Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मोदक on Fri, 01/24/2014 - 21:18
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
इतिहास
वाङ्मय
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद
आस्वाद
समीक्षा
बातमी
माहिती
संदर्भ
प्रश्नोत्तरे
मदत
विरंगुळा
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.
  • Log in or register to post comments
  • 32326 views

प्रतिक्रिया

Submitted by तुमचा अभिषेक on Fri, 01/24/2014 - 23:07

Permalink

कुठे कोकण-मालवण जत्रा वा

कुठे कोकण-मालवण जत्रा वा आग्री कोळी मेळावा ज्यात कोंबडीवडे आणि मत्स्याहार, सोबतीला सोलकढी वगैरेचे खाण्यापिण्याचे स्टॉल असतील तर नक्की कळवा. मला समजले तर मी कळवेनच.
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Sun, 01/26/2014 - 22:51

Permalink

दर रविवारी सकाळी प्रभादेवी

दर रविवारी सकाळी प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्यमंदिरात मिनी थिएटरमध्ये सकाळी दहा ते एक या वेळात वेगवेगळ्या विषयांवरच्या डाॅक्युमेंटरीज दाखवल्या जातात. डाॅक्युमेंटरीजचे दिग्दर्शकही बहुतेकवेळा उपस्थित असतात, त्यांच्याशी अनौपरिक गप्पा, प्रश्नोत्तरं करता येतात. कोणत्या डाॅक्युमेंटरीज दाखवल्या जाणार हे एक ते दोन दिवस आधी जाहीर केलं जातं. हा उपक्रम एफएफएसआय, आयडीपीए आणि फिल्म्स डिव्हिजनचा असून गेल्या कित्येक महिन्यापांसून विनाशुल्क राबवला जातोय.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sun, 01/26/2014 - 23:32

In reply to दर रविवारी सकाळी प्रभादेवी by इनिगोय

Permalink

डाॅक्युमेंटरीला चलाऽऽऽऽ

डाॅक्युमेंटरीला चलाऽऽऽऽ डाॅक्युमेंटरीला चलाऽऽऽऽ डाॅक्युमेंटरीला चलाऽऽऽऽ
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Mon, 01/27/2014 - 09:26

In reply to डाॅक्युमेंटरीला चलाऽऽऽऽ by कवितानागेश

Permalink

चला चला..

चला चला.. डाक्मेंट्री कट्टा करायचा काय? मग तिथून माटुंग्याला खादाडीलापण जाता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/27/2014 - 09:35

In reply to चला चला.. by इनिगोय

Permalink

नेकी और पुछ पुछ....

"डाक्मेंट्री कट्टा करायचा काय? मग तिथून माटुंग्याला खादाडीलापण जाता येईल." कट्ट्याला आणि खादाडीला आमची कधीच ना नसते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 01/27/2014 - 09:41

Permalink

घोडबंदर रोड, ठाणे - २४ जाने ते २ फेब्रु

खाद्य, कला आणि संस्कृती मेळा http://articles.timesofindia.indiatimes.com/2014-01-25/thane/46600296_1_festival-thane-food-lovers
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मश्री चित्रे on Mon, 01/27/2014 - 09:50

In reply to घोडबंदर रोड, ठाणे - २४ जाने ते २ फेब्रु by सुनील

Permalink

पण..

नेमका कुठे आहे महोत्सव?
  • Log in or register to post comments

Submitted by भुमन्यु on Mon, 01/27/2014 - 11:26

Permalink

हिरानंदानी ठाणे मॅरथॉन

हिरानंदानी ठाणे मॅरथॉन १६ फेब्रु. २०१४. माहिती - www.hiranandanithanehalfmarathon.com रजीस्ट्रेशन - https://www.eventavenue.com/attReglogin.do?eventId=EVT4533
  • Log in or register to post comments

Submitted by माणिकमोति on गुरुवार, 01/30/2014 - 11:26

Permalink

फेब्रुवारी मध्ये व्हीजेटीआय

फेब्रुवारी मध्ये व्हीजेटीआय कॉलेज मधे अतिशय सुन्दर असे फुलान्चे प्रदर्शन असते. ह्यावर्षी किती तारखेला आहे, कुणाला कल्पना आहे??
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 01/30/2014 - 14:17

Permalink

उद्या परवा रामबाग कल्याण

उद्या परवा रामबाग कल्याण चिंतामणी हॉल गुलाब प्रदर्शन .उदघाटन तारका वर्षा उसगावकर .
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 01/30/2014 - 14:19

Permalink

उद्या नाही .१ ,२फे ला

उद्या नाही .१ ,२फे ला
  • Log in or register to post comments

Submitted by एकुजाधव on गुरुवार, 01/30/2014 - 15:28

Permalink

छायाचित्र प्रदर्शन

छायाचित्र प्रदर्शन

जहांगीर आर्ट गॅलरी, काळाघोडा. दि. २९ जाने, २०१४ पासुन सुरू.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Sat, 02/01/2014 - 07:32

Permalink

म्या जातोय.... सकाळी १० ते ५

म्या जातोय.... सकाळी १० ते ५:३० साठ्येला ... . . . Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 02/01/2014 - 09:57

Permalink

काला घोडा काही खास आहे का ?

काला घोडा काही खास आहे का ? मंगळवार ४ फेब्रु दुपारी १२ते २ काला घोडा , दुपारी ३ ते ५ शिवडी जेट्टी फ्लेमिंगो पक्षी पाहाणे असा विचार आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Sat, 02/01/2014 - 10:18

Permalink

आज मोनो रेल चे उदघाटन आहे

आज मोनो रेल चे उदघाटन आहे :) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीनिवास टिळक on Sat, 02/08/2014 - 08:27

Permalink

हिंदुत्व अध्ययन वर्ग

काय: हिंदुत्व अध्ययन प्रमाणपत्र वर्ग कोठे: केशव सृष्टी भायंदर मुंबई केव्हा: फ़ेब्रुवारी २१-२३,२०१४ समन्वयक: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अधिक माहिती: अनिल श्रीराम पांचाल १७ चंचल स्मृती ग द आंबेकर मार्ग वडाळा मुंबई ०२२ २४१८५५०२; २४१३६९६६; भ्रमण ध्वनी ९९७५४१५९२२
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Sat, 02/08/2014 - 19:04

Permalink

सोमवार २४ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता

व्हिजन महाराष्‍ट्र फाऊंडेशन, वैद्य साने ट्रस्‍ट आणि ग्रंथाली माधवबाग कृतार्थ मुलाखतमाला पर्व दुसरे – पुष्‍प तेरावे कमलाकर सोनटक्के वय झाले, पण आस्था सरली नाही; जिद्द संपली नाही! मुलाखत घेणार – चंद्रशेखर नेने सोमवार २४ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता चहापान – ५.३० ते ६.०० स्‍थळ - दादर माटुंगा कल्‍चर सेंटर, माटुंगा रोड. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाट्यशिक्षण घेतल्‍यानंतर सोनटक्के यांना मुंबई मराठी साहित्य संघाने बोलावून घेतले ते त्यांच्या नाट्यप्रशिक्षण वर्गाचे संचालक म्हणून. सोनटक्के यांनी त्यानंतर आयएनटी, मराठवाडा विद्यापीठ यांच्याकरता तीच जबाबदारी उत्साहाने निभावली व नाट्यप्रशिक्षण घेतलेले शेकडो नाट्यकलावंत ‘तयार’ केले. सोनटक्के यांनी कला संस्थेचे प्रशासक म्हणून नेहरू सेंटर आणि केंद्र व राज्य सरकारमध्ये उत्तम कामगिरी बजावली. मुख्यत: नाट्यमाध्यमातून व्यक्त झालेले सोनटक्के यांचे व्यक्तिमत्त्व बहुअंगी आहे. त्यामुळेच त्यांची मुलाखत हा गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा सांस्कृतिक ठेवाच ठरणार आहे. अवश्य यावे!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 02/09/2014 - 07:26

Permalink

जे पर्यटक स्वत: सहलीचे आयोजन

जे पर्यटक स्वत: सहलीचे आयोजन करून जातात त्यांच्यासाठी उपयोगी आज दुपारी (प्रवेश१२ ते ४) १२ ते ६ ,गोरेगाव पूर्व ,बॉम्बे इक्सिबिशन सेंटर ,TTF -OTM चे ट्रावल प्रदर्शन .भरपूर माहितीपत्रके ,नकाशे देतात .राज्ये आणि परदेशांचे स्टॉलस . प्रवेश रु पन्नास
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मश्री चित्रे on Sun, 02/09/2014 - 16:41

Permalink

सी के पी फुड फेस्टिवल

15 व 16 फेब्रुवारी ला सी के पी हॉल ठाणे येथे. 15 ला संध्याकाळी उद्‌घाटन. विविध पदार्थांचे स्टॉल्स. उदा- चिंबोरीचे कालवण, खिम्याचे कानवले,बोम्बिल फ्राय,निनावं, वालाचे बिर्डे इत्यादी. प्रवेश फी 20/-
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sun, 02/09/2014 - 16:46

In reply to सी के पी फुड फेस्टिवल by पद्मश्री चित्रे

Permalink

धत्त त्तेरे की..

धत्त त्तेरे की.. घासफूसवाल्यांसाठी काय नाय का? ;-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Sun, 02/09/2014 - 16:48

In reply to धत्त त्तेरे की.. by किसन शिंदे

Permalink

किसनद्येवा...झाडे लावा, झाडे

किसनद्येवा...झाडे लावा, झाडे जगवा :p ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sun, 02/09/2014 - 17:07

In reply to किसनद्येवा...झाडे लावा, झाडे by सुहास झेले

Permalink

(No subject)

:D
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मश्री चित्रे on Sun, 02/09/2014 - 17:37

In reply to धत्त त्तेरे की.. by किसन शिंदे

Permalink

आहे ना. निनाव ,वालाच बिर्ड ..

आहे ना. निनाव ,वालाच बिर्ड ..
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 02/11/2014 - 16:52

In reply to आहे ना. निनाव ,वालाच बिर्ड .. by पद्मश्री चित्रे

Permalink

निनाव काय असतं?

निनाव काय असतं?
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Tue, 02/11/2014 - 17:45

In reply to निनाव काय असतं? by सूड

Permalink

निनाव

बेसन, गुळ, नारळाचे दूध, वेलचीपूड, तूप घालून केलेल्या वड्या. ह्या वड्या ओव्हनला किंवा गरम तव्यावर भाजून केकसारख्या बनवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 02/12/2014 - 20:18

In reply to निनाव by सानिकास्वप्निल

Permalink

पाककृती.. पाककृती..

पाककृती.. पाककृती.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Wed, 02/12/2014 - 20:20

In reply to पाककृती.. पाककृती.. by मोदक

Permalink

पद्मश्रीताई

पद्मश्रीताई देतील पाकृ :)
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Tue, 02/11/2014 - 16:48

Permalink

राणीबागः 'बीएनएचएस' सोबत

Bnhs Programmes‎The Bombay Natural History Society (BNHS) Bats and Trees walk at Ranibaug Date: 16th Feb, 2014, Sunday Spread over 53 acres, Ranibaug is Mumbai’s only heritage botanical garden, and has recently celebrated 150 years of its existence. Ranibaug is home to an astonishing 853 plant species including 286 trees. Many exotic species like Baobab and Tree of Heaven can be seen here. Fruiting and flowering trees such as Flame of the Forest, Indian Laburnum, Indian Coral Tree, and fig trees grow here. The garden is also host to a large colony of India’s largest bat, Indian Flying Fox. Get to know more about these mysterious creatures of the night from a bat expert. Reporting: Outside the main gate at 8.45 a.m. Charges: For members Rs. 100/- per head and for non-members Rs. 150/- per head. (Cost includes entry ticket and BNHS expertise) Registration*: Call at Hornbill House 22871202/22821811 or e-mail at bnhs.programmes@gmail.com. Please carry adequate water and hat/cap. Note: Carrying plastic bags, disposable water bottles or food is not allowed inside the zoo premises. Such items will be collected and kept outside at the gate. Participants can carry water in non-disposable water bottles.
  • Log in or register to post comments

Submitted by मोक्षदा on Tue, 02/11/2014 - 21:57

Permalink

फुलांचे प्रदर्शन

दर वर्षीप्रमाणे यंदाही व्ही.जे.टी.आय (V.J.T.I.) महाविद्यालयात २२ व २३ फेब्रुवारी २०१४ या दोन दिवशी फुलांचे प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे खूप वेगवेगळ्या नर्सरीज यात आपल्या फुलांची सजावट मांडतात. बागेतील झाडे, बोन्साई, landscaping, औषधी वनस्पती बघण्यास मिळतात. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी फुलांच्या सजावटीत भाग घेतात, हरबेरियम बघण्यास मिळते. गुलाबाच्या फुलांची स्पर्धाही घेतली जाते आणि विजेत्यांना राजा-राणीचा किताब दिला जातो. विविध प्रकारच्या भाज्या-फळेही येथे मांडलेली असतात. संपूर्ण प्रदर्शन बघण्यास २-३ तास लागतात. लहान मुले मात्र कंटाळतात. झाडे घेण्याचा मोह टाळता येतच नाही. त्यांच्यासाठी तर शेवटी मैदानावर खास स्टॉल असतात. झाडे, बिया, कुंड्या, गांडूळ खते, झाडांसाठी लागणारे अवजारे सर्व काही विकत मिळते. हौसेला मोल नाही. जरूर भेट द्या. सर्वसामान्यांना परवडेल इतकेच तिकीट आहे. (हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी वनस्पतिशास्त्रातली तज्ज्ञ मंडळी पूर्ण वर्षभर मेहनत घेतात.)
  • Log in or register to post comments

Submitted by माणिकमोति on Wed, 02/12/2014 - 10:21

In reply to फुलांचे प्रदर्शन by मोक्षदा

Permalink

धन्यवाद...!

माहीतीबद्दल धन्यवाद...!!! नक्की जाणार... कधिपासुन ह्या प्रदर्शनाची तारीख शोधत होते...
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on गुरुवार, 02/20/2014 - 23:09

In reply to फुलांचे प्रदर्शन by मोक्षदा

Permalink

येस्स , वीजेटीआय. आमच्या

येस्स , वीजेटीआय. आमच्या कॉलेजमध्ये. एकेवर्षी फिरलोय मी, पण त्यामागे कारण वेगळेच होते. बाकी स्वताला फुलांची आवड नसली तरी आवड असलेल्यांनी नक्कीच बघण्यासारखे आहे एवढे खात्रीने सांगू शकतो. तसेच गेल्या रविवारी मी भायखळा राणीबागेत देखील मित्रांबरोबर म्हणून एका फूलप्रदर्शनाला फेरफटका मारून आलो, ते देखील चांगले होते, ते ही दरवर्षी भरते हे मला जवळ राहत असूनही या वर्षीच समजले. फूलप्रदर्शनाचे फूलप्रदर्शन आणि मुलांना बरोबर न्यायचे असल्यास राणीबागेतले प्राणीही दाखवू शकता जेणेकरून ते वैतागणार नाहीत. याबद्दल आधी इथे सांगू न शकल्याबद्दल क्षमस्व !
  • Log in or register to post comments

Submitted by दर्यासारंग on Wed, 02/12/2014 - 21:33

Permalink

...

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by दर्यासारंग on Wed, 02/12/2014 - 21:40

Permalink

सी के पी हॉल, ठाणे पश्चिम १६ फेब्रुवारी

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on गुरुवार, 02/20/2014 - 14:09

Permalink

द लिव्ह वेल डाएट

निरोगी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली देणा-या डॉ. सरिता डावरे आणि शेफ संजीव कपूर यांच्या ‘द लिव्ह वेल डाएट’ या पुस्तकाची आता मराठी आवृत्तीही प्रकाशित होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल आणि ख्यातनाम गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार असून विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मंडळीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ‘द लिव्ह वेल डाएट’ हे पुस्तक डाएटविषयीचं सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करणारं आहे. कारण या पुस्तकात योग्य आणि अयोग्य खाण्यातील फरक समजावून सांगण्यात आलेला आहे, शिवाय निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आलेलं आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अभिनेत्री स्वरूप संपत या मान्यवरांशी गप्पा मारतील. दिनांक : २४ फेब्रुवारी २०१४ स्थळ : महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड वेळ : सायंकाळी ६ साभार: प्रहार
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on गुरुवार, 02/20/2014 - 15:49

Permalink

डोंबिवलीत हॅण्डलूम एक्स्पो

आत्ताच मटामध्ये ही बातमी वाचली.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 02/20/2014 - 16:21

In reply to डोंबिवलीत हॅण्डलूम एक्स्पो by भाते

Permalink

अरे वा.

अरे वा. आता मात्र डोम्बिवलीच मध्यवर्ती करुन घ्यावं लागणार की. निदान एका दिवसापुरतं ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 02/20/2014 - 21:50

In reply to अरे वा. by कवितानागेश

Permalink

तुमच्या साठी १ दिवसापुरते

तर आमच्यासाठी नेहमीच डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by साळसकर on Wed, 03/05/2014 - 21:22

Permalink

नरेपार्क परेळ, मुंबई - खाद्यमेळावा

नरेपार्क परेळ, मुंबई - खाद्यमेळावा बहुतेक या रविवार पर्यंत असेल, काही डिटेल्स मिळाले तर कळवतो, कानावर आले तसे इथे टाकलेय, इतर कोणाला माहीत असेल तर त्यांनीही महिती दिल्यास उत्तम :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 03/05/2014 - 22:44

Permalink

७ ते ९ मार्च

अर्थकारणा बद्दल व्याख्यानमाला संध्याकाळी ७ ते ९ ब्राम्हण सभा, डोंबिवली पुर्व. ३ वक्ते आहेत.पैकी एक चंद्रशेखर टिळक.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on गुरुवार, 03/06/2014 - 10:57

Permalink

जागतिक म‌हिला दिनानिमित्त

आत्ताच मटामध्ये ही बातमी वाचली.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Tue, 03/25/2014 - 13:20

Permalink

आख्यान २०१४

पुराणशास्त्राला वाहिलेला आशियातील पहिलावहिला 'आख्यान २०१४' हा महोत्सव मुंबई विद्यापीठात रंगणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने या अनोख्या महोत्सवाची रचना केली आहे. भारतात जागतिक पुराणकथांवर आधारित एक परिपूर्ण अभ्यासक्रम चालवणारे मुंबई हे एकमेव विद्यापीठ आहे. संस्कृत विभागातर्फे हा अभ्यासक्रम राबविला जातो. पुराणकथांबाबत आज चुकीची किंवा अर्धवट माहिती तसेच एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून माहिती दिली जाते. यामुळे अनेक गरसमजुती तयार होतात. हे टाळण्यासाठी योग्य, नेमकी आणि निष्पक्ष माहिती उपलब्ध करून देण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातून होणार आहे. हा महोत्सव ५ एप्रिल रोजी विद्यापीठातील संस्कृत भवनात पार पडणार आहे. साभार:पुराणांचे 'आख्यान'
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 04/09/2014 - 13:40

Permalink

सौजन्यः सामना वृत्तपत्र.

येवा, आंबे खावा! मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - कोकणातील अस्सल हापूस आंब्याची चव चाखणार्‍यांसाठी कोकण प्रतिष्ठानने नेहमीप्रमाणेच आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव १२ एप्रिल ते २७ मे या कालावधीत विलेपार्ले, दादर, ठाणे, मुलुंड, बोरिवली या ठिकाणी भरविण्यात येणार असल्याचे आज प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र तावडे यांनी या महोत्सवाची माहिती दिली. इथे भरणार महोत्सव १२ ते २० एप्रिल : डॉ. हेडगेवार मैदान, हनुमान रोड, विलेपार्ले (पू) २१ ते ३० एप्रिल : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क. १ ते ९ मे : न्यू इंग्लिश स्कूल मैदान, राम मारुती रोड, ठाणे (प) १० ते १८ मे : संभाजी राजे मैदान, मुलुंड (पू) १९ ते २७ मे : एमएचबी कॉलनी मैदान, बोरिवली (प) कालावधी : १२ एप्रिल ते २७ मेपर्यंत ठिकाण : विलेपार्ले, दादर, ठाणे, मुलुंड, बोरिवली विलेपार्ल्यातही आमंत्रण कोकणातील बागायतदारांना उद्योगात प्रोत्साहन मिळावे म्हणून श्रीकांत सरमळकर फाऊंडेशनच्या वतीने २७ एप्रिल ते ७ मेदरम्यान भव्य आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघात संपन्न होणार्‍या या महोत्सवात बागायतदारांनी २३ एप्रिलपर्यंत संपर्क व नाव नोंदणी करावी. महोत्सवातील स्टॉल्स विनामूल्य देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी श्रीकांत सरमळकर फाऊंडेशन, इमारत क्रमांक ३५ समोर, खेरनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ५१ येथे संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on Fri, 04/11/2014 - 00:42

In reply to सौजन्यः सामना वृत्तपत्र. by शिद

Permalink

सही ...

सोबतीला आणखीही कोकणी खाद्यपदार्थ असतीलच ना.. किमान आंब्याफणसाचे तरी.. २१-३० एप्रिल - शिवाजी पार्क , यातील एखादा विकांत जमवायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीनिवास टिळक on गुरुवार, 07/24/2014 - 19:03

Permalink

श्री भास्कराचार्य ९००वी जयंती परिसंवाद, ताजे वृत्त

वरील परिसंवादात (१८-२१ सप्टेंबर,ठाणे) वाचण्यात येणाऱ्या ४० एक शोध निबंधांचे सारांश विद्या प्रसारक मंडळ ठाणे यांच्या web site वर प्रसिद्ध झाले आहेत. जिज्ञासूनी ते खालील दुव्यावर अवश्य वाचावेत http://www.vpmthane.org/bhaskara900/ नमुना म्हणून एक सारांश खाली देत आहे जो माझ्या सारख्या गणितात अनभिज्ञ असलेल्या माणसालाही उद्बोधक वाटला IX PEDAGOGICAL IMPORTANCE OF BHĀSKARĀCĀRYA’S WORKS TODAY Pedagogical Analysis of Lilavati Sudhakar C. AGARKAR, VPM's Academy of International Education and Research, Thane Lilavati, a book written by Bhaskaracharya in 1150 is a master piece of mathematical treatises. Bhaskaracharya, literally means Bhaskar the teacher. One notices that various facets of a good teacher are interspersed within the text. The entire text is written in poetic form with profuse use of alliterations, pun, metaphors, etc. At several places he addresses the reader as sakhe (a female friend), bale (a young girl), mitra (a male friend), etc. Moreover, he frames the questions taking the help of animals and bird like elephants, monkey, serpent, peacock, swans, bees, etc. He also makes use of mythological stories from Hindu epics like Ramayana and Mahabharata to frame question. Lilavati has a huge collection of problems relating to arithmetical calculations, algebraic equations and properties of geometrical figures. The author attempts to develop essential pre-requisites through a series of examples and provides necessary hints required to solve a given problem. Openness is the hallmark of Lilavati as the author suggests different ways of dealing with the problem and leaves it to the reader to use the most appropriate one. As a part of a yearlong celebration of Bhaskaracharya's 900th birth anniversary the Vidya Prasarak Mandal, Thane has initiated workshops on Lilavati for school children. Since January 2014 a dozen workshops have been conducted both in rural as well as the urban parts of India. Apart from acquainting them with salient features of Lilavati these workshops were used to test the utility of Bhaskaracharya's pedagogy in teaching school mathematics. It has been noticed that the pedagogic techniques advocated in Lilavati are found effective in removing students' fear of mathematics, motivating them to handle an unknown situation and developing problem solving skills. Constructivism, as a philosophy of learning, has gained importance in recent days and is advocated as an effective method of teaching school subjects. The critical analysis of Lilavati shows that Bhaskaracharya has used this technique about 900 years ago. It is high time that we implement it for effective teacher pupil interactions. The paper will present the pedagogic analysis of Lilavati and discuss its relevance for the teaching of mathematics in 21st century
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/24/2014 - 19:09

In reply to श्री भास्कराचार्य ९००वी जयंती परिसंवाद, ताजे वृत्त by श्रीनिवास टिळक

Permalink

माहितीकरिता

बहुत धन्यवाद. नक्की प्रयत्न केला जाईल अटेंड करण्याचा.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 11/12/2014 - 03:06

Permalink

निर्मळ यात्रेस १८

निर्मळ यात्रेस १८ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ज्यांना सुकेळी खायची असेल त्यांनी जरुर हजेरी लावावी.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Wed, 11/12/2014 - 10:46

In reply to निर्मळ यात्रेस १८ by शिद

Permalink

हो.. नक्की जाणार आहे

हो.. नक्की जाणार आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Wed, 11/12/2014 - 10:36

Permalink

ऐकलय याबद्दल खूप. पण जायला

ऐकलय याबद्दल खूप. पण जायला मिळालं नाही कधी. लिन्कवर माहिती नीट दिलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 11/12/2014 - 15:55

Permalink

जानेवारीतली फेस्ट्स

पवईफेस्ट, पवई काळाघोडा महोत्सव, मुंबई (तोबा गर्दीची जत्रा) उपवन फेस्टिव्हल, ठाणे
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 12/17/2014 - 21:21

Permalink

९ ते ११ जानेवारीपर्यंत वर्सोवा - अंधेरी मुंबईत कोळी सी फूड महोत्

Image removed. कोळी नृत्य, आगरी कोळींचा पेहराव, त्यांची बोली भाषा, अस्सल कोळी लोकांचे झणझणीत तयार झालेले पारंपारिक मासळी खाद्य व त्यांचा परंपरागत चालत आलेला मच्छिमारी व्यवसाय याचबरोबर यातून परिस्थितीशी झटून उभा राहिलेला आधुनिक आगरी-कोळी माणूस याचे जिवंत चित्र या महोत्सवातून प्रदर्शित होणार आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com