मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू .
अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्या बांधावर बसून पाहता येऊ लागला . आपली तरुण पिढी तर अक्षरश: दिवाणी झाली , आधी missed call, मग sms , mms,मग Bluetooth, मग wai fi ,2g ,3g आणि आता 4g ,
राजकारणा प्रमाणेच आपल्या समाज मनाला व्यापून तरीही दशांगुळे उरलेले हे मोबाईल विश्व मानवाच्या एवढे उपयोगाचे आहे म्हंटल्यावर मानव नावाचा इब्लीस प्राणी त्याचा गैर वापर केल्या शिवाय थोडाच राहणार ,
ह्या साधनाचा दुरुपयोग करणारे महाभाग हि आहेतच जगात ,
अगदी लोकांना विनाकारण वेळी अवेळी रिंग देणे ,अश्लील मेसेज करणे यासारख्या टुकार उद्योग करणाऱ्या प्राण्या प्रमाणेच अगदी मोबाईल धारकाला वैताग येई पर्यंत s m s व call द्वारे आपला व्यवसाय करणारे महाभाग देखील पहावयाला मिळतात , हे सगळे कमी आहे म्हणून कि काय काही महाभागांनी आता असा प्रकार सुरु केलाय , ते मोबाईल वर s m s पाठवतात तुमचा नंबर आमच्या लकी नंबर योजनेत भाग्यवान विजेता ठरला आहे तुम्हाला 5 लाख great British pound मिळणार आहेत . तुमचे डिटेल्स s m s करा .
वाचणारा शहाणा असला तर डिलीट करतो , पण असे शहाणे आपल्या देशात फार कमी असतात , जवळ पास दुर्मिळ प्रजाती . मग काय हे s m s पाठवतात तिकडून call येतो किंवा यांना दम नाही धरवला तर हेच दहा वेळा call करून विचारतात sir / madam आमच्या बक्षिसाच काय झाले ?
मग सुरु होतो खरा खेळ , तिकडून उत्तर देणारा सांगतो मी तुमचे पैसे घेऊन निघणारच आहे पण काही कागदपत्रे आणि tax म्हणून तुम्हाला अमुक टक्के रक्कम भरावी लागेल , यांच्या कडे तेवढे पैसे असतील तर लगेच अकौंट नंबर दिला जातो , पैसे भरून पावती मेल करायला सांगतात . आपल्या ह्या बकर्या कडे पैसे जर कमी असतील तर चक्क बार्गेनिंग पण होते , रक्कम कमी जास्त करून पैसे भरले जातात पावती स्कॅन करून मेल पाठवला जातो , आणि परत सुरु होते फोनाफोनी .
मग दोनचार दिवसांनी हा बकराच फोन करतो तेव्हा सांगितले जाते मी आताच इंडियात येतोय तुमचे बक्षीस घेऊन विमानतळा वर आहे पण तुमच्या सरकारचा इनकम tax भरल्या शिवाय मला येथून बाहेर सोडणार नाहीत . तेव्हा अजून x y z % रक्कम अमुक अमुक tax एजंट च्या खात्यात भरा ,
आता पर्यंत बकर्याने पोट तर फाडून घेतलेलेच असते पण आता त्याला वाटते हि प्रोसेस म्हणजे त्या फाडलेल्या पोटा ला टाके असतील , पण त्याला काय माहित कि हे टाके घालणे नसून त्याचा कोथळा बाहेर काढणे चालले आहे , बिचारा मोठ्या आशेने परत दुसर्या account ला पैसे जमा करतो पावती मेल करतो , परत फोना फोनी
आताची फोनाफोनी जरा वेगळी असते , आपल्या बकर्याचा संयम संपत आलेला असतो पण दोन्ही हात दगडा खाली अडकलेले असतात एकदा नाही तर दोन वेळा माती खाल्लेली असते . आणि तिकडून चालू असते तिसर्यांदा माती खायला लावायची जबरदस्त गोड गळचेपी .अजून थोडेसे पैसे अमुक अमुक ऑफिसरला दिल्यास तुमचे बक्षीस डायरेक्ट तुम्हाला कॅश मिळणार असते किंवा चेक़ दिला जाणार असतो पण त्याच वेळेस हे देखील सुचवले जाते कि आधीच क्लेम करायला , तुम्हाला पैसे भरायला खूप उशीर झालाय आता लगेच हे पैसे भरले नाहीत तर तुमचा क्लेम रद्द होऊन तुम्ही भरलेले पैसे वाया जातील, आम्ही एवढी मदत करतोय पण तुम्हीच सहकार्य करायला तयार नाहीत . आपल्या बकर्यात थोडी धुगधुगी असलीच तर बकरा त्यांच्यावर उखडतो , मग तिकडून सुरु होते, जा तुला काय करायचे ते कर हि भाषा .आणि मग सरकते आपल्या बकर्याच्या पायाखालील जमीन .
कारण जवळपास आताशी त्याच्या डोक्यात उजेड पडलेला असतो कि आपल्याला बकरा करण्यात आलेय , मोठ्या आणि फुकट बक्षिसाच्या आशेने आपण आपली आहे ती पुंजी पण गमावून बसलोय . पण हे सगळ कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो .
आजच्या ह्या मतलबी दुनियेत कुणी हि कुणाला हि काहीही फुकट देत नाही हे साधे सत्य आपण किती सहज पणे विसरतो आणि अश्या फसवणुकीला बळी पडतो ,
ह्यात देखील व्हरायटी असते बरका , कधी कधी s m s येतो कि परदेशात एक बडा पैसेवाला वारलाय , त्याला वारस नाही , त्याच्या संपत्तीचे व्यवहार आम्ही बघतोय , तुम्ही तुमची माहिती पाठवल्यास आम्ही ती संपत्ती तुम्हाला charity trust तर्फे दान केली असे दाखवू , त्या साठी पहिले तुम्ही थोडेसे पैसे कागदपत्रे बनवण्यासाठी आणि tax भरण्यासाठी अमुक account मध्ये जमा करा , आमचे कमिशन जे काही असेल ते तुम्हाला तुमचे पैसे मिळाल्यावर दिले तरी चालेल .आमचा तुमच्यावर विश्वास आहे.
कधी s m s येतो तुच्या नंबर द्वारे तुम्हाला तुमच्या जागेवर मोबाईल tower allot झाला आहे , त्या साठी तुम्ही इच्छुक असाल तर तुमचा पत्ता आणि इमेल आयडी , जागेचा उतारा मेल करा , तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पाहिजे त्या tower कडून १०,००,००० रुपये diposit आणि महिना १५,००० रुपये भाडे मिळेल ,
आता हा s m s बघून आपण नक्की रिप्लाय करतो आणि सुरु होतो त्याच तिकीटा वर तोच खेळ ,. तुमच्या कडे साहेबाला खुश करण्या साठी आणि प्रोसिस्सिंग फी म्हणून पैसे मागितले जातात , sorry account ला भरायला सांगितले जातात , आणि मग परत वरचीच स्टोरी रिपीट .
कधी s m s येतो तुमच्याशी मला confidential बोलायचे आहे मला ह्या X Y Z मेल वर मेल करा ,तुम्हाला त्रास देतोय पण माझा काही इलाज नाही sorry , तुम्ही मेल केला कि सांगितले जाते असेच काही तरी थातूर मातुर आणि नंतर account ला पैसे भरा हा मंत्र , आणि मग परत पहिले पाढे पंचावन्न .
अजून एक कार्यक्रम ,
तुमचा बायोडाटा मारुती सुझुकी कंपनी साठी किंवा एखाद्या फेमस कंपनी मध्ये जॉब साठी सिलेक्ट झाला आहे , तुम्ही ह्या तारखेला इंटरव्यु साठी या तुमचा बायोडाटा इमेल करा आणि तुमच्या प्रवासाच्या साठी आम्ही तुम्हाला जे प्लेन चे तिकीट पाठवू त्याचे आणि रजिस्ट्रेशन फी चे असे अमुक तमुक रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढून पाठवा किंवा चेक़ पाठवा , मग आम्ही तुम्हाला तुमचे तिकीट आणि जे लेटर पाठवू त्याची प्रिंट घेऊन ठरलेल्या वेळी मुलाखतीला या, मुलाखती नंतर तुमचे पैसे लगेचच परत दिले जातील .
अहो हा एक s m s आणि वरचा tower चा s m s यांनी तर भले भले सुशिक्षित लोकांना माती खायला लावलीय हो , sorry सुशिक्षित नाही फ़क़्त शिकलेल्या लोकांना .
अजून आता चीन च्या मोबाईल क्रांती नि सगळे डबडे एकदम स्वस्त होऊन राहिलेत म्हणजे जवळपास सगळ्या मोबाईल मध्ये इंटरनेट असतंय , आता त्याच्यात पण हेच फंडे आन वापरणाऱ्या दिड्शाण्याला मोठ मोठे गंडे.मोबाईल नंबर च्या ऐवजी इमेल आयडी असतोय फ़क़्त बाकी सगळी भाषा सेम सगळी प्रक्रिया सेम आणि सगळी बोंबाबोंब पण सेम .
फक्त मोबाईल वापरनार्यात कदाचित बरेच जण अडाणी असतील पण नेट वापरणारे आणि त्याद्वारे असे गंडले जाणारे नक्कीच किमान लिहिता वाचता येणारे असतात , का बरे लोक आपली थोडी बुद्धी चालवून पहात ?
किती जादू असते ह्या पैशाची माहितीय का तुम्हाला ? तुमच्या एखाद्या परिचिताला असा s m s किंवा मेल आला असेल ना तर त्याला जरा सांगून पहा , म्हणावं बाबा असे कोणी नसत , असे कुणी कुणाला पैसे देते का ? बर देणार असेल तर ते तुझ्या कडे कशाला मागतेय ?जे काय द्यायचेय त्यातून कापून घेऊन उरलेले देऊन टाका की म्हणावं .
असे सांगितल्या बरोबर त्याचे डोळे पहा मग कळेल तुम्हाला तुम्ही कुठल्या मोहळावर दगड मारलाय ते , त्याची नजर तुम्हाला सांगेल तुम्ही जगातले १नंबर धोकेबाज आहात , कैकयी पेक्षा मत्सरी आहात , आणि कदाचित या पृथ्वी वरचे त्याचे एकमात्र शत्रू आहात .
ती व्यक्ती जर थोडी सडेतोड असेलना तर तुम्हाला जागेवर ऐकायला मिळेल त्यांच्या नशिबाची थोरवी , आणि तुमच्या करंट्या नशिबाचे प्रमाणपत्र......
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
याद्या
6793
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा... बाणखेले साहेब,
मानायचं का ?
चांगले लिहिता. लिहित जा. बाकी
धनबक्षिसाचे जे ईमेल किंवा
बँकेत काम करणारी एक काकू
In reply to धनबक्षिसाचे जे ईमेल किंवा by विनीत संखे
मस्त
लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत
In reply to मस्त by प्रचेतस
छान मुद्दा निवडलात !!
जाम भारी वाटलं वाचुन, पुर्वी
आता असे फोन आले की मी सऱळ
In reply to जाम भारी वाटलं वाचुन, पुर्वी by ५० फक्त
असं काय काका,किमान एखाद्या
In reply to आता असे फोन आले की मी सऱळ by पिवळा डांबिस
काय ५०??
In reply to असं काय काका,किमान एखाद्या by ५० फक्त
बाप रे!!
असे बरेच लॉटरीवाले समस हल्ली
असले एसेमेस खूप येतात..आपण तर
छान लिहीलंय. चेतन सुभाष गुगळे
त्यांच मत ते
In reply to छान लिहीलंय. चेतन सुभाष गुगळे by नगरीनिरंजन
सध्या तरी तशी गरज वाटत नाहीये
In reply to त्यांच मत ते by शैलेन्द्र
ट्राय ट्राय बट डोन्ट क्राय
In reply to छान लिहीलंय. चेतन सुभाष गुगळे by नगरीनिरंजन
लै भारी
In reply to ट्राय ट्राय बट डोन्ट क्राय by चेतन सुभाष गुगळे
अपेक्षेप्रमाणे उपयुक्त आणि
In reply to ट्राय ट्राय बट डोन्ट क्राय by चेतन सुभाष गुगळे
कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला
लाभ आणि लोभ यातला फरक ओळखता यायलाच हवा.
In reply to कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला by शिल्पा ब
आज लोकसत्ता मधे..