Skip to main content

मिसळपावचे अधिकृत धोरण

लेखक सरपंच यांनी मंगळवार, 13/07/2010 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज दिनांक १३/०७/१० ला मिसळपावच्या धोरणांना प्रसिध्दी देतांना आनंद होत आहे. ही धोरणे मिसळपावची यापुढील मार्गदर्शक असतील. यापुढे मिसळपाववर वावर करतांना आणि लेखन करतांना सदस्यांना ही धोरणे मान्य आहेत असं गृहीत धरल्या जाईल. १. मिसळपावावरील लेखनात ललित किंवा वैचारिक लेखन, गद्य, पद्य, पाककृती यांना स्थान दिले जाईल. या व्यतिरिक्त खेळीमेळीचे धागे मिसळपावावर ठेवले जातील. लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल. एखाद्या सदस्याने मिसळपावाचे सदस्यत्व सोडले असता त्याचे लेखन प्रकाशित ठेवण्याचा किंवा अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेईल. २. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा. ३. आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे झाल्यास मिसळपावाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करता येईल. ४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी. ५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करणारे लिखाण, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल. ६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी. ७. संपादकीय धोरणात परिस्थिनुरुप बदल करण्याचे हक्क संपादकांकडे राखीव आहेत. त्याचा वेळोवेळी वापर करता येईल. गरज भासल्यास सदस्यांना जाहीर निवेदनामार्फत तशी सूचना दिली जाईल. ८ . वारंवार सूचना/ ताकीद देऊनही एखाद्या सदस्याचा खोडसाळपणा दिसून येत असेल तर विशिष्ट कालावधीसाठी व्य.नि. आणि खरडवहीची सुविधा काढून घेण्याचे अधिकार संपादक मंडळाला आहेत. या उपायानंतरही सदस्याच्या वागणूकीत सुधारणा नसल्यास सदस्याचे खाते बंद होऊ शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी. ९. संकेतस्थळावरील अडचणी, लेखांचे संपादन, संपादनाविषयी तक्रारी यांच्यावर निघणारे धागे संपादन मंडळाला अनावश्यक वाटल्यास त्वरित उडवले जातील आणि त्याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही. १०. येथील सर्व लेखनप्रकारातील आणि सर्व विषयांवरील लेखन तसेच त्यावरील सर्व प्रतिसाद, हे त्या त्या लेखन/प्रतिसाद कर्त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याला मिपा व्यवस्थापनाचे कुठल्याही प्रकारे/अर्थाने अनुमोदन नाही याची सर्व सदस्य, लेखक आणि वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. ११. मिपा संकेतस्थळ खासगी आहे. कोणी सदस्य मराठी संकेतस्थळास बाधा येईल असे कृत्य करीत असल्यास, जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करीत असतील किंवा संकेतस्थळावरील वातावरण खराब करीत असल्यास, संस्थळास धोका निर्माण करीत आहे असे वाटत असल्यास सबंधिताचे लेखन काढून टाकण्याबरोबर सदस्यत्व रद्द करणे, कायमचे निष्काषित करणे त्याबाबतचा निर्णय संपूर्णपणे संपादक मंडळाचा, व्यवस्थापनाचा, किंवा ज्यांना व्यवस्थापनाने अधिकार दिले आहेत त्यांचा किंवा संस्थळ मालकांचा राहील.त्याबाबत कोणतेही कारण , स्पष्टीकरण देणे आवश्यक नाही. मिसळपावाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी वरील सूचनांचे पालन करावी अशी अपेक्षा आहे. सदस्यांना लेखनविषयक धोरणांची जाणीव करून देण्यास आणि वेळोवेळी मदत करण्यास संपादक मंडळ नेमलेले आहे. लेखनविषयक प्रश्न असल्यास जाहीर लेख न टाकता संपादकांना खरडी किंवा व्यक्तिगत निरोपांद्वारे विचारावेत. संपादक मंडळ या आयडीवर निरोप पाठवूनही हे प्रश्न विचारता येतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 227145
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by गॉडजिला

* लागू २६ मे पासूनच होत असल्याचे दिसते आहे (शासकीय पुर्वसूचना म्हणजे नियमावली गॅझेटेड ३ महिन्यांपुर्वीच देऊन झालेली आहे) (संदर्भ) * टेक्निकली कंप्लेटची पोच २४ तासात आणि निपटारा १५ दिवसात, प्रायव्हसी भंग मजकुर तत्काळ वगळणे इत्यादी लगेच लागू व्हावे, १५ दिवसात समाधान अथवा निपटारा न झाल्यास सेल्फ रेग्युलेटींग बॉडीं़ कडे जायचे आहे जसे कि मिपासारख्या संस्थळाला कोणती सेल्फरेग्युलेटींग बॉडी लागू होईल हे क्लिअर नाही . त्यामुळे मिपा व्यवस्थापनाने निपटारा न केलेल्या केसेस पुढच्या स्तराची व्यवस्था होईपर्यंत रेंगाळतील. (पण बहुधा केंद्रसरकारच्या केंद्रीय समितीकडे जाण्याचा मार्ग तो पर्यंत मोकळा रहावायास हवा असा अंदाज आहे पण नक्की माहित नाही चुभू देघे) ** सरकारचे सुरवातीचे लक्ष मोठ्या सोशल मेडीया साईट कडे असणे आणि कोर्ट कज्जात छोट्या मोठ्या तात्पुरत्या स्टे मिळणे यात काही आठवडे ते काही महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ज्या ज्या राज्यात राज्यस्तरीय निवडणूका येतील तेथे वातावरण तापून छोट्या केसेसही धसास लावण्याचे आग्रह वाढू लागतील. * चर्चात्मक मराठी संस्थळांनी आपापसात चर्चा करून सेल्फरेग्य्लेटींग बॉडी जाहीर करणे श्रेयस्कर असावे अन्यथा मोठ्या संस्थळांच्या सेल्फरेग्य्लेटींग मध्ये सरकारने बसवले तर नियमांची संख्या वाढेल मिपासारख्या छोट्या संस्थळांचे कंबरडे मोडू शकेल त्यामुळे मायबोली, मिपा, ऐसी अक्षरे यांनी वेळीच पावले उचलणे श्रेयस्कर असावे. आता

In reply to by माहितगार

मिसळपाव साइट आणि त्यावरचे लेखन हे इतर फेसबुक ट्विटर वगैरे संस्थळावरील लेखनापेक्षा लहान असते. त्यावर कंट्रोल ठेवणे सोपे असते. पण मोठ्या साइटवर तपासण्या करण्यासाठी काही यांत्रिक/ इलेक्ट्रॉनिक/ सॉफ्टवेर वापरावी लागतात. किंवा कुणी कंप्लेट केल्यावर action घेतात. म्हणजे साइटवरून त्या व्यक्तिचे अकाउंट गोठवतात/ रद्द करतात. पण यामध्ये आता सरकारने हस्तक्षेप करण्याचे अधिकार वाढवणार असं दिसतंय. म्हणजे आक्षेपकारक मजकूर /लेखन लिहून अमुक तमुक बाधा येते अशा कायद्या अंतर्गत खटलाही चालवला जाईल बहुतेक. या ज्या साइट्स आहेत त्यावर सभासदांना स्वप्रकाशन सोय असते. तर छापील माध्यमांत लेखकांचे लेखन अगोदर संपादित/संयोजित/दुरुस्ती करून मग छापले जाते. तिथे यास जबाबदार अधिकारी व्यक्तीची नेमणूक असते. त्याचे नाव छापलेले असते. म्हणजे की छापून आल्यावर लेखक नव्हे तर हा अधिकारीही कायद्याच्या कचाट्यात येतो. आता ही नियमावली अचानक येण्याचे कारण म्हणजे हल्लीच घडलेले ट्विटर प्रकरण . राणावतने केलेली ट्विटस असावीत. ___________________________ बाकी ओटोरिक्षात बसण्याअगोदर भाड्याची निश्चिती झाल्यावरच बसणे योग्य समजत़ो.ओटोचे भाडे अधिक सांगत असेल तर त्यात न बसण्याचा आपला मार्ग मोकळा असतो. तसेच संस्थळाशी आपले जमत नसल्यास तिथून आपणच दूर होणे योग्य नव्हे का? प्रवासानंतर मागितलेल्या भाड्यावर वाद न घालता देणे उचित समजतो.

In reply to by कंजूस

3. (1) Due diligence by an intermediary: An intermediary, including social media intermediary and significant social media intermediary, shall observe the following due diligence while discharging its duties, namely:— उपरोल्लेखीताचा अर्थ significant social media intermediary, आहेच पण सोबत An intermediary, including social media intermediary हे दोन्ही समाविष्ट होतात. कायदा आणि नियमावलीत बहुधा social media intermediary याची व्याख्या नमुद नाही आणि जिथे व्याख्या नमुद नसते तिथे व्याख्या बनवण्याचे स्वांत्र्य न्यायालयांना पोहोचत असावे. इन एनी केस मिपा प्लॅट्फॉर्म किमान intermediary व्याख्येस पात्र होतच असावा चुभूदेघे उत्तरदायीत्वास नकार लागू

In reply to by माहितगार

* social media intermediary ची व्याख्या नियमावलीत आहे माझ्या नजरेतून सुटली होती( हि व्याख्या मूळ आयटी कायद्यात नसल्यामुळे संसदेची मान्यता हवी असा काही मायनर मुद्दा एका वृत्त माध्यमाच्या संपादकाने काढला आहे पण न्यायालया समोर टिकणारा वाटत नाही intermediaryच्या व्याख्येत एनीवे सगळेच येतात त्यामुळे खुपसा फरक पडत नाही) तर एकुण मिपा intermediary व social media intermediary दोन्ही कक्षेत येताना दिसते. *'सिग्निफीकंट social media intermediary' या कक्षेत मात्र मिपा पन्नास लाख सदस्य बनवल्या शिवाय येणे अवघड असावे. * मिपाचा दिवाळी अंक प्रकार क्युरेटेड पब्लिशींगच्या कक्षेत येईल किंवा नाही याचा सल्ला मिपा मालकांना कायदे तज्ञांकडून घ्यावा लागेल अथवा एज रिस्ट्रीक्टेड कंटॅट मिपावर फारसे नसतेच पण एज अ‍ॅक्सेस कंट्रोल शिवाय कुरेटेड भागात ए सेन्सॉर दर्जा कंटेंटचा समावेश करता येणार नाही असा अंदाज नियमावलीवरून येतो. चुभूदेघे उत्तरदायीत्वास नकार लागू

उत्तर दिल्यावर प्रश्नच बदलला

https://www.misalpav.com/comment/1109009#comment-1109009 असे मिपाच्या संपादक मंडळाला करता येते काय?

हे मिसळपावचे अधिकृत धोरण आहे का?

संपादक मंडळ हे समतोल असावे पूर्वग्रहदूषित असू नये इतकी माफक अपेक्षाहि लोकांची नसावी काय?

In reply to by सुबोध खरे

ते म्हणजे आपण अथवा कोणीही जे काही मिपावर कुठंही काहीही लिखित स्वरूपाने कोणत्याही धाग्यावर, प्रतिसादावर त्यानुसंगे अथवा सोडून जर काहीही विचारता, लिहिता किंव्हा व्यक्त होता तर त्याला उत्तर द्यायला मिपा वाचक, वाचनमात्र सदस्य , सदस्य, मिपा कट्टेकरी, साहित्य संपादक, मिपा मालक आणि प्रत्यक्ष ब्रम्हदेवही बांधील वा जबाबदार नाही याची कृपया नोंद घ्यावी. बाकी रस्ते खराब आहेत अनवाणी चालून पायाला त्रास होऊ शकतो असेही निरीक्षण केले.

मला वाटते अजूनही जवळ जवळ सर्वच सदस्य मिपाकडून उपकृत झाल्यासारखे वागतात. मला वाटते कि मिपादेखील व्यवस्थित कायदेशीर कक्षात आहे आणि येथील प्रसारित होणारी माहिती चुकीचा प्रसार करणारी आणि द्वेषमूलक नाही हे तपासणारी दक्ष यंत्रणा उभारणे मिपालदेखील बंधनकारक असायला हवे. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना एखाद दोन दिवसाची हलकीशी शिक्षा तर काहींची थेट हकालपट्टी असा भेदभाव मिपावर उघडपणे दिसून येतो. तो दिसत काम नये याचीदेखील दक्षता संपादक मंडळाला टाळता येणार नाही.

नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे
नवा कायदा काय आहे, हे थोडक्यात कोणी सांगेल का?

In reply to by गणेशा

नवीन कायदा म्हणण्यापेक्षा नवीन विधी नियमावली हा शब्द प्रयोग कदाचित बरोबर असावा. संस्थळाच्या जबाबदारी बद्दल अंशिक चर्चा वरील काही प्रतिसादातून केली आहेच. सदस्यांना लागू होणार्‍या नियमावलीच्या भागाचा अनुवादाची विनंती या नवीन धाग्यातून केली आहे. * (मी मिपाचा सामान्य सदस्य आहे उत्तरदायीत्वास नकार लागू)