नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला.
या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी :
१. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच.
२. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे.
३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच.
माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात...
काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते.
त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते.
बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता.
केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते.
इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल.
मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला.
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत.
आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत.
परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वाचने
134078
प्रतिक्रिया
637
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोकणी
Exactly दोन हजार रुपया हे
In reply to कोकणी by मिहिर
धन्यवाद !
In reply to Exactly दोन हजार रुपया हे by प्रीत-मोहर
नाही. ती चूकच असावी
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
:)
In reply to नाही. ती चूकच असावी by स्वधर्म
+१
In reply to :) by पैसा
अोके.
In reply to :) by पैसा
जुन्या चालत असलेल्या नसलेल्या
In reply to नाही. ती चूकच असावी by स्वधर्म
शाई जात नाहीhttp://zeenews
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या
In reply to शाई जात नाहीhttp://zeenews by मोहनराव
अबप तुमची का?
In reply to काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या by डॉ सुहास म्हात्रे
बहुतेक. पण वाहीन्यासर्फिंग
In reply to अबप तुमची का? by यशोधरा
काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या
In reply to काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या by डॉ सुहास म्हात्रे
ही अफवा पसरवण्यासाठी केलेली
In reply to काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या by डॉ सुहास म्हात्रे
झी न्यूज ही सर्वात खोटारडी
In reply to शाई जात नाहीhttp://zeenews by मोहनराव
ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे.
In reply to झी न्यूज ही सर्वात खोटारडी by कपिलमुनी
माफ करा साहेब बाकी चालू द्या,
In reply to ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे. by प्रसाद_१९८२
ही सर्वात खोटारडी आणि
In reply to माफ करा साहेब बाकी चालू द्या, by कैलासवासी सोन्याबापु
ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे.ओके तुम्हाला बहुदा कळलेले
In reply to ही सर्वात खोटारडी आणि by प्रसाद_१९८२
शुद्धीपत्रक
In reply to ओके तुम्हाला बहुदा कळलेले by कैलासवासी सोन्याबापु
उत्तम माहिति
चांगलं लेखन
दोन हजार रूपयांची नोट बाजारात
In reply to चांगलं लेखन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नमोजी परल्या दर्जाचे इमानदार
In reply to दोन हजार रूपयांची नोट बाजारात by खटपट्या
तिकडे जातिवंत सीए असलेल्या
अजून काही एअरलाईन्स ने नोटा
ते 2000 ची नोट, हायवे लॉजिक
साहेब,
In reply to ते 2000 ची नोट, हायवे लॉजिक by संदीप डांगे
रद्द केलेल्या नोटांच्या
In reply to ते 2000 ची नोट, हायवे लॉजिक by संदीप डांगे
हे सगळं ५०० च्याच नव्या
In reply to रद्द केलेल्या नोटांच्या by डॉ सुहास म्हात्रे
जस कि ???
In reply to हे सगळं ५०० च्याच नव्या by मराठी कथालेखक
हे सगळं ५०० च्याच नव्या
In reply to हे सगळं ५०० च्याच नव्या by मराठी कथालेखक
याचे उत्तर वर आहे.
In reply to हे सगळं ५०० च्याच नव्या by मराठी कथालेखक
त्यापेक्षा रु२००० च्या नोटांमुळे वरच्या सर्व कृतींचा खर्च (कागद, शाई, वाहतूक, हिशेब, वितरण, बाजारातून परत काढून घेणे, इ) अत्यंत कमी झालेला आहे. शिवाय, हे सगळे कारवाई गुप्त ठेवून कमी वेळात करण्यासाठी आवश्यक होते.दर २०००च्या नोटेमागे चार ५००च्या नोटा छापायला लागल्या असत्या. त्यासाठी पैसे, श्रम आणि वेळ चौपट लागले असते. त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे, हे जेवढे जास्त तेवढे ही कारवाई गुप्त राहण्याची शक्यता कमी. ही कारवाई गुप्त राहणे तिचा जीव होता.सिंधु नदीच्या दोन बँकांच्या मध्ये
In reply to रद्द केलेल्या नोटांच्या by डॉ सुहास म्हात्रे
दुसऱ्या धाग्यावर बेनामी
फॅन ..
In reply to दुसऱ्या धाग्यावर बेनामी by सुबोध खरे
या निमित्तानं
In reply to दुसऱ्या धाग्यावर बेनामी by सुबोध खरे
या निर्णयाचं स्वागत करणाऱ्या लोकांमध्ये
मस्त लेख
सहमत.
In reply to मस्त लेख by गॅरी ट्रुमन
असल्या बांडगुळांनी त्यांची बडबड ताबडतोब बंद करावी. आपण आपले भविष्य घडविण्यासाठी हातपाय मारायला तयार नसू तर असेच मॅट्रिक्समध्ये पडून राहा.== सहमत आहे, छान प्रतिसाद.१००% सहमत
In reply to मस्त लेख by गॅरी ट्रुमन
आपला अंदाज...
सहमत.
In reply to आपला अंदाज... by चौकटराजा
२००० ची नोट अचानक रद्द होईल
In reply to आपला अंदाज... by चौकटराजा
भ्रष्टाचारमुक्त भारत !!
असे नेमके प्रश्न विचारायचे
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
मला नेमके (किंवा इतरही)
In reply to असे नेमके प्रश्न विचारायचे by संदीप डांगे
तुमच्या सारख्या 'विचारवंता'चे
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
मी विचारवंत वगैरे असल्याचा
In reply to तुमच्या सारख्या 'विचारवंता'चे by प्रसाद_१९८२
नोटा बंद केल्याने भविष्यातला
In reply to मी विचारवंत वगैरे असल्याचा by मराठी कथालेखक
मला नाही तसे वाटत , माझा
In reply to नोटा बंद केल्याने भविष्यातला by पद्माक्षी
माणूस हा स्वार्थी आहे
In reply to मला नाही तसे वाटत , माझा by मराठी कथालेखक
भ्रष्टचार संपणार नाही, पण
In reply to मी विचारवंत वगैरे असल्याचा by मराठी कथालेखक
ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक
In reply to भ्रष्टचार संपणार नाही, पण by पक्षी
निवडणूक ओळखपत्राचा
In reply to ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक by मार्मिक गोडसे
निवडणूक ओळखपत्रामूळे निवडणुक
In reply to निवडणूक ओळखपत्राचा by प्रसाद_१९८२
पूर्णपणे नाही. बुरखा
In reply to निवडणूक ओळखपत्रामूळे निवडणुक by मार्मिक गोडसे
कहीतरीच. बुरखा न उघडता
In reply to पूर्णपणे नाही. बुरखा by श्रीगुरुजी
फोटो फक्त महिलांच्या
In reply to कहीतरीच. बुरखा न उघडता by मार्मिक गोडसे
हा जावई शोध मी पहिल्यांदाच
In reply to फोटो फक्त महिलांच्या by श्रीगुरुजी
असे नसेल
In reply to पूर्णपणे नाही. बुरखा by श्रीगुरुजी
पॅनकार्ड ही अत्यंत महत्वाची
In reply to ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक by मार्मिक गोडसे
पॅनकार्ड कधी अंमलात आले
In reply to पॅनकार्ड ही अत्यंत महत्वाची by मराठी कथालेखक
धन्यवाद
In reply to पॅनकार्ड कधी अंमलात आले by मार्मिक गोडसे
दुर्देवाने काँग्रेसलादेखील
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
नरसिंहराव गेल्यावर त्यांचं
In reply to दुर्देवाने काँग्रेसलादेखील by मार्मिक गोडसे
रावांच पार्थिव
In reply to नरसिंहराव गेल्यावर त्यांचं by अनुप ढेरे
खरंय, पीव्ही नरसिंह राव
In reply to रावांच पार्थिव by मार्मिक गोडसे
जसे माजी. पंतप्रधान
In reply to खरंय, पीव्ही नरसिंह राव by कैलासवासी सोन्याबापु
काळा चष्मा घातला तर जगही
In reply to जसे माजी. पंतप्रधान by मार्मिक गोडसे