Skip to main content

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 14/11/2016 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !

वाचने 134078
प्रतिक्रिया 637

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

काळा चष्मा घातला तर जगही काळेच दिसते.

ह्या वाक्याची सलामीला गरज होतीच का डॉक्टर साहेब ? एड होमिनेम न करता मुद्दे मांडले जाऊ शकत नाहीत का ? तुमचे मुद्दे संयुक्तिक होते/आहेत/असतील ही खात्री सुद्धा आहे. तरीही जर अशी शेरेबाजी टाळता आली तर पहा ही विनंती करतो. बाकी तुमचे जर गोडसे साहेबांसोबत काही वैयक्तिक विषय असले तर खरडवही/ व्यनी आहेतच. राग मानू नये जाणवले म्हणून स्पष्ट बोलतोय.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

खरे सरांची मते मला खरोखरंच पटली माझे वाचन, अनुभव व अभ्यास त्यांच्यापेक्षा नक्कीच कमी आहे. मी काळा चष्मा घातला असता तर, वरील एका प्रतिसादात ,हे माहीत नव्हतं. इतक्या पररकोटीच्या द्वेषाची फळं भोगतोय त्यांचा पक्ष. असे मी म्हटले नसते.

In reply to by मार्मिक गोडसे

दुसर्‍या पक्षातले नरसिंह रावांबद्दल आदराने बोलतात पण त्यांच्या पक्षातले तसे बोलायला घाबरतात... कारण त्यांनी घराणेशाहीला मुजरा करायला नकार दिला होता व तो आचरणात आणला होता. १९९०-९१ ला भारताची वित्तव्यवस्था खोल गर्तेत असताना नरसिंह राव व मनमोहन ही जोडगोळी भारतात पंतप्रधान व वित्तमंत्री या पदांवर नसते तर भारत आज आहे त्या अर्थिक सुव्यवस्थेत नसता, किंबहुना दुर्बळ व दरिद्री राष्ट्रांच्या रांगेत कोठेतरी मागच्या जागेवर उभा असता. त्या दोघांनी भारताची फिरवलेली (टर्न अराऊंड या अर्थाने) अर्थव्यवस्था हा देशांच्या इतिहासात क्वचित घडणारा सुवर्णक्षण आहे. भारताची आताची स्थिती हा त्या दोघांच्या कृतीने त्यावेळी बनवलेल्या पायावर उभी आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वरील प्रतिसादासाठी +१. जिथे काम करतो त्या कंपनीतल्या सहकारी पण 'अंध भक्तांना (सर्व पक्षीय) ' हे सांगितले की काहीही विचार न करता अंगावर येतात.

In reply to by मराठी कथालेखक

नरसिंहराव हे गुप्त संघस्वयंसेवक होते .. व त्यांना संघाने काॅग्रेस मधे घुसवले होते असे वाटते ..

In reply to by संदीप डांगे

शब्दशः नाही पण राव हे संघाचे पहिले पंतप्रधान असं गंमतीनी म्हणतात. ते लुंगीच्या आत खाकी चड्डी घालतात अशी थट्टा होत असे म्ह्णे. काँग्रेस आणि गांधी घराणं त्यांचा द्वेष करण्यामागे हे एक कारण आहे.

In reply to by पक्षी

काळा पैसा संपविण्यासाठी सरकारने उचलेले हे पाउल अगदी स्तुत्य आहे. पण असेच पाउल १९७८ साली १००० च्या नोटा चलनातून बाद करून उचलले होते मग तरी देखील आजपर्यंत भ्रष्टाचार कसा टिकून राहिला ? माझ्या मते जोपर्यंत १०० रुपयांवरील सर्व व्यवहार चेकने किंवा क्रेडीट/डेबिट कार्डने करणे बंधनकारक होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार चालूच राहील, जरी कमी झाला तरी. पण पूर्ण भारत म्हणजे फक्त मोठी मोठी शहरे नव्हेत, आजही वीज, पाणी, रस्ते, इंटरनेट, दळणवळणाची साधने नसलेली अनेक गावे भारतात आहेत. जेथे ह्या मुलभूत सुविधा नसतील तेथे डेबिट/क्रेडीट कार्ड कसे वापरणार ? जेथे अजूनही निरीक्षरता आहे तेथे चेकचे व्यवहार कसे होणार ? समजा एखाद्या गावातल्या माणसाला त्याच्या बैलगाडीचे चाक दुरुस्त करायचे असेल तर तो गावातल्याच किंवा तालुक्यातील लोहाराकडे जातो, तेथे रोखीने पैसे देऊन(किंवा उधार ठेऊन) तो आपले काम करून घेतो. जर काहीही कारणाने त्या माणसाकडे भ्रष्टाचाराने गोळा केलेला पैसा असेल तर असा माणूस ते पैसे निर्धोकपणे वापरू शकतो. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला तरी तो चालूच राहणार ह्यात शंका नाही. थोडक्यात, रोखीने पैशाचे व्यवहार चालूच राहिले तर आवाक्यात आलेला भ्रष्टाचार थांबणार नाही.

In reply to by मराठी कथालेखक

भ्रष्टाचार करण्यासाठी दोन बाजू आवश्यक असतात. देणारा व घेणारा. तुम्ही तुमच्या बाजूने बंद करा..

In reply to by संदीप डांगे

मी का ? अं ....जिकडून पैसे मिळतील तिकडे जायला तयार आहोत आपण :) विनोद बाजूला ठेवून.. हो काही वेळा भ्र्ष्टाचारात माझाही सहभाग असतो. जसे हॉटेलवर रहाताना जर टॅक्स मुळे ३००-४०० रुपये (प्रतिदिन भाड्यात) जास्त जाणार असतील तर रोखीने पैसे देवून मी ही पैसे वाचवलेले आहेत.

In reply to by मराठी कथालेखक

श्या, तिकडे सैनिक सीमेवर उभे असताना तुम्ही हाटेलात का राहता, रस्त्यावर उभं राहायचं, सगळेच पैसे वाचतील, आणि ब्रष्टाचार न केल्याने देशभक्तीही होईल!

In reply to by संदीप डांगे

असं नसतं हो... सर्व काही करायचं आणि नंतर फेसबूकवर/व्हाटस अप्वर सैनिकांबद्दल कळवळा असणारे संदेश प्रसारित करायचे म्हणजे झाली देशभक्ती !!

In reply to by मराठी कथालेखक

मकले आणि डांगे अण्णा प्रत्येक वेळेस सैनिकाला/ लष्कराला या वादात ओढायचे कारण काय? कोणताही प्रामाणिकपणे काम करणारा भारतीय हा काय कमी देशभक्त आहे का ?

In reply to by सुबोध खरे

हा हा, हे तुम्ही मला म्हणताय? अगदी हेच जिथे तिथे सैनिकांचे दाखले देणाऱ्यांना बोला डॉक्टर साहेब! माझा प्रतिसाद उपरोधिक आहे अशाच लोकांसाठी, लोकांनी जरा म्हटले त्रास होतो की हे भक्त लोक लगेच सैनिकवाला मुद्दा काढत आहेत, हवे असेल तर जरा चेपुवर चक्कर मारून या,

In reply to by संदीप डांगे

मी पण उपरोधानेच बोललो. खूप लोकांचे असे पोस्ट्स वाचलेत 'सीमेवर सैनिक लढत आहेत, तुम्हाला काही वेळ रांगेत उभे रहायला काय त्रास' वगैरे.. उबग आला असल्या पोस्ट्सचा. फेसबूकवर मी एक वयस्कर गृहस्थ माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये होते. [हे माझ्या एका सरांचे मित्र. माझे सर आणि हे गृहस्थ दोघेही अनेकविध विषयांवर आपली मते फेसबूकवर टाकत असत/असतात. दोघांचीही फ्रेंड/फॉलोअर लिस्ट प्रचंड मोठी. माझे सर काही काळापुर्वि निर्वतलेत.] तर या गृहस्थांनी अशीच काहीतरी पोस्ट टाकली. त्यावर कुणा एकाने 'सैनिकांना त्यांच्या कामाचा मोठा पगार मिळतो' अशा अर्थाची काहीशी प्रतिक्रिया दिली. मी त्या प्रतिक्रियेला 'लाईक' दिले , तसेच 'अशी तुलना गरजेची नव्हती' अशी प्रतिक्रिया मूळ पोस्टवर दिली. या गृहस्थांनी पाच मिनटातच त्या दुसर्‍या व्यक्तिला आणि मला 'अनफ्रेंड' केले !! डॉक्टरसाहेब तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपले काम प्रामाणिकपणे , चोखपणे करणारा कुणीही व्यक्ती सैनिकच आहे. मग तो शाळेत मन लावून शिकवणारा शिक्षक असेल, गटारात उतरणारा सफाई कामगार असो की कोणतीही किळस न बाळगता रुग्णसेवा, त्यांची स्वच्छता करणारे नर्स/मामा/मावशी असतील..अशा अनेकांना ना जास्त पगार मिळतो ना समाजात चांगला मान...गटारात विषारी वायूमुळे गुदमरुन मेलेल्या कामगारास कुणी हुतात्माही म्हणत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

भ्रष्टाचार नाहिच थांबायचा हो. पुर्वी लोक १००० च्या नोटेत साचवायचे आता २००० च्या नोटेत साचवतील इतकेच. लाच पुर्वीही खात होते. आताही खातील (आता नव्या नोटा मागतील इतकेच). पण २ गोष्ती नक्की साध्य होतीलः १. सध्याचा बराच काळा पैसा सर्क्युलेशन मधुन बाहेर जाइल (अथवा येइल) २. खोट्ञा नोटा सर्क्युलेशन बाहेर जातील (यामुळे दहशतवादी कारवायांना आणि देशविघातक वृत्तींना (काही काळ) चाप बसेल. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी अजुन बराच वेळ जाइल. मोदींच्या पिढीच्या हयातीत शक्य होइल असे वाटत नाही (माझ्या पिढीच्या हयातीत तरी होइल की नाही कुणास ठाउक). तुम्हाला खरेच असे वाटते का की या सगळ्या खटाटोपाचा उद्देश भ्रष्टाचारावर मात करणे हा आहे?

In reply to by मृत्युन्जय

तुमचे दोन्ही मुद्दे मान्य. खोट्या नोटांचा प्रश्न बराच काळासाठी निकालात निघेल हे तर आहेच. शिवाय काही काळ बाजारातला काळा पैसा कमी झाल्याने महागाई कमी होईल. खास करुन स्थावर मालमत्तांचे भाव कमी होवू शकतील असे वाटते. पण यापुढे भ्रष्टाचार होणार नाही किंवा त्याचे प्रमाण खूप कमी होईल असे मानणे भाबडेपणाचे वाटते. समजा एक भ्रष्ट अधिकारी आहे. त्याचे 'वरचे' मासिक उत्पन्न सुमारे दोन लाख रुपये महिना आहे. त्याने घरात सुमारे सात-आठ लाख साठवले होते. नोटा रद्द झाल्याने त्याला समजा त्याने काही मार्गाने काही नोटा बदलून घेतल्या आणि पैसा वाचवला असे मानू. पण तरी त्याचे तीन-चार लाखांचे नुकसान झाले तर पुढच्या महिन्यात तो काय विचार करेल ? "नको मला तो काळा पैसा, नको ती लाच वगैरे" की "xxx बरंच नुकसान झालं की ..हे नुकसान भरुन काढायला आता 'रेट' वाढवायला हवा ..."

In reply to by मराठी कथालेखक

भ्रष्टाचार नाहिच हो कमी होणार भ्रष्ट अधिकारी आता १०० आणि २००० च्या नोटांमध्ये पैसे खातील. आजच कुणलातरी २००० च्या नोटांंअध्ये लाच घेताना पकडले. हे चक्र चालुच राहणार. एकदा हा स्ट्राइक करुन मग दर काही काळाने नविन उपाययोजना आणुन या सर्व प्रकाराला आळा घालणे एवढेच काम सरकार करु शकते. तुर्तास जे उद्देश साध्य झाले आहेत ते महत्वाचे आहेत. या आणी अश्या उपायांनीच भ्रष्टाचार हळु हळु कमी होइल. उद्या सकाळी भार भ्रष्टाचारमुक्त झाला असेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल.

In reply to by मृत्युन्जय

बरोबर आहे. मुळात 'सामान्य' माणसाला भ्रष्टाचार नको आहे हे गृहितक तरी खरं आहे का ? किंबहूना भ्रष्टाचारी आणि सामान्य माणूस असं वर्गीकरण तरी कितपत योग्य आहे ? मला वाटतं आपल्या सोयीचा असलेला भ्रष्टाचार अनेकांना हवा आहे. तुम्ही रस्त्यानं आपल्या वाहनानं चालला आहात आणि एखादा नियम मोडलात आणि पकडले गेलात तर समोरच्या पोलिसाने नियमाप्रमाणे दंड न घेता कमी पैशात तडजोड करावी हीच तुमची (म्हणजे अनेकांची ) अपेक्षा असते ना ? मी पुर्वि जिथे रहात होतो तिथून जवळच एक कमी उत्पन्न गटासाठीची जूनी वसाहत होती. या लोकांना सरकारी योजनेतून स्वस्तात घरे मिळाली. पूढे अनेकांनी समोरच्या रस्त्यावरील जागेत अतिक्रमण केलेत. आता एखादा प्रामाणिक , कर्तव्यदक्ष महापालिका आयुक्त येवून त्याने ही सगळी अतिक्रमणं पाडलीत तर या 'सामान्य' लोकांना आवडणार/चालणार आहे का ? मीटर न टाकणारा रिक्षावालाही सामान्यच असतो ना ? त्याला कर्तव्यदक्ष अंमलबजावणी अधिकारी आलेला आवडेल का ? छोटे मोठे दुकानदार उत्पन्नाचे कर प्रामाणिकपणे भरतात का ? शहराच्या थोडं बाहेर गेलं की अनेक 'सामान्य' दुकानदार शीतपेय छापील किमतीपेक्षा दोन-तीन रुपये जास्त घेवून विकताना दिसतील. हा देखील भ्रष्टाचारच ना ? आतादेखील अनेक 'सरळमार्गी सामान्य' लोक (म्हणजे पर्याय नसल्याने मारुन मुटकून टॅक्स भरणारे-खरं तर तो आधीच कापला जातो म्हणा) आपल्या 'काळे पैसे' बाळगणार्‍या नातेवाईक वा मित्रांना 'दोन लाख आपल्या खात्यात' भरुन देत आहेत वा त्या विचारात आहेत. अनेक उदाहरणं सापडतील. भारत भ्रष्टाचार मुक्त तेव्हाच होईल जेव्हा 'मी भ्रष्टाचार करणार नाही वा भ्रष्टाचारास कोणत्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही' अशी मनोवृत्ति असणारे लोक भ्रष्टाचार करु पहाणार्‍यांपेक्षा संख्येने खूप जास्त आणि सर्व वर्गात असतील.

In reply to by मराठी कथालेखक

>>मुळात 'सामान्य' माणसाला भ्रष्टाचार नको आहे हे गृहितक तरी खरं आहे का ? >>किंबहूना भ्रष्टाचारी आणि सामान्य माणूस असं वर्गीकरण तरी कितपत योग्य आहे ? >>मला वाटतं आपल्या सोयीचा असलेला भ्रष्टाचार अनेकांना हवा आहे. सहमत आहे. >>छोटे मोठे दुकानदार उत्पन्नाचे कर प्रामाणिकपणे भरतात का ? सामान्य माणसं अजाणतेपणे(?) त्यांना हे करायला उद्युक्त करतात किंवा त्यात साथ देतात. समजा एकाद्या दुकानातून पाचशे रुपयांची खरेदी केली. त्यावर बिल द्या असे म्हटल्यावर तो व्यापारी म्हणतो,"बिल हवे असेल तर १३ टक्के टॅक्स पडेल. ५६५ रुपये लागतील". त्यावर हा सामान्य माणूस क्षणाचाही विलंब न लावता बिल नसले तरी चालेल असे सांगेल. (म्हणाजे ज्या वस्तूत वॉरंटी वगैरे भानगड नसेल अशा वस्तूच्या बाबतीत).

In reply to by मराठी कथालेखक

आपण ईतर प्रगत राष्ट्रांप्रमाने रोखी मुक्त व्यवहार करण्याकडे वाटचाल करीत आहोत. अतिशय नगण्य भ्रष्टाचार हा त्याचा एक फायदा ( अनेक पैकी) फायदा आहे. 2000 ची नोट तात्पुरती व्यवस्था आहे. http://blogs.timesofindia.indiatimes.com/voices/demonetisation-issue-an…

In reply to by मराठी कथालेखक

ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल ! या तुम्ही उधृत केलेल्या वाक्यातील ही व पुढच्या पायर्‍या हे शब्द तुमच्या नजरेतून अनवधानाने निसटले, की अवधानाने दुर्लक्षित केले गेले, हे ठरवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकत आहे :) ;) "काळे धन, भ्रष्टाचारी लोक व अतिरेक्यांनी बनवलेलया खोट्या पैश्याविरुद्ध काहीही न करता हातावर हात ठेऊन बसले आहे आणि जनतेला त्या दलदलीला सतत सहन करणे भाग पाडले आहे", अश्या सरकारचे तुम्ही अभिनंदन कराल असे तुमच्या लेखनातून व्यक्त होत आहे ! तेव्हा शुभेच्छा !! छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !! आता थोडी सर्वमान्य व्यावहारीक माहिती... १. व्यवस्थापनाचा महत्वाचा नियम... "जगावेगळे उत्तम यश मिळविण्यासाठी प्रथम जगावेगळी उत्तम स्वप्ने पाहणे जरूर असते... आणि ध्येय माहीत असेल तरच ते सत्यात आणण्यासाठी रननीति बनवणे शक्य होते. खुजे ध्येय केवळ सामान्यत्वाकडेच नेऊ शकते आणि कोठे जायचे हेच माहीत नसले की दिशाविहीन भरकटणे नशिबी येते." २. Henry David Thoreau : If you have built castles in the air, your work need not be lost; that is where they should be. Now put the foundations under them. ३. विकसित देशांतील विकास व सुस्थिती आकाशातून पडलेली नाही, किंवा कोणत्या हरीने खाटल्यावर बसलेल्या जनतेला दिलेली भेटही नाही. तो, तेथिल सरकारचे काही वर्षांचे प्रयत्न आणि जनतेचे सहकार्य, यांच्या एकत्रित परिणाम आहे. ================ महत्वाची सूचना : भारताला विकसित देश करण्यासाठी तुमच्याकडे काही विशेष कार्यक्रम असल्यास तो सांगण्यासाठी पंतप्रधानांनी संस्थळाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्यावर केलेली सुचना पसंत पडली तर त्याबद्दल स्वतः माहिती घेण्यासाठी पंतप्रधान वेळ देतात असा इतिहास आहे. या संधीचा जरूर फायदा घ्या व आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी हातभार लावा. त्याचा सर्व भारतियांना फायदाच होईल... त्यात तुम्ही-आम्ही आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही फायदा होईल. बघा पटते का.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्या पुढच्या पायर्‍या काय आहेत ते ही तुम्ही सांगा, माझ्यामते पुढच्या पायर्‍या म्हणजे जमा झालेल्या धनावर टॅक्स, पेनल्टी वसूल करणे. यामुळे बाजारातला काळा पैसा कमी होईल हे निश्चित (दुसर्‍या एका प्रतिक्रियेत मी ते मान्य केले आहेच). पण यापुढे भ्रष्टाचार होणार नाही ते कसे ? बाकी इकडचे तिकडचे quotes टाकण्यापेक्षा तुम्ही जे म्हणताय ते म्हणजे 'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल.
भारताला विकसित देश करण्यासाठी तुमच्याकडे काही विशेष कार्यक्रम असल्यास तो सांगण्यासाठी पंतप्रधानांनी संस्थळाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहे
माझ्याकडे असा काही कार्यक्रम नाहीये हो. मी एक सामान्य बुद्धीचा नोकरदार माणूस आहे आहे. महत्वाची सूचना : बाकी मी नेमके प्रश्न विचारले होते , नेमकी उत्तर देता येत आलीत तरे बरे होईल. अन्यथा चालू देत तुमचं

In reply to by मराठी कथालेखक

'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल.
आधी जमा झालेला काळा पैसा चलनातुन फेकुन देणे आणि ह्यापुढे काळा पैसा निर्माण होणार नाही हे बघणे ह्या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या म्युचुअली एस्च्क्लुझीव्ह सुद्धा आहेत.

In reply to by गंम्बा

मी ही तेच म्हणतोय. पण मूळ लेखात 'भ्रष्टाचारमूक्त भारत' चा उल्लेख असल्याने माझी ही प्रतिक्रिया होती. आपण दोघे एकच मुद्दा मांडत आहोत :)

In reply to by मराठी कथालेखक

तुमच्या महत्वाच्या सूचनेप्रमाणे तुमच्या प्रतिसादाची नेमकी उत्तरे खालीलप्रमाणे आहेत... १. माझा वरचा प्रतिसाद, तुमच्या... छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !! या नेमक्या वाक्याने संपलेल्या प्रतिप्रतिसादाचे, तुम्हाला सोईचे वाटले नसले तरीही, अगदी नेमकेच उत्तर होते. :) २. भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल. ७० वर्षांचा भ्रष्टाचार एका कारवाईत आणि एका रात्रीत संपवता येणार नाही हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे व पटले आहे असे माध्यमांतल्या त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. हे मलाही पटले आहे. तुम्हालाही पटायला हरकत नसावी, असे वाटते. "आजच पुढच्या सगळ्या पायर्‍या सांगून सावध करून, (अ) त्यांच्याबद्दल काही प्रतिबंधक कारवाई करण्याची भ्रष्टाचार्‍यांना आणि अतिरेक्यांना संधी देण्याइतके हे सरकार बुळे नाही किंवा (आ) भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करणार्‍या वृत्तीचे नाही", असे त्याच्या आतापर्यतच्या कारवायांवरून दिसत आहे... हे देशासाठी चांगलेच आहे. याबाबतीत गेल्या दोन वर्षांत अनेक छोट्यमोठ्या पायाभूत कारवाया झाल्या आहेत व त्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. अजून काही महत्वाच्या कारवाया भविष्यात चालू राहणार आहेत असे पंतप्रधानांनी स्वतः सार्वजनिक सभेत सांगीतले आहे. तेव्हा "भ्रष्टाचार्‍यांच्या आणि अतिरेक्यांच्या विरुद्धच्या सरकारच्या कारवायांना उघड करा (पक्षी : भ्रष्टाचार्‍यांना आगावू माहिती देवून मदत करा)" असा दुराग्रह न करता, त्या कारवाया जश्या उलगडत जातील तश्या, एक सजग नागरीक म्हणून सहकार्य करणे हेच आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे. ३. माझ्याकडे असा काही कार्यक्रम नाहीये हो. मी एक सामान्य बुद्धीचा नोकरदार माणूस आहे आहे. असे तुम्हीच म्हणत आहात. अशा अवस्थेत निदान कधी नाही ते एखादे सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध काही कारवाई करत आहे त्याबद्दल समाधान ठेवून त्याच्या प्रत्येक पायरीवर सरकारला सहकार्य करावे हे उत्तम असे मला वाटते. गेली ७० वर्षे भ्रष्टाचाराची सतत वाढ होत असताना त्याविरुद्ध काही दीर्घकालीन ठोस उपाय झाले नाही, त्यापेक्षा हे बरे नाही का ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"काळे धन, भ्रष्टाचारी लोक व अतिरेक्यांनी बनवलेलया खोट्या पैश्याविरुद्ध काहीही न करता हातावर हात ठेऊन बसले आहे आणि जनतेला त्या दलदलीला सतत सहन करणे भाग पाडले आहे", अश्या सरकारचे तुम्ही अभिनंदन कराल असे तुमच्या लेखनातून व्यक्त होत आहे ! तेव्हा शुभेच्छा !!
मी नं व्यक्त केलेलं काहीही तुम्ही माझ्या नावावर खपवू पहात आहात. हा शुद्ध फालतूपणा झाला. मुळात मी माझ्या प्रतिक्रियेत १) नोटा रद्द करण्याच्या निर्णायास विरोध केलेला नाही २) नोटा रद्द करण्याने बनावट नोटांचा बंदोबस्त झाल्याचे अमान्य केलेले नाही ३) तसेच बाजारातील काळा पैसा कमी होईल हे देखील मी अमान्य केले नव्ह्ते. (आणि दुसर्‍या एका प्रतिक्रियेत तर अगदी स्पष्टपणे मान्य केले होते). पण तरीही तुम्ही नको तो अर्थ काढत असाल तर याला 'खोडसाळपणा' हाच एक शब्द आहे. माझा मुद्दा एकच आहे. नोटा रद्द करण्याने वरील दोन फायदे मान्य असले तरी 'यापुढे भ्रष्टाचार होणार नाही किंवा झाल तरी फार कमी असेल' असे मला वाटत नाही. यावर मुद्देसूद प्रतिवाद केल्यास बरे. धन्यवाद.

In reply to by मराठी कथालेखक

खोडसाळपणा किंवा फालतूपणा करणे माझ्या स्वभावात नाही आणि तो सहन करणेही माझ्या स्वभावात नाही. या प्रतिसादासह वरचे तुमचे प्रतिसाद परत एकदा वाचून पहा ! अनवधानाने काही वाक्यरचना लिहीली गेली असली तरी त्याने वाचकांचा समज-गैरसमज होऊ शकतो. मुक्त संस्थळावरची लिखित वाक्ये तेथे तशीच राहत असल्याने व सगळ्यांना वाचता येत असल्याने, नंतर त्यांचे दडपून समर्थन करणे कठीण जाते. तेव्हा प्रत्येक शब्द नीट विचार करून लिहावा असे माझे मत आहे. तसे तुमचे मत असावे असा माझा आग्रह नाही. बाकी तुमच्या इतर प्रतिसादांना वर उत्तर दिले आहेच. माझीही सूचना :) जर सभ्य भाषेत संवाद चालू ठेवण्याची तयारी असेल तर तो करायला मला नेहमीच आनंद वाटेल. अन्यथा, कर्कश्य व असंवैधानिक भाषेमुळे वितंडवाद होतो, ज्यात मला अजिबात रस नाही. पुढच्या प्रतिसादाला उत्तर आले नाही तर ते का आले नाही (निदान प्रतिवाद सुचत नाही म्हणून तर नाहीच नाही) हे समजावे यासाठी हे शेवटचे विधान आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कर्कश भाषा मी सुरु केली नाही. शिवाय माझा मुद्दाच तुम्हाला कळाला नाही आणि उगाचच मी या 'कारवाई/मोहिमेला विरोध करत आहे' असा तुम्ही समज निर्माण करुन घेतलात. माझा मुद्दा साधा सरळ होता तो म्हणजे उत्साहाच्या भरात या कार्वाईचे नसलेले उद्दिष्ट तुम्ही त्यास चिकटवत आहात. असो. चर्चा मुद्द्यापासून भरकटत असल्याने अधिक चर्चा करण्यात रस नाही. धन्यवाद.

In reply to by मराठी कथालेखक

हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. हा आणि... ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल ! हा मजकूर मूळ लेखात आहे. दुसरे विधान तर लेखाच्या शेवटी आणि ठळक अक्षरांत आहे. असे असतानानी या "एकाच" कारवाईने सगळा भ्रष्ताचार कसा संपणार ? असा प्रश्न लेखासंबधी करून कोण बरे... उत्साहाच्या भरात या कार्वाईचे नसलेले उद्दिष्ट तिला किंवा लेखाला चिकटवत आहे ? छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !! असा कर्कशपणा कोणी सुरू केला हे तुमच्या ध्यानात आले नाही तरी वाचकांच्या ते ध्यानात येतेच. इथला सगळा मजकूर सगळ्यांना वाचायला इथेच असणार आहे. इथे काहीही कबूल करायची गरज नाही, कारण तो उद्येश नाहीच. फक्त शांतपणे सर्व विचार केला तर सगळे ध्यानात येईल. लेख नीट न वाचता केल्या जाण्यार्‍या कर्कश्य आणि भरकटवणार्‍या प्रतिक्रिया बंद झाल्या तर त्याचे स्वागतच आहे. धन्यवाद !

In reply to by मराठी कथालेखक

धन्यवाद, पण नको धन्यवाद ! (पक्षी : थँक्स, बट नो थँक्स !) :) आता तुम्ही, कुत्सितपणे का होईना पण, मोठेपणा दिला आहेच, तर त्याचा फायदा घेऊन काही सर्वमान्य विचार खाली देत आहे. ते नवीन नक्कीच नाहीत, पण महत्वाचे जरूर आहेत... १. सार्वजनिक संस्थळावरचे लेखन (उदा: मिपावरचे लेख व प्रतिसाद) सर्वच वाचकांना दीर्घकाळ वाचायला उपलब्ध राहते, त्यामुळे... २. आपले प्रतिसाद, लेख किंवा त्यावरच्या इतर प्रतिसादांमधील लेखनावर आधारलेले असावेत; किमान त्याच्या केलेल्या विपर्यासावर किंवा स्वतःच्या कल्पनेने बनवलेला व लेखात/प्रतिसादात नसलेला मुद्दा रेटून केलेल नसावे. (माणुस म्हटले की एखादी चूक होणारच, चुकून तसे झाले तर ते स्विकारण्याइतका मनाचा मोठेपणा बाळगावा.) कारण... ३. आंतरजालावरच्या आभासी जगात, प्रत्येकाची ओळख व पत, त्याच्या लिखाणाच्या नीतीवरून व प्रतीवरून ठरते.

In reply to by मराठी कथालेखक

घरात रोज बाहेरुन धुळ / कचरा येतच असतो. ती धुळ येणे काही बंद करता येणार नाही म्हणुन आत्ता आज घरात साठलेली धुळ्/कचरा आहे तो स्वच्छच करायचा नाही का? नविन होणारा भ्र्ष्टाचार थांबणार नाही, पण आधी जमा झालेला काळा पैसा १० टक्क्यानी जरी कमी झाला तरी मी ही योजना यशस्वी झाली असे म्ह्णीन. नविन होणारा भ्रष्टाचार आणि करचुकवे पणा नक्कीच थोडा कमी होइल कारण त्या लोकांना थोडी धास्ती तर नक्कीच वाटेल. ------- हे ही लक्षात घ्या की, जितका पैसा जमा होणार नाही, तो थेट आरबीया चा नफा असेल. म्हणजे १४ लाख कोटी पैकी १ लाख कोटी बँकेत भरलेच गेले नाहीत तर आरबीआय ला १ लाख कोटीचा फायदा होइल. बजेट डेफीसीट एकदम कमी होइल.

In reply to by गंम्बा

नविन होणारा भ्र्ष्टाचार थांबणार नाही, पण आधी जमा झालेला काळा पैसा १० टक्क्यानी जरी कमी झाला तरी मी ही योजना यशस्वी झाली असे म्ह्णीन.
मला हेच म्हणायचे आहे. असलेला काळा पैसा कमी करणे , आणि खोट्या नोटांचा बंदोबस्त करणे हा या पूर्ण मोहीमेचा खरा उद्देश आणि तो काही यशस्वी होईल यात शंका नाही. पण मोहीमेचे स्वागत करताना, उत्साहाच्या भरात नसलेले उद्दिष्ट त्या मोहिमेला चिकटवले जावू नये (भ्रष्टाचारमूक्त भारत) नाहीतर पुढे भ्रष्टाचार होताना पाहिल्यावर ही तुम्हालाच ही मोहीम अयशस्वी वाटण्याची शक्यता निर्माण होते. झालेच तर या मोहीमेमुळे उत्तरप्रदेश वगैरे राज्यांत निवडणूकांत भाजपला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. कारण काही धनदांडगे काळ्याचे पांढरे करताना आसपासच्या गरीब मंडळींची मदत घेतील आणि त्यावेळी या गरीबांना काही प्रमाणात मोबदला मिळेल. अगदी लाखाला पाच-दहा हजार इतका मिळाला तरी ती मंडळी , भाजपच्या निर्णयामुळे श्रीमंतांचे काही पैसे आपल्याला मिळाले यामुळे खूष होवून भाजपला मत देण्याची शक्यता आहे. टीपः मी इथे केवळ एक शक्यता वर्तवत आहे, यात मी चूक्/बरोबर वगैरे भाष्य करत नाहीये किंवा मोदी/भाजपवर आक्षेप घेत नाहीये.

In reply to by मराठी कथालेखक

मला हेच म्हणायचे आहे. असलेला काळा पैसा कमी करणे , आणि खोट्या नोटांचा बंदोबस्त करणे हा या पूर्ण मोहीमेचा खरा उद्देश आणि तो काही यशस्वी होईल यात शंका नाही. पण मोहीमेचे स्वागत करताना, उत्साहाच्या भरात नसलेले उद्दिष्ट त्या मोहिमेला चिकटवले जावू नये (भ्रष्टाचारमूक्त भारत) नाहीतर पुढे भ्रष्टाचार होताना पाहिल्यावर ही तुम्हालाच ही मोहीम अयशस्वी वाटण्याची शक्यता निर्माण होते. परफेक्ट

In reply to by मराठी कथालेखक

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी ही एकुलती एक कृती होती असं तुम्हाला वाटतंय का? या आधी आणि यापुढे पुढे काहीच केलं जाणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा कायमच चालू राहणार कारण जो पर्यंत लोकांना भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय आणि तो करणे कसे व का चुकीचे आहे हे कळणार नाही तो पर्यंत सतत भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही ना काही कृती करायला लागणार. भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवायला काहीच हरकत नाही कारण तेव्हाच स्वप्नपूर्ती कशी करावी याचा विचार होतो. याचा अर्थ लगेच रामराज्य येईल, घरांच्या किंमती कमी होतील व स्वस्ताई येईल असा नाही. पण हे पाऊल उचलणे महत्वाचे होते आणि धाडसाचे पण होते. ते धाडस मोदींनी दाखवले. यामुळे भाजपमधील, विरोधी पक्षातील आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कितीतरी नेत्यांची आणि काळाबाजारयांची अडचण झाली असणार आहे.

ती राजकीय पक्षांच्या फंडात पैसे भरायची काय भानगड आहे माहित आहे का कुणाला? वीस हजार पर्यंत कॅश भरली तर दात्याचे नाव जाहीर केले जात नाही असे ऐकले आहे, तसेच राजकीय पक्ष आपले अकाऊंट्स, देणग्या जाहीर करत असतात काय?

In reply to by संदीप डांगे

तसेच राजकीय पक्ष आपले अकाऊंट्स, देणग्या जाहीर करत असतात काय?
एक राजकीय पक्ष होता. त्याने पक्षाला मिळालेल्या सगळ्या देणग्या वेबसाईटवर टाकल्या होत्या. पण ती यादी आता वेबसाईटवरून नाहिशी झाली आहे असे म्हणतात :)

In reply to by संदीप डांगे

बरोबर आहे माहिती. सर्व पार्ट्या यात आहेत, आप देखील. भरपूर काळा पैसा जमा होतो यातून. इथे स्ट्राईक केला मोदींनी तर आयुष्यभर मत देईन त्यांना.

In reply to by संदीप डांगे

Under Section 13A of the Income Tax Act, political parties are exempt from paying Income Tax but are required to file their Income Tax returns annually to the Income Tax Department. They enjoy 100% tax exemption from all sources of income.
याबद्दल सुलभ प्रकारे अधिक माहिती इथे मिळेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या प्रकारे राजकीय पक्षांकडे नक्की किती गंगाजळी आहे व ती कुठून आली याची माहिती जनतेला उपलब्ध होते काय?

In reply to by संदीप डांगे

सर्वसामान्य जनतेला नाही, पण या गोष्टींचे (ही) फर्स्ट हॅन्ड रिपोर्ट मिळतात असे ऐकून आहे.

In reply to by मोदक

मोदक भाऊ, तुम्ही खोचक कमेंट्स करत आहात का? असल्यास का व नसल्यास प्रश्नाचे स्पष्ट उत्तर द्या किंवा इग्नोर मारा, सिम्पले! का भाजपची गंगाजळी किती हा प्रश्न येईन म्हणून दिशाभ्रम करत आहात?

In reply to by संदीप डांगे

२०१३-१४ चे ऑडिटेड बॅलन्स शीट मिळतात ब्वा नेटवर. http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/AAR2014/AA%202013-14%2… http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/AAR2014/INC%20Annual%2… http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/AAR2015/Nationalist%20… असेच बाकीच्यांचेही मिळतील. बेहिशेबी रोकडा किती मात्र म्हैत नै.

In reply to by संदीप डांगे

ती कुठून आली याची माहिती जनतेला उपलब्ध होते काय?
२००००च्या आतली रक्कम कॅशने स्वीकारता येते. ती कशी आली याची काहीही माहिती ठेवावी लागत नाही बहुधा. सर्व राजकीय पक्ष काळा पैसा पक्षात असाच आणतात. इथे सर्जिकल स्ट्राईक करणार का मोदी माहिती नाही. केला तर आदर प्रचंड दुणावेल.

In reply to by अनुप ढेरे

हेच, इकडे सर्जिकल strike होतो का पाहू! सर्वात आधी इथेच व्हायला पाहिजे होतं, आता 19500 च्या नोटांची भरती पक्षांच्या खात्यात होत असेल तर त्याची काही माहिती पब्लिक डोमेन ला येईल काय देव आणि मोदीच जाणे

In reply to by संदीप डांगे

कोणत्याच पक्षाची ही माहिती पब्लिक डोमेनमधे येणार नाही. कारण बँकेत पैसे भरताना ते एकदम सगळी कॅश भरतात. प्रत्येक माणसाची वेगळी रिसिट दाखवणार नाहीत. आणि कोणत्याही बँकेचे एकेक एन्ट्री दाखवणारे स्टेटमेंट थर्ड पार्टीला मिळणे शक्य नाही.

आत्ताच मोदींची स्पिच ऐकली त्यातलं एक वाक्य.. "गरीब चैनीत झोपत आहेत आणि श्रीमंत पैसेवाले झोपेच्या गोळ्या घेत आहेत!" त्यावर एक झलक... https://www.facebook.com/freethinker/videos/10154697477823609/ कदाचित हे खरबोपती असावेत!

नोटा रद्द करण्याच्या हेतूवर अजिबात शंका नाही. या निर्णयाचे चांगले परीणाम देखील बघायला मिळत आहेत. पुण्यात एकाने १००० च्या ५२ नोटा कचर्‍यात फेकून दिल्या. म्हणजे ५२००० रूपयांचे बेहिशेबी उत्पन्न अर्थव्यवस्थेतून नाहीसे झाले. सोलापूरच्या महापौर बाईंनी अनेक वर्षे मालमत्ता कर भरला नव्हता. नोटा रद्द केल्यावर घरातील ५००-१००० च्या नोटा आणून सव्वा लाख रूपये मालमत्ता करून गेल्या अनेक वर्षांची थकबाकी चुकविली. सर्व महापालिका, नगरपालिकांना थकीत करभरणा मिळत आहे. एकंदरीत असे बरेच चांगले परीणाम दिसत आहेत. परंतु या चांगल्या निर्णयाच्या अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या आहेत असे दिसते. नोटा रद्द करण्याचा निर्णय ठरल्यानंतर ५०० च्या नवीन नोटा व २००० च्या नोटा ८ नोव्हेंबर पूर्वीच मोठ्या संख्येने तयार करून ठेवायला पाहिजे होत्या. म्हणजे त्यांचे लगेच वितरण होऊन नागरिकांना कमी त्रास झाला असता. एटीम यंत्रांचे कॅलिब्रेशनदेखील आधीच करायला हवे होते. त्यामुळे आता जो गोंधळ सुरू आहे तो कमी प्रमाणात झाला असता.

In reply to by श्रीगुरुजी

आधीच छापुन ठेवल्या नाहीत असेच काल मोदींनी भाषणात सांगीतले आहे.टिप देणारे सरकारी बाबूंनी याचा उपयोग करून घेतला असता आणि जुन्या नोटांची आधीच वासलात लागली असती. नोटा फेकण्यापेक्षा आपत्ग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात भरा असे मक्याभाऊंनी आवाहन केले आहे. खरेच सरकारी बाबूंनी याचा विचार करावा आणि जमेल तितका दुवा तरी घ्यावा.,

In reply to by पद्माक्षी

कालच श्री.अनिल बोकील म्हणाले होते कि २६ जुलै नन्तर मुंबईत ३ दिवस एकही FIR दाखल झाला नाही, पुण्यात ५ दिवसात एकही घरफोडी नाही.---- हि भारतीय दैवी वृत्ती वर आल्याची पुनरावृत्ती आहे का?

In reply to by पद्माक्षी

तेच हो , काल TV वर झालेल्या श्री. बोकील यांच्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन बोलत आहे, :)

माझे मित्र भारतात जाताना त्यांच्या काही ५००-१००० च्या नोटा त्यांच्या नातेवाईकांना देण्यासाठी सांगत आहेत. मी सगळ्यांना हो म्हणालो तर एकूण रक्कम ५०,०००-६०,००० होत आहे. माझा प्रश्न असा आहे, विमानतळावर याचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का ?

In reply to by टवाळ कार्टा

तोच तर प्रॉब्लेम आहे. रु. ७५०० प्रति माणशी. काही वेबसाईट म्हणतात की प्रत्येक मित्राची पॅन कार्ड फोटोकॉपी घेऊन नेली तर चालेल. पण खरे खोटे काही माहित नाही.

In reply to by राघवेंद्र

आरबीआयच्या संस्थळावर खालील माहिती आहे... 18. While coming into India how much Indian currency can be brought in? A person coming in to India from abroad can bring in with him Indian currency notes within the limits given below: a. upto Rs. 5,000 from any country other than Nepal or Bhutan, and b. any amount in denomination not exceeding Rs.100 from Nepal or Bhutan. 19. While going abroad how much Indian currency can be taken out? A person going out of India can take out with him Indian currency notes within the limits given below: a. upto Rs.5000 to any country other than Nepal or Bhutan, and b. any amount in denomination not exceeding Rs.100 to Nepal or Bhutan.

In reply to by राघवेंद्र

रिझर्व बँकेच्या संस्थळावर उपलब्ध असलेल्या १९ जून २०१४ च्या या पत्रकानुसार भारतातून बाहेर* जाताना व बाहेरुन* परत येताना भारतीय चलन नेण्याची व आणण्याची प्रति व्यक्ती कमाल मर्यादा ₹२५,००० इतकी आहे. (*या बाहेरमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ व भूतान यांचा समावेश नाही). रिझर्व बँकेनुसार ₹२५,००० इतकी कमाल मर्यादा असुनही, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कस्टम्स विभागाच्या संस्थळावर ही मर्यादा ₹७,५०० इतकीच आहे. रिझर्व बँकेच्या ससंस्थळावर या विषयाचे अधिक नवे पत्रक शोधण्याचा प्रयत्न केला असता ते मिळाले नाही. बहुतेक तरी रिझर्व बँकेनी तेव्हाची ₹२५,००० ही कमाल मर्यादा कमी केलेली नाही. या ठिकाणी रिझर्व बँक जरी नियमन यंत्रणा असली तरी अंमलबजावणी कस्टम्स विभागालाच करायची आहे. आपल्या देशात दुर्दैवाने विविध सरकारी विभागामंध्ये एकवाक्यता नसते. हे झाले जे लोक ३० डिसेंबर अथवा ३१ मार्चपर्यंत भारतात जाऊ शकणार्‍या मंडळींसाठी. इतरांना स्वतःच्या NRO खात्यात जुन्या नोटा भरायला सांगितले जात आहे परंतु परदेशातून तसे करण्याचा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाहीये. १० तारखेला वाचलेल्या एका बातमीनुसार युकेतल्या भारतीय डेप्युटी हाय कमिशनर यांनी परदेशस्थ भारतीयांकडल्या जुन्या ₹५०० व ₹१,००० च्या नोटा बदलून देण्याच्या सोयीस्कर पर्यायांसाठी प्रयत्न करू असे सांगितले आहे. आशा आहे की येत्या काही दिवसात सरकारपातळीवरुन याबाबत काही तरी ठोस पाऊल उचलले जाईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

वरच्या प्रतिसादात मुंबई विमानतळाच्या कस्टम्सच्या संस्थळावर रिझर्व बँकेपेक्षा कमाल मर्यादा बरीच कमी असल्याने मी ही बाब लक्षात आणून देण्यासाठी mumbaiaircustoms@nic.in या पत्त्यावर १७ तारखेला इमेल पाठवला होता. आज त्याचे उत्तर मिळाले. ते असे... As per the Reserve Bank of India guidelines:- Any passenger resident in India
  • who had gone out of India on a temporary visit, may bring into India at the time of his return from any place outside India (other than from Nepal and Bhutan), currency notes of Government of India and Reserve bank of India notes up to an amount not exceeding Rs. 25,000 (Twenty Five Thousand Only) per person.
  • Any person resident outside India, not being a citizen of Pakistan, Bangladesh, and visiting India, may bring into India currency notes of Government of India and Reserve bank of India notes up to an amount not exceeding Rs. 25,000 (Twenty Five Thousand Only) per person.
For further clarification, you may visit Reserve Bank of India official website https://www.rbi.org.in/Scripts/FAQView.aspx?Id=66 where the issue is clarified under FAQ no 04. SUPERINTENDENT OF CUSTOMS VIGILANCE SECTION, CSI AIRPORT, MUMBAI मी त्यांना धन्यवाद देताना त्यांच्या संस्थळावरील कमाल मर्यादेत दुरुस्ती करण्यास सुचवले आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

एकदम ब्येस्ट केलंत ! धन्यवाद ! केवळ त्रासाबद्दल ओरड न करता सुजाण नागरिकांनी केलेल्या दुसर्‍यांना उपयोगी होऊ शकणार्‍या उत्तम सकारात्मक कृतीचे अजून एक उदाहरण !