला नाही इथे. बाकी कोणाचा थयथयाट होतो आहे हे आम्हा वाचकांना समजते आहेच. कोणी काही एक गोष्ट करत असेल तर मोडता घालणे ही पहिली पायरी. आणि त्यावर काही बोलले की आरडाओरड करायची ही दुसरी पायरी.

In reply to by मोदक

इथे संदिप डांगे थेटपणे सांगूदेत की त्यांना असे खोटे लिहायचे आणि ओढून ताणून टीका करायचे पैसे मिळतात म्हणून. मी त्यांच्या प्रतिसादांचा प्रतिवाद करणे बंद करतो.
मोदक, तुम्ही माझी इथे थेट बदनामी करत आहात. माझा तोल जाऊन मी काहीतरी असभ्य वर्तन करावे व बॅन व्हावे किंवा सरळ इथून निघून जावे असे काही तुमच्या अजेंड्यात असेल तर, डोन्ट वरी, असे काहीही होणार नाही. इथे काय खोटे लिहिले आहे ते सिद्ध करा, ओढून ताणुन टिका हा प्रत्येकाच्या पर्सेप्शनचा प्रश्न आहे. पण मी इथे पैसे घेऊन लिहितो हा गंभीर आरोप आहे. तो तुम्ही पुराव्यासकट सिद्ध करा. लै झालं च्यायला.

In reply to by संदीप डांगे

शब्द सांभाळा.. च्यायला वगैरे कशाला म्हणताय..? तुम्ही इथून जावे वगैरे काहीही माझ्या अजेंड्यात नाही. मुळात माझा कसलाही अजेंडाच नाही. माझी भूमीका इतकीच आहे की जर कोणी काही लिहीत असेल त्याला योग्य ते पुरावे असावेत नसेल तर स्वत:च्या भूमीकेशी प्रामाणिक असावे. तुम्ही १००% सरकार विरोधी भूमीका मांडत असाल तर तसे मान्य करा आणि विरोध सुरू ठेवा. फक्त वैयक्तीक विरोध करताना लोकांच्या नावाखाली स्वत:चा अजेंडा रेटू नका. ताकाला जाऊन भांडे लपवणे वगैरे भ्याड प्रकार करू नका इतकेच..! तुम्ही दिशाभूल करणारे, ओढून ताणून भाजपा विरोधी विशिष्ट अजेंडा राबवणारे प्रतिसाद देत आहात आणि त्यावर प्रतिवाद न करता पळ काढता हे अनेक ठिकाणी आणि या धाग्यावर सिद्ध झाले आहेच. तुम्ही या धाग्यावर लिहिलेल्या गोष्टींना काहीतरी बेस आहे का..? तसेच मिपावर इतर ठिकाणी तुमच्या प्रतिसादांमध्ये दिसणारा विखार तुमचा अजेंडा दाखवत नाही असे तुमचे म्हणणे आहे का..? तुमच्या पसंतीचे नसले तरी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रातिनिधींना शिवीगाळ करणे किंवा मिपासदस्यांना भाट* म्हणणे कोणत्या सभ्यतेत बसते ते आधी सांगा मग पुरावे वगैरे मागा. तुमच्यावर आरोप झाले तर इतके चवताळत आहात मग तुम्ही मिपाकरांवर भाट म्हणून केलेल्या आरोपांचे काय..? *भाट शब्दाचा अर्थ सांगा बघू.

In reply to by मोदक

तुम्ही इथे 'पैसे खाऊन प्रतिसाद देतो' असा स्पष्ट माझे नाव घेवून आरोप केलाय, तो सिद्ध करा, पहिले दुसरं ची नाटकं नकोत,

In reply to by संदीप डांगे

इथे काय खोटे लिहिले आहे ते सिद्ध करा, ओढून ताणुन टिका हा प्रत्येकाच्या पर्सेप्शनचा प्रश्न आहे. पण मी इथे पैसे घेऊन लिहितो हा गंभीर आरोप आहे. तो तुम्ही पुराव्यासकट सिद्ध करा. लै झालं च्यायला.
मी भाजपचा दलाल आहे अश्या स्वरूपाचा गंभीर आरोप तुम्ही माझ्यावर एका धाग्यावर केला होता. तो कधी पुराव्यासकट सिद्ध करताय?

In reply to by संदीप डांगे

http://www.misalpav.com/comment/892439#comment-892439
गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. संदीप डांगे - Mon, 24/10/2016 - 22:16 गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. घटनात्मक पदावर बसून काय निर्णय घ्यावे ह्याची अक्कल नसेल तर ... असो. डोकं फार तापलं आहे. उगा उणादुणा शब्द निघायचा... श्रीगुरुजी, मिपाची जनभावना तुमच्या विचारांविरुद्ध आहे असेच चर्चेत दिसत आहे, योग्य ती समज आपल्याला येवो, भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही कितीही पुरावे दिले तरी डांगे अण्णा मान्य नाहीच करणार , ती त्यांची जुनी सवय आहे . इतारांना प्राणिवाचक संबोधून नंतर तिकडून पळ काढणे , अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरणे आणि नंतर त्याचे समर्थन करणे , असे प्रकार आधीही झाले आहेत. मूकं करोति वाचालं .... असं समजून सोडून द्या.

In reply to by संदीप डांगे

१. स्वतः आपल्या खासदार आमदारांना बॅन्केच्या व्यवहारांचा तपशील मागणे फक्त 'शोबाजी' आहे. (हे काम आयकर विभाग, ईडी किंवा तत्सम सरकारी विभाग करु शकतो की... आवश्यकता असेल तेव्हा.)
कशावरून ही फक्त 'शोबाजी' आहे. या मागणीची डेडलाईन ३१ डिसेंबर आहे. त्यानंतर काही काळ वाट पाहून काहीच कृती झाली नाही तरच शोबाजी म्हणता येईल. इथे आधीच 'शोबाजी' म्हणून नाचायला सुरूवात झाली आहे. दुसरं म्हणजे हे काम करायला आयकर विभाग, ईडी किंवा तत्सम सरकारी विभागांना कोणीच बंदी घातलेली नाही. त्यांना वाटलं तर ते काम करतील की. या पक्षाने हा अंतर्गत निर्णय घेतलेला आहे. आयकर विभागाचे किंवा ईडीचे काम आम्ही करत आहोत असा दावा कोणीच केलेला नाही.
२. आपले खासदार आमदार आपला काळापैसा आपल्याच बॅन्क अकाउंटमधे ठेवतात असे समजणे भाबडेपणाची शंभरावी लेवल असावी.
ठेवू पण शकतात किंवा दुसरीकडे पण लपवू शकतात. १९९३ मध्ये झाममुच्या ४ खासदारांना विश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी नरसिंहरावांनी प्रत्येकी १ कोटी रूपये दिले होते. हा आरोप न्यायालयातही सिद्ध झाला होता. परंतु या व्यवहार संसदेच्या सभागृहाच्या आत झाला व संसदेच्या आत होणार्‍या कोणत्याही गुन्ह्यावर न्यायालय थेट शिक्षा करू शकत नसल्याने नरसिंहराव सहीसलामत सुटले. हे एक कोटी रूपये शिबू सोरेन व अन्य ३ खासदारांनी आपापल्या बँक खात्यात भरले होते.
३. ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान खासदार-आमदार आपल्याच बॅन्क खात्यातून गडबडीचे व्यवहार करतील असे समजणे भाबडेपणाची हजारावी लेवल असावी. खासदार-आमदार एवढे मूर्ख असतील असे कुणाला वाटत असेल तो मूर्खांच्या नंदनवनात सुखी राहो.
त्यांच्या पक्षाला काय करायचंय ते करू देत की. तुम्हाला का त्रास होतोय? ते काही बेकायदेशीर कृत्ये करत आहेत का? ते मूर्ख किंवा भाबडे असतील तर असू देत की. तुम्हाला त्यांची का काळजी?
४. आमदार-खासदारांनी आपले बॅन्क व्यवहार तपशील आयकर विभागाकडे नव्हे तर पक्षाध्यक्षाकडे सादर करावे - पक्षाध्यक्ष कोण लागून गेलेत? भारताचे ऑडिटर जनरल का काय? कोण्या पक्षाचा पक्षाध्यक्ष हा सरकारी अधिकारी व सरकारी माणूस नसतोय. आपलाच पक्षाचा माणूस आपल्याच पक्षाच्या माणसाचे डिटेल्स तपासणार आणि त्याला क्लिनचीट देणार? हे तर अक्षरशः 'केजरीवाल छाप' झालं. केजरीविरोधी लोकांनी केजरीच्या असल्या क्लिनचीट प्रकरणांच्या उडवलेल्या रेवड्या आठवत आहेत. सैंया भये कोतवाल तो डर काहे का ही म्हणही आठवत आहे.
कोणत्या आमदार-खासदारांनी असं सांगितलंय की आम्ही आमचे तपशील आयकर विभागाकडे न देता फक्त पक्षाध्यक्षांकडेच देणार म्हणून. त्यांचे तपशील हवे असतील तर ते मिळवायला आयकर खात्याला कोणीही अडवू शकत नाही. पक्षाध्यक्षांनी ते तपशील मागणे गुन्हा असेल किंवा बेकायदेशीर असेल तर आमदार-खासदार तक्रार करू शकतात. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. पक्षाध्यक्ष त्यांना क्लीनचिट देऊ देत किंवा गुन्हेगार असे जाहीर करू देत. ते काय करतील त्याला कायदेशीर दृष्ट्या शून्य महत्त्व आहे. तुम्ही का अस्वस्थ झाला आहात?
५. माध्यमांमधे फक्त हेडलाईन्स वाचल्या जातात, कोण जास्त तपशीलात जात नाही, सामान्य माणूस तर नाहीच. "मोदींनी आपल्या खासदार आमदारांना आपले बॅन्क व्यवहार सादर करायला सांगितले" एवढंच सगळीकडे फिरतंय, त्यावर भक्तभाट व स्वयंघोषित निष्पक्ष लोकांची बुद्धीभ्रम करणारी भाषा असेल तर क्या कहने.
मग ही तक्रार माध्यमांकडे करा ना. माध्यमांनी काय शीर्षके द्यावीत हा त्यांचा अधिकार आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपची पिछेहाट, भाजपला नोटबंदी भोवली असले मथळे असणार्‍या बातम्यांमध्ये प्रत्यक्षात भाजप इतर पक्षांच्या किती आणि कसा पुढे आहे याचीच माहिती होती. जर कोणी फक्त हेडलाईन्स वाचून जास्त तपशीलात न जाता मते ठरवित असतील तर तो त्यांचा दोष आहे.
भक्तभाट लोकांची दिशाभूल होत नसते हे वरील काही प्रतिसादांवरुन लक्षात आलेच. सारासार विचार करण्याची क्षमता हरवलेल्यांना काय समजवायचे. ज्यांना दुसरीही बाजू बघायची आहे त्यांच्यासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी ज्याच्यात्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करुन निर्णय घ्यावा.
म्हणजे सारासार विचार करण्याची क्षमता फक्त तुमच्याकडेच. इतरांची ती क्षमता हरविली आहे.
माझे मत एवढेच आहे की अशी शोबाजी करण्यापेक्षा सर्व पक्षांच्या सर्व आमदार-खासदार-नेत्यांच्या गेल्या दहा वर्षातल्या व्यवहारांची, संपत्तीची चौकशी करावी. जसा भुजबळ आत टाकला तसे सर्वांना आत टाकावे. तेव्हा प्रामाणिकपणाचे, साफ नियतचे गोडवे गायला भाट लोकांची अजिबात गरज नसेल.
तुम्ही हे मोदी किंवा शहांना कळविल्यास बरे होईल. त्यांना वाटले तर ते करतील चौकशी. तुम्हाला एखाद्या आमदार-खासदाराच्या संपत्तीविषयी संशय असेल तर न्यायालयात जनहित याचिका दाखल करू शकता.

ओ! असं कसं बोलता ? आम्हाला पटत नाही हाच एक मोठा पुरावा नाही का ? मग इतर सगळे पुरावे म्हणजे अंधश्रद्धा,आणि ते देणारे किंवा मागणारे तुम्ही म्हणजे भक्त असं आपलं ठरलंय ना आधीच ?

संदीप डांगे, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
१. स्वतः आपल्या खासदार आमदारांना बॅन्केच्या व्यवहारांचा तपशील मागणे फक्त 'शोबाजी' आहे. (हे काम आयकर विभाग, ईडी किंवा तत्सम सरकारी विभाग करु शकतो की... आवश्यकता असेल तेव्हा.)
तुमचं ठार बरोबर आहे. यालाच राजकारण म्हणतात. २.
३. ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान खासदार-आमदार आपल्याच बॅन्क खात्यातून गडबडीचे व्यवहार करतील असे समजणे भाबडेपणाची हजारावी लेवल असावी.
विधान बरोबर आहे. मात्र उपरोक्त आदेशातनं असा हेतू काही सूचित होत नाही. कशावरनं मोदी खासदारांचा प्रामाणिकपणा तपासून पहात नसतील? आयकर खात्याकडून यथोचित अहवाल मागवले असतीलही. ३.
४. आमदार-खासदारांनी आपले बॅन्क व्यवहार तपशील आयकर विभागाकडे नव्हे तर पक्षाध्यक्षाकडे सादर करावे - पक्षाध्यक्ष कोण लागून गेलेत? भारताचे ऑडिटर जनरल का काय?
आयकर विभागाकडे तपशील सादर करू नयेत असं या बातमीत तरी लिहिलेलं नाही. ४.
आपलाच पक्षाचा माणूस आपल्याच पक्षाच्या माणसाचे डिटेल्स तपासणार आणि त्याला क्लिनचीट देणार? हे तर अक्षरशः 'केजरीवाल छाप' झालं.
कोण म्हणतो सफेद कपटा (=क्लीन चिट) मिळणार आहे? ५.
५. माध्यमांमधे फक्त हेडलाईन्स वाचल्या जातात, कोण जास्त तपशीलात जात नाही, सामान्य माणूस तर नाहीच. "मोदींनी आपल्या खासदार आमदारांना आपले बॅन्क व्यवहार सादर करायला सांगितले" एवढंच सगळीकडे फिरतंय, त्यावर भक्तभाट व स्वयंघोषित निष्पक्ष लोकांची बुद्धीभ्रम करणारी भाषा असेल तर क्या कहने.
तुम्ही जा की तपशीलात. कोणी अडवलंय! मात्र तुम्ही लेख न वाचता मन मानेल तसं खुशाल ठोकून देताहात. ६.
सारासार विचार करण्याची क्षमता हरवलेल्यांना काय समजवायचे. ज्यांना दुसरीही बाजू बघायची आहे त्यांच्यासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी ज्याच्यात्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करुन निर्णय घ्यावा.
ठार बरोबर. आ.न., -गा.पै.

याला "शोबाजी" न म्हणता किमान सुरवात म्हणतात. अर्थात आपल्यासारखे ज्यांना फक्त दिशाभूल करायची आहे किंवा धुरळाच उडवायचा आहे किंवा ज्यांनी आत्तापर्यंत फक्त शोबाजीच बघितली आहे किंवा त्यापुढे जाऊन विचार करण्याची ज्यांची कुवत नाही अशांशी काय बोलावे. उद्या इन्कम टेक्स डिपार्टमेंट कडे जर या आमदारांनी आपापले बैंक स्टेटमेंट पाठवले आणि समजा कोणी दोषी आढळले नाहीत तर परत इथे येऊन कांगावा चालू कराल की इन्कम टेक्स खाते देखिल आता सरकारने आपल्या ताब्यात घेतले वगैरे. कारण एकदा विरोधच करायचा ठरवला कि तो कितीही खालच्या पातळीवर जाऊन करता येतो . बाकी भक्तभाट वगैरे शब्दांबद्दल मी काय बोलावे. जो माणूस मुख्यमंत्र्यांबद्दल 'हरामखोर वगैरे बोलू शकतो , अथवा एका सदस्यांना दलाल वगैरे संबोधू शकतो त्याच्यासाठी हे खूपच कमी समजावे लागेल.

अपेक्षित प्रतिसाद आलेत, धन्यवाद! आवश्यकच होते, आता अजून कोण राहिले असतील तर त्यांचेही येऊ द्या. :)

In reply to by संदीप डांगे

बर मग मोदींनी केली हे फक्त शोबाजी का हे आम्हा भक्तभाट व सारासार विचार न करणाऱ्याना आपल्या महान ज्ञानातून पटवून सांगा . का हा प्रतिसाद ही अपेक्षितच होता ?

In reply to by संदीप डांगे

शहाजोगपणे भाजपच्या निर्णयाला नावे ठेवायला गेलात व त्यातला फोलपणा उघडकीला आणल्यावर त्यावर प्रतिवाद करता येत नाही हे कबूल करा.