Skip to main content

हिरवीन

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 24/05/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे एक मिपाकर परममित्र आणी त्यांच्या हिरवीनीला समर्पित! :) ______________________________________________ अरे हटाव बाजू, हिमालया आन फेअर ॲन्ड लवलीच्या कापूसभरल्या भावल्यांना     तूच माझी खरी हिरवीन ग!     एकच बावनकशी ब्युटी ग! झालो तर्राट आन लैच्च सैराट खुळा झालोय, सकाळ संध्याकाळ लोकं बघणार कायबाय बोलणार,     तरीबी, तुझच ध्यान काढीत बसणार ग!     आता ही येवढीच माझी ड्युटी ग! काय सांगू, दिसते कशी तू फुलावरली जणू पाकुळीच मऊ ग्वाड गुलाबजाम पाकातला     आन रसमलाई सगळी फिकी ग!     तूच ग माझी, हायेस लै क्यूटी ग! - संदीप चांदणे

वाचने 9813
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

काळ्या आभाळी चमचमती तारका तू पाठीवरती हात फिरिवता लागे कसे मऊ वळून वळून पोरी आन ट्राफिक सगळी बघती ग! तूच ग मायेची, हायेस स्कूटी ग!
. असलं कायतरी लिव्हशील वाटले शेवटी. ;)

In reply to by अभ्या..

याला म्हणतात... - - - - - - - - For - - - - डायल १०० नंतर १०१ नंतर १०२.... .....काय फायदा नाय... व्यनि करा... सांगतो! Sandy

In reply to by रातराणी

स्वपन्या लका घे कि पल्सर बिल्सर, किती दिवस भैनीची गाडी तंगाडणारेस?

आयना असल्याबिगर मायना नाही असे सांगून मी खाली बसतो.. प्रेक्षक बाकडा क्रं ५

In reply to by प्रचेतस

असं स्वतःच विचारतेत व्हय? का "प्रचू डार्लिंग" ऐकून घेऊसे वाटू लागलेय?

In reply to by प्रचेतस

रैवारीच जाऊन आलो बघा तुमच्या 'दसु' कडे!! अंधार पडला तरी पाय निघत नव्हता! 1 (फोटो फक्त पुराव्यादाखल आहे... लगेच पोज वगैरेवर (कुणीही!) कमेण्टू नये!) ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

वल्लीदा, ह्या कवितेचा आणि तुमचा 'अजून'तरी संबध नाहीय्ये हे नम्रपणे सांगू इच्छितो! ही कविता मिपावरच्या अत्यंत लाडक्या, मराठीत-गुड सेन्स ऑफ ह्यूमर असणारा, मनमिळाऊ, हजरजबाबी, हुश्शार(माझ्यापेक्षा थोड कमी), पुण्यात न राहणारा आणि विशेषण कमी पडतील अशा अवलीयासाठी आहे! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

दिसली का आमची? बाकी तुमच्या उजवीकडे जी मूर्ती आहे ती तीन शिरे, एक धड आणि चार पाय असलेली भासमान नरमूर्ती आहे.

In reply to by जव्हेरगंज

जिथ गुर्जींनी आमच्या सरांच्या तोंडावरच दार आपटलय... तिथ आम्हाला कोण इचारतंय!! बाकी, हे 'त्यातले'1 नसून 'आतले'2 आहे! १. त्यातले = तांब्यातले २. आतले = मनातले Sandy

सॅण्डीभौ, सैराट-अ मधल्या आर्चीवर लैच फिदा झालेले दिसतात ! (आमच्या हिशेबाने सैराट-ब वर सैराट-अ फ्री आस ड्युयल प्याक करुन सैराट म्हुन श्यान इकलय. काय, मंडळी बरुबर हायkका? )

In reply to by कानडाऊ योगेशु

कापराला कापूर चिकटून जसा भुरभूर आग पसरवत सगळा ढीग पेट घेतो तसा आहे हा रोग!! ;) Sandy