नमस्कार मिपाखरांनो 🙏
१४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे त्याचबरोबर मिसळपावचा वर्धापनदिनसुदधा आहे! गणेशोत्सव व मिसळपाव वर्धापन दिन शुभेच्छा!
पावसाच्या बाबतीत जुलै ऑगस्ट महिने किमान मराठवाडा व विदर्भात निराशा जनक ठरले आहेत. सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट काही प्रमाणात तरी भरून निघेल अशी अपेक्षा आहेत. देशभरात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीतरी गाठेल का हे पहावे लागेल.
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची व राज्य सरकारची त्यावरची भूमिका काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
GST Council ची १२ सप्टेंबरची बैठक महत्त्वाची आहे. GST दर आणि इतर करासंबंधी विषयांवर काही निर्णय होण्याची शक्यता आहे.
क्रिकेटप्रेमी मिपाखरांसाठीही सप्टेंबरमध्ये भरपूर आशियाई प्रसाद आहे!
मिपाकरांनी महत्त्वाच्या बातम्या, दुवे, निरीक्षणे आणि मतमतांतरे इथे नोंदवावीत.
गणपती बाप्पा मोरया! 🙏
मिसळपाव वाढदिवस शुभेच्छा! 🥳
| लेख वर्गीकरण |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
- नेपाळ मधील ढगफुटी अत्यंत…
- नेपाळ मधील ढगफुटी अत्यंत दुर्दैवी आहे. लोकांचे हाल बघवत नाहीत. पाशुपतिनाथ त्यांचे रक्षण करो.
सरकारचे कोर्टात आग्रही प्रतिपादन
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ह्यांनी सरकार पक्षातर्फे घटनेचे कलम १४२ invoke करून कॉक्रोच जनता पार्टी/ आंदोलक पोरांच्या विरुद्ध असणाऱ्या केसेस रद्द करून FIR निरस्त करण्याचा अर्ज दाखल केला आहे.
ह्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत ह्यांनी "ठीक आहे जर तुमचे आपापसात समझोत्याचे ठरले असेल तर १४ पैकी कुठले FIR निरस्त करायचे त्याची सूची कोर्टापुढे ठेवा ज्यावर आम्ही विचार करू" असे म्हणले आहे.
पुच्छ ते मुरडिलें कोठे ,…
In reply to सरकारचे कोर्टात आग्रही प्रतिपादन by वृषभ खोंडे
पुच्छ ते मुरडिलें कोठे , कंकणे मनगटी बरी !
नवीन डेव्हलपमेंट
केसेस मागे घेतल्याबद्दल कॉक्रोच जनता पार्टीने सप्टेंबर ५, २०२६ पासून जाहीर केलेलं आंदोलन मागे घेतलं आहे
सरकारी भाट - मास्टरस्ट्रोक
कॉक्रोचेस प्रेमी - झुकवले सरकार पुन्हा एकदा
खांद्याच्या वरती (खरे साहेबांच्या भाषेत) वजन असणारे - लेट्स वेट अँड वॉच.
केसेस मागे घेणार हे सरकारने…
In reply to नवीन डेव्हलपमेंट by वृषभ खोंडे
केसेस मागे घेणार हे सरकारने जाहीर केलेले होतेच. त्यामुळे त्यात विशेष काहीच नाही.
पण ज्या लोकांवर अगोदरच गुन्हेगारी खटले होते त्यांचे काय होईल.
येथे जर सर्वोच्च न्यायालयाने यांचे खटले मागे घेण्यास नकार दिला तर काय होईल याचे कुतूहल आहे.
Courts refuse to quash a First Information Report (FIR) when the alleged crime is serious, harms society as a whole, or contains enough initial evidence to warrant a full criminal trial
आता असे बघा खरे सर
In reply to केसेस मागे घेणार हे सरकारने… by सुबोध खरे
२८००+ हिस्ट्री शीटर होते म्हणे, त्यांच्यावर केस चालवायची म्हणली तर हिस्ट्री शीट पूल आऊट करून तोंडदेखल्या कुठल्याही जुन्या केस मधे ताब्यात घेऊन कारवाई केली म्हणायला काय जाते ?
कारण कसे आहे सामान्य जनतेला तुमच्या इतकी लीगल समज नसते किंवा त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत खटले लढवले नसतात ना !
हे २८०० वरच्या केस मागे घेणार नाही हे इतके ambiguous आहे की "जंगल me मे मोर नाचा किसने देखा" ही म्हण आठवते फक्त.
(जस्टिस चौधरी) खोंडे
येथे जर सर्वोच्च न्यायालयाने…
In reply to केसेस मागे घेणार हे सरकारने… by सुबोध खरे
कुतूहल कुरवाळत बसायची गरज नाही. शेपूट खाली घालायची आज्ञा वरून आली आहे. खटले मागे घेतले जातीलच वर काही लोकांना पक्ष प्रवेश सुद्धा मिळेल. त्यातील अनेक मंडळी पुढील केंद्रीय निवडणुकांत प्रखर जाज्वल्य देशभक्ती पार्टी चे कार्यकर्ते म्हणून वावरताना दिसतील.
त्याशिवाय, सरकारने आंदोलनात देशद्रोही, विदेशी शक्ती वगैरे आहेत असे म्हटले होते. देशद्रोह्यांना सरकार पकडेल कि नाही ह्याचे जास्त कुतूहल आहे.
स्को परिषदेत सामील झालेल्या…
स्को परिषदेत सामील झालेल्या सर्व जागतिक नेत्यांचे एकत्रित प्रकाशचित्र मोदींनी प्रकाशित केले होते. पाकिस्तानी अधिकृत ट्विटरवर केलेल्या प्रकाशचित्रातून मोदी व इराणच्या राष्ट्रपतींना काढून टाकले आहे.
कालच पुण्यात अभियांत्रिकी पदविका शिक्षण संस्थेत मृत पक्षाच्या मालकाचे चिरंजीव गेले आणि त्या संस्थेच्या मुख्य कार्यालयात शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त मोदींचे चित्र पाहून त्यांना अतोनात संताप आला व त्यांनी दांडगाई करून मोदींचे चित्र काढायला लावले. म्हणे शिवाजी महाराज व मोदींची बरोबरी कशी होऊ शकते. त्याचं भिंतीवर त्याच ओळीत दौपदी मुर्मू व आंबेडकर यांचेही चित्र होते. परंतु ते काढण्याची यांची हिंमत नाही. याच्या चुलत आजोबांच्या निवासस्थानी सर्वात वरती आजोबांचे व त्याखाली शिवाजी महाराजांचे चित्र वर्षानुवर्षे आहे. ते याला चालते.
एकंदरीत महाराष्ट्राने यांना कचऱ्यात फेकून दिले आहे ते योग्यच आहे.
उहू
In reply to स्को परिषदेत सामील झालेल्या… by श्रीगुरुजी
पाकिस्तान, भिकारस्थान, इत्यादी इत्यादी संपलेले आहे सर. म्हणजे बघा ऑपरेशन सिन्दुर इत्यादी इत्यादी आठवण असेलच न सर.
आदरणीय मोदीजींनी भारताला इतके वर ठेवले आहे (किती ते तुम्हालाच जास्त चांगले ठाऊक असणार) की आता तुलना पाकिस्तान सोबत नाही ,
आता थेट चीनची बरोबरी. आता माघार नाही. हे पाकिस्तान वगैरे काय सर ! हं चला आता मुद्द्यासारखे मुद्दे बोलू.
(सव्यसाची) खोंडे.
विषयानुरूप ताजी बातमी
केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेतील कलम १४२चा हवाला देऊन सुप्रीम कोर्टाला झुरळ आंदोलनातील पोरांवर टाकलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली हे आपण वर वाचले. त्या पावलावर पाऊल ठेवत आता बिहार, बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र ह्या फुरोगामी सरकारे असणाऱ्या राज्यांनी चारही राज्ये मिळून एकंदरीत ११६ एफ.आय.आर रद्द करण्याबाबत विनंती अर्ज कोर्टात रुजु केला आहे.
च्यायला
ह्याला हिरो करायचेच होते तर आधी इतके ताणून कशाला मोदींना शिव्या खायला लावल्या राव !? कालचा पोरगा राजकीय मंडारीन लोकांना वर्क आऊट करतोय !
अभाविपने, पंजाब…
अभाविपने, पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षपद सलग दुसऱ्या वर्षी कायम राखले आहे.
मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत निकालांनुसार, अभाविपच्या अंकित बिधानने आआपच्या विद्यार्थी संघटना एएसएपीच्या आदिल ब्रार याचा ५१२ मतांनी पराभव केला. पंजाब विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अभाविपने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत सलग दोन वेळा सर्वोच्च पद जिंकले आहे. गेल्या वर्षी, अभाविपने जवळपास ५० वर्षांत प्रथमच ही निवडणूक जिंकली होती.
तथाकथित झ पिढी भाजपवर संतापली आहे या समजुतीला या निकालामुळे छेद मिळाला आहे. अर्थात शिरोमणी अकाली दलाच्या विद्यार्थी संघटनेने दिलेल्या पाठिंब्यामुळे हा विजय झाला आहे. भाजपविना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वाताहात झाल्यानंतर अकाली दलाचे डोळे उघडले आहेत व ते आता भाजपशी पुन्हा युती करण्याच्या प्रयत्नात आहेत.
श्रीयुत अंकित विधान ह्यांचे अभिनंदन
In reply to अभाविपने, पंजाब… by श्रीगुरुजी
पंजाब विद्यापीठ (पी. यू.), चंडीगढ मधे ते उत्तम काम करतील आणि पुन्हा एखादी SOPU संघटना आणि पर्यायाने एखाद नवीन लॉरेन्स बिश्नोई तयार होण्यापासून थांबवतील अशी आशा आहे.
बाकी,
भाजपविना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वाताहात झाल्यानंतर अकाली दलाचे डोळे उघडले आहेत व ते आता भाजपशी पुन्हा युती करण्याच्या प्रयत्नात आहेत.
कमालच आहे म्हणायची ! डोळे उघडले पण अण्णाद्रमुकची अवस्था नाही बघितली ? एकंदरीत मामला गंभीर वाटतोय. ह्यांनी डोळे तिरळे उघडले का काय ?
(आय स्पेशलिस्ट) खोंडे.
मुंबई उच्च न्यायालयाने…
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी, मुंबईत २०२० मध्ये झालेल्या माजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी, केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असलेल्या सालियनचा, एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता.
चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दिशाचा मृत्यू आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले होते. मात्र, तिच्या वडिलांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप केला.
सतीश सालियनचे वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणातील पोलीस तपासावर शंका उपस्थित केली होती.
याचिकाकर्त्याने आपल्या मुलीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची आणि शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
________________
अर्थात यातून काहीही निष्पन्न होणार नाही. सरकार अत्यंत खंबीरपणे ठाकरे कुटुंबियांच्या पाठीशी आहे. ज्याप्रमाणे यांनी पवार कुटुंबीय, राणे, कुटुंबीय, आव्हाड, संजय राठोड यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊन दिली नाही, तसेच या प्रकरणात सुद्धा होणार.
अरेरे
In reply to मुंबई उच्च न्यायालयाने… by श्रीगुरुजी
अर्थात यातून काहीही निष्पन्न होणार नाही. सरकार अत्यंत खंबीरपणे ठाकरे कुटुंबियांच्या पाठीशी आहे. ज्याप्रमाणे यांनी पवार कुटुंबीय, राणे, कुटुंबीय, आव्हाड, संजय राठोड यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊन दिली नाही, तसेच या प्रकरणात सुद्धा होणार.
ह्या उद्वेगातून पण ताजी घडामोड मांडल्याबद्दल आपले अभिनंदन गुरुजी. सरकार असेच खंबीरपणे ७२,००० कोटींचे गाडीभर पुरावे असताना पण होते अन् आदर्श सोसायटी बांधणाऱ्या व्यक्तीच्या मागे पण होते. असो!
भारताचे क्रेडिट रेटींग अपग्रेड
जपानच्या क्रेडिट रेटींग एजन्सी (Japan Credit Rating- JCR) ने भारताचे क्रेडिट रेटींग BBB+ वरून A- वर अपग्रेड केले आहे. सरकार आपण कर्जाऊ घेतलेले पैसे (व्याजासकट) फेडू शकणार नाही याची शक्यता कमी असेल- म्हणजेच सरकार डिफॉल्ट करेल याची शक्यता कमी असेल तर क्रेडिट रेटींग अधिक चांगले असते. क्रेडिट रेटींग अपग्रेड होणे याचा अर्थ सरकारची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम झाली आहे असा त्या रेटींग एजन्सीचे मत आहे असा झाला.
यावरून एक गोष्ट आठवली. नोव्हेंबर २०१७ मध्ये अमेरिकेतील मुडीज या रेटींग एजन्सीने असेच भारताचे क्रेडीट रेटींग अपग्रेड केले होते. खरं तर क्रेडिट रेटींग अपग्रेड होणे ही आपल्या देशाच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने चांगली घटना असल्याने त्याचा आनंद सगळ्या भारतीयांना व्हायला हवा. पण झाले असे की 'मोदी पंतप्रधान असताना असे अपग्रेड झालेच कसे' या कारणाने अनेकांच्या पोटात दुखायला लागले. मग त्यांनी मुडीजला त्याचा जाब विचारायला सुरवात केली. पण असा जाब विचारणाऱ्यांपैकी अनेकांनी तो जाब विचारताना त्यात एक बारीकशी चूक केली होती आणि ती म्हणजे ट्विट करताना मूडीज या क्रेडीट रेटींग एजन्सीला टॅग न करता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडीला टॅग केले होते. काही संबंध नसताना इतके लोक आपल्याला नक्की कसला जाब विचारत आहेत याचा त्याला पत्ता लागला नसावा 😀
चंसुकु,रेटींग एजन्सीचं…
In reply to भारताचे क्रेडिट रेटींग अपग्रेड by चंद्रसूर्यकुमार
चंसुकु,
रेटींग एजन्सीचं रेटींग ह्या सगळया मॅनेज करता येणाऱ्या गोष्टी आहेत. त्या पर्फेक्ट आणि १००% विश्वसनीय असताअ ह्या अंधश्रद्धा आहेत.
२००८ला झालेल्या लेहमन ब्रदर्स क्रायसिसवर 'द बीग शॉर्ट' नावाचा एक नितांत सुंदर आणि माझा अत्यंत आवडता सिनेमा आहे. त्यातला हा सीन मुडीज आणि S&P Global Ratings च्या कार्यपध्दतीवर (?) प्रकाश टाकतो. २.२० मिनीटांपासून पुढे लक्ष देऊन बघा/ऐका.
- (मुडी) सोकाजी
+१/-१
In reply to चंसुकु,रेटींग एजन्सीचं… by सोत्रि
नक्कीच. २००७-०८ च्या आर्थिक संकटाच्या वेळेस अमेरिकन रेटींग एजन्सींनी सी.डी.ओ च्या वरच्या ट्रान्चना ट्रीपल ए रेटींग दिले होते. दुसरे ट्रीपल ए रेटींग असलेले फायनान्शिअल इन्स्ट्रुमेन्ट म्हणजे अमेरिकन सरकारचे bond त्यापेक्षा या सीडीओ ट्रान्चवरील यिल्ड २% जास्त होते. एकच रेटींग असेल तर दोन फायनान्शिअल इन्स्ट्रुमेन्टच्या यिल्डमध्ये असा फरक असू शकत नाही या मूळ फायनान्सच्या तत्त्वाचे त्यात उल्लंघन होत होते. तोच धागा पकडून मग श्री.रा.रा. रघुराम राजननी म्हटले की मार्केट या सीडीओ ट्रान्चवरील रिस्क योग्य प्रकारे ध्यानात घेत नाहीये- (अंडरएस्टीमेट करत आहे) आणि त्यातून मोठा धोका उद्भवतो. रेटींग एजन्सीज परीपूर्ण अजिबात नसतात.
तरीही काही गोष्टी-
१. कॉर्पोरेट रेटींगसाठी भरपूर झोलझपले चालतात. एखाद्या कंपनीला चांगले रेटींग मिळणे आणि रेटींग ॲनॅलिस्ट आठवडाभर हवाईसारख्या ठिकाणी मस्त रिजॉर्टमध्ये सुट्टीवर जाणे असे योगायोग होतात 😐️. पण देशाच्या रेटींगसाठीही तसेच चालतात का? २०१० पूर्वी ग्रीसची आर्थिक स्थिती तितकी चांगली नसतानाही गोल्डमन सॅक्सबरोबर झोलझपले करून ग्रीसने आपल्या आर्थिक स्थितीचे चुकीचे चित्र उभे केले होते. त्यामुळे त्यांचे क्रेडीट रेटींग चांगले होते. पण तो प्रकार उघडकीला आल्यानंतर त्याच क्रेडीट रेटींग एजन्सींनी ते रेटींग डाऊनग्रेड केले होते.
२. अमेरिकेतील क्रेडीट रेटींग एजन्सीज- विशेषत: एस & पी या बाबतीत नोटोरिअस आहे. पण जपानच्या क्रेडीट रेटिंग एजन्सीचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे?
३. २०१७ मध्ये टॉम मूडीला जाब विचारणाऱ्या लोकांना इतक्या सगळ्या गोष्टी माहित होत्या असे मला तरी अजिबात वाटत नाही. भारताचे रेटींग अपग्रेड झाले आणि ते पण मोदी सरकारच्या काळात? छे छे. असे कसे शक्य आहे- मूडीज असे करूच कसे शकली त्या कुंपणापर्यंतच त्या लोकांची धाव होती. बरं नोव्हेंबर २०१७ मध्ये अपग्रेड केलेले रेटींग २०२० मध्ये लॉक डाऊन काळात डाऊनग्रेड केले होते तेव्हा त्यापैकी काहींनी- बघा आम्ही सांगत होतो असेही म्हटले होते. तेव्हा सगळ्यांचे लक्ष लॉक डाऊन आणि कोविडचे आकडे यावर होते त्यामुळे या बातमीकडे त्यामानाने दुर्लक्ष झाले होते. म्हणजे २०१७ मध्ये विश्वासार्ह नसलेली एजन्सी २०२० मध्ये एकदम विश्वासार्ह झाली का? आताही रेटींग अपग्रेड केले आहे म्हणून असले सगळे प्रश्न येत आहेत. समजा रेटींग डाऊनग्रेड झाले असते तर त्याच एजन्सीचा त्याच लोकांनी उदो उदो केला असता हे नक्की.
ट्रंपच्या आचरटपणाला अंत नाही…
ट्रंपच्या आचरटपणाला अंत नाही. नकाशात होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकेचा भाग म्हणून दाखविल्यानंतर आता ट्रंपला या सामुद्रधुनीचे नामांतर ट्रंप सामुद्रधुनी असे करायचे आहे.
या माणसाचा आचरटपणा आणि मर्कटलीला अमर आहेत.
सीजेपीत फुट https://www…
सीजेपीत फुट
https://www.loksatta.com/desh-videsh/cockroach-janta-party-split-manish…
बेस्ट !
In reply to सीजेपीत फुट https://www… by राज जोशी
उपद्रव मूल्य (न्यूसन्स व्हॅल्यु) असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत अंतर्गत तडे पडले की ते बरोबर त्याच्या उपद्रव मूल्य नियमनात अंगभूत चेक्स अँड बॅलन्सेसचे काम करतात. पोरांनी सरकारला प्रश्न विचारले शिव्या घातल्या, ओके, आता पोरे पण पब्लिक स्फियर मधे आहेत, अकाऊंटबिलिटीचा बडगा त्यांनाही बघावाच लागणार आहे.
नवीन माहिती, ताजी घडामोड
सावरकर मुसलमान समाजाचा द्वेष करत नव्हते तर त्यांच्या प्रगतीचा विचार करत होते - सात्यकी सावरकर
मोदी, भागवत ह्यांंच्या पाठोपाठ आता सात्यकी सावरकर पाच ? एकंदरीत लहानपणी पासून खास बाळकडूवर पोसलेल्या भक्तगणांची आता गोची होत असणार खरी !
(निरीक्षक) खोंडे
न्यूयॉर्कपाठोपाठ, परमपूजनीय…
न्यूयॉर्कपाठोपाठ, परमपूजनीय श्री. मोहनजी भागवतांच्या लंडन दौऱ्याला सुद्धा काही स्थानिकांनी विरोध केलाय. संघ फॅसिस्ट, जातीयवादी, मुस्लिमविरोधी अशी नेहमीची झिजून गुळगुळीत झालेली कारणे दिलीत.
न्यूयॉर्कप्रमाणे, लंडनचा महापौरही स्थलांतरित पाकडा आहे.
गनिमांच्या देशांत नक्की का…
In reply to न्यूयॉर्कपाठोपाठ, परमपूजनीय… by श्रीगुरुजी
गनिमांच्या देशांत नक्की का जात आहेत भागवत जी ?
फॅक्ट चेक :
सादिक खान लंडनचा महापाौर हा पाकिस्तानी. जोहरान ममदानीचा बाप महमूद ममदानी हा भारतीय मुळ असणारा युगांडन नागरिक होय, जोहरान ममदानीचे जन्माच्या हवाल्याने किंवा कौटुंबिक हवाल्याने पाकिस्तानशी कनेक्शन दिसून येत नाही. त्याचे वडील महमूद ममदानी ह्यांचा जन्म मुंबईत १९४६ साली झाला असे उपलब्ध सार्वजनिक स्त्रोतातून कळते.
तो मुसलमान त्यात लिबरल म्हणून तुम्हाला राग किंवा द्वेष असेल त्याचा तर तो तुमच्या वैयक्तिक अखत्यारीतला प्रश्न आहे पण आपण कोणाचा द्वेष करतोय हे तरी नीट माहिती असावे असे मनापासून वाटते.
(सादिक खान विरोधक) खोंडे
सिंधू पाणी करार स्थगित…
सिंधू पाणी करार स्थगित असताना, भारताने लडाखमध्ये पहिले दगडी धरण बांधले.
लडाखमधील शेतकरी समुदायांमधील पाण्याची टंचाई कमी करण्याच्या आणि सीमावर्ती भागांमध्ये सिंधू नदीच्या पाण्याचा वापर अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, भारताने लेहमधील उपशी येथे नदीवर आपले पहिले दगडी बंधारे बांधले आहेत.
संपूर्णपणे नैसर्गिक दगडांनी आणि सिमेंटचा वापर न करता बांधलेल्या या धरणामुळे पाण्याची पातळी जवळपास १० फुटांनी वाढली आहे, ज्यामुळे वसंत ऋतूतील पेरणीच्या हंगामात पाण्याअभावी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता शेतांना पाणी देणे शक्य झाले आहे.
वर्षानुवर्षे, स्थानिक शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, कारण वसंत ऋतूतील पेरणीच्या हंगामात पंपांना पाणी काढता यावे यासाठी सिंधू नदी खोल दऱ्यांमधून खूप कमी पातळीवर वाहत होती. सिंधू नदीच्या पाण्याच्या वापरावरील मर्यादा आणि ही पाण्याची टंचाई, यांमुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या होत्या आणि शेतकरी समाज आर्थिकदृष्ट्या विकलांग झाला होता.
स्थानिक शेतीला मदत करण्यापलीकडे, हा प्रकल्प पाकिस्तानला एक प्रबळ सामरिक संदेश देतो. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे, हा प्रकल्प हे दाखवून देतो की, नदी पुढे पाकिस्तानकडे वाहण्यापूर्वी, भारत आता सीमावर्ती भागांमध्ये सिंधू नदीच्या पाण्याचा वापर करण्यासाठी आणि आपल्याच समुदायांना आधार देण्यासाठी सक्रियपणे पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.
लडाख प्रशासन आता सिंधू नदीवर अशा प्रकारचे आणखी बंधारे बांधण्याचे काम करत असून, काही ठिकाणी काम सुरू आहे आणि आणखी बरेच प्रकल्प विचाराधीन आहेत.
डसणाऱ्या विषारी सापांना पाणी पाजण्यासाठी, भारतीय शेतकऱ्यांच्या तहानलेले ठेवून, सिंधू जलवाटप करार करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींच्या सरकारने हा करार स्थगित करून एक महत्त्वाचा निर्णय घेऊन एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.
सर्वप्रथम भारत सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन.
In reply to सिंधू पाणी करार स्थगित… by श्रीगुरुजी
दुसरे म्हणजे धरण आणि बंधारा ह्या स्थापत्य अभियांत्रिकी मधील संकल्पनांत अंमळ घोळ झाला आहे, तो सरकारला अपेक्षित नसावा आणि तुम्हालाही नसावा ही माझी सदिच्छा.
पुढे म्हणजे ही बातमी मे २०२६ शेवटाकडे आला तेव्हाची आहे. अंदाजे २८ - ३० मे, २०२६ दरम्यानची. संबंधित दुवे खालीलप्रमाणे -
१. इकॉनॉमिक टाईम्स २८/०५/२०२६ ची बातमी
२. दैनिक जागरण इंग्रजी आवृत्ती (जागरण जोश) मध्ये आलेली बातमी, ३०/०५/२०२६
३. रीच लडाख बुलेटिन (स्थानिक वृत्तपत्र), २८/०५/२०२६
४. मनी कंट्रोल - २८/०५/२०२६, ह्यांच्यानुसार माननीय लेफ्टनंट गव्हर्नर केंद्रशासित प्रदेश लडाख ह्यांनी २८ मे ला ह्या बंधाऱ्याचे उद्घाटन केले.
आता माझे काही प्रश्न -
१. तीन महिने शिळ्या बातमीला पुन्हा उद्धृत करण्याचे काय प्रयोजन ?
२. दूुसरे म्हणजे सरकारने काम उत्तम केले आहे, फुल न फुलाची पाकळी दिलीच आहे. पण उपशी बंधाऱ्यानंतर ५६ कोटींचे प्रकल्प विचाराधित होते किती निधी पूर्ण सोडला गेला अन् किती प्रकल्प पूर्ण झाले ? ( हे पण पाहणे गरजेचे आहे, कारण उपशी तर अक्षरशः ७ दिवसात बांधला होता बंधारा)
चांगले काम चांगलेच असते फक्त ते मांडायला दरवेळी एक हात लाकूड चार हात ढलपी ॲप्रोच बरा नाही.
चालायचेच हो, एका सरकारने तर सिंधू करार मोडीत काढणे सोडा लाहोरसाठी बस सुरू केल्या गेल्या होत्या, ते पण कारगिल एकीकडे सेट इन मोशन असताना. किमान इथे त्यांनी काहीच नाही केले पण आम्ही बरेच केले मध्ये त्यांनी काय नाही केले हा भाग माफक सटल ठेऊन आम्ही केले वर फोकस केले आहेत हा एक सकारात्मक बदल आहे.
जाता जाता - मोदी सरकार रोज काहीतरी नवीन आणि लोकोपयोगी करते ते काही घेऊन आलात तर बरे वाटेल. नाहीतर जनता उद्या नवीन बाटलीत जुनीच दारू भरून विकल्याचे आळ घेईल, बघा बुवा तुम्हाला अन् तुमच्या लाडक्या पार्टीला चालणार असेल तर
(मैत्रीपूर्ण सल्लागार) खोंडे
स्थानिक शेतीला मदत…
In reply to सिंधू पाणी करार स्थगित… by श्रीगुरुजी
स्थानिक शेतीला मदत करण्यापलीकडे, हा प्रकल्प पाकिस्तानला एक प्रबळ सामरिक संदेश देतो. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे, हा प्रकल्प हे दाखवून देतो की, नदी पुढे पाकिस्तानकडे वाहण्यापूर्वी, भारत आता सीमावर्ती भागांमध्ये सिंधू नदीच्या पाण्याचा वापर करण्यासाठी आणि आपल्याच समुदायांना आधार देण्यासाठी सक्रियपणे पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.
भक्तीAI ने निर्माण केलेली वाक्यरचना आहे का ?
भक्तीAI
In reply to स्थानिक शेतीला मदत… by साहना
भक्तीAI
🤣
उद्योग विश्वातील एक ताजी घडामोड.
केनिया ने टाटा केमिकल्स कंपनीला आपली सगळी ऑपरेशन्स (केनिया मधली) तात्काळ बंद करण्याचा आदेश दिला आहे
केनियन राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो ह्यांच्या नुसार टाटा केमिकल्सला कॉस्टिक सोडा निर्मिती आणि निर्यात साठी १०० वर्षांचे लीज केनियन सरकारने दिले होते पण त्या लीज मधील अटी-शर्तींमध्ये विकास टाटा केमिकल्सने त्या प्लँटच्या आजुबाजूला केला नाही त्यामुळे "आम्ही काय गुलाम आहे का ?" असा प्रश्न रूटो ह्यांनी उपस्थित केला आहे आणि टाटा केमिकल्स ऐवजी कॉस्टिक सोडा निर्मिती करता दोन नव्या (चिनी नसल्या म्हणजे मिळवले) कंपनी आणणार असल्याचे घोषित केले आहे. कॉस्टिक सोडा/ सोडा ऍश हे एक महत्वाचे औद्योगिक रसायन असून बऱ्याच इंडस्ट्रीयल एप्लिकेशन्स मध्ये त्याचे महत्व आहे, टाटा समूहातील टाटा केमिकल्स ही कंपनी जगात एक अग्रगण्य कंपनी मानली जाते ह्याच्या निर्मितीत.
जागतिक राजकारण
In reply to उद्योग विश्वातील एक ताजी घडामोड. by वृषभ खोंडे
यामागे एक मोठे जागतिक राजकारण नक्कीच सुरू आहे. केनिया सरकारने जरी याला 'स्वदेशी चळवळ' किंवा स्वतःचा फायदा म्हटले असले, तरी चीनला याचा थेट फायदा होत असल्याचे दिसत आहे. म्हणजे या खेळी मागे कोण आहे हे निराळे सांगायलाच नको! शिवाय केनियाच्या माजी उपराष्ट्राध्यक्षांनी च सरळ आरोप केला आहे की टाटा कंपनीला बाहेर काढून ती जागा चिनी कंपन्यांना देण्यासाठी हा सगळा कट रचला गेला आहे. या भागात चिनी कंपन्यांना 'लिथियम' सारखी मौल्यवान खनिजे आणि तेलाचे साठे शोधायचे आहेत. इतरही अनेक प्रकार आहेत जसे काही महिन्यांपूर्वी केनियातील नैरोबी विमानतळाचे काम भारताच्या अदानी समूहाला मिळणार होते. पण तिथे विरोध झाल्यानंतर ते काम रद्द करण्यात आले. नंतर लगेचच एका मोठ्या चिनी सरकारी कंपनीला ते काम देण्यात आले.
जेव्हा केनियासारखे देश किंवा त्यांचे नेते आर्थिक अडचणीत असतात, तेव्हा एक देश त्यांना लगेच मदत आणि निधीची ऑफर देतो. यामुळे स्थानिक नेत्यांना आपले राजकारण चमकवणे सोपे जाते. एकदा देश ताब्यात आला की आपल्याच कंपन्या घुसवणे सुरू होते. केनियाच्या स्वार्थाचा चीनने घेतलेला फायदा आहे. केनियावर आधीच चीनचे मोठे कर्ज आहे.
मग भारत सरकार काय करते आहे असा प्रश्न मनात येतोच! पण भारत थेट समोर येओन भांडत नाही. पडद्यामागे खूप शांत आणि हुशारीने आपली चाल खेळत असणार यात शंका नाही. म्हणजे पहा इतके होऊनही भारत सरकारने केनियाच्या राष्ट्रपतींच्या विधानावर कोणतीही मोठी किंवा रागाची प्रतिक्रिया दिलेली नाही. नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालय आणि नैरोबीमधील भारतीय दूतावास केनियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असावेत. केनियाच्या राष्ट्रपतींनी टाटांना हाकलून द्या असे म्हटल्यानंतर केनिया सरकारने टाटा कंपनीसोबत मिळून एक संयुक्त समिती स्थापन केली आहे. म्हणजे दबाव आहे असणार.
टाटा कंपनी मगाडी भागात गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोकांना पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि शिक्षण व्यवस्था म्हणजे शाळा इत्यादी देत आहे. भारत सरकारने केनियाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला असणार आहे की, टाटा गेल्यास तिथल्या गरीब जनतेचे मोठे नुकसान होईल. शिवाय स्थानिक लोकांकडूनही आता केनिया सरकारवर दबाव आणला जाईल. कदाचित आधीचह आला असेल. केनियाचे राष्ट्रपती केवळ राजकीय फायद्यासाठी बोलत आहेत. कायदेशीररीत्या व्यवस्थित पणे बस्तान बसवलेल्या टाटा कंपनीला इतक्या सहज बाहेर काढणे शक्य नाही, हे भारताला ठाऊक आहे.
असो, खूपच मोठा प्रतिसाद झाला.
हम्म
In reply to जागतिक राजकारण by निनाद
मग भारत सरकार काय करते आहे असा प्रश्न मनात येतोच! पण भारत थेट समोर येओन भांडत नाही. पडद्यामागे खूप शांत आणि हुशारीने आपली चाल खेळत असणार यात शंका नाही.
आता तुम्ही म्हणताय तर ठीकच आहे पण एकंदरीत पडद्यामागे भारत खेळतो तो खेळ शांतपणे खेळतोय का अतिशय कूर्मगतीने अन् मूर्खपणाने खेळतोय हे मात्र कळत नाहीये.
(कौटिल्य) विष्णुगुप्त खोंडे
अजून एक निरुत्साही बातमी
मालदीव ने तिलाफुशी नावाचे एक बंदर बांधायला घेतले आहे आणि त्याच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाचे कंत्राट एका चायनीज कंपनीला दिले आहे
खायच्या तांदळापासून ते प्यायच्या पाण्यापर्यंत आणि आरोग्य ते पर्यटन उद्योग भारतावर अवलंबून असणाऱ्या मालदीवने ही वेगळीच वाट चोखाळली आहे असे म्हणावे का ? मोहम्मद मुईझु हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी असे भारताच्या विरुद्ध बंडखोरीचे बोल ऐकवले, नंतर त्यांनी दिल्लीत येऊन भारतीय नेतृत्वाची भेट घेऊन दिलजमाई करत मालदीवला भारताकडून मिळणारे फुकटचे रमणे परत एकदा पुनर्स्थापित करून घेतले होते जे उदारमानाने भारतीय नेतृत्वाने मंजूर केले होते, त्यानंतर आता परत हे बांधकाम चिनी कंपनीला देणे जरा विचित्र जाणवते.
(देशभक्त) खोंडे
अग्निवीर नावाचा गोंधळ: एक चिंताजनक बातमी
पाकिस्तान आय.एस.आय. द्वारे अग्निवीर इच्छुक उमेदवार आणि भरती संस्था ह्या टॅलेंट स्पॉटींग करता वापरते आहे अशा आशयाचा हा फ्री प्रेस जर्नलचा रिपोर्ट.
भारताची मिलिट्री इंटेलिजन्स…
In reply to अग्निवीर नावाचा गोंधळ: एक चिंताजनक बातमी by वृषभ खोंडे
भारताची मिलिट्री इंटेलिजन्स आणि राज्यांचे ATS विभाग अशा संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतात. डॉ. खरे याबबतीत कदाचित अधिक काही सांगू शकतील.
मला वाटते यात क्लसिक 'डबल एजंट' गेम पण होत असेल. म्हणजे जेव्हा एखाद्या भारतीय जवानाला किंवा नागरिकाला पाकिस्तानी एजंट आपल्या जाळ्यात ओढतात, तेव्हा तो जवान लगेच भारतीय यंत्रणांना याची कल्पना देतो. भारतीय यंत्रणा त्या जवानाला अटक करत नाहीत. उलट, त्याला पाकिस्तानशी चॅटिंग सुरू ठेवण्यास सांगतात. आता तो जवान भारतासाठी 'डबल एजंट' म्हणून काम करणार. यंत्रणा या जवानांमार्फत पाकिस्तानला अत्यंत जुनी, चुकीची किंवा मुद्दाम बदललेली लष्करी माहिती (उदा. तुकड्यांच्या खोट्या हालचाली) पाठवणार. मग माग काढत काढत पाकिस्तानातील मुख्य हँडलर कोण आहे, ते पैसे कसे पाठवत आहेत हवाला किंवा बँक आणि त्यांचे भारतात इतर कुठे नेटवर्क आहे, याची पूर्ण माहिती हाती लागत असणार.
अर्थात मला यातली काही माहिती नाही. पुर्वी वाचलेल्या हेर्कथांवर आधारीत हे माझे स्वप्नाळू मनोरंजन आहे. पण तरीही या विषयावर एखादी मस्त वेगवान रोमांचक कथा लिहिता येऊ शकते...
दुहेरी खेळ कथा नक्की वाचा!
In reply to भारताची मिलिट्री इंटेलिजन्स… by निनाद
या विषयावर एखादी मस्त वेगवान रोमांचक कथा लिहिता येऊ शकते...
क्लॉड एआइने ही दुहेरी खेळ कथा लिहिलीय, नक्की वाचा! 😉
हा उंदीर मांजरांचा खेळ चालूच…
In reply to अग्निवीर नावाचा गोंधळ: एक चिंताजनक बातमी by वृषभ खोंडे
हा उंदीर मांजरांचा खेळ चालूच राहतो. फ्री प्रेस जर्नलने लिहिलेले आहे त्यात विशेष असे काही नाही.
मुळात चार वर्षे नोकरी केलेल्या अग्निवीराला लष्करी गुप्त बातम्या माहिती असण्याची शक्यता फारशी नाही.
परंतु असे सैनिक बंदुका/ शस्त्रास्त्रे उत्तम हाताळू शकतात. त्यामुळे त्यांना धर्माच्या नावावर भडकवणे ( मुस्लिम किंवा शिक्ष किंवा फुटीरतावादात ओढणे (माओवादी किंवा पूर्वोत्तर राज्यातील फुटीर चळवळीत).
हे शक्य झाले तर १८ वर्षाच्या बेअक्कल तरुणाला पूर्ण प्रशिक्षण देऊन भारतात घुसवण्यापेक्षा इथेच जन्मलेल्या आणि वाढलेल्या आणि उत्तम प्रशिक्षित झालेल्या माणसाला आपल्या कामास लावणे हे जास्त फायद्याचे ठरेल.
यास्तव असे प्रयत्न आय एस आय कडून चालवले जातात. उदा एखाद्याच्या नातेवाईकाचे घर बुलडोझरने पाडले असेल किंवा सरकार दरबारी काही अन्याय झाला असेल किंवा नातेवाईक तस्करी/ अमली पदार्थाच्या जाळ्यात ओढलं असेल तर त्याची मदत करून त्याला आपल्या जाळ्यात ओढणे.
असं नेहमीच चालू असतं.
१९८४ नंतर शीख सैनिक सुटीवर गेला कि किंवा १९८९ नंतर काश्मिरी सैनिक /तामिळी माणूस सुटीवर घरी गेला कि तो कुणाशी संपर्कात आहे किंवा कुणाला भेटतो यावर लष्करी गुप्तहेर खाते नजर ठेवून असे. कारण संशयास्पद काही आढळले कि त्या माणसा तर्फे( संपर्क केलेल्या) पूर्ण जाळे कसे विणलेले आहे याची बातमी ते काढत असत.
ए आयचा नोकरी मिळवण्यासाठी…
ए आयचा नोकरी मिळवण्यासाठी वापर --- पण जरा वेगळ्या पध्दतीने
https://www.moneycontrol.com/news/trends/job-seekers-hide-secret-ai-mes…
माझ्या स्वप्नातील भारत
पंतप्रधान मोदींच्या…
पंतप्रधान मोदींच्या बडोद्यातील कार्यक्रमाची तिकिटे बुक माय शो वर विक्रीला ठेवली असता एका तासात सगळी विकली गेली
आता ह्याच्यातून काढायला बसता तीन अर्थ निघतात
१. मोदींना आपले कार्यक्रम बुक माय शो वर विकावी लागतात.
२. कॉक्रोच वगैरे काही नाही मोदींचा ऑरा इंटॅक्ट आहे
३. भाजपच्याच कार्यकर्त्यांनी तिकिटे विकत घेऊन ती जनतेत फुकट वाटली.
अजून काही संभावना असल्यास मांडाव्यात
जो जे वांछील तो ते लाहो, होऊ दे धुरळा शा हब्बे दुलास ! 🤣🤣🤣
बुक माय शो वर तिकीटे फुकट…
In reply to पंतप्रधान मोदींच्या… by वृषभ खोंडे
बुक माय शो वर तिकीटे फुकट उपलब्ध आहेत.
बुक माय शो फक्त सीट बुकिंग साठी वापरले आहे.
ओके
In reply to बुक माय शो वर तिकीटे फुकट… by विजुभाऊ
विक्री ऑप्शन कट.
काय दिवस आलेत? विश्वघाबरू…
काय दिवस आलेत? विश्वघाबरू राहूल गांधींची कॉपी करू लागले आहेत. आता टेलिप्रॉम्टरशिवाय जाहीर सभेत बोलायची कॉपी कशी करणार?
जर्मनीतील स्थानिक निवडणुका
जर्मनीत बर्लिनहून फार लांब नसलेले एक राज्य आहे- सॅक्सनी-अनहाल्ट. या राज्यातील स्थानिक (आपल्याकडील विधानसभेला समकक्ष) निवडणुकांमध्ये कट्टर उजव्या AfD (जर्मनीसाठी पर्याय) या पक्षाने ८३ पैकी ३९ जागा जिंकल्या आहेत आणि तो पक्ष सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पक्षाचे बहुमत थोडक्यात हुकले आहे. हा पक्ष जर्मन संसदेत सर्वात मोठा विरोधी पक्षही आहे.
हा पक्ष कट्टर उजवा आहे. ॲंजेला मर्केल यांच्या काळात अति उदारमतवादीपणा दाखवून अनेक निर्वासितांना आश्रय देऊन जर्मनीने गळ्यातले लोढणे घेतले- युरोपातील अनेक देशांनी घेतले. २०१५ मध्ये ३१ डिसेंबरला जर्मनीतील कलोन या शहरात अनेक जर्मन स्त्रियांवर या निर्वासितांच्या टोळ्यांनी बलात्कार केले होते. हे आणि इतर प्रकार जर्मनीत होणे हे त्यापूर्वी अकल्पनीय मानले जात असले तरी हे निर्वासित घरी घेतल्यावर त्या प्रकारांचे प्रमाण वाढले. इतकेच नाही तर आपल्याला 'झेनोफोबिक' आणि 'इस्लामोफोबिक' म्हटले जाईल या 'भीतीने' अनेक लोक त्याविरूध्द जाहीरपणे बोलायचेही टाळत होते इतका आचरटपणा या उदारमतवाद्यांच्या नादाला लागून जर्मनीत झाला होता.
AfD पक्ष या उदारमतवादी आचरटपणाविरोधात आलेली प्रतिक्रिया वाटते. सगळ्या निर्वासितांना हाकलून द्या, इस्लामला आणि युरोप-अमेरिकेत जे LGBTQ+ चे खूळ गेल्या काही वर्षात अचानकपणे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे त्याला विरोध वगैरे त्यांच्या मागण्या आहेत. हा पक्ष नव नाझी आहे असाही आरोप त्या पक्षावर होत आला आहे.
आज या पक्षाने यश एका राज्यात मिळवले आहे. पुढील अडीच वर्षांत देशात राष्ट्रीय पातळीवरील निवडणुक होणार आहे. त्यावेळी हा पक्ष सत्तेत येणार का अशी भीती व्यक्त होणे सुरू झाले आहे. असे कट्टरपंथी पक्ष पुढे येणे धोकादायक असले तरी मुळात अशा पक्षांना वाढण्यायोग्य परिस्थिती निर्माण कोणी केली याचा विचार करताना कोणी दिसत नाही. आपण कित्ती कित्ती उदारमतवादी म्हणत बाहेरचे लोक घरी घ्यायचे, त्यांना करदात्यांच्या पैशावर पोसायचे आणि त्यांनी जर्मन स्त्रियांवर बलात्कार केल्यावरही तो जणू सेक्युलर आणि उदारमतवादी बलात्कार होता म्हणजे त्याविरूध्द काही बोलायचे नाही असल्या खुळचटपणाला राजमान्यता मिळाल्यावर त्याच्या विरोधात कोणीतरी उभा राहिला तर तो पक्ष लोकांना जवळचा वाटायला लागला तर त्यात आश्चर्य कोणते? अमेरिकेतही जो बायडन सत्तेत असताना न्यू यॉर्क शहरात सेंट्रल पार्कमध्ये आश्रय दिलेल्या निर्वासितांनी निदर्शने केली होती- का तर आम्हाला लॉजसारख्या ठिकाणी न उतरवता चांगल्या ठिकाणी आमची राहायची सोय करा म्हणून. इतका माज असे बाहेरचे लोक करायला लागले तर त्यांच्याविरोधात जनभावना वाढणारच.
अवघड आहे
In reply to जर्मनीतील स्थानिक निवडणुका by चंद्रसूर्यकुमार
Weidel has said she supports civil partnership for gay and lesbian couples, noting she is a lesbian herself and in a civil partnership with another woman.[15][72] She opposes legalization of same-sex marriage, stating that she supports protecting the "traditional family".[24]
एकंदरीत लग्न करून पोरे भिन्नलिंगी पद्धतीने जन्माला घाला पण समलैंगिक बाहेरख्यालीपणा केला तरी चालेल असे काहीसे बाई म्हणत आहेत असे वाटते. जर्मनी विचित्र आहे फार, म्हणले तर अतिउदार म्हणले तर डायरेक्ट एक मानववंश भट्टीत घालणारा, जर्मनी अभियांत्रिकी, शिस्त आणि पोर्क गहू आणि बियरने परिपूर्ण खाद्यसंस्कृती.
मला सगळ्यात जास्त नवल वाटले होते चर्च टॅक्सचे, जर्मन आयकरात चर्चसाठी special टॅक्स असतो आणि तो द्यायचा नसेल तर तुम्हाला तो स्वतः disable करावा लागतो.
विशेष म्हणजे चर्चसाठी हा कर जर्मन शासकीय महसूल यंत्रणा गोळा करते आणि त्या त्या चर्चला ट्रान्स्फर करते. हा कर मुळातच कशासाठी वापरला जातो हे जगजाहीर आहे.
पण ठीकच आहे एकंदरीत जर्मनी मधे जर निर्वासित प्रॉब्लेम असेलच आणि तो इतका व्यग्र असेल तर जनता पर्याय शोधणार हे मात्र नक्की.
किमान जर्मन जनता पर्याय शोधला जाऊ शकण्याइतकी सुदैवी आहे, आपल्याकडे यूपीए सरकारने 1.2 कोटी बेकायदेशीर बांगलादेशी आहे असे मान्य केले होते, 2016 मध्ये किरेन रिजिजू ह्यांनी संसदेत बोलताना तो आकडा २ कोटी असल्याचे मान्य केले होते. त्यांच्याच पक्षाचे अश्विनी उपाध्याय ह्यांनी २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करून एकंदरीत ५ कोटी बेकायदेशीर बांगलादेशी लोक भारतात राहत असल्याचे सांगितले होते व कोर्टाकडे (स्वतःच्याच) सत्ताधारी पक्षाला त्यांना ओळख पटवून हाकलून लावण्याचे आदेश देण्यासंबंधी विनंती केली होती.
(दक्ष करादाता नागरिक) खोंडे
वेगळी परिस्थिती
In reply to अवघड आहे by वृषभ खोंडे
भारतात बांगलादेशी नागरीक अवैधपणे राहतात हे अगदी उघडे गुपित आहे. साधारण १५ वर्षांपूर्वी माझे ऑफिस महालक्ष्मीला फेमस स्टुडिओ जवळ होते. त्यावेळेस सुरवातीला मी हार्बर लाईनच्या रे रोड स्टेशनवर उतरून १६४ नंबरच्या बसने जायचो. रे रोड स्टेशनसमोर जी झोपडपट्टी होती त्यात (किंवा मध्यंतरी बांद्रा स्टेशनजवळील गरीब नगर झोपडपट्टी पाडली त्यात) बांगलादेशी भरलेले आहेत/होते हे त्या भागात प्रवास करणाऱ्यांमध्ये उघडे गुपित होते. कधी आयुष्यात अंघोळ न करणारे घाणेरडे वासमारे बांगलादेशी बसमध्ये आपल्या आजूबाजूला वावरायचे हे अगदी नको वाटायचे. आमच्या नवी मुंबईत धुणीभांडी करणाऱ्या अनेक बायका आपण कलकत्त्याच्या आहेत असे सांगतात- त्या खरच भारतीय आहेत की बांगलादेशी हा पण प्रश्नच आहे. अनेक सोसायट्यांमध्ये त्यांना कामावर ठेवायचे नाही अशाप्रकारचे इन्फॉर्मल नियम केले आहेत.
ते लोक बांगलादेशी आहेत हे सगळ्यांना माहीत असले तरी कायद्याच्या दृष्टीने ते भारतीय नाहीत म्हणून त्यांना भारतात राहायचा अधिकार नाही हे पटवून देणे आणि ते बांगलादेशीच आहेत (अन्य कोणत्या देशाचे नाहीत) म्हणून त्यांना दुसरीकडे न हाकलता बांगलादेशातच हाकलणे महाकर्मकठीण काम होते- अजूनही आहे. त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी असतात/असायच्या. भारतात दुर्दैवाने पैसे चारून असली कामे करता येतात हे पण उघडे गुपित आहे. त्यात ते दिसतात पण भारतीयांसारखेच आणि बोलतातही भारतीय भाषांपैकी एक बंगालीच. मग ते भारतीय नाहीत हे कायद्याच्या दृष्टीने सिध्द करणे अशक्य होते/आहे. त्यांना हाकलायचा उपाय कायदेशीर असू शकणार नाही. त्यांना लिक्विड ऑक्सिजन देऊन बदड बदड बदडणे आणि इथे मार खाण्यापेक्षा आपल्या देशात चालते झालेले परवडले असे वाटायला लावणे हा एकच उपाय. मध्यंतरी एस.आय.आर च्या वेळेस अनेक बांगलादेशी स्वत:हून त्यांच्या देशात गेले अशा बातम्या आल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले याची कल्पना नाही. तेव्हा मुळात भारतात घुसलेले बांगलादेशी हाकलावे असे कितीही वाटले तरी ते कायदेशीर रित्या करणे जवळपास अशक्य आहे. कोणी हातात दांडुका घेऊन त्यांना धाक दाखवला तरच ते शक्य आहे. तसे कोणी करत आहे असे वाटत नाही. फार तर आपल्याला नवे बांगलादेशी घुसू नयेत इतकेच करता येईल. बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर अनेक सीमावर्ती गावांमधील लोकांनी स्वत: जमिनी बीएसएफच्या ताब्यात दिल्या आणि बऱ्याच ठिकाणी कुंपण बांधले गेले आहे असे वाटते. तरीही बंगालमधील एकूणच नद्यानाले, दलदली वगैरे टोपोग्राफी ध्यानात घेता सगळीकडे असे कुंपण बांधता येणेही अशक्य आहे असेही बातम्यांमधील चर्चांमध्ये म्हटलेले ऐकले आहे.
जर्मनी आणि भारतातील परिस्थितीत एक मोठा फरक हा की जर्मनीत त्या लोकांना सरकारने अधिकृतपणे येऊ दिले होते. त्यामुळे ते कोण आहेत, त्यांची नाव-गाव-फळ-फूल सरकारकडे असावे असे म्हणायला जागा आहे. तसे भारतात झालेले नाही. बांगलादेशींना अधिकृतपणे आणलेले नाही आणि कोण आले, कधी आले याचा कसलाही अधिकृत रेकॉर्ड भारताकडे असणे शक्य नाही.
तेव्हा दोन परिस्थिती पूर्ण वेगळ्या आहेत आणि समकक्ष नाहीत.
प्रश्न
In reply to वेगळी परिस्थिती by चंद्रसूर्यकुमार
मध्यंतरी लोहगडावरून केतन अगरवालला ढकलून ठार मारले म्हणून त्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक झाली होती. पण त्या प्रकरणी त्या दोघांना शिक्षा होणे फारच कठीण आहे- कारण त्यांचे मोबाईल लोकेशन आणि गडावर जिथेजिथे सीसीटीव्ही आहेत त्यावरून ते दोघे त्यावेळेस लोहगडावर होते हे सिध्द झाले तरी केतनला ढकलताना सीसीटीव्हीमध्ये पकडलेले नाही की कोणीही त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. तेव्हा सिया उत्तरे देताना गडबडली, परस्परविरोधी विधाने तिने केली म्हणून चोराच्या मनात चांदणे वगैरे वगैरे वाटून ती दोषी आहे असे इतरांना कितीही वाटले तरी ते कायद्याच्या दृष्टीने सिध्द कसे करणार? फार तर ती तिथे होती हे सिध्द होईल पण ती तिथे होती याचा अर्थ तिनेच खून केला हे सिध्द करता येणार नाही.
तीच गोष्ट दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी. त्यावेळेस बॉलिवूड सेलेब्रिटींसह इतरही काही लोकांची मोबाईल लोकेशन तपासा वगैरे वगैरे म्हटले गेले तरी फार तर ते सगळे लोक त्यावेळेस त्या इमारतीत (कदाचित त्या फ्लॅटमध्ये सुध्दा) होते हे सिध्द होईल. पण ते तिथे हजर होते याचा अर्थ त्यांचा तिच्या मृत्यूत हात आहे हे कायद्याच्या दृष्टीने सिध्द कसे करणार?
त्याप्रमाणेच एखादा माणूस बांगलादेशी आहे असे मला कितीही वाटत असले आणि मी त्याच्याविरोधात तक्रार केली पण त्याने आधार कार्ड किंवा दुसरे काही बनावट डॉक्युमेंट काढले तर माझा दावा मी सिध्द कसा करणार?
प्रश्न तो आहे.
हे ठीकच आहे चंद्रभाऊ
In reply to वेगळी परिस्थिती by चंद्रसूर्यकुमार
पण बाईंचे काय ?
अरे वा
In reply to जर्मनीतील स्थानिक निवडणुका by चंद्रसूर्यकुमार
अगदी नोंद घेण्याजोगी घटना आहे. माझ्यामते तर याला किमान दहा वर्षे उशीर झाला आहे. बैल गेला णि झोपा केल्या अशी परिस्थिती आहे. जरी पक्ष सत्तेत आला नाही, तरी संपूर्ण जर्मनीत त्याची ताकद वेगाने वाढत आहे. आता 'हा पक्ष लोकशाहीसाठी धोक्याचा' अशी आवई उठणार आहे हे नक्की!
चंद्रसूर्यकुमार तुम्ही खूप छान सांगोपांग विश्लेषण केले आहे. तुमचा या बाबतीत हातखंडा आहे पण तुम्ही 'सहरा वागेनक्नेश अलायन्स' चा उल्लेख नाही केला? हा पक्ष डावा आहे, पण निर्वासितांच्या मुद्द्यावर हा पक्षसुद्धा ए एफ डी प्रमाणेच निर्वासितांच्या विरोधात आहे. या पक्षानेही पहिल्याच निवडणुकीत मते मिळवून संसद प्रवेश केला आहे. जर्मनीतील पारंपारिक उदारमतवादी राजकारण आता इतिहास जमा होणार असे वाटते.
(पण हे आंतरराष्ट्रिय घडामोडींमध्ये घ्यायला हवे होते का?)
नवनाझी की पुराणनाझी ?
चंद्रसूर्यकुमार,
वायमार प्रजासत्ताकात ( इ.स. १९१८ ते १९३२ ) अशाच प्रकारचा खुळचटपणा शिगेस पोचला होता. त्यातनं अराजक उत्पन्न झालं. त्यास पर्याय म्हणून हिटलर उभा राहिला.
आजही नवा हिटलर सहज उभा राहू शकतो जर्मनीत. तो जर उभा राहिला, तर नाझी नवे म्हणावेत की जुने ?
आ.न.,
-गा.पै.
प्रश्न मुख्य तो नाही
In reply to नवनाझी की पुराणनाझी ? by गामा पैलवान
जर असा नवा हिटलर उभा राहिलाच तर त्याचा भारतीय लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण नवा असेल की जुन्या हिटलर सारखाच असेल ? 🤣🤣
डॅलस येथील रिपब्लिकन…
डॅलस येथील रिपब्लिकन पक्षाच्या मध्यावधी अधिवेशनात, ट्रम्प यांनी मतदारांसमोर एक धक्कादायक व्यवहारवादी प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पक्षाला पुन्हा सत्तेवर आणल्यास प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकाला ५,००० डॉलर्स मिळू शकतील.
"असे समजा की मी आणखी एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहे," असे ट्रम्प समर्थकांना म्हणाले. "जर रिपब्लिकन पक्षाने प्रतिनिधी सभा आणि अमेरिकेचे सिनेट जिंकले . . . तर मी अमेरिकेतील प्रत्येक प्रौढ नागरिकाला ५,००० डॉलर्सचा लाभांश देईन," असे ट्रम्प म्हणाले. “याला ‘ट्रम्प डिव्हिडंड’ म्हटले जाईल,” अध्यक्ष म्हणाले. “आता आपल्याला फक्त जिंकायचे आहे."
WSJ च्या एका अहवालानुसार, जर या कार्यक्रमावर उत्पन्न किंवा इतर पात्रतेच्या निकषांनुसार निर्बंध घातले नाहीत, तर संभाव्यतः २०० दशलक्षाहून अधिक देयकांसह, ट्रम्प १ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त 'लाभांश' देण्याचे आश्वासन देत आहेत.
अमेरिकेचे सार्वजनिक कर्ज प्रथमच ४० ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे आणि त्यामुळे कर्जाचा खर्चही वाढत आहे, अशा वेळी १ ट्रिलियन डॉलर्सहून अधिक रकमेचा प्रस्ताव काँग्रेसमधून सहजपणे मंजूर होण्याची शक्यता फारच कमी आहे.
ओ
In reply to डॅलस येथील रिपब्लिकन… by श्रीगुरुजी
त्यांनी त्यांच्या देशात त्यांच्या मतदारांवर रुंजी घालायला पैसे देतो म्हणले तर आपण त्याला धक्कादायक व्यवहारवादी प्रस्ताव म्हणता आहात तर मग हे
"लाडकी बहिण" आणून निवडणुका जिंकणारे काय म्हणवतील ? ट्रम्पने लाडकी बहिणचा अभ्यास केला असला तर त्याला बरोबर कळेल कसे निवडणूक जिंकेपर्यंत सरसकट स्त्रिया, एंजल प्रिया आयडी असणारे बाप्ये सगळ्यांना १५०० द्यायचे आणि नंतर व्यवस्थित बंद करायचे छाननी करतो म्हणत ! 🤣🤣🤣🤣
नवीन चिंताजनक घडामोड
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन काम करण्यास आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स निरुत्साही इतका खर्च करून बांधलेला प्रकल्प पांढरा हत्ती ठरू नये अशी अपेक्षा आहे. मध्यंतरी बॅगेज हँडलिंग संबंधी आमचा एक सेवाधारित प्रकल्प विकायला मुंबई विमानतळावर बऱ्याच चकरा झाल्या होत्या, तेव्हा तेथील ग्राउंड स्टाफ, हाऊस किपिंग, रिटेल इत्यादी मधील लोकांशी चर्चा होत असत त्यातील कैक लोक निरुत्साही वाटत होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिफ्ट व्हायला.
त्यांचे म्हणणे की अजून तिथे काहीच सुविधा विकसित झालेल्या नाहीत. टॅक्सी/कॅब मध्ये इत्यादी स्थानिक भूमिपुत्र मंडळींची दादागिरी आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या नावाने फक्त नवी मुंबईत महानगरपालिका वाहतूक उपक्रमाच्या २-३ बसेस आहेत, बाकी टर्मिनल बिल्डिंग सुद्धा पूर्ण झालेली नाही त्यामुळे एकदम तिकडे शिफ्ट होणे कठीण आहे. त्यांच्यानुसार अदानी कडून खूप विनवण्या आणि इन्सेन्टिव्स येतात पण फिजिबल नाही तूर्तास.
मला वाटते आधी काम करून घ्यायला हवे पूर्ण, स्थानिक लोकांत दादागिरी consolidate न होऊ देणे, टॅक्सी/कॅब मधील घोळ निस्तरणे, गोल्ड लाईन मेट्रो वर युद्धातरावर काम करणे मोबाईल रेंज ते सार्वजनिक परिवहन उपलब्धता केल्यास जनता हळूहळू तिकडे शिफ्ट होईल. .
एअरपोर्ट तसा फारच सुंदर आहे (जागा/ कन्सेप्ट) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर जाणाऱ्या लोकांना आजवर अंधेरीत झक्कत जाणे सोडून इलाज नव्हता.
त्यातही हिंटरलँड महाराष्ट्र, दक्षिण/पश्चिम मध्यप्रदेश, विदर्भ तेलंगणा, दक्षिण गुजरात, गोवा, कारवार पर्यंत उत्तर कर्नाटक ह्या सगळ्या जनतेला आधी प्रवास करत येऊन नंतर अंधेरीपर्यंत जायची ट्रॅफिक मधली कसरत ह्या विमानतळामुळे वाचू शकते. मुंबईत आले की शिवेवरच एक आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सेटअप असणे म्हणून बरे पडते.
(जी किशन रेड्डी गडकरी) खोंडे
नवी मुंबई विमानतळ
In reply to नवीन चिंताजनक घडामोड by वृषभ खोंडे
नवी मुंबई विमानतळ पांढरा हत्ती ठरेल ही शक्यता कमी. जगातील अनेक मोठ्या शहरांमध्ये एकापेक्षा अधिक विमानतळ आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ प्रवासी आणि कार्गो विमानांचा वाढलेला आकडा अनिश्चित काळापर्यंत सांभाळू शकणार नाही. आजूबाजूच्या परिसरात दाट लोकवस्ती ध्यानात घेता त्या विमानतळाच्या विस्तारावर मर्यादा आहेत. मग मुंबई शहराजवळच दुसरा विमानतळ बांधणे हाच उपाय. आता कदाचित मुंबईत मुख्य विमानतळावर तो प्रश्न तितक्या प्रमाणावर येत नसावा पण ते किती काळ चालणार? तहान लागल्यावर विहिर खणायला लागण्यापेक्षा दोन-चार वर्षे लवकर विमानतळ बांधून पूर्ण झाला असला तरी हरकत नाही. अशा गोष्टींमध्ये अगदी परफेक्ट टायमिंग जमणे अशक्यच.
त्यांचे म्हणणे की अजून तिथे काहीच सुविधा विकसित झालेल्या नाहीत. टॅक्सी/कॅब मध्ये इत्यादी स्थानिक भूमिपुत्र मंडळींची दादागिरी आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या नावाने फक्त नवी मुंबईत महानगरपालिका वाहतूक उपक्रमाच्या २-३ बसेस आहेत, बाकी टर्मिनल बिल्डिंग सुद्धा पूर्ण झालेली नाही त्यामुळे एकदम तिकडे शिफ्ट होणे कठीण आहे.
हळूहळू या गोष्टी होतीलच. पण त्या लवकरात लवकर विकसित करणे गरजेचे आहे. बंगलोरला केंपेगौडा विमानतळ सुरू झाल्यानंतरही नवीन विमानतळ किती लांब आहे, तिथे जायला यायला किती त्रास होतो वगैरे तक्रारी होतच होत्या. पण आता सगळ्यांच्याच ते अंगवळणी पडले आहे. तसेच नवी मुंबईतही होईलच.
मला सगळ्यात मोठा प्रश्न वाटतो कनेक्टिंग विमान घेणाऱ्या प्रवाशांचा. आंतरराष्ट्रीय प्रवास करून समजा नागपूरचा रहिवासी नवी मुंबई विमानतळावर उतरला तर त्याला नागपूरचे विमान ३-४ तासात लगेच नवी मुंबईहूनच मिळेल का? वेळ सोयीची नसेल तर मग नवी मुंबई विमानतळावरून अंधेरीला जायचे का? तिथून मुख्य विमानतळावर जायच्या विचारानेच प्रवासी अर्धमेला होईल 🫢नवी मुंबई विमानतळ ते मुंबई विमानतळ हा केवळ विमान प्रवाशांसाठीचा डेडिकेटेड मार्ग बांधणे जवळपास अशक्य आहे- बांधायचा म्हटला तरी अनेक वर्षे लागतील. कारण मध्ये नवी मुंबईची खाडी आहे. समजा कनेक्टिंग विमानाचा प्रश्न नसेल तर नवी मुंबई विमानतळावर पोचण्यासाठी भरपूर कॅब, विमानतळावर लाऊंज आणि दुकाने वगैरे सुविधा वगैरे वर्ष-दोन वर्षात होतील. नवी मुंबई विमानतळाचे ठिकाण सगळ्यांना सोयीचे नाही. बोरीवलीच्या लोकांना तिथे पोचायला संध्याकाळच्या ट्रॅफिकमध्ये कित्येक तास लागतील. पण मुंबई शहरातील दाट लोकवस्ती पाहता दुसरा विमानतळ हवा, एकदम जवळ हवा, जिथे आधीच टॉवर्स आधीपासून उभे आहेत तिथे जवळपास नको वगैरे सगळ्या गोष्टींची पूर्तता होणे शक्य नाही. त्या बाबतीत नाईलाज आहे.
मला खरा मोठा प्रश्न वाटतो उडान स्किमच्या (की दुसरी कोणती स्किम) नावाखाली कोणत्या कोणत्या आटपाट ठिकाणी विमानतळ बांधून ठेवले आहेत ते नक्कीच पांढरे हत्ती होतील- आधीच झालेले आहेत. युपीत लखनौ, वाराणसी, प्रयागराज, नोएडा वगैरे ठिकाणी विमानतळ आहेत ते समजू शकतो. तिथे जाणारे प्रवासी तितक्या प्रमाणावर मिळतात इतके पोटेन्शिअल त्या ठिकाणांमध्ये आहे. मात्र लखीमपूर खेरी, मुरादाबाद, श्रावस्ती, ललितपूर अशा ठिकाणी पण विमानतळ बांधले आहेत/बांधले जात आहेत. मुळात ज्या ठिकाणी विमानाने जाणाऱ्या/जाऊ शकणाऱ्या प्रवाशांचा आकडा तितका असेल तिथे विमानतळ असेल तर समजू शकतो. पण विमानतळ आहे म्हणून लोक विमानाने जातात का? श्रावस्तीला लोकवस्ती भरपूर आहे पण तिथे विमानाने जाऊ शकतील इतके प्रवासी किती प्रमाणावर आहेत? विमानतळ आहे म्हणून मुरादाबाद किंवा श्रावस्तीला जाऊ असे वाटणारे लोक कितीसे असतील? मरायला तिथे जाऊन करायचे काय? अशा विमानतळांवरून किती विमानांचे उड्डाण दररोज होते हा संशोधनाचाच विषय आहे.
दुसरे म्हणजे दोन विमानतळ जवळ बांधणे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील चिपी आणि उत्तर गोव्यातील मोपा हे विमानतळ खूप जवळ आहेत. मोप्याच्या नव्या विमानतळाविषयीही आता नवी मुंबई विमानतळाविषयी होत्या तशाच तक्रारी सुरवातीला होत्या. गेल्या ३-४ वर्षात त्या मागे पडल्या असे दिसते. आता प्रश्न हा की चिपी विमानतळ गोव्यात असल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला आणि त्यामुळे अधिक मोठा. एक तर सिंधूदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी तरी चिपीपेक्षा मोपा विमानतळ जवळ आणि आंतरराष्ट्रीय मोठा विमानतळ असल्याने वेळा आणि विमानांची जा-ये या बाबतील चिपीपेक्षा अधिक सोयीचा. त्यामुळे चिपी विमानतळ पण पांढरा हत्ती होणार का हा प्रश्नही पडतो.
मध्यंतरी नवीन क्रिकेट मैदाने…
In reply to नवी मुंबई विमानतळ by चंद्रसूर्यकुमार
मध्यंतरी नवीन क्रिकेट मैदाने बांधण्याचे पेव फुटले होते. भारताच्या अडीचपट मोठा भूभाग असलेल्या ऑस्ट्रेलियात जेमतेम ६-७ आंतरराष्ट्रीय सामने होणारी क्रिकेट मैदाने आहेत जी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या निकषानुसार बांधली आहेत (म्हणजे खेळपट्टीपासून चौकार सीमारेषेचे किमान अंतर, प्रकाशयोजना इ.).
परंतु भारतात किमान १ आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेली ८३ मैदाने आहेत. त्यातील ४९ मैदाने ही सर्व प्रकारच्या सामन्यांसाठी वापरता येऊ शकतात. परंतु या ४९ मैदानांपैकी २८ मैदानात सर्व ३ प्रकारांचे सामने आयोजित होतात, ३५ मैदानात एकदिवसीय व वी२० सामने आणि उर्वरित मैदानात कसोटी व एकदिवसीय सामने.
२०२६-२७ या वर्षात केवळ १७ मैदाने वापरली गेली.
महाराष्ट्रात पुणे येथील गहुंजे, मुंबईत वानखेडे व ब्रेबॉर्न, नवी मुंबईत डि वाय पाटील आणि नागपुरात जामठा मैदान आहे. यातील वानखेडे व जामठा वगळता इतर मैदानात क्वचितच सामने होतात. नवी मुंबईतील मैदानात तर अनेक वर्षे एकही सामना झाला नाही.
मैदानात सामना नसला तरी मैदानातील हिरवळ कायम ताजीतवानी ठेवावी लागते. प्रकाशयोजना तपासावी लागते. खेळपट्टीची निगा राखावी लागते. मैदानातील पाणी निचरण्याची व्यवस्था तपासावी लागते. हा खर्च खूप असतो.
म्हणजे निम्म्याहून जास्त मैदाने निरूपयोगी पांढरा हत्ती बनली आहेत. स्थानिक सामने सुद्धा काही ठराविक मैदानांवरच खेळले जातात.
भारतातील नव्याने होणाऱ्या विमानतळाचे पांढरे हत्ती होऊ नये. बारामती, यवतमाळ, कोल्हापूर, सोलापूर अश्या जवळपास सर्व जिल्ह्यात विमानतळ आहे, परंतु उड्डाणांची संख्या खूप कमी आहे. पुण्यात लोहगाव विमानतळ आहे. आता पुरंदर भागात (शहरापासून ५०-६० किमी अंतरावर) नवीन विमानतळाची योजना आहे. तो कितपत उत्पादक राहील याविषयी शंका आहे.
मैदाने
In reply to मध्यंतरी नवीन क्रिकेट मैदाने… by श्रीगुरुजी
क्रिकेट हा माझ्या आवडीचा विषय राहिलेला नाही. तरीही एक गोष्ट लिहितो/विचारतो. ऑस्ट्रेलिया आणि भारत ही तुलना या बाबतीत करता येईल का? ऑस्ट्रेलिया हा भारताच्या अडीच पट मोठा देश आहे पण देशाची ८५-९०% लोकवस्ती किनाऱ्याजवळील सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेन, ॲडलेड, पर्थ आणि काही प्रमाणात डार्विन या शहरांमध्ये आहे. भारताचे अंदमान-निकोबार बेट हे मुख्य भूमीपासून थोडे दूर पण भारताचाच भाग असलेले बेट आहे त्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे टास्मानिया हे बेट आहे (मुख्य भूमीपासून तितके दूर नसले तरी). तिकडचे मुख्य शहर होबर्टमध्येही काही प्रमाणावर लोकवस्ती आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनेबेरा हे फार मोठे शहर नाही- देशाची राजधानी कुठे ठेवायची यावरून इतर शहरांमध्ये भांडणे झाल्यावर मग राजधानी म्हणून वेगळेच शहर वसवायचा निर्णय झाला- ते शहर कॅनबेरा. तर सांगायचा मुद्दा हा की दिसायला ऑस्ट्रेलिया भारताच्या अडीच पट मोठा दिसला तरी लोकसंख्या मुंबईच्या दुपटीपेक्षा कमी आणि ती पण बहुसंख्य या ६-७ शहरांमध्येच. मग त्याच शहरांमध्ये क्रिकेटची मैदाने असणार ना?
बरं भारताची ऑस्ट्रेलियाशी तुलना न करता न्यू झीलंडशी केली तर मग वाटेल की न्यू झीलंड हा इतका लहान देश तरीही ऑकलंड, वेलिंग्टन, खाईस्टचर्च, ड्युनेडिन, नेपिअर अशी मला माहित असलेलीच पाच क्रिकेट मैदाने आहेत. मग न्यू झीलंडच्या तुलनेत भारत इतका मोठा आणि लोकसंख्या इतक्या पटीने जास्त तरीही ८३ मैदाने म्हणजे त्या मानाने कमीच वाटतील.
अर्थात भारतात क्रिकेटचे एकही मैदान जरी नसले तरी व्यक्तिश: माझ्यात काहीही फरक पडणार नाही. पण असे आकडे आपण तुलनेसाठी दुसरे कोणते आकडे वापरतो यावरून कमी किंवा जास्त दाखवता येतात हा मुद्दा मांडायला हे लिहिले आहे.
सामने किती होतात व मैदान…
In reply to मैदाने by चंद्रसूर्यकुमार
सामने किती होतात व मैदान किती सामन्यांसाठी वापरले जाते हे पाहणे महत्त्वाचे आहे. वर्षात एखादाच सामना होत असेल व उर्वरित ३६०+ दिवस एकही सामना होत नसेल तर मैदानाच्या देखभालीचा खर्च, मैदानातील हिरवळ सर्व ३६५ दिवस जिवंत ठेवण्यासाठी लागणारे पाणी, खेळपट्टीची देखभाल, मैदानाने व्यापलेली जागा व बाहेरील वाहनतळाची जागा यांचा खर्च खूप जास्त आहे. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या जेमतेम २-३ टक्के इतकीच असली तरी दोन्ही देश साधारणपणे एकूण समान दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात (म्हणजे ३६५ दिवसात ५ ते ८ कसोटी सामने, साधारणपणे १५ ते २० मर्यादित षटकांचे सामने). ऑस्ट्रेलियात व भारतातही साधारणपणे ५०-६० दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जाते. जर ऑस्ट्रेलियाला यासाठी ६-७ आंतरराष्ट्रीय मैदाने पुरत असतील, तर भारताला ८३ मैदानांची अजिबात आवश्यकता नाही. भारतातील अनेक मैदाने अजिबात वापरात नाहीत, परंतु कधीतरी सामना होईल यासाठी देखभाल करावी लागते. पुण्याजवळील बाळेवाडी येथे १९९३ मधील राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेसाठी नवीन मैदान बांधले. त्यानंतर क्वचितच ते मैदान वापरले गेले. बहुतेक वेळा तेथे काहीही होत नाही. कधीतरी एखाद्या पुढाऱ्याच्या घरातील विवाहसमारंभ असतो. क्रिकेटची बहुतेक मैदाने अशीच पडून आहेत.
मैदानांचा वापर 'मल्टी-स्पोर्ट्स + मॉडल'वर आधारित असला पाहिजे
In reply to सामने किती होतात व मैदान… by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी यांनी योग्य मुद्दा मांडला आहे. पण त्यात काही भाग अजून वाढवतो.
ऑस्ट्रेलियात मैदानांचा वापर 'मल्टी-स्पोर्ट्स + मॉडल'वर आधारित आहे. ते एकाच मैदानाचा वापर वेगवेगळ्या खेळांसाठी आणि कार्यक्रमांसाठी करतात. ऑस्ट्रेलियात इतर खेळांनाही प्रमुख प्रेक्षक वर्ग असतो. या स्टेडियम्समध्ये रग्बी, फुटबॉल (सॉकर) आणि अगदी टेनिसचे सामनेही आयोजित केले जातात. मेलबर्न एमसीजी किंवा सिडनीची मैदाने हिवाळ्यात ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीगसाठी (ए एफ एल ऐकले असेल तर) वापरली जातात. उन्हाळा सुरू झाला की तिथे क्रिकेट खेळले जाते. क्रिकेटचा हंगाम नसताना टेलर स्विफ्ट, कोल्डप्ले यांच्या मोठ्या संगीत मैफिली येथे होतात. सामन्य दिवसांत स्टेडियमचे टूर, रेस्टॉरंट्स आणि कॉर्पोरेट मीटिंगसाठी ही जागा भाड्याने दिली जाते. यामुळे मैदानातून वर्षभर सतत कमाई होत राहते. तिथली हिरवळ आणि सुविधांचा पूर्ण वापर होतो. कारण यासाठी मैदान 'कायम विकले जाईल' असा प्रयत्न करणारा मार्केटिंगचा एक रिसोर्स प्रयत्न करत असतो.
भारतात मैदाने ही स्वतंत्र होतील आणि त्यांचा ताळेबंद राखला जाऊ लागेल तेव्हा ती मैदाने पण पांढरा हत्ती होणार नाहीत. क्रिकेटच्या मैदानांवर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात भारतीय फुटबॉल, प्रो कबड्डी यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या पहिजेत. क्रिकेट नसताना मैदानाचे मुख्य भाग सुरक्षित ठेवून तिथे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाण्यांचे कार्यक्रम व्हायला हवेत. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय मैदाने स्थानिक सामने, क्लब सामने आणि शालेय स्पर्धांसाठी खुली केली पहिजेत - हे फार महत्त्वाचे आहे.
स्टेडियम हे फक्त 'क्रिकेटचे मैदान' न राहता 'क्रीडा आणि मनोरंजन केंद्र' एंटरटेन्मेंट हब बनले पाहिजे. यामुळे बालेवाडीसारखी मैदाने पडून राहणार नाहीत. आणि मैदानांच्या देखभालीचा खर्च स्वतः स्टेडियमच्या कमाईतूनच निघाला पाहिजे.
अजून एक ह्याच संदर्भातली बातमी
In reply to नवी मुंबई विमानतळ by चंद्रसूर्यकुमार
इंडिगोने नवी मुंबई विमानतळावरून संचालित होणाऱ्या फ्लाईट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे
ह्यातून पुन्हा तोच एक मुद्दा अधोरेखित होतो आहे. की जोवर फिडर मेकॅनिजम पक्षी बस, मेट्रो, लोकल, प्रीपेड टॅक्सी (सरकारी दर नियंत्रित) इत्यादींची जोडणी विमानतळ, बंदर इत्यादींना मिळत नाही तोवर त्यांचे ऑपरेशन हे दोलायमान राहणारच.
(रोडकरी) खोंडे
हम्म
In reply to नवीन चिंताजनक घडामोड by वृषभ खोंडे
म्हणूनच म्हणालो मी की दोन्ही विमानतळांना जोडणारी गोल्ड लाईन मेट्रो (जी बहुतांशी अंडरग्राऊंड आहे) तिचे काम आधी सुरू करणे गरजेचे होते. आताशा तिचे allignment फायनल करून काम सुरू करण्याचा मुहूर्त शोधत आहेत. त्यात ती लाईन बेलापूर खाडीच्या खालून का वरून काढायची म्हणजे अजून वेळकाढू/काटेकोर लागणारच कारण आपल्याकडे बाकी काही कडक असेल नसेल कमिश्नर फॉर रेल्वे सेफ्टी (CRS) सर्टिफिकेशन भयानक कठीण असते.
आता तुम्ही म्हणता तसा सीन इमॅजिन करा. नागपूरहून प्रवास करून प्रवासी आला समजा नवी मुंबई विमानतळावर, त्याने बघितले फ्लाईट मुंबईतून आहे, सरळ arrival मधून बाहेर आला किंवा बॅगेज क्लेम मधूनच जो एक्झिट असेल तो घेतला, अन् एअरपोर्ट गोल्ड लाईन पकडली का ३५ मिनिटात सरळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अंधेरी टर्मिनल २.
दिल्लीत अशीच सिस्टीम आहे, एअरपोर्ट मेट्रो शिवाजी स्टेडियम ते एअरपोर्ट मार्गे धौला कुंवा, ह्या एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनने एक सोय अजून केली आहे ती म्हणजे प्रत्येक मेट्रो स्टेशन वर बॅगेज चेक इन काऊंटर दिलेत मोठ्या एअरलाईन्स सगळ्यांना. म्हणजे बॅग घेऊन मेट्रो पर्यंत या, तिथे चेक इन होणार बॅग अगदी टॅग लावून तुम्ही सड्याने एअरपोर्टला जा, केबिन लगेज सोबत मस्त चेक इन इमिग्रेशन सिक्युरिटी करून सरळ डिपार्चर गेटला जाऊन बसा.
अधोरेखित बाब ही की आधी एअरपोर्ट एक्सप्रेस एरोसिटी पर्यंत सुरू केली गेली मेट्रो मग टी ३ चे विस्तारीकरण करून जोडणी दिली.
(मेट्रो मॅन) खोंडे
ऐकावे ते नवलच
मी मुंबई गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही कारण मला लाज वाटते - नितीन गडकरी
मंत्री महोदयांचे म्हणणे आहे की २०११ -१२ मध्ये सुरू करून २०१६ मधे संपवायचा हायवे २०२६ मध्ये सुरू होतो आहे त्याची मला फारच जास्त लाज वाटते म्हणे. त्यामुळे मी ह्या महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही.
आता त्यांनी आश्वासन दिले आहे की ते ऑक्टोबर मधे मुंबई ते गोवा स्वतः मोटारीने जातील आणि जाताना निरीक्षण करत जात ज्या ज्या कंत्राटदार मंडळींनी कामे duplicate केली आहेत त्यांची नोंद करत पुढे त्यांना ब्लॅक लिस्ट करतील !
आज ११ सप्टेंबर
आमेरीका आणि न्यु यॉर्क वर ९/११ च्या अतिरेकी हल्ल्याला २५ वर्षे झाली. हल्ल्याच्या २५ व्यावर्षी एक (कथित समाजवादी) मुस्लीम न्यु यॉर्कच्या महापौरपदी असणे होऊ शकते.
कसाबलाही मानवाधीकार म्हणून वकील पुरवणे ठिक पण त्याच्या वकीलाला भविष्यात मुंबईच्या महापौराचा मुख्य सल्लागार नेमले गेले तर कसे वाटेल. अद्याप तरी मुंबईत हे घडलेले नाही पण न्यु यॉर्क मध्ये तेथील महापौर ममदानींनी अतीरेक्याची केस लढवणाऱ्या वकीलास मुख्य सल्लागारपदी यशस्वीपणे नेमुन दाखवले आहे! कालाय तस्मै नम:
आता असे बघा
In reply to आज ११ सप्टेंबर by माहितगार
एक शब्द आहे "सार्वभौमता" पटला तर बघा. अमेरिकेला काय गोंधळ घालायचा ते अमेरिकेला घालू द्या. दुसरे म्हणजे मुंबईत झाला तर ? वगैरे प्रश्नांना काहीच अर्थ नाहीये.
आंतरराष्ट्रीय संबंधांवर बोलायचे तर अमेरिका कसा अडगा आहे, ह्याला नड त्याला नड करतो इत्यादी इत्यादी बोलता येईल. त्यांच्या अंतर्गत बाबीत बोलून अबकी बार ट्रम्प सरकार घोषणेचे हात दाखवून अवलक्षण सुद्धा आपल्याला काहीच शिकवणार नसेल तर काहीच अर्थ नाही बुवा.
(टी टी एम एम) खोंडे.
उदाहरणासाठी काढलेली समांतर…
In reply to आता असे बघा by वृषभ खोंडे
उदाहरणासाठी काढलेली समांतर रेषा = आंतरराष्ट्रीय संबंध लावणे = म्हणजे बादरायण संबंध लावणे!
भारतीयांना अतिरेक्यांनाची सम्राटपदीही पुजा करण्याचा अनुभव असंख्यांना त्याचा गर्वही आहे, त्यामुळे अतिरेक्यांचे समर्थन करणाऱ्या एखाद्या वकीलाला सल्लागारपदी नेमणे याचे वैषम्य असंख्यांना नसण्यात विशेष काही नाही हे खरेच. त्यामुळेच आधीच कालाय तस्मै नम: लिहिले आहेच.
मला वाटते आपण शब्दप्रमाण्य जपाल
In reply to उदाहरणासाठी काढलेली समांतर… by माहितगार
त्यामुळे आता
ह्याच्या समर्थनार्थ कुठल्या अतिरेक्याला "सम्राटपदी" बसवले, कधी बसवले ते जरा साद्यंत सांगा.
सुरुवात सम्राटपद म्हणजे नेमके काय ? इथून केलीत तरी चालेल.
(शब्द शिकारी) खोंडे
पण न्यु यॉर्क मध्ये तेथील…
In reply to आज ११ सप्टेंबर by माहितगार
ज्ञानाला सीमा असते पण अज्ञानाचे विवर अथांग असते.
कासेम हे मानवाधिकार अधिवक्ता आहेत त्यामुळे ज्यांचे कुणी प्रतिनिधित्व करणार नाही त्याचे प्रतिनिधित्व करणे त्यांचे कामच आहे. किंबहुना लोकशाही आणि न्यायव्यवस्थेची ती महत्वाची सेवा आहे. कुणा आरोपीचा कोर्टांत बचाव करणे ह्याचा अर्थ तो वकील त्यांत सामील आहे असा होत नाही. त्याचा अर्थ वकील त्या व्यक्तीचे जे काही कायदेशीर अधिकार आहेत त्याचे रक्षण करतो.
कासेम ह्यांनी ९/११ च्या आरोपींचा बचाव केला नाही तर अल दरबी [१] ह्या ओसामा बिन लादेन ह्याच्या सहकार्याचा बचाव केला आणि केस होती येमेन च्या जवळ एका फ्रेंच तेल टँकर वर हल्ल्याची. आणि त्यांत सुद्धा त्याचा खरा सहभाग होता कि नाही ह्याची शाश्वती नाही कारण अमेरिकन सरकारने त्याला गुटनामो बे वर कोंडून ठेवले होते. इथे लोकांना नेहमीची कायदेशीर प्रक्रिया मिळत नाही आणि इथून सुटण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आरोप मान्य करणे.
कासेम हे अल दरबी चे नागरी अधिवक्ता होते तर नेव्ही च्या तर्फे म्हणून Lt. Cmdr. Travis Owens हे अमेरिकन नेव्ही चे JAG अल दरबी चा बचाव करत होते. Lt. Cmdr. Travis Owens आणि कासेम दोघांनीही अल-दरबीच्या बचावाचे काम केले आहे.
“Aside from the fact that it’s un-American to accuse a defense attorney of being aligned with his defendant, it’s also illogical,” Owens told City & State.
“To have Ramzi on the case, I mean, you couldn’t have asked for a better situation in terms of the government being able to get what it wanted to get out of the defendant,” Owens said.
President Donald Trump seemed to agree. Given al-Darbi’s plea deal, and his level of cooperation, Trump allowed him to be repatriated to Saudi Arabia in 2018 and serve out his sentence in his home country. Al-Darbi was the first – and apparently, still the only detainee released from Guantánamo over Trump’s two terms.
कासेम आणि ओवेन्स ह्यांनी फक्त बचाव केला नाही तर हवी ती माहिती त्याच्याकडून काढून घेतली आणि ट्रम्प सरकारने सुद्धा त्याला गुटनामो बे वरून सौदी मध्ये हस्तांतरित केले.
सध्या भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता. ह्यांचे कारनामे पहा :
At the time, Mehta was serving as the Additional Solicitor General (ASG) of India. Government law officers are generally expected to represent the state, not private citizens. However, Mehta sought and received special, rare permission from the Central government to represent Shah. This drew massive criticism from opposition parties and legal experts, who questioned the propriety and ethics of a government lawyer fighting a personal legal battle for the ruling party president's son.
(जय शाह ह्यानी कदाचित सरकार माझ्या बापाचे आहे आणि सरकारी नोकर हे माझे नोकर आहेत असा युक्तिवाद केला असावा)
त्याच्या आधी :
High-ranking police officers were accused of staging murders under the guise of anti-terrorism operations. When a Supreme Court-appointed committee headed by Justice H.S. Bedi found faults and recommended the prosecution of several police officials, Mehta strongly opposed the findings. He resisted sharing the investigative reports with the petitioners and argued that the activists seeking accountability had a "selective public interest" aimed unfairly and exclusively at Gujarat.
[१] https://en.wikipedia.org/wiki/Ahmed_al-Darbi
आपला मोदी द्वेष किती टोकाचा…
In reply to पण न्यु यॉर्क मध्ये तेथील… by साहना
आपला मोदी द्वेष किती टोकाचा आहे ते पाहून घ्या.
Tushar Mehta has served as a trusted legal advisor and counsel to Amit Shah through major legal battles spanning over a decade. [1] (https://www.thehindu.com/news/national/tushar-mehta-appointed-as-solici…), [2] (https://x.com/thecaravanindia/status/1791422786080059436)Key Legal Representation
Sohrabuddin Sheikh Encounter Case: Tushar Mehta served as the primary legal counsel for the State of Gujarat during the Sohrabuddin Sheikh fake encounter case, in which Amit Shah was a key accused. Shah was eventually discharged by a special CBI court in Mumbai in 2014. [1] (https://theprint.in/judiciary/tushar-mehta-re-appointed-as-solicitor-ge…), [2] (https://www.thehindu.com/news/national/tushar-mehta-appointed-as-solici…)
Defamation Case for Jay Shah: In 2017, Mehta received special government permission to represent Jay Shah, Amit Shah's son, in a criminal defamation suit against the news portal The Wire. [1] (https://x.com/thecaravanindia/status/1791422786080059436), [2] (https://www.business-standard.com/article/current-affairs/asg-tushar-me…), [3] (https://www.firstpost.com/india/tushar-mehta-to-represent-jay-amit-shah…)
Professional Relationship Longstanding Association: Amit Shah and Tushar Mehta have shared a professional and personal association dating back decades in Gujarat. [1] (https://www.instagram.com/reel/DYKp9tbTNyo/), [2] (https://www.thehindu.com/news/national/tushar-mehta-appointed-as-solici…)
Rise to Solicitor General: Following the NDA government coming to power in 2014, Mehta was appointed Additional Solicitor General and later became the Solicitor General of India, where observers note his ongoing alignment with the political and legal strategy of the Modi-Shah leadership.
जो वर्षानुवर्षे एखाद्याचा वकील आहे त्याने त्याच केस मध्ये अशिलासाठी काम केले तर त्यात काहीही चूक नाही. जर व्यवस्थित परवानगी घेऊन काम केले तर त्यात काय चूक आहे. अमित शाह यांनी कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनू सिंघवी कडे जायला हवे होते का? मुळात ज्या वकीलावर विश्वास नाही त्याच्या कडे कसे कोणी जाईल?
एखादा डॉक्टर एखाद्या रुग्णाला वर्षानुवर्षे रुग्ण सेवा देत आला असेल तर तो उद्या केवळ सरकारी नोकरीत आहे म्हणून त्याने त्या रुग्णावर परत उपचार करू नये असे म्हणण्यासारखे आहे.
असो आपला मोदीद्वेष जगजाहीर आहेच. तेंव्हा अधिक सांगणे न लगे.
माझ्या वरच्या प्रतिसादांत…
In reply to आपला मोदी द्वेष किती टोकाचा… by सुबोध खरे
माझ्या वरच्या प्रतिसादांत मोदी महाशयांचा उल्लेख शून्य आहे. थेट किंवा लेकी बोले सुने लागे प्रमाणे सुद्धा परमआदरणीय मोदिजीं वर काही टिप्पणी केली नाही. मनात हेतू सुद्धा नव्हता.
तुम्हालाच हिरण्यकश्यपू प्रमाणे प्रत्येक ठिकाणी मोदीद्वेष रुपी शत्रू दिसायला लागलाय आणि इतरांना मोदीळ वगैरे झालाय असे डायग्नोसिस आपण करत आहात.
शाह-मेहता ह्यांचे जुने घनिष्ट व्यावसायिक संबंध आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती असली कि एखादा चांगला वकील रिटेनर वर ठेवावाच लागतो. आपल्याला सत्ता मिळाली कि त्या वकिलाला उच्च पदावर पोचवणे सुद्धा गृहीत आले. ह्यांत आश्चर्य नाही आणि द्वेष सुद्धा नाही.
> जो वर्षानुवर्षे एखाद्याचा वकील आहे त्याने त्याच केस मध्ये अशिलासाठी काम केले तर त्यात काहीही चूक नाही. जर व्यवस्थित परवानगी घेऊन काम केले तर त्यात काय चूक आहे.
सॉलिसिटर जनरल हे सरकारी पद आहे ह्या पदाला सत्तेचा आश्रय आहे. ह्या पदावरील व्यक्ती कायद्याने इतर खाजगी केसेस घेऊ शकत नाही. त्याला अपवाद म्हणून वेगळी परवानगी घेण्याची पळवाट आहे. हि पळवाट घेऊन त्यांनी जय शाह ह्यांचे वकीलपत्र घेतले. तांत्रिकदृष्टया काहीच चुकीचे नसले तरी "Appearance of Impropriety" आहे. त्याशिवाय हि तात्पुरती परवानगी असल्याने बचाव करणारी व्यक्ती सॉलिसिटर जनरल आहे ह्याचा दबाव संबंधित सरकारी संस्था, दुसरे वकील इतरांवर पडतो. अर्थात हे नैतिक मुद्दे झाले. भारतातील सार्वजनिक आयुष्यांतील एकूण नैतिकतेची अपेक्षा पाहता ह्यांत आश्चर्य किंवा विशेष वाटावे असे काहीच नाही.
आपल्या फॅमिली अशिलाचे हित आपल्या नोकरी पेक्षा महत्वाचे वाटणे शक्य आहे. त्यांत नैतिक दृष्टया सुद्धा काही चूक नाही. चूक मला वाटते खाजगी केस साठी हि तथाकथित परवानगी देणाऱ्या सरकारी यंत्रणेची. मेहता ह्यांनी राजीनामा देऊन केस लढविण्यात काहीच नैतिक दृष्टया चूक नव्हते.
> एखादा डॉक्टर एखाद्या रुग्णाला वर्षानुवर्षे रुग्ण सेवा देत आला असेल तर तो उद्या केवळ सरकारी नोकरीत आहे म्हणून त्याने त्या रुग्णावर परत उपचार करू नये असे म्हणण्यासारखे आहे.
डॉक्टर आणि वकील ह्या दोन्ही व्यवसायांची एथिक्स अगदी वेगळी आहेत. ह्यांची ह्या प्रकारे तुलना करणे False Equivalence म्हणजे फोल युक्तिवाद आहे.
डॉक्टरचा लढा हा आजाराशी, विषाणूशी किंवा मृत्यूशी असतो. डॉक्टर सरकारी असो वा खाजगी, त्याचा मूळ उद्देश आजाराला हरवणे आणि रुग्णाचा जीव वाचवणे हाच असतो. आजार हा कोणाचाही 'पक्षपाती' नसतो. वैद्यकीय उपचार हा 'झिरो-सम गेम' नाही. एका रुग्णाचा जीव वाचवला, याचा अर्थ दुसऱ्या कोणाचा तरी जीव घेतला असा होत नाही. कायदा आणि न्यायव्यवस्था हा 'झिरो-सम गेम' आहे. न्यायालयात एक पक्ष जिंकतो आणि दुसरा हरतो. जर सॉलिसिटर जनरलने आपला वेळ आणि प्रभाव वापरून एखाद्या खाजगी अशिलाला जिंकवून दिले, तर याचा अर्थ त्यांनी दुसऱ्या पक्षावर (जो सामान्य नागरिक, पीडित किंवा खुद्द सरकार असू शकते) थेट अन्याय केला आहे.
--
पण माझा मूळ मुद्दा तुषार मेहता सुद्धा नव्हता. ममदानी ह्यांनी विख्यात प्राध्यापक आणि मानवाधिकार वकिलाला आपला सल्लागार नेमले आहे आणि भारतीय केंद्रसरकारांत आपल्या मित्रमंडळाने SG नेमले हा आहे. (इथे सुद्धा किती चुकीचे केले, हा हंबरडा फोडायचा उद्देश नाही तर उगाच मांडणी आणि एका विदेशी शहराचं महापौरावर टिप्पणी करण्याच्या आधी आपल्या पायाखाली काय जळते आहे त्यावर लक्ष ठेवावे हा मुद्दा आहे).
तुम्हाला तर तुषार मेहता ह्यांची नेमणूक हि त्यांच्या मेरिट वर झाली आहे आणि त्यांनी परवानगी घेऊन खाजगी केस लढवणे योग्य वाटते तर मला आक्षेप नाही. प्रत्येकाचा नैतिकतेचा कंपास वेगळी उत्तर दिशा दाखवतो.
+१०००
In reply to माझ्या वरच्या प्रतिसादांत… by साहना
प्रतिसाद प्रचंड आवडला.
तेच नामूळ मुद्द्याला हात…
In reply to माझ्या वरच्या प्रतिसादांत… by साहना
तेच ना
मूळ मुद्द्याला हात घालताना तुमचा पूर्वग्रह उघडकीस आला आहे आता त्यावर कितीही मल्लिनाथी करा
बूंद से गयी सो हौद से नही आती!
सरकार कोणत्याही देशाचे असो ते आपल्या विचारसरणीचेच महाधिवक्ता नेमणार यात काय संशय? मग तेथे ममदानी असो किंवा राहुल गांधी.
राहुल गांधी तुषार मेहता याना आपले वकील नेमतील का?
श्रीहरी अणे हे महाराष्ट्राचे अधिवक्ता होते. जेंव्हा त्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली तेंव्हा त्यांना रजा दिली गेली.
कारण आपला वकील विरोधी विचारसरणीचा असणे हे "कोणालाही" झेपणारे नाहीच यात सरकार पण येतेच.
ओवैसी किंवा वक्फ बोर्ड हिंदुत्ववाद्याला वकील नेमतील का ?
हे विश्लेषण करताना श्री तुषार मेहता यांचे उदाहरण देऊन तुम्ही आपला मोदी शाह यांच्याबद्दल द्वेष उघड केला हे हि स्पष्ट दिसते आहे.
त्यावर आता टिप्पणी करून शब्दांचे अवडंबर रचून कितीही मल्लिनाथी करा.
जे गेलं ते गेलंच!
> मूळ मुद्द्याला हात घालताना…
In reply to तेच नामूळ मुद्द्याला हात… by सुबोध खरे
मोदींवर टीका करण्यासाठी मला काहीही आडपडदा लागत नाही. गरज असेल तेंव्हा स्पष्ट टीका करते. त्यामुळे तुम्ही "पूर्वग्रह उघडकीस आणला" वगैरे थापा मारत आहात त्याला काहीच अर्थ नाही. गोव्यांत म्हण आहे कि श्वानाला कुठेही दुखापत झाली तरी तो पायावर लंगडतो. त्याच प्रमाणे मुद्दा काहीही असला तरी तुमच्या मोदीभक्तीमुळे तुम्हाला तिथे फक्त ब्लास्फेमी दिसते आणि तुम्ही त्यावरच झिम्मा घालू पाहता. मला फक्त मूळ मुद्याला खोडून काढायचे होते.
आणि माझा पूर्वग्रह वगैरे गृहीत सुद्धा धरला तरी मूळ मुद्याशी तुम्ही एकमत आहात कि तुषार मेहता हे त्यांच्या न्यायप्रियते मुळे किंवा त्यांच्या चारित्र्यामुळे SG नाही झाले तर सद्य सरकारांत गुन्हेगारी प्रवृत्तींची खूप वर्षे ते पाठराखण करत होते म्हणून झाले. तुमच्या मते "हे चालायचेच", आणि हे वास्तव आहे ते मी सुद्धा नाकारू शकत नाही. फक्त मी त्यावर उघड पणे बोट ठेवले म्हणून तुमच्या भक्तींत विघ्न आले.
तुषार मेहता हे त्यांच्या…
In reply to > मूळ मुद्द्याला हात घालताना… by साहना
तुषार मेहता हे त्यांच्या न्यायप्रियते मुळे किंवा त्यांच्या चारित्र्यामुळे SG नाही झाले तर सद्य सरकारांत गुन्हेगारी प्रवृत्तींची खूप वर्षे ते पाठराखण करत होते म्हणून झाले.
हा हा हा
हास्यास्पद आहे.
अजून येऊ द्या
+१
In reply to माझ्या वरच्या प्रतिसादांत… by साहना
+1
जेष्ठ नि़धर्मी, पुरोगामी,…
जेष्ठ नि़धर्मी, पुरोगामी, उदारमतवादी, मानवतावादी, गांधीवादी, समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
जुना समाजवादी पक्ष -> जनता पक्ष -> जनता दल -> राष्ट्रवादी काँग्रेस -> काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास होता. या प्रवासात १९९० विधानसभा निवडणुकीत ते शिवाजीनगर मतदारसंघात जनता दलाचे उमेदवार होते. त्यांना ५,००० मते मिळाली होती. त्याच मतदारसंघात काँग्रेसचे अंकुश काकडे ६५,००० मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते तर भाजपच्या मतांवर शिवसेनेचे शशिकांत सुतार ७५,००० मते मिळवून जिंकले होते.
त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक लढली नाही (किंवा उमेदवारी मिळाली नाही). बऱ्याच वर्षांपूर्वी ते महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे काही काळ अध्यक्ष होते.
वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत ते अत्यंत हिरिरीने अभ्यासपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची बाजू मांडायचे.
डॉ. रत्नाकर महाजनांना श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास मोक्षप्राप्ती होवो. 🙏🙏🙏
डॉ. रत्नाकर महाजनांना श्रद्धांजली.
In reply to जेष्ठ नि़धर्मी, पुरोगामी,… by श्रीगुरुजी
एक प्रश्न : निधर्मी व्यक्तीस मोक्षप्राप्ती कशी होते ?
अपेक्षित पुण्यसंचय झाला की…
In reply to डॉ. रत्नाकर महाजनांना श्रद्धांजली. by धर्मराजमुटके
अपेक्षित पुण्यसंचय झाला की प्रत्येकाला मोक्षप्राप्ती होणार.
डिडॉलरायझेशन
दिल्लीतील ब्रिक्स शिखर परीषदेत रशिया आणि इराणने डिडॉलरायझेशचा मुद्दा लावून धरला अशा बातम्या आहेत. https://www.outlookindia.com/national/brics-de-dollarisation-bloc-stops-short-of-common-currency-pushes-local-currency-trade
डिडॉलरायझेशन करायचे म्हणजे जागतिक व्यापार अमेरिकन डॉलर सोडून दुसऱ्या चलनात करायचा. ब्रिक्स देशांचे जागतिक व्यापारासाठी चलन येणार असे गेल्या काही वर्षांपासून ऐकत आहे. पण त्या दृष्टीने अजून काही हालचाल झालेली दिसत नाही.
डिडॉलरायझेशन करायचे हे बोलायला ठीक आहे. पण मुळात अमेरिकन डॉलर हा जागतिक व्यापाराचे चलन म्हणून कसा टिकला? समजा ऑस्ट्रेलियाला ब्राझीलकडून कॉफी विकत घ्यायची आहे तर त्यासाठी अमेरिकन डॉलर मोजायला लागतात. आता ऑस्ट्रेलियाकडे ते डॉलर कुठून आले? तर अमेरिकन ग्राहकांना गरजेची आहे अशी कोणतीतरी वस्तू/सेवा ऑस्ट्रेलियन कंपन्या विकतात. कदाचित थेट अमेरिकेला विकत नसल्या तरी शेवटी कोणीतरी अमेरिकन ग्राहकांना हवे असलेले असे काहीतरी बनवितो आणि ते विकून त्या बदल्यात डॉलर मिळवतो. ते डॉलर पूर्ण व्यापारासाठी वापरले जातात. म्हणजे जपानने अमेरिकेला काहीतरी हवे ते विकायचे आणि अमेरिकन डॉलर मिळवायचे. मग ऑस्ट्रेलिया जपानला काहीतरी विकणार आणि त्या बदल्यात जपान ते डॉलर ऑस्ट्रेलियाला देणार. आणि ऑस्ट्रेलिया तेच डॉलर वापरून ब्राझीलकडून कॉफी विकत घेणार- अशा प्रकारची गुंतागुंतीची व्यवस्था आहे. थोडक्यात जागतिक व्यापारासाठी अमेरिकन डॉलर मुबलक प्रमाणावर उपलब्ध होतात त्याचे कारण अमेरिका भरपूर आयात करतो. थोडक्यात भरपूर आयात करत असेल त्या देशाचे चलन रिझर्व्ह करन्सी म्हणून बनू शकते.
त्यामुळेच चीनी युआन रिझर्व्ह करन्सी बनायला अडचणी आहेत. चीनचा भर निर्यातीवर आहे आणि चीनची अर्थव्यवस्था अमेरिकन अर्थव्यवस्थेप्रमाणे 'कन्स्युमर इकॉनॉमी' नाही. समजा ऑस्ट्रेलियाला ब्राझीलकडून कॉफी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी चीनी युआन पाहिजे असतील तर कोणीतरी चीनला निर्यात करणारा हवा आणि त्या देशाकडून चीन आयात करणारा हवा. तसे आहे का?
सगळीकडे चीनी युआन उपलब्ध करायचा मार्ग म्हणजे चीनची सगळ्या जगात गुंतवणुक वाढली पाहिजे. पण अनेक देशांमध्ये चीनच्या गुंतवणुकीचे काय परिणाम होतात हे जगजाहीर असल्याने चीनी युआन इतक्या प्रमाणावर चीनच्या बाहेर गुंतवणुकीच्या मार्गाने जातील की त्यातून जागतिक व्यापार करता येईल ही शक्यता त्या मानाने कमी दिसते.
थोडक्यात अमेरिकन डॉलरला इतक्यात मरण नाही असे दिसते.
चंद्रभाऊ
In reply to डिडॉलरायझेशन by चंद्रसूर्यकुमार
सहमत आहे पण तरीही शॉर्ट रन मधे सोन्यावर अधिक भिस्त ठेवेन 😛🙏🏾. बेसिकली, जोवर अमेरिकेला डॉलर सोडून अजून काही विकण्यालायक/ नफा मिळवून देणारे मिळत नाही तोवर डॉलर मजबूत असेल कारण त्याच्या समर्थनार्थ यू एस मिलिटरी वाटेल तिथे लोकशाहीची वारी घेऊन जाऊ शकेल....
(कौटिल्य) खोंडे
गिकुकाकांचा अग्रलेख
In reply to डिडॉलरायझेशन by चंद्रसूर्यकुमार
अपेक्षेप्रमाणे गिकुकाकांनी ब्रिक्स शिखर परीषदेवर अग्रलेख लिहिला आहे. नेहमीप्रमाणे तेच तेच घिसेपिटे मुद्दे त्यांनी मांडले आहेत ते सोडून द्या पण त्यातील एक वाक्य मात्र अगदी गिकुकाकांना सोडून इतर कोणालाही शोभून दिसेल असे वाटत नाही. तर ते वाक्य आहे- 'डॉलरला पर्याय हवा ' किंवा 'व्यापाराला कुंपणे नकोत' हे तत्त्व म्हणून ठीक; पण डॉलरऐवजी चिनी युआनही डोईजडच ठरू शकतो आणि व्यापाराच्या समतोलाऐवजी चिनी वस्तूंचा महापूर वाढू शकतो.
कोणते चलन व्यापारासाठी वापरले जाते याचा व्यापाराच्या समतोलाशी काय संबंध? व्यापारी समतोल (किंवा असमतोल) दोन देशांमधील असतो आणि कोणतेही दोन देश एकमेकांना अगदी सारख्या प्रमाणात निर्यात करणे (किंवा एकमेकांकडून आयात करणे) शक्य नाही. त्यामुळे कोणत्याही दोन देशांमध्ये थोड्याफार प्रमाणावर व्यापारी असमतोल असणारच. अगदी इतिहासकाळात भारत सोनेकी चिडीया का म्हटला जायचा? कारण भारतातून होणारी निर्यात खूप जास्त होती आणि इतर देशांमधून त्याबदल्यात सोने यायचे. तो व्यापारी असमतोल नव्हता तर काय होते?
त्याहूनही पुढची सिक्सर म्हणजे अगदी खास गिकुकाका स्टाईल- चिनी वस्तूंचा महापूर वाढू शकतो? मग त्याच न्यायाने सध्या आंतरराष्ट्रीय व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होतो मग जगभरात अमेरिकन वस्तूंचा महापूर हवा नाही का? तसे होताना दिसत आहे का?
माणसाने काय लिहावे त्यामागे थोडाफार तरी अभ्यास असावा की नाही?
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/brics-summit-delhi-india-…
ब्रिक्स देशांचे जागतिक…
In reply to डिडॉलरायझेशन by चंद्रसूर्यकुमार
BRICS म्हणजे losers club आहे. निव्वळ FOMO म्हणून ढवळे पवळे एकत्र आले आहेत. सर्वच राष्ट्रे येन केन प्रकारेण महत्वाच्या क्षेत्रांत मागासलेली आहेत. भारत विनाकारण ह्या गुंत्यांत गुंतला आहे. जे काही पाहिजेत होते ते व्दिपक्षी संबंधांनी साध्य करणे शक्य आणि सोपे सुद्धा होते.
डॉलर हे चलन जागतिक चलन by design नव्हते. डॉलर ची निर्मिती हि निव्वळ अमेरिकन स्थानिक चलन म्हणून झाली होती. काळाच्या ओघांत इतरांनी स्वतःहून डॉलर्स मध्ये व्यवहार करणे सुरु केले. ह्यांत अमेरिकन तंत्रज्ञान, आर्थिक प्रगती आणि स्थिरता इत्यादी सर्व महत्वाचे होते पण सर्वाधिक महत्वाचे होते rule of law. अमेरिकन आणि यूरोपियन मित्र राष्ट्रे सोडल्यास इतर राष्ट्रे आणि विशेषतः तथाकथित BRICS राष्ट्रे ह्यांना हि जमण्यासारखी गोष्ट नाही. कायद्याच्या दृष्टीने हि राष्ट्रे फारच मागासलेली आहेत.
चिनी चलन चीन च्या अवाढ्यव व्यापाराने कदाचित एक पर्याय वाटला तरी प्रत्यक्षांत शक्य नाही. लोकशाही राष्ट्रांत कितीही बजबजपुरी माजली तरी जो पर्यंत लोकशाही आहे तो पर्यंत संस्था आणि नियम तसेच राहतात त्यामुळे रिस्क कमी होते. उद्या ची ह्यांना हृदयविकाराचा झटका आला तर परवा चीन मध्ये नक्की काय होईल ह्याची शाश्वती नाही. त्यामुळे कितीही मोठी लोकसंख्या असली तरी चीन चे चलन जास्त चालणार नाही. त्याशिवाय चीन-रशिया-भारत मधील कॅपिटल कंट्रोल्स असे आहेत कि त्यामुळे सुद्दा रिस्क वाढते. एखाद्या चलनाचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर होण्यासाठी एक स्वतंत्र, स्थिर आणि पारदर्शक कायदेशीर आणि गुंतवणूक सुरक्षा यंत्रणा असणे किती महत्त्वाचे आहे, हे आपल्या अनेकदा लक्षात येत नाही. जेव्हा कायदेशीर आणि नियमन करणाऱ्या यंत्रणांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते, तेव्हा त्या देशाचे चलन कायम दुय्यम दर्जाचे मानले जाते. स्वतंत्र संस्था, पारदर्शकता, भांडवल हालचालींचे स्वातंत्र्य आणि कायदेशीर सुरक्षा या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. या कारणामुळेच जपानी येन, युरो आणि ब्रिटिश पाउंड यांचा आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये चायनीज युआनपेक्षा जास्त वापर होतो; तसेच स्विस फ्रँक, कॅनेडियन डॉलर आणि ऑस्ट्रेलियन डॉलर हे जगातील राखीव चलने (reserve currencies) मानले जातात.
किमान सध्या तरी डॉलर्स ला पर्याय फक्त सोने आहे. डॉलर्स चा सर्वांत मोठा शत्रू अमेरिकन सरकार आणि फेडरल रिसर्व आहे आणि सध्या ट्रम्प-बेसेन्ट च्या काळांत भ्रष्टाचार आणि बजबजपुरी इतकी माजली आहे कि त्यामुळे डॉलर्स ला धोका निर्माण झाला आहे. बहुतेक राष्ट्रे डॉलर्स कमी करून त्या जागी सोने घेत आहेत आणि हळू हळू हि प्रक्रिया सुरूच राहणार आहे.
तालेब ह्यांनी बेझेन्ट साठी खालील शब्दप्रयोग वापरले :
Bessent, with his brilliant treasury fix, looks like a doctor attempting to cure a patient's pancreatic cancer with a combination of potent tranquilizers and yoga-style meditation.
डॉलर ला पर्याय हवा का ?
निव्वळ मुक्त आर्थिक धोरणातून स्पर्धा हि नेहमीच फायदेशीर आहे त्यामुळे डॉलर ला पर्याय निर्माण होणे एक चांगली गोष्ट आहे. पण विश्वगुरू चीन आणि इतर losers क्लब मंडळींनी कितीही आरडा ओरडा केला तरी सत्य स्थिती हि आहे कि जागतिक अर्थव्यवस्था आणि त्याचा पाया शेवटी अमेरिका निर्मित आहे. त्यामुळे अमेरिका ची मित्र राष्ट्रे ह्यांची प्रगती झाली आहे आणि कायदा सुव्यवस्था इत्यादी बाबतीत हीच राष्ट्रे चांगली आहेत. अमेरिकेच्या मित्र परिवारांत नसलेली राष्ट्रे हि मागासलेली आहेत. त्यामुळे डॉलर्स ला युरो वगैरे पर्याय वाटत नाहीत कारण अमेरिकेला क्षती पोचली तर त्यांना सुद्धा क्षती पोचेल आणि BRICS वगैरे राष्ट्रे मागासलेली असल्याने त्यांच्या चलनाला कधीच जास्त मागणी राहणार नाही. त्यामुळे किमान पुढील काही दशके तरी डॉलर्स ला पर्याय फक्त सोने असू शकेल असे वाटते.
सोने सुद्धा पर्याय म्हणून जास्त काळ शक्य नाही. कारण उर्जा स्वस्त आणि मुबलक होत जाणार आहे. ह्यामुळे सोने किती काळ rare असेल ह्याची शाश्वती देता येत नाही.
BRICS चे चलन निर्माण होईल असे मला तरी वाटत नाही. किमान भारताने त्यांत भाग घेऊ नये. चीन भारतासाठी भरवशाचे राष्ट्र नाही. रशिया सोबत काहीही करणे म्हणजे पतिव्रता स्त्री ने गावांतील गणिके सोबत बाजारांत फिरायला जाणे होय. चीन आणि रशिया बाहेरून काहीही वाटली तरी त्यांच्या अंतर्गत समस्या आणि त्यांची धोरणे सतत step change द्वारे बदलतात. ब्राझील, दक्षिण आफ्रिका ह्यांची काहीच लायकी नाही.
भारताला डॉलर्स मध्येच व्यापार करणे जास्त फायद्याचे आहे. त्याशिवाय हळू हळू रुपया full convertible करणे आणि capital कंट्रोल्स पूर्णतः काढल्यास रुपयाचे जगांतील स्थान चांगले होऊ शकते. संस्थात्मक दृष्ट्या RBI बऱ्यापैकी स्वायत्त आहे आणि सुदैवाने देशांत ज्या मोजक्या संस्था चांगल्या काम करतात त्यापैकी आहे. काळाच्या ओघांत त्याची वाटचाल योग्य दिशेने होत राहणे आवश्यक आहे.
BRICS पेक्षाही घाणेरडा शब्दप्रयोग म्हणजे "ग्लोबल साऊथ". लेसरनेत्र वगैरे ह्या शब्दाचा प्रयोग अतिशय गर्वाने करतात पण प्रत्यक्षांत ग्लोबल साऊथ हि एक जागतिक झोपडपट्टी आहे आणि ग्लोबल सौथ चे "नेतृत्व" वगैरे "बस्ती का हस्ती" म्हणवून घेण्यासारखे आहे.
https://www.youtube.com/watch?v=GbXtCRCT0Ig
+१
In reply to ब्रिक्स देशांचे जागतिक… by साहना
Sadly खरय
सार
In reply to ब्रिक्स देशांचे जागतिक… by साहना
वर लिहिलेल्याला सगळ्याचे सार...
भारत सरकार, विश्वगुरू, लेसर आईज व महान जागतिक नेतृत्व इ. इ.
यांच्या मताला जगात कसलीही किंमत नाही.
असे काहीसे निघत आहे.
बाकी लिंकमधला व्हिडीओ काही संदर्भ देईल असे वाटले पण तो अत्यंत टुकार रॅप सॉंग होता आणि त्याचा संबंध केवळ बस्ती का हस्ती या एका उपमेशी संबंधित होता. नसता दिला तरी चालले असते.
असे जरी असले तरी खाली लिहिल्याप्रमाणे गुरूजी व इतर समर्थकांच्या मते ब्रिक्स परिषदेसाठी आलेल्या सर्व नेत्यांना शाकाहारी भोजन करावयास लावणे (जरी चीनचे नेते फिरकले नाहीत तरी) हा भारतासाठी अतिउच्च मानबिंदू ठरला, यात वाद नाही 😃
यांच्या मताला जगात कसलीही…
In reply to सार by स्वधर्म
अंथरूण छोटे आणि पाय लांब असले तर अंथरूण कसेही घाला शरीराचा भाग उघडा पडेलच. सध्याचे गोबी लेझरनेत्र वगैरेची जीभ कर्तृत्वाच्या पेक्षा जास्त चालते पण मूळ भारत देश गरीब, विविध क्षेत्रांत मागासलेला असल्याने त्यांच्या नेतृत्वाला जगांत नेहमीच कमी महत्व राहिले आहे. त्यामुळे त्यांचा चारित्र्य दोष नाही. आडात नाही ते पोहऱ्यात कसे येईल ?
भारत सरकारच्या मताला कदाचित…
In reply to सार by स्वधर्म
भारत सरकारच्या मताला कदाचित किंमत नसेल, तर मग कोणत्या देशाच्या सरकारच्या मताला किंमत आहे? अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, फ्रान्स, जपान, . . . ?
शाकाहारी भोजन
In reply to सार by स्वधर्म
"असे जरी असले तरी खाली लिहिल्याप्रमाणे गुरूजी व इतर समर्थकांच्या मते ब्रिक्स परिषदेसाठी आलेल्या सर्व नेत्यांना शाकाहारी भोजन करावयास लावणे (जरी चीनचे नेते फिरकले नाहीत तरी) हा भारतासाठी अतिउच्च मानबिंदू ठरला, यात वाद नाही 😃"
ह्यात कसला आला आहे मानबिन्दु ? घरी बोलावलेल्या पाहुण्याला "मी देईन तेच तुला खायला पाहिजे" असे म्हणण्यात कसला आला आहे मोठेपणा? 'अतिथी देवो भवो' संस्क्रुति मिरवीणार्याला हे अशोभनीय कृत्य आहे. उद्या एखाद्या शुद्ध शाकाहारी पाहुण्याला भोजनाला बोलावुन समिश भोजन वाढले तर चालेल काय?
भारतात एखादी आंतर्राष्ट्रीय…
In reply to शाकाहारी भोजन by सौन्दर्य
भारतात एखादी आंतर्राष्ट्रीय परिषद होते. त्यात काय चर्चा झाली / ती कशी भारतासाठी उपयोगी किंवा घातक आहे हा विषय चर्चेसाठी यायला हवा. ईथे विषय काय तर "खायला काय घातले?" धन्य ते जन आणी धन्य त्यांची समज.
उपहास होता तो
In reply to शाकाहारी भोजन by सौन्दर्य
भक्तांना कशाचा मानबिंदू वाटेल याचा नेम नाही 😀
>>>रशिया सोबत काहीही करणे…
In reply to ब्रिक्स देशांचे जागतिक… by साहना
>>>रशिया सोबत काहीही करणे म्हणजे पतिव्रता स्त्री ने गावांतील गणिके सोबत बाजारांत फिरायला जाणे होय.
बाजारात अमेरीकेसारखे रंडीबाज असतांना पायातली चप्पल काढून मारायला गणिकेचा उपयोग होत असेल तर पतिव्रता नक्कीच विचार करेल.
हो. पण चप्पल मारले का ? कि…
In reply to >>>रशिया सोबत काहीही करणे… by राज जोशी
हो. पण चप्पल मारले का ? कि फक्त घोषणाबाजी करून पळ काढला ?
Modi Is Hedging Against…
In reply to हो. पण चप्पल मारले का ? कि… by साहना
Modi Is Hedging Against Trump, One Deal at a Time.
https://www.nytimes.com/2026/08/29/world/asia/modi-india-deals-trump.html
न्यू यॉर्क टाइम्स पण विकलं गेलं काय? अंबानी/ अदानींना ?
>>>न्यू यॉर्क टाइम्स पण…
In reply to Modi Is Hedging Against… by सुबोध खरे
>>>न्यू यॉर्क टाइम्स पण विकलं गेलं काय? अंबानी/ अदानींना ?
मोदी हय तो साला कुच भी मुमकीन हय !!
तुम्हाला बहुतेक जागतिक…
In reply to हो. पण चप्पल मारले का ? कि… by साहना
तुम्हाला बहुतेक जागतिक राजकारणातील काहीही कळत नाही. अशा बैठका दबाव वाढवण्यासाठी आणि घोषणांसाठीच असतात. आणि बैठक संपल्यावर आपापल्या देशात वा घरी जाणे याला पळ काढणे म्हणत नाहीत.
ब्रिक्स परिषदेतील जागतिक…
ब्रिक्स परिषदेतील जागतिक नेत्यांसाठी संपूर्ण शाकाहारी भोजनाचे आयोजन केल्यासाठी एकाही जागतिक नेत्याने आक्षेप घेतला नाही.
परंतु मांसाहारी पदार्थ नसल्याने पवन खेडा, एक यडछाप, महुआ मोईत्रा, प्रियंका चतुर्वेदी यांचे पित्त खवळले आहे.
एखाद्या लग्नातील जेवणावर वऱ्हाडींचा आक्षेप नाही, परंतु जेवणाच्या आशेने मांडवाबाहेर ताटकळत बसलेल्यांचा आक्षेप आहे.
मांड
यडछाप लोकांसाठी, इतर सर्व…
In reply to ब्रिक्स परिषदेतील जागतिक… by श्रीगुरुजी
यडछाप लोकांसाठी, इतर सर्व मुद्दे सोडून, जेवणाचा बेत हा विरोधाचा विषय व्हावा इतकी त्यांची दुरावस्था झालीये. थोडक्यात कोणत्याही भरीव मुद्द्यांवर, ते पंतप्रधान मोदींना विरोध करू शकत नाहीत, इतके मोदींचे चांगले काम आहे.
कुठे कुत्रे भुंकले कि…
In reply to यडछाप लोकांसाठी, इतर सर्व… by श्रीगुरुजी
कुठे कुत्रे भुंकले कि सिंहाचे कातडे घालून बसलेला गाढव, मलाच घबरून कुत्री ओरडत आहेत असे म्हणतो. आणि ह्या गर्दभराजाची मित्रमंडळी मग त्याच्या शौर्याची स्तुती करतात. हे खेडा कोण, हि महुआ कोण आणि चतुर्वेदी कोण. ह्यांच्या पित्ताची काळजी इतरांनी करावी तरी का ?
चिनी राष्ट्राध्यक्ष ची ह्यांनी हा गाला टाळून हॉटेलवर विश्राम करणे पसंद केले तर UAE चे प्रतिनिधी सुद्धा परत गेले. झाली तर हि बातमी होऊ शकते. नाहीतर असल्या गाला वगैरेंत कुणीच ताव मारायला जात नाही.
काय ते पोर्ट्समथ अन काय ते म्यारियट ....
अहाहा,
काय ते पोर्ट्समथ, अन काय ते म्यारियट !
काय ते डांबरट, लई लई ब्येक्कार !!
पकिस्तानचा १९ वर्षांखालील क्रिकेट चमू इंग्लंडात पोर्ट्समथ येथे म्यारियट हाटीलात उतरला होता. त्यांना शरणार्थी समजून स्थानिक लोकांनी राडा केला. संबंधित बातमी : https://zeenews.india.com/hindi/sports/cricket/uk-anti-immigration-prot…
आपल्या बुबुडाविपुमाधवि लोकांना विचारलं पाहिजे की हे रमणीय दृश्य मानावं का म्हणून.
-गा.पै.
कॉपीराईट
In reply to काय ते पोर्ट्समथ अन काय ते म्यारियट .... by गामा पैलवान
बुबुडाविपुमाधवि लोकांना
मिपावर ८-९ वर्षांनी हा शब्द वापरला गेला असावा 😀
माझा कॉपीराईट असलेला शब्द परस्पर वापरल्याबद्दल तुम्हाला लवकरच एक नोटिस येणार आहे 😀
बुबुडाविपुमाधविम्हणजे??
In reply to कॉपीराईट by चंद्रसूर्यकुमार
बुबुडाविपुमाधवि
म्हणजे??
शॉर्ट फॉर्म
In reply to बुबुडाविपुमाधविम्हणजे?? by चबुगबाळे
बुद्धीवादी बुद्धीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंत या लांबलचक विशेषणाचा बुबुडाविपुमाधवि हा शॉर्ट फॉर्म पूर्वीच्या काळी केला होता. दर वेळेस इतके सगळे लिहायचा कंटाळा यायचा म्हणून.
बु बु द्विरूक्ती आहे.
In reply to शॉर्ट फॉर्म by चंद्रसूर्यकुमार
बु बु द्विरूक्ती आहे.
भारदस्त
In reply to बु बु द्विरूक्ती आहे. by श्रीगुरुजी
हो. पण बुडाविपुमाधवि पेक्षा बुबुडाविपुमाधवि हे जास्त भारदस्त वाटले :)
यावरून ही बातमी आठवली -
In reply to काय ते पोर्ट्समथ अन काय ते म्यारियट .... by गामा पैलवान
Fake Pakistan football team in official green kits deported from Japan
वरील इंग्लिश बातमीचा खालील मराठी सारांश कडून करून घेतलाय -
पाकिस्तानचा कोणतीही अधिकृत राष्ट्रीय फुटबॉल टीम नव्हतीच;२२ जणांनी हिरव्या अधिकृत जर्सी घालून आणि बनावट कागदपत्रांसह जपानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जपानी अधिकाऱ्यांना संशय आल्यावर चौकशी केली आणि त्या लोकांना परत पाठवण्यात आलं. तपासात पाकिस्तानची फेडरल तपास संस्था FIA ने सांगितलं की यामागे मानव तस्करीचं रॅकेट होतं. मालिक वकास नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली; त्याने 'Golden Football Trial' नावाचा बनावट क्लब तयार केल्याचं सांगितलं जातं. प्रत्येकाकडून४०-४५ लाख पाकिस्तानी रुपये घेऊनच जपानला पाठवण्यात आल्याचं उघडकीस आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जानेवारी२०२४ मध्येही अशाच प्रकारे १७ जणांना जपानला पाठवण्यात आलं होतं, आणि ते अजूनही परत आलेले नाहीत. थोडक्यात, ही खरी टीम नव्हती, तर बनावट फुटबॉल संघाचा बहाणा करून लोकांना परदेशात बेकायदेशीरपणे पाठवण्याचा एक कथित मानव-तस्करीचा घोटाळा होता.
*वरील इंग्लिश बातमीचा खालील…
In reply to यावरून ही बातमी आठवली - by कांदा लिंबू
*वरील इंग्लिश बातमीचा खालील मराठी सारांश ChatGPT कडून करून घेतलाय -
कांद्या भावा
In reply to यावरून ही बातमी आठवली - by कांदा लिंबू
पाकिस्तान म्हणजे आता शिळ्याच नव्हे तर शिळ्या होऊन फाटून बुरशी लागलेल्या कढीला परत ऊत आणणे झाले आहे भावा.
तुलना आता पाकिस्तान सोबत नाही तर चीन सोबत. वरचढ होण्याचा प्रयत्न हवा, चला चीन सोबत ऑलिम्पिक पदके बरोबरीने प्राप्त करण्याची स्पर्धा करूया!
(महावीर फोगाट) खोंडे
(No subject)
११ सप्टेंबरला हौथींनी हल्ला…
११ सप्टेंबरला हौथींनी हल्ला करण्यापूर्वी सौदी अरेबियाची तेल वाहून नेणारी नलिका
आणि हल्ल्यानंतर
हे हल्ल्यापूर्वीचे चित्र
In reply to ११ सप्टेंबरला हौथींनी हल्ला… by श्रीगुरुजी
दिशा सालियनच्या मृत्यू…
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात ज्यांच्या भूमिकेची चौकशी होणे आवश्यक आहे, त्यांमध्ये सीबीआयने आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया आणि सूरज पांचोली यांची नावे घेतली आहेतज्यांच्या भूमिकेची मुख्य गुन्हे, गुन्हेगारी कट, त्यानंतर खोट्या आत्महत्येच्या कथेची निर्मिती आणि प्रसार, तसेच पुरावे दडपणे, नष्ट करणे आणि/किंवा खोटे पुरावे तयार करणे या संदर्भात चौकशी करणे आवश्यक आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या सखोल चौकशीच्या निर्देशानंतर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये उद्धव ठाकरे, शोविक चक्रवर्ती, सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि इतरांचीही नावे आहेत.
एफआयआरनुसार, या यादीत आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक, मुंबईचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, डीसीपी विशाल ठाकूर, तत्कालीन महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर अनेक कार्यरत किंवा माजी पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
_________________________
या प्रकरणामुळे सर्व आरोपींना त्रास, मनस्ताप होईल, पण अंतिमतः सर्व जण निर्दोष सुटतील कारण प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार एकही नाही. सर्व वैज्ञानिक पुरावे केव्हाच नष्ट केले आहेत. भ्रमणध्वनीचे अस्तित्व गुन्हा घडला त्या स्थानाच्या आसपास होते हा निणायक पुरावा नाही.
स्कॉटलंड, वेल्स व उत्तर…
स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडममधून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत असे वृत्त येत आहे. ते आपले वेगळे चलन करणार, आपले वेगळे प्रवेशपत्र करणार, युरोपियन संघटनेत प्रवेश करणार अश्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. असे झाले तर त्या चारही देशातील मुस्लिम दबावगट अजून प्रबळ होतील. इंग्लंडने, थोडक्यात युनायटेड किंगडमने, युरोपियन संघटनेत पुनप्रवेश करावा यासाठी ही दबाव टाकण्याची चाल असू शकते.
यासाठी युनायडटेड किंगडम (UK)…
In reply to स्कॉटलंड, वेल्स व उत्तर… by श्रीगुरुजी
यासाठी युनायडटेड किंगडम (UK) ला आता डिव्हाइडेड किंगडम (DK) म्हणावे लागेल का?
अरेरे... इंग्लंडची स्वप्ने…
In reply to यासाठी युनायडटेड किंगडम (UK)… by सुबोध खरे
अरेरे... इंग्लंडची स्वप्ने पाहणा-या भारत द्वेष्ट्यांच्या मनाची हूरहूर खूपच वाढलेली असेल.
मोदींना १२ वर्षांच्या काळात…
मोदींना १२ वर्षांच्या काळात एकही चांगला अर्थमंत्री का मिळाला नाही? २०१९ पर्यंत अरूण जेटली होते जी राजकीय नेमणूक होती. अरूण जेटली हे शिक्षणाने व व्यवसायाने वकील होते. त्यांना अर्थशास्त्राची कितपत माहिती होती याविषयी शंका आहे.
नंतर आलेल्या निर्मला सीतारामन यांची अर्थमंत्री म्हणून कारकीर्द निराशाजनक आहे. कोणत्याही आणि प्रत्येक वस्तूवर व सेवेवर कर लावणे हा त्यांच्या दृष्टीने उत्पन्न वाढविण्याचा एकमेव मार्ग आहे. आता तर २०००+ रूपयांच्या UPI व्यवहारांवर कर घोषित केला आहे. परदेशी प्रवासावर TCS ही यांचीच कल्पना. लाभांश व दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर यांच्याच (की जेटलींच्या) काळात सुरू झाला. अनेक सेवांवर (उदा. महिलांचे सौंदर्यप्रसाधन करणे) सेवा घेणाऱ्याकडून वसेक आणि सेवा देणाऱ्यावर आयकर अशी दुहेरी करवसुली यांनीच सुरू केली.
आता केवळ श्वासोच्छ्वासावर वसेक आकारणी करणे शिल्लक आहे.
श्रीगुरुजी,प्रश्न फक्त कराचा…
In reply to मोदींना १२ वर्षांच्या काळात… by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,
प्रश्न फक्त कराचा नाहिये. UPI व्यवहारांसाठी जे ईंफ्रा लागते त्याचा खर्च तर कुठे तरी भरुन यायला हवा ना? आतपावेतो हा खर्च सरकार करते आहे. पण कुठेपरयंत फुकट सेवा द्यावी? बाकी भारतीय लोकानी "फुकट ते पौष्टीक" ही सवय मोडायला हवी. तीच गत लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी वगेरे ला पण लागु होते. पण मूंगेरीलाल ने सुरु केलेली ही योजना आता भारतीय लोक व नेत्यांमधे खुप लोकप्रिय झाली आहे. फुकट मिळणारी मदत बंद झाली तर शिव्या तर मिळणार.
मोदी सरकारचा अजून एक तुघलकी निर्णय!
In reply to मोदींना १२ वर्षांच्या काळात… by श्रीगुरुजी
खालची ndtv बातमी वाचून मी असंच काहीसं लिहायला इथं आलो होतो.
UPI पेमेंटवर कुठल्याही प्रकारचा कर लावणे हा निव्वळ तुघलकी निर्णय आहे.
१. मुळामध्ये एक व्यक्ती किंवा संस्था दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला केलेल्या कामाचा किंवा सेवेचा मोबदला देते यावर कर आकारणी करण्यामागचा नेमका तर्क काय आहे?
२. इतर स्वरूपात म्हणजे बँक ट्रान्सफर, चेक किंवा रोख स्वरूपात मोबदला दिल्यास त्यावर कर आकारणी होते काय?
३. सरकार जरी म्हणत असलं की हा कर किंवा शुल्क केवळ व्यापाऱ्यांकडूनच वसूल करण्यात येईल, ग्राहकांवर कोणताही भार पडणार नाही. तरीही व्यापारी तरी काय म्हणून हा बोजा सहन करतील? अंतिमतः व्यवहारात तो बोजा ग्राहकांवरच पडेल.
पुन्हा एटीएम कडे वळण्याची दिवस आले आहेत. मागच्या पाच-सात वर्षात एटीएम मधून किंवा बँकेतून रोख रक्कम काढणे याची मोठ्या रकमांव्यतिरिक्त कधी गरज पडली नव्हती. आता मात्र दहा-वीस हजार रुपये एटीएम मधून काढत राहावे लागतील.
पेट्रोल पंपावर साडेचार-पाच हजारांचं इंधन भरून त्यावर UPI साठी वेगळे शुल्क देण्याऐवजी तिथल्याच एटीएम मधून रोख रक्कम काढून ती दिलेली चांगली.
UPI मधून आलेल्या रेवेन्यूची आयकर खात्यामार्फत छाननी सुरू झाल्यानंतर अनेक मध्यम व्यापाऱ्यांनी (किमान हैदराबादेत तरी) UPI पेमेंट घेणे आधीच बंद केले आहे. सरळ रोख मागतात नाहीतर माल देत नाहीत. बाजारपेठांमधली बंद पडत आलेली एटीएम पुन्हा सुरू होत आहेत.
आता तर सरकार अप्रत्यक्ष रित्या सरळ सरळ म्हणत आहे, UPI पेमेंट कराल तर अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल, रोख रक्कम द्याल तर शुल्क तर सोडाच, आयकर व इतर कर आकारणीची फारशी काळजी करण्याची गरज नाही!
म्हणून सामान्य नागरिकांनी आता ठरवायचे आहे, अकारण अतिरिक्त शुल्क द्यायचं की रोखित व्यवहार करायचा!
https://www.ndtv.com/india-news/upi-charges-announced-rs-5-for-some-transactions-above-rs-2-000-free-for-consumers-12050144/amp/1
- (व्यवहारी पुरुष) कांदा लिंबू
कर?
In reply to मोदी सरकारचा अजून एक तुघलकी निर्णय! by कांदा लिंबू
हा कर नाहीये. हे चार्जेस सेवा देणारी संस्था लावणार आहे. अर्थात त्यावर जीएसटी वैगेरे असेल तो सरकारला मिळेल. पण मूुदलातले चार्जेस हे कर नाहीयेत.
मग ही घोषणा सरकारने का केली?
In reply to कर? by कॉमी
मग ही घोषणा सरकारने का केली?
का केली? का केली? हा मनुवादी…
In reply to मग ही घोषणा सरकारने का केली? by श्रीगुरुजी
का केली? का केली?
हा मनुवादी कावा आहे.
असे चार्जेस लावण्यास सरकारने…
In reply to मग ही घोषणा सरकारने का केली? by श्रीगुरुजी
असे चार्जेस लावण्यास सरकारने मनाई केली होती. ती मनाई आता मागे घेतली आहे.
UPI infrastructure खर्चाचा लहान वाटा सरकार उचलत होते. उर्वरित खर्च इतर खाजगी खेळाडू करत होते.
I stand corrected.
In reply to कर? by कॉमी
तो कर नसून ते शुल्क आहे हे बरोबर आहे. I stand corrected. पण ती यंत्रणा उभारणे व चालविणे हा खर्च सरकारने NPCL ला द्यायला हवा.
नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी सर्वमान्य चलन उपलब्ध करून देण्यात सरकारची एकाधिकारशाही आहे. म्हणून पुरेसे चलन नागरिकांना पुरविण्याची जबाबदारीदेखील सरकारची आहे. हे चलन रोख, चेक, बँक ट्रान्स्फर, कार्ड, वा UPI इ स्वरूपांत असते. त्यापैकी रोख चलन मोफत आहे. पण ते रोख चलन पुरविण्यासासाठी सरकारला खर्च येतो. त्याचे वर लिहिल्याप्रमाणे अनेक तोटेही असतात. ते तोटे टाळणे वा कमी करणे व नागरिकांना आर्थिक व्यवहारांत सुलभता प्रदान करणे हि सरकारची जबाबदारी आहे, तेंव्हा UPI चा खर्च सरकारने उचलायला हवा.
बहुसंख्य नागरिकांनी UPI न वापरता रोख व्यवहार करायला सुरुवात केली तर ते सरकारला कोणत्या भावात पडेल?
- (अर्थतज्ज्ञ नसलेला) कांदा लिंबू
सर्व बॅंकांचा एकत्रित नफा ४…
In reply to I stand corrected. by कांदा लिंबू
सर्व बॅंकांचा एकत्रित नफा ४ लाख कोटींहून अधिक आहे. युपीआयच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा तथाकथित खर्च या नफ्याच्या जेमतेम १-२ टक्के असेल. मग त्यासाठी लगेच शुल्क? आणि यात भारत सरकारने का शुल्काची घोषणा करायची? युपीआय सेवा देणाऱ्यांना करू दे की?
का देतील ते फुकट सेवा ? आज न…
In reply to सर्व बॅंकांचा एकत्रित नफा ४… by श्रीगुरुजी
का देतील ते फुकट सेवा ? आज न उद्या शुल्क घेता येईल ह्या आशेखातर ते सेवा देत आले आहेत.
मी Europe मध्ये payment…
In reply to मोदी सरकारचा अजून एक तुघलकी निर्णय! by कांदा लिंबू
मी Europe मध्ये payment companies (Acquirer) साठी काम करतो. जेव्हा UPI France मध्ये introduce करण्यात आले, तेव्हा आमच्या company ने देखील ते implement केले. त्या वेळी समोर आलेला एक अतिशय महत्त्वाचा आणि काहीसा आश्चर्यकारक प्रश्न होता — “आपण Merchant कडून charge काय करणार?”
तेव्हापासून UPI च्या commercial model बद्दल आमच्या discussions मध्ये हा मुद्दा वारंवार येत आहे. विशेषतः Acquiring side साठी sustainable revenue model कधी आणि कसा तयार होईल, याची आम्ही वाट पाहत आहोत.
UPI आणि इतर बहुतांश modern payment systems हे multi-party payment ecosystems आहेत. त्यामध्ये साधारणपणे तीन प्रमुख participants असतात:
Issuer / Consumer Bank – पैसे देणाऱ्या ग्राहकाची bank.
Acquirer / Merchant Bank – Merchant ला payment acceptance ची सुविधा देणारी bank किंवा payment provider.
Payment Network / Scheme – या case मध्ये UPI; network च्या भूमिकेच्या दृष्टीने Visa किंवा Mastercard सारखे.
UPI ची एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, विशेषतः India मधील domestic UPI transactions साठी, traditional card-style MDR (Merchant Discount Rate) model effectively zero ठेवण्यात आला आहे.
त्यामुळे Acquirer ला Merchant कडून conventional transaction fee घेण्याची मुभा नसते, आणि त्याच वेळी Payer / Consumer कडूनही सामान्यतः transaction fee घेतली जात नाही.
UPI ला government आणि regulatory ecosystem चा मजबूत support असल्यामुळे, Network component ची cost traditional international card schemes च्या तुलनेत तुलनेने कमी असण्याची अपेक्षा करता येते. (फ्री आहे आज)
पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उरतो:
Merchant साठी payment accept करण्याची पूर्ण acquiring service कोणत्या economics वर चालणार?
कारण Acquiring side वर प्रत्यक्षात अनेक costs असतात — Merchant onboarding, transaction processing, fraud आणि risk management, reconciliation, settlement, refunds, chargebacks / dispute handling, customer support, compliance आणि technical connectivity.
म्हणजेच, payment transaction स्वतः “free” असली तरी payment ecosystem चालवण्यासाठी infrastructure आणि services free नसतात.
इथेच UPI चा business model विशेष interesting बनतो.
जर Merchant MDR भरत नसेल आणि Consumer transaction fee भरत नसेल, तर payment ecosystem मधील participants — विशेषतः Acquirer आणि Payment Service Providers — यांना त्यांच्या services आणि infrastructure साठी compensate करण्यासाठी दुसरा काही commercial mechanism आवश्यक आहे.
म्हणूनच payment industry च्या दृष्टीने आम्ही पाहत असलेला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की:
UPI भविष्यात एक स्पष्ट fee / incentive structure define करेल का, ज्यामुळे Acquirers आणि इतर Payment Service Providers UPI acceptance वर sustainable business model तयार करू शकतील?
मोदी सरकारचा हा निर्णय योग्य…
In reply to मोदी सरकारचा अजून एक तुघलकी निर्णय! by कांदा लिंबू
मोदी सरकारचा हा निर्णय योग्य आहे पण निर्णय घेण्याची प्रक्रिया चुकीची आहे.
UPI चे दर काय असावे ह्यावर भारतीय सरकारने हस्तक्षेप करणेच चुकीचे आहे. NPCI ला हे स्वातंत्र्य द्यावे आणि फारतर RBI ने इथे मार्गदर्शक तत्वें घालून द्यावी. भारतीय बँकिंग क्षेत्र इतर क्षेत्रापेक्षा थोडे जास्त चांगले आहे पण अति सरकारी हस्तक्षेपाने इथे सुद्धा वाट्टोळे होत आहे.
इतर लोकांनी इथे जास्त प्रतिक्रिया लिहिली आहे पण प्रत्येक transaction ला transaction cost असतो आणि कुणी तरी ह्याची जबाबदारी घेणे अपेक्षित आहे. NPCI, बँका आणि त्यांचे ग्राहक ह्यांनी एकमेकांचे हित लक्षांत घेऊन त्यावर निर्णय घेतला पाहिजे.
Fintech मध्ये काम करणार्यांनी इथे लिहिले आहे त्यामुळे त्यावर आणखीन चर्चा करण्याची गरज नाही.
जणू काही
In reply to मोदींना १२ वर्षांच्या काळात… by श्रीगुरुजी
जणू काही मॅडम त्यांच्या संमतीशिवाय स्वतंत्र निर्णय घेऊ शकत असल्यासारखच...
नंतर आलेल्या निर्मला…
In reply to मोदींना १२ वर्षांच्या काळात… by श्रीगुरुजी
नंतर आलेल्या निर्मला सीतारामन यांची अर्थमंत्री म्हणून कारकीर्द निराशाजनक आहे.
माझ्या हैद्राबादी सीएच्या "कांदा भाई, तुम्हारे लास्ट म्हैने के इनवॉइसों के पेमेंटां ये म्हैने में आते नै आते वो बातां नक्को बोलो। निर्मला आपा के अठरा परसेंट, बीस तारीख के पैले भरने पड़ते, सुने?" या बोलण्याला काळ्या विनोदाची करुण झालर आहे!
Cashless की रोख?
अनेकदा, UPI किंवा तत्सम cashless व्यवहारांचे समर्थन करताना, UPI, RTGS, NEFT वगैरे यंत्रणा चालविण्यासाठी भारत सरकार, रिझर्व बँक, NPCL वगैरेंना येणाऱ्या खर्चाचा मुद्दा मांडला जातो. हा मुद्दा खरा आहे यात वाद नाही.
तथापि, या खर्चाची तुलना, व्यक्तींनी व संस्थांनी रोखीत व्यवहार केला तर त्यासाठी सरकारला किती खर्च येईल याच्याशी करायला हवी.
Cashless व्यवहारात - वरील यंत्रणा चालविणे हा खर्च सरकारला असतो. पण त्याचबरोबर या यंत्रणांमुळे व्यवहारांचा माग ठेवणे, कर आकारणी करणे, अर्थव्यवस्थेत पांढऱ्या पैशाचे प्रमाण वाढणे, एकूण रोख रकमेचे प्रमाण कमी राखता येणे असे अनेक फायदे सरकारला मिळतात.
Cash व्यवहारात - प्रत्यक्ष नोटा छापणे, त्या सुरक्षितपणे नागरिकांच्या हातात पडण्यासाठी उपलब्ध राहतील यासाठी प्रचंड मोठी, logistics, banking, security व्यवस्था चालविणे हे सरकारला करावे लागते, त्याचबरोबर रोख रकमांमुळे भुरटे गुन्हे, चोरीमारी, दरोडे अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होते. किरकोळ बँकिंग यंत्रणेवरचा ताण वाढतो. आणि यातला किती व्यवहार काळा राहील, किती निळा होईल आणि किती पांढरा दाखवला जाईल याची काहीही खात्री नसते.
म्हणून cashless व्यवहारांना उत्तेजन देणे, हवे तर त्यासाठी काही incentives देणे व अंतिमतः रोख व्यवहार तुलनेने गैरसोयीचे करणे हा मार्ग सरकारने चोखायला हवा.
२०१६ पासून ते मागच्या वर्षी पर्यंत याबाबतीत सरकारचे मार्गक्रमण योग्य होते पण आता मात्र उलट्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
cashless पेक्षा रोखीने व्यवहार करणे सुलभ वाटायला लागले आहे.
युपीआय करा का करू नका
विद्यानंद बापट आणि जमत ए इस्लामी हिंदच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट झाल्यामुळे बरेच काही बदलेल असे वाटते. ह्यावर मिपावरील निवडक मते (पॉपकॉर्न खात) वाचायला आवडतील.
🤣🤣🤣🤣
अतिशय योग्य निर्णय आहे…
In reply to युपीआय करा का करू नका by वृषभ खोंडे
अतिशय योग्य निर्णय आहे विद्यानंद बापटांचा. केवळ नास्तिकतेच्या सहाय्याने मनुवाद्यांना आवरता येणार नाही, त्यासाठी शांतीप्रिय आणि निधर्मी विचारांची एकजूट होणे गरजेचे आहे. लढा चालूच रहाणार.
चिंताजनक बातमी
अमेरिकन डेमोक्रॅट खासदार स्टेनी होयर ह्यांनी Lindsey O Graham sanctioning Russia and Iran Act मध्ये संशोधन करून मागच्या महिन्यात पास केलेली ही ॲक्ट दुरुस्त करून तिच्यात भारत, संयुक्त अरब अमिराती, चीन, तुर्की, अझरबैजान, स्लोवाक प्रजासत्ताक, सिंगापूर, हंगेरी, कझाकस्तान आणि किरगिझ प्रजासत्ताक ह्यांना १००% टॅरीफ करता पात्र ठरवण्याचे सुचवले आहे.
फक्त घोषणाबाजी झाली तर…
In reply to चिंताजनक बातमी by वृषभ खोंडे
फक्त घोषणाबाजी झाली तर इतक्या मिरच्या झोंबल्या अमेरीकनांना.....
ठो दे .. ठो दे.... ठो दे…
ठो दे .. ठो दे.... ठो दे... ठो !!!
https://www.lokmat.com/national/pakistani-naval-ship-rams-indian-warshi…
ही ह्यांची स्वतःच्या शब्दांची बूज अन् नंतर मुजोर वृत्ती
++++++++
असली वृत्ती अंगी रुळली की असले सरकार जमिनीवर आणणे इष्ट असते, २०१४ मधे काँग्रेस / सं.पु.आ. सोबत जे केले अन् ज्यामुळे केले ते मोदींच्या दुसऱ्या टर्म पर्यंत करावे लागेल असे वाटले नव्हते. तिसऱ्या टर्म मधील दुसरं वर्ष सरता सरताच ते प्रकर्षाने जाणवू लागले आहे. (चिंताक्रांत) खोंडे
कसे माहित नाहि पन मला आज…
कसे माहित नाहि पन मला आज लोगिन होता आले तिन चार वर्शनि. मला माझा पर्वलिचा शब्द लक्षत नाहि. कसा शोधायचा? कुनि मदत केलि तर बरे होइल.
शिवाय मला नाव बद्लुन मिलेल काय?
मिळेल
In reply to कसे माहित नाहि पन मला आज… by दा विन्ची
फक्त त्यासाठी एक छोटीशी शुद्धलेखनाची परीक्षा पास करावी लागेल असे विश्वसनीय अंतर्गत सूत्रे सांगतात.
(खबरदार जबाबदार बीट वार्ताहर) खोंडे 😂
दा विन्चि, लगे रहो. कितियेक वर्शन्नि अज पहिल्य्न्दच मोक्लय दहि
In reply to कसे माहित नाहि पन मला आज… by दा विन्ची
दा विन्चि, लगे रहो.
कित्येक वर्षांनी आज पहिल्यांदाच 'मोकलाया दाहि दिश्या' या अजरामर रचनेची आठवण करून देणारे काही वाचायला मिळाले.
दा वा विन्चि, आपले नावही बदलू नका आणि लेखन-शैलीपण न बदलता खुस्खुषीत, गरमागरम जिलब्या सोडत रहा. शुभेच्छा.
(कितियेक वर्शन्नि अज पहिल्य्न्दच मोक्लय दहि दिस्य य अज्रम्र रच्नेचि अथ्व्न करुण देन्रे कही वच्य्ला मिल्ले.)
मला माझा पर्वलिचा शब्द लक्षत…
In reply to कसे माहित नाहि पन मला आज… by दा विन्ची
मला माझा पर्वलिचा शब्द लक्षत नाहि. कसा शोधायचा?
Mipa@123 हा पर्वलिचा शब्द ठेवा मनजे लक्षत राहिल
पंतप्रधान नरेंद्र मोदी
ह्यांच्या ७६व्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या समर्थकांत आणि पक्ष कार्यकर्त्यांत उत्साही वातावरण दिसून आले.
हे दिसून येत असतानाच एक चिंताजनक (म्हणली तर) बाब लक्षात आली आहे. श्री मोदी ह्यांच्या वाढदिवसा निमित्त आशीर्वाद का दिया हा कार्यक्रम मध्य प्रदेशात सरकारी पातळीवरून साजरा करण्यात आला आहे.
ह्या कार्यक्रमानुसार उज्जैन मध्ये २५ लाख पणत्या प्रज्वलित करून मोदींना शुभेच्छा द्यायचा कार्यक्रम होता. ह्या २५ लाख पणत्या प्रज्वलित करण्यास ४५,००० लिटर तेल लागलेले आहे असेही कळते.
कळीचा प्रश्न हा आहे की ते तेल नेमके कुठले होते ? खाद्यतेल होते का ? नसल्यास कुठले तेल होते ? ह्यासंबंधी ते तेल खाद्यतेल असल्यास काही महिने अगोदर आदरणीय मोदीजींनी खुद्द दिलेल्या "जेवणात खाद्यतेल वापर १०% कमी करणे पण देशभक्ती आहे" वक्तव्याचे काय ? ईरान अमेरिका इस्राएल युद्धाच्या वेळी त्यांनी पेट्रोलियम पदार्थ, सोने खरेदीवर होणारा खर्च, विदेश यात्रांमध्ये होणारा खर्च (जनतेचा), ह्यांच्या सोबतच खाद्यतेलाची आयात पण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वरील १०% बचत करण्याचे आवाहन केले होते.
स्वतःच्या वाढदिवशी असे ४५,००० लिटर खाद्यतेल जाळणे त्यांना रुचले आहे अन् मान्य आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. जर ते तेल खाद्यतेल नसेल तर खूप बरे वाटेल, पण तसे मध्यप्रदेश सरकारने किमान पुढे येऊन सांगणे अपेक्षित आहे.
(तेल्या मारुती भक्त) खोंडे.
अजूनच चिंताजनक बाब म्हणजे असे लाखो पणत्या प्रज्वलित करण्याचे कार्यकम मध्यप्रदेशातील बऱ्याच इतर शहरांत झालेले वरील बातमीतून कळते त्यात वापरलेले तेल मात्र मी गृहीत धरले नाहीये, त्यावर पण स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे सरकारने (मध्यप्रदेशच्या).
हिंदू उत्सवांत मोदीपावली…
In reply to पंतप्रधान नरेंद्र मोदी by वृषभ खोंडे
हिंदू उत्सवांत मोदीपावली नावाचा एक नवीन सण आता अधिक करण्यात हरकत नसावी. शालिवाहन राजाने म्हणे मातीच्या सैनिकरुपी पुतळ्यांत जीव फुंकून त्यांना योद्धे बनवले होते. मोदीपावलीत हाडामांसाच्या जनतेला मठ्ठ पुतळे बनवण्याची कला मोदींजींनी साध्य केली अशी किवंदंता पसरवण्यास हरकत नसावी.
त्यापेक्षा तेवढी वडापिंपळाची…
In reply to पंतप्रधान नरेंद्र मोदी by वृषभ खोंडे
त्यापेक्षा तेवढी वडापिंपळाची, तुळशीची किंवा कडुलिंबाची रोपं लावा की, पणत्या लावण्यापेक्षा.
हे अन् असे मनात आले होते
In reply to त्यापेक्षा तेवढी वडापिंपळाची… by रामचंद्र
पण त्याने भक्तसंप्रदाय चवताळून जातो त्यांना वाटते की हे कोण आले लेकाचे आम्हाला सांगणारे. ....
बाय द वे, तुम्ही खुद्द रामचंद्र, दंडवत घ्या. आजकाल तुमची कमी अन् तुमच्या नावावर सत्ता राबवणाऱ्या लोकांची जास्त चलती आहे हे शुभवर्तमान अर्थातच तुम्हाला माहिती असेलच.
तरीही तुमच्या माहितीकरिता सांगतो, उद्या तुम्हाला पण पाकिस्तानात जा म्हणण्यात आले तर तुमच्या जुळ्या मुलांपैकी लव ह्याने लाहोर वसवल्याचे सांगतात, घरचाच सातबारा आहे (म्हणले फक्त सुचवावे) 😂😂
(श्री सुपर रिअल इस्टेट कन्सल्टन्सी मालक) खोंडे
खरंच मोदींविषयी काही वाटत…
In reply to हे अन् असे मनात आले होते by वृषभ खोंडे
खरंच मोदींविषयी काही वाटत असेल त्यांनी प्रत्येकानं जरी एक कडुलिंबाचं रोप लावून वाढवलं तरी पक्षाला ते अभिमानानं मिरवता येईल. बघू, मोतीबाग, रेशीमबागेतून तरी सुरुवात होतीये का?
करायला पुष्कळ काही आहे
In reply to खरंच मोदींविषयी काही वाटत… by रामचंद्र
कडुनिंबच नाही तर जगभरची दुर्मिळ झाडे + डेरेदार झाडे लावता येतील, एक बूथ चार युथ इत्यादी असणाऱ्या पार्टीला त्या प्रेमाने आपल्या नेत्यासाठी लावलेल्या त्या झाडांचे कलर/ बार कोडिंग करून त्यांची निगा राखता येईल...
पण इतके विधायक विचार करावे कोणी ?
दिल्ली मुख्यमंत्र्यांनी हे…
In reply to करायला पुष्कळ काही आहे by वृषभ खोंडे
दिल्ली मुख्यमंत्र्यांनी हे गाणे मोदीजी ह्यांच्या सन्मानार्थ प्रकाशित केले आहे :
https://x.com/CMODelhi/status/2100631995001012266
ह्यांत करदात्यांचा पैसा वापरला असावा.
बघू, मोतीबाग, रेशीमबागेतून…
In reply to खरंच मोदींविषयी काही वाटत… by रामचंद्र
बघू, मोतीबाग, रेशीमबागेतून तरी सुरुवात होतीये का?
२०१६ -- https://indianexpress.com/article/india/india-news-india/maharashtra-rss-chief-energy-minister-lead-tree-plantation-drive-2887554/
२०१६-- two crore tree plantation drive--- https://www.nagpurtoday.in/rss-chief-bhagwat-plants-a-neem-tree-at-mahal-based-hq/
२०१७-- https://www.dnaindia.com/india/report-delhi-rss-unit-to-plant-one-million-saplings-of-timber-trees-2531908
२०२३ -- https://theprint.in/india/rss-chief-plants-tree-saplings-on-world-environment-day/1613077/
२०२४ -- https://timesofindia.indiatimes.com/city/ranchi/rss-chief-promotes-environmental-protection-by-planting-trees-in-bokaro/articleshow/111179404.cms
२०२४ -- https://theprint.in/india/rss-chief-attends-tree-plantation-programme-i…
२०२६ ---https://www.thesangaiexpress.com/Encyc/2026/3/31/by-our-staff-reporter-…
२०२६-- https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/raibareli/parsadepur/news/rss-tree-plantation-drive-deeh-community-health-center-environment-rss-tree-plantation-deeh-community-health-center-138965703.html
२०२६-- https://newsonair.gov.in/ek-ped-maa-ke-naam-tree-plantation-campaign-launched-in-indore/
माहिती न घेता लिहिल्यामुळे आपला दृष्टिकोन दिसून येतो.
असे अनेक दुवे देता येतील.
असो
आपलं चालू द्या.
अरे वा, उत्तम! आता शक्य तिथं…
In reply to बघू, मोतीबाग, रेशीमबागेतून… by सुबोध खरे
अरे वा, उत्तम! आता शक्य तिथं शाळा, शाखा, सरकारी कार्यालयाचं आवार, सार्जनिक उद्यान, नदीचा काठ तिथं वडाचं झाड असा उपक्रम सुरू व्हावा.
>>>सार्जनिक उद्यान हा काही…
In reply to अरे वा, उत्तम! आता शक्य तिथं… by रामचंद्र
>>>सार्जनिक उद्यान
हा काही नवीन प्रकार सुरु झाला आहे काय? फक्त शल्यविशारदांसाठी प्रवेश वगैरे काही असते काय? आणि तिथे आतमधे काय असते नेमके?
वेगळे तेल
In reply to पंतप्रधान नरेंद्र मोदी by वृषभ खोंडे
असल्या प्रकारची उधळपट्टी मुळीच समर्थनीय नाही. तरीही मोदींनी केलेल्या आवाहनाशी या तेलाचा संबंध आहे असे वाटत नाही. भारत ज्या प्रकारचे खाद्यतेल आयात करतो ते- पाम तेल, सोयातेल आणि सूर्यफुलाचे तेल त्या संबंधी ते आवाहन होते असे वाटते. जसे सोने कमी खरेदी करा कारण त्यातून डॉलर्स वाचतील त्याप्रमाणेच या खाद्यतेलाविषयी असावे.
मध्य प्रदेशात दिव्यांमध्ये खाद्यतेल जरी वापरत असले तरी ते या तीन पैकी नसते असे जेमिनी मावशी म्हणाली. तिने सांगितले की मध्य प्रदेशात दिव्यांमध्ये मोहोरीचे तेल, तीळाचे तेल किंवा तूप वापरले जाते. इतक्या लाखांच्या संख्येने दिवे लावले असतील तर तूप वापरले जायची शक्यता कमी. तेव्हा मोहोरी किंवा तीळाचे तेल असावे.
मात्र अशी उधळपट्टी करदात्यांच्या पैशातून झाली असेल तर ती समर्थनीय नाही हे पण तितकेच खरे.
बघा बुवा चंद्रभाऊ
In reply to वेगळे तेल by चंद्रसूर्यकुमार
असे आहे की भारताचे अंतर्गत खाद्यतेल प्रोडक्शन जवळपास १०-१२ दशलक्ष टन वर स्थिरावले आहे (ऐंशीच्या दशकातील पिवळ्या क्रांतीनंतर) आणि आजच्या घडीला मागणी आहे २४.५ - २६ दशलक्ष टन.
इतका घोर फरक असताना तुम्ही उधळपट्टीचा निषेध पण करता आहात आणि ते तेल आयातीत नाही हे वेगळे पण सांगता आहात ! मुळातच मागणी विरुद्ध पुरवठा प्रमाणात सरासरी ५०% घट असल्यामुळे ती कमोडिटी जेव्हा उधळली जाते तेव्हा ती आयातीत आहे का स्थानिक उत्पादन ह्याला महत्व उरत नाही तर तिचा विनिमय (आधीच ८० कोटी लोक फुकट धान्यावर असताना) सार्वजनिक वितरण/ खुल्या बाजारात होऊन लोकांच्या पोटापाण्यासाठी व्हावा का एखाद राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसाला ते जाळून उत्सव साजरा करावा ह्याला उरते आणि ह्यात एक माणुसकी असणार व्यक्ती म्हणून किंवा एक देशाशी प्रखर बांधिलकी असणार देशभक्त नागरिक म्हणून मला वाटते सार्वजनिक वितरण/ बाजारी विनिमय हेच संयुक्तिक आहे, २५ लाख पणत्या पेटवून केलेली नासाडी नाही.
एकंदरीत एकतर विरोध करा किंवा सरळ भांडवली एप्रोच घेऊन होते पैसे फुंकले तेलात म्हणा (तसेही गुरुजी सरकारने भरपूर तेल दिले आहे म्हणतायत 😂) प्रॉब्लेम हा आहे की मोदींनी तेलाचे प्रकार/ नावे पक्षी सोयाबीन, पाम तेल किंवा सोयाबीन तेल कमी वापरा इत्यादी सांगितले नव्हते, देशाचे पंतप्रधान बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दाला वजन असते, त्यामुळे जेव्हा मोदींनी एकंदरीत खाद्यतेलांच्या वापरात १०% कपात करण्याचं आवाहन केलं तेव्हा त्यांना काय अपेक्षित आहे हे जनता समजू शकत नाही आम्ही हेच समजणार की मोदीजी म्हणालेत भजी कमी खावा. त्यामुळे आता retrospectively (इंग्रजीत पूर्वलक्ष्यी प्रभावाने) त्यावर मल्लिनाथी करताना तेलांच्या प्रकारांत पाठभेद करणे तितके संयुक्तिक वाटत नाही.
(एका तेलियाने) खोंडे
आपणाला अजूनही
In reply to वेगळे तेल by चंद्रसूर्यकुमार
जर तरचा स्कोप वाटतो ह्याच्यात ? ह्याला निरागसपणा म्हणावं का अगम्य आशावाद ? जे काही असेल स्पष्टीकरण (फक्त तुमची शंका आहे म्हणून खालीलप्रमाणे)
सरकारी यंत्रणा = करदात्यांचा पैसा इतका जास्त उधळला गेला आहे की बस, त्याचे विवरण खालील प्रमाणे
रोशन कुमार सिंह - उज्जैन कलेक्टर , आयएएस
नेहा जैन - सी.ई.ओ. , (आयएएस) उज्जैन स्मार्ट सिटी लिमिटेड ह्या दोघांच्या नेतृत्वात उज्जैन स्मार्ट सिटी लिमिटेडच्या ऑफिस मध्ये एक कमांड अँड कंट्रोल सेंटर बनवून "सेवा संकल्प अभियान" कार्यक्रमाच्या अंतर्गत ही थेर करण्यात आली होती. ह्या दोघांनी तांत्रिक भाग, नकाशे आरेखन, ड्रोन वापरून टेलीमेट्री इत्यादी सांभाळले होते
+++++
उज्जैन महानगरपालिका - क्षिप्रा घाटाची डागडुजी, साफसफाई आणि कार्यक्रम पश्चात स्वच्छता ह्यासाठी पूर्ण यंत्रणा
+++++
सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्य प्रदेश - बॅरिकेड्स आणि ऍक्सेस कंट्रोल, व्हीआयपी एरिया, मीडिया एनक्लोजर इत्यादी बनवणे
++++
पूर्ण उज्जैनला ८ सेक्टर वाटले गेले होते. एका सेक्टर मध्ये १३,५०० ब्लॉक, एका ब्लॉक मध्ये २२५ पणत्या. त्या एका ब्लॉक वर एक सरकारी कर्मचारी मुकादम म्हणून नियुक्त, त्याचे काम म्हणजे त्याच्या ब्लॉक मधील २२५ दिवे पेटवणे कामे लावलेले नागरिक स्वयंसेवक मॅनेज करणे. आता सगळ्यात क्रूर विनोद म्हणजे हे नागरिक म्हणजे मध्य प्रदेश सरकारचे वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी ज्यांची बायजावार जंत्री काढून त्यांना मुद्दाम बोलवून घेण्यात आले होते ह्या पणत्या पेटवायला एकंदरीत "आमच्या सरकारने योजना काढून लाभ दिलाय न ? मग चला जरा आता आमच्या कामी या" असे , ह्या कामी २३,५०० लाभार्थी सहभाग घ्यायला आणले गेले होते ते मध्य प्रदेश वेलफेअर डिपार्टमेंटच्या म्हणजे सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि क्रीडा व युवक कल्याण विभाग !
त्यामुळे करदात्यांचा पैसा, सार्वजनिक यंत्रणा आणि सरकारी संसाधने वापरल्याबद्दल आपल्याला आता तरी शंका उरली नसेल असे वाटते.