Skip to main content

चालू घडामोडी । सप्टेंबर २०२६ | भाद्रपद २०४८

लेखक कांदा लिंबू यांनी मंगळवार, 01/09/2026 08:30 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मिपाखरांनो 🙏 

१४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे त्याचबरोबर मिसळपावचा वर्धापनदिनसुदधा आहे! गणेशोत्सव व मिसळपाव वर्धापन दिन शुभेच्छा!

पावसाच्या बाबतीत जुलै ऑगस्ट महिने किमान मराठवाडा व विदर्भात निराशा जनक ठरले आहेत. सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट काही प्रमाणात तरी भरून निघेल अशी अपेक्षा आहेत. देशभरात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीतरी गाठेल का हे पहावे लागेल. 

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची व राज्य सरकारची त्यावरची भूमिका काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

GST Council ची १२ सप्टेंबरची बैठक महत्त्वाची आहे. GST दर आणि इतर करासंबंधी विषयांवर काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

क्रिकेटप्रेमी मिपाखरांसाठीही सप्टेंबरमध्ये भरपूर आशियाई प्रसाद आहे!

मिपाकरांनी महत्त्वाच्या बातम्या, दुवे, निरीक्षणे आणि मतमतांतरे इथे नोंदवावीत.

गणपती बाप्पा मोरया! 🙏

मिसळपाव वाढदिवस शुभेच्छा! 🥳


वाचने 1205
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

 - नेपाळ मधील ढगफुटी अत्यंत दुर्दैवी आहे. लोकांचे हाल बघवत नाहीत. पाशुपतिनाथ त्यांचे रक्षण करो. 


सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ह्यांनी सरकार पक्षातर्फे घटनेचे कलम १४२ invoke करून कॉक्रोच जनता पार्टी/ आंदोलक पोरांच्या विरुद्ध असणाऱ्या केसेस रद्द करून FIR निरस्त करण्याचा अर्ज दाखल केला आहे

ह्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत ह्यांनी "ठीक आहे जर तुमचे आपापसात समझोत्याचे ठरले असेल तर १४ पैकी कुठले FIR निरस्त करायचे त्याची सूची कोर्टापुढे ठेवा ज्यावर आम्ही विचार करू" असे म्हणले आहे.


केसेस मागे घेतल्याबद्दल कॉक्रोच जनता पार्टीने सप्टेंबर ५, २०२६ पासून जाहीर केलेलं आंदोलन मागे घेतलं आहे

 

सरकारी भाट - मास्टरस्ट्रोक 

कॉक्रोचेस प्रेमी - झुकवले सरकार पुन्हा एकदा 

खांद्याच्या वरती (खरे साहेबांच्या भाषेत) वजन असणारे - लेट्स वेट अँड वॉच.


In reply to by वृषभ खोंडे

केसेस मागे घेणार हे सरकारने जाहीर केलेले होतेच.  त्यामुळे त्यात विशेष काहीच नाही.

पण ज्या लोकांवर अगोदरच गुन्हेगारी खटले होते त्यांचे काय होईल.

येथे जर सर्वोच्च न्यायालयाने यांचे खटले  मागे घेण्यास नकार दिला तर काय होईल याचे कुतूहल आहे.     

 

Courts refuse to quash a First Information Report (FIR) when the alleged crime is serious, harms society as a whole, or contains enough initial evidence to warrant a full criminal trial


In reply to by सुबोध खरे

पण ज्या लोकांवर अगोदरच गुन्हेगारी खटले होते त्यांचे काय होईल. 

२८००+ हिस्ट्री शीटर होते म्हणे, त्यांच्यावर केस चालवायची म्हणली तर हिस्ट्री शीट पूल आऊट करून तोंडदेखल्या कुठल्याही जुन्या केस मधे ताब्यात घेऊन कारवाई केली म्हणायला काय जाते ? 

कारण कसे आहे सामान्य जनतेला तुमच्या इतकी लीगल समज नसते किंवा त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत खटले लढवले नसतात ना ! 

हे २८०० वरच्या केस मागे घेणार नाही हे इतके ambiguous आहे की "जंगल me मे मोर नाचा किसने देखा" ही म्हण आठवते फक्त.

 

(जस्टिस चौधरी) खोंडे


स्को परिषदेत सामील झालेल्या सर्व जागतिक नेत्यांचे एकत्रित प्रकाशचित्र मोदींनी प्रकाशित केले होते. पाकिस्तानी अधिकृत ट्विटरवर केलेल्या प्रकाशचित्रातून मोदी व इराणच्या राष्ट्रपतींना काढून टाकले आहे. 

 

कालच पुण्यात अभियांत्रिकी पदविका शिक्षण संस्थेत मृत पक्षाच्या मालकाचे चिरंजीव गेले आणि त्या संस्थेच्या मुख्य कार्यालयात शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त मोदींचे चित्र पाहून त्यांना अतोनात संताप आला व त्यांनी दांडगाई करून मोदींचे चित्र काढायला लावले. म्हणे शिवाजी महाराज व मोदींची बरोबरी कशी होऊ शकते. त्याचं भिंतीवर त्याच ओळीत दौपदी मुर्मू व आंबेडकर यांचेही चित्र होते. परंतु ते काढण्याची यांची हिंमत नाही. याच्या चुलत आजोबांच्या निवासस्थानी सर्वात वरती आजोबांचे व त्याखाली शिवाजी महाराजांचे चित्र वर्षानुवर्षे आहे. ते याला चालते.

 

एकंदरीत महाराष्ट्राने यांना कचऱ्यात फेकून दिले आहे ते योग्यच आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

पाकिस्तान, भिकारस्थान, इत्यादी इत्यादी संपलेले आहे सर. म्हणजे बघा ऑपरेशन सिन्दुर इत्यादी इत्यादी आठवण असेलच न सर. 

आदरणीय मोदीजींनी भारताला इतके वर ठेवले आहे (किती ते तुम्हालाच जास्त चांगले ठाऊक असणार) की आता तुलना पाकिस्तान सोबत नाही , 

आता थेट चीनची बरोबरी. आता माघार नाही. हे पाकिस्तान वगैरे काय सर ! हं चला आता मुद्द्यासारखे मुद्दे बोलू. 

 

(सव्यसाची) खोंडे.


केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेतील कलम १४२चा हवाला देऊन सुप्रीम कोर्टाला झुरळ आंदोलनातील पोरांवर टाकलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली हे आपण वर वाचले. त्या पावलावर पाऊल ठेवत आता बिहार, बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र ह्या फुरोगामी सरकारे असणाऱ्या राज्यांनी चारही राज्ये मिळून एकंदरीत ११६ एफ.आय.आर रद्द करण्याबाबत विनंती अर्ज कोर्टात रुजु केला आहे. 

Screenshot 20260901 200746 Meanwhile, उजव्या गटांत आणि विचारवंतांत आता सरकारच्या ह्या निर्णयाचे समर्थन करण्याच्या मूड मध्ये अजिबातच दिसत नाहीत. जनरल जनता पार्टी आणि रिझर्व्हेशन हटाव आंदोलनात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अजित भारती ह्यांचे मत खालीलप्रमाणे.

Screenshot 20260901 200323


Screenshot 20260901 202748

 ह्याला हिरो करायचेच होते तर आधी इतके ताणून कशाला मोदींना शिव्या खायला लावल्या राव !? कालचा पोरगा राजकीय मंडारीन लोकांना वर्क आऊट करतोय !


अभाविपने, पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षपद सलग दुसऱ्या वर्षी कायम राखले आहे.

 

मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत निकालांनुसार, अभाविपच्या अंकित बिधानने आआपच्या विद्यार्थी संघटना एएसएपीच्या आदिल ब्रार याचा ५१२ मतांनी पराभव केला. पंजाब विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अभाविपने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत सलग दोन वेळा सर्वोच्च पद जिंकले आहे. गेल्या वर्षी, अभाविपने जवळपास ५० वर्षांत प्रथमच ही निवडणूक जिंकली होती.

 

तथाकथित झ पिढी भाजपवर संतापली आहे या समजुतीला या निकालामुळे छेद मिळाला आहे. अर्थात शिरोमणी अकाली दलाच्या विद्यार्थी संघटनेने दिलेल्या पाठिंब्यामुळे हा विजय झाला आहे. भाजपविना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वाताहात झाल्यानंतर अकाली दलाचे डोळे उघडले आहेत व ते आता भाजपशी पुन्हा युती करण्याच्या प्रयत्नात आहेत. 


In reply to by श्रीगुरुजी

पंजाब विद्यापीठ (पी. यू.), चंडीगढ मधे ते उत्तम काम करतील आणि पुन्हा एखादी SOPU संघटना आणि पर्यायाने एखाद नवीन लॉरेन्स बिश्नोई तयार होण्यापासून थांबवतील अशी आशा आहे. 

बाकी

भाजपविना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वाताहात झाल्यानंतर अकाली दलाचे डोळे उघडले आहेत व ते आता भाजपशी पुन्हा युती करण्याच्या प्रयत्नात आहेत.

कमालच आहे म्हणायची ! डोळे उघडले पण अण्णाद्रमुकची अवस्था नाही बघितली ? एकंदरीत मामला गंभीर वाटतोय. ह्यांनी डोळे तिरळे उघडले का काय ?

(आय स्पेशलिस्ट) खोंडे.


मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी, मुंबईत २०२० मध्ये झालेल्या माजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी, केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असलेल्या सालियनचा, एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता.

 

चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दिशाचा मृत्यू आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले होते. मात्र, तिच्या वडिलांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप केला.

 

 

सतीश सालियनचे वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणातील पोलीस तपासावर शंका उपस्थित केली होती.

 

 

याचिकाकर्त्याने आपल्या मुलीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची आणि शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

 

________________

 

अर्थात यातून काहीही निष्पन्न होणार नाही. सरकार अत्यंत खंबीरपणे ठाकरे कुटुंबियांच्या पाठीशी आहे. ज्याप्रमाणे यांनी पवार कुटुंबीय, राणे, कुटुंबीय, आव्हाड, संजय राठोड यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊन दिली नाही, तसेच या प्रकरणात सुद्धा होणार. 

 


In reply to by श्रीगुरुजी

अर्थात यातून काहीही निष्पन्न होणार नाही. सरकार अत्यंत खंबीरपणे ठाकरे कुटुंबियांच्या पाठीशी आहे. ज्याप्रमाणे यांनी पवार कुटुंबीय, राणे, कुटुंबीय, आव्हाड, संजय राठोड यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊन दिली नाही, तसेच या प्रकरणात सुद्धा होणार.

 

 

ह्या उद्वेगातून पण ताजी घडामोड मांडल्याबद्दल आपले अभिनंदन गुरुजी. सरकार असेच खंबीरपणे ७२,००० कोटींचे गाडीभर पुरावे असताना पण होते अन् आदर्श सोसायटी बांधणाऱ्या व्यक्तीच्या मागे पण होते. असो!


जपानच्या क्रेडिट रेटींग एजन्सी (Japan Credit Rating- JCR) ने भारताचे क्रेडिट रेटींग BBB+ वरून A- वर अपग्रेड केले आहे. सरकार आपण कर्जाऊ घेतलेले पैसे (व्याजासकट) फेडू शकणार नाही याची शक्यता कमी असेल- म्हणजेच सरकार डिफॉल्ट करेल याची शक्यता कमी असेल तर क्रेडिट रेटींग अधिक चांगले असते. क्रेडिट रेटींग अपग्रेड होणे याचा अर्थ सरकारची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम झाली आहे असा त्या रेटींग एजन्सीचे मत आहे असा झाला.

 

यावरून एक गोष्ट आठवली.  नोव्हेंबर २०१७ मध्ये अमेरिकेतील मुडीज या रेटींग एजन्सीने असेच भारताचे क्रेडीट रेटींग अपग्रेड केले होते. खरं तर क्रेडिट रेटींग अपग्रेड होणे ही आपल्या देशाच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने चांगली घटना असल्याने त्याचा आनंद सगळ्या भारतीयांना व्हायला हवा. पण झाले असे की 'मोदी पंतप्रधान असताना असे अपग्रेड झालेच कसे' या कारणाने अनेकांच्या पोटात दुखायला लागले. मग त्यांनी मुडीजला त्याचा जाब विचारायला सुरवात केली. पण असा जाब विचारणाऱ्यांपैकी अनेकांनी तो जाब विचारताना त्यात एक बारीकशी चूक केली होती आणि ती म्हणजे ट्विट करताना मूडीज या क्रेडीट रेटींग एजन्सीला टॅग न करता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडीला टॅग केले होते. काही संबंध नसताना इतके लोक आपल्याला नक्की कसला जाब विचारत आहेत याचा त्याला पत्ता लागला नसावा 😀 

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंसुकु,

रेटींग एजन्सीचं रेटींग ह्या सगळया मॅनेज करता येणाऱ्या गोष्टी आहेत. त्या पर्फेक्ट आणि १००% विश्वसनीय असताअ ह्या अंधश्रद्धा आहेत. 

२००८ला झालेल्या लेहमन ब्रदर्स क्रायसिसवर 'द बीग शॉर्ट' नावाचा एक नितांत सुंदर आणि माझा अत्यंत आवडता सिनेमा आहे. त्यातला हा सीन मुडीज आणि S&P Global Ratings च्या कार्यपध्दतीवर (?) प्रकाश टाकतो. २.२० मिनीटांपासून पुढे लक्ष देऊन बघा/ऐका.

 

- (मुडी) सोकाजी


In reply to by सोत्रि

नक्कीच. २००७-०८ च्या आर्थिक संकटाच्या वेळेस अमेरिकन रेटींग एजन्सींनी सी.डी.ओ च्या वरच्या ट्रान्चना ट्रीपल ए रेटींग दिले होते. दुसरे ट्रीपल ए रेटींग असलेले फायनान्शिअल इन्स्ट्रुमेन्ट म्हणजे अमेरिकन सरकारचे bond त्यापेक्षा या सीडीओ ट्रान्चवरील यिल्ड २% जास्त होते. एकच रेटींग असेल तर दोन फायनान्शिअल इन्स्ट्रुमेन्टच्या यिल्डमध्ये असा फरक असू शकत नाही या मूळ फायनान्सच्या तत्त्वाचे त्यात उल्लंघन होत होते. तोच धागा पकडून मग श्री.रा.रा. रघुराम राजननी म्हटले की मार्केट या सीडीओ ट्रान्चवरील रिस्क योग्य प्रकारे ध्यानात घेत नाहीये- (अंडरएस्टीमेट करत आहे) आणि त्यातून मोठा धोका उद्भवतो. रेटींग एजन्सीज परीपूर्ण अजिबात नसतात.

तरीही काही गोष्टी-

१. कॉर्पोरेट रेटींगसाठी भरपूर झोलझपले चालतात. एखाद्या कंपनीला चांगले रेटींग मिळणे आणि  रेटींग ॲनॅलिस्ट आठवडाभर हवाईसारख्या ठिकाणी मस्त रिजॉर्टमध्ये सुट्टीवर जाणे असे योगायोग होतात 😐️. पण देशाच्या रेटींगसाठीही तसेच चालतात का? २०१० पूर्वी ग्रीसची आर्थिक स्थिती तितकी चांगली नसतानाही गोल्डमन सॅक्सबरोबर झोलझपले करून ग्रीसने आपल्या आर्थिक स्थितीचे चुकीचे चित्र उभे केले होते. त्यामुळे त्यांचे क्रेडीट रेटींग चांगले होते. पण तो प्रकार उघडकीला आल्यानंतर त्याच क्रेडीट रेटींग एजन्सींनी ते रेटींग डाऊनग्रेड केले होते.

२. अमेरिकेतील क्रेडीट रेटींग एजन्सीज- विशेषत: एस & पी या बाबतीत नोटोरिअस आहे. पण जपानच्या क्रेडीट रेटिंग एजन्सीचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे?

३. २०१७ मध्ये टॉम मूडीला जाब विचारणाऱ्या लोकांना इतक्या सगळ्या गोष्टी माहित होत्या असे मला तरी अजिबात वाटत नाही. भारताचे रेटींग अपग्रेड झाले आणि ते पण मोदी सरकारच्या काळात? छे छे. असे कसे शक्य आहे- मूडीज असे करूच कसे शकली त्या कुंपणापर्यंतच त्या लोकांची धाव होती. बरं नोव्हेंबर २०१७ मध्ये अपग्रेड केलेले रेटींग २०२० मध्ये लॉक डाऊन काळात डाऊनग्रेड केले होते तेव्हा त्यापैकी काहींनी- बघा आम्ही सांगत होतो असेही म्हटले होते. तेव्हा सगळ्यांचे लक्ष लॉक डाऊन आणि कोविडचे आकडे यावर होते त्यामुळे या बातमीकडे त्यामानाने दुर्लक्ष झाले होते. म्हणजे २०१७ मध्ये विश्वासार्ह नसलेली एजन्सी २०२० मध्ये एकदम विश्वासार्ह झाली का? आताही रेटींग अपग्रेड केले आहे म्हणून असले सगळे प्रश्न येत आहेत. समजा रेटींग डाऊनग्रेड झाले असते तर त्याच एजन्सीचा त्याच लोकांनी उदो उदो केला असता हे नक्की.


ट्रंपच्या आचरटपणाला अंत नाही. नकाशात होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकेचा भाग म्हणून दाखविल्यानंतर आता ट्रंपला या सामुद्रधुनीचे नामांतर ट्रंप सामुद्रधुनी असे करायचे आहे. 

 

या माणसाचा आचरटपणा आणि मर्कटलीला अमर आहेत. 


In reply to by राज जोशी

उपद्रव मूल्य (न्यूसन्स व्हॅल्यु) असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत अंतर्गत तडे पडले की ते बरोबर त्याच्या उपद्रव मूल्य नियमनात अंगभूत चेक्स अँड बॅलन्सेसचे काम करतात. पोरांनी सरकारला प्रश्न विचारले शिव्या घातल्या, ओके, आता पोरे पण पब्लिक स्फियर मधे आहेत, अकाऊंटबिलिटीचा बडगा त्यांनाही बघावाच लागणार आहे.


सावरकर मुसलमान समाजाचा द्वेष करत नव्हते तर त्यांच्या प्रगतीचा विचार करत होते - सात्यकी सावरकर

 

मोदी, भागवत ह्यांंच्या पाठोपाठ आता सात्यकी सावरकर पाच ? एकंदरीत लहानपणी पासून खास बाळकडूवर पोसलेल्या भक्तगणांची आता गोची होत असणार खरी !  

 

(निरीक्षक) खोंडे


न्यूयॉर्कपाठोपाठ, परमपूजनीय श्री. मोहनजी भागवतांच्या लंडन दौऱ्याला सुद्धा काही स्थानिकांनी विरोध केलाय. संघ फॅसिस्ट, जातीयवादी, मुस्लिमविरोधी अशी नेहमीची झिजून गुळगुळीत झालेली कारणे दिलीत.

 

न्यूयॉर्कप्रमाणे, लंडनचा महापौरही स्थलांतरित पाकडा आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

गनिमांच्या देशांत नक्की का जात आहेत भागवत जी ? 


सादिक खान लंडनचा महापाौर हा पाकिस्तानी. जोहरान ममदानीचा बाप महमूद ममदानी हा भारतीय मुळ असणारा युगांडन नागरिक होय, जोहरान ममदानीचे जन्माच्या हवाल्याने किंवा कौटुंबिक हवाल्याने पाकिस्तानशी कनेक्शन दिसून येत नाही. त्याचे वडील महमूद ममदानी ह्यांचा जन्म मुंबईत १९४६ साली झाला असे उपलब्ध सार्वजनिक स्त्रोतातून कळते. 

 

तो मुसलमान त्यात लिबरल म्हणून तुम्हाला राग किंवा द्वेष असेल त्याचा तर तो तुमच्या वैयक्तिक अखत्यारीतला प्रश्न आहे पण आपण कोणाचा द्वेष करतोय हे तरी नीट माहिती असावे असे मनापासून वाटते. 

 

(सादिक खान विरोधक) खोंडे


सिंधू पाणी करार स्थगित असताना, भारताने लडाखमध्ये पहिले दगडी धरण बांधले.

 

लडाखमधील शेतकरी समुदायांमधील पाण्याची टंचाई कमी करण्याच्या आणि सीमावर्ती भागांमध्ये सिंधू नदीच्या पाण्याचा वापर अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, भारताने लेहमधील उपशी येथे नदीवर आपले पहिले दगडी बंधारे बांधले आहेत.

 

संपूर्णपणे नैसर्गिक दगडांनी आणि सिमेंटचा वापर न करता बांधलेल्या या धरणामुळे पाण्याची पातळी जवळपास १० फुटांनी वाढली आहे, ज्यामुळे वसंत ऋतूतील पेरणीच्या हंगामात पाण्याअभावी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता शेतांना पाणी देणे शक्य झाले आहे.

 

वर्षानुवर्षे, स्थानिक शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, कारण वसंत ऋतूतील पेरणीच्या हंगामात पंपांना पाणी काढता यावे यासाठी सिंधू नदी खोल दऱ्यांमधून खूप कमी पातळीवर वाहत होती. सिंधू नदीच्या पाण्याच्या वापरावरील मर्यादा आणि ही पाण्याची टंचाई, यांमुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या होत्या आणि शेतकरी समाज आर्थिकदृष्ट्या विकलांग झाला होता.

 

स्थानिक शेतीला मदत करण्यापलीकडे, हा प्रकल्प पाकिस्तानला एक प्रबळ सामरिक संदेश देतो. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे, हा प्रकल्प हे दाखवून देतो की, नदी पुढे पाकिस्तानकडे वाहण्यापूर्वी, भारत आता सीमावर्ती भागांमध्ये सिंधू नदीच्या पाण्याचा वापर करण्यासाठी आणि आपल्याच समुदायांना आधार देण्यासाठी सक्रियपणे पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.

 

लडाख प्रशासन आता सिंधू नदीवर अशा प्रकारचे आणखी बंधारे बांधण्याचे काम करत असून, काही ठिकाणी काम सुरू आहे आणि आणखी बरेच प्रकल्प विचाराधीन आहेत.

 

डसणाऱ्या विषारी सापांना पाणी पाजण्यासाठी, भारतीय शेतकऱ्यांच्या तहानलेले ठेवून, सिंधू जलवाटप करार करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींच्या सरकारने हा करार स्थगित करून एक महत्त्वाचा निर्णय घेऊन एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. 

 

सिंधू नदीवरील दगडी धरण

In reply to by श्रीगुरुजी

दुसरे म्हणजे धरण आणि बंधारा ह्या स्थापत्य अभियांत्रिकी मधील संकल्पनांत अंमळ घोळ झाला आहे, तो सरकारला अपेक्षित नसावा आणि तुम्हालाही नसावा ही माझी सदिच्छा. 

पुढे म्हणजे ही बातमी मे २०२६ शेवटाकडे आला तेव्हाची आहे. अंदाजे २८ - ३० मे, २०२६ दरम्यानची. संबंधित दुवे खालीलप्रमाणे -

१. इकॉनॉमिक टाईम्स २८/०५/२०२६ ची बातमी

२. दैनिक जागरण इंग्रजी आवृत्ती (जागरण जोश) मध्ये आलेली बातमी, ३०/०५/२०२६

३. रीच लडाख बुलेटिन (स्थानिक वृत्तपत्र),  २८/०५/२०२६

४. मनी कंट्रोल - २८/०५/२०२६, ह्यांच्यानुसार माननीय लेफ्टनंट गव्हर्नर केंद्रशासित प्रदेश लडाख ह्यांनी २८ मे ला ह्या बंधाऱ्याचे उद्घाटन केले.

आता माझे काही प्रश्न - 

१. तीन महिने शिळ्या बातमीला पुन्हा उद्धृत करण्याचे काय प्रयोजन

२. दूुसरे म्हणजे सरकारने काम उत्तम केले आहे, फुल न फुलाची पाकळी दिलीच आहे. पण उपशी बंधाऱ्यानंतर ५६ कोटींचे प्रकल्प विचाराधित होते किती निधी पूर्ण सोडला गेला अन् किती प्रकल्प पूर्ण झाले ? ( हे पण पाहणे गरजेचे आहे, कारण उपशी तर अक्षरशः ७ दिवसात बांधला होता बंधारा)

चांगले काम चांगलेच असते फक्त ते मांडायला दरवेळी एक हात लाकूड चार हात ढलपी ॲप्रोच बरा नाही.

 

भारतीय शेतकऱ्यांच्या तहानलेले ठेवून, सिंधू जलवाटप करार करण्यात आला होता. 

चालायचेच हो, एका सरकारने तर सिंधू करार मोडीत काढणे सोडा लाहोरसाठी बस सुरू केल्या गेल्या होत्या, ते पण कारगिल एकीकडे सेट इन मोशन असताना. किमान इथे त्यांनी काहीच नाही केले पण आम्ही बरेच केले मध्ये त्यांनी काय नाही केले हा भाग माफक सटल ठेऊन आम्ही केले वर फोकस केले आहेत हा एक सकारात्मक बदल आहे.

जाता जाता - मोदी सरकार रोज काहीतरी नवीन आणि लोकोपयोगी करते ते काही घेऊन आलात तर बरे वाटेल. नाहीतर जनता उद्या नवीन बाटलीत जुनीच दारू भरून विकल्याचे आळ घेईल, बघा बुवा तुम्हाला अन् तुमच्या लाडक्या पार्टीला चालणार असेल तर 

 

(मैत्रीपूर्ण सल्लागार) खोंडे


In reply to by श्रीगुरुजी

स्थानिक शेतीला मदत करण्यापलीकडे, हा प्रकल्प पाकिस्तानला एक प्रबळ सामरिक संदेश देतो. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे, हा प्रकल्प हे दाखवून देतो की, नदी पुढे पाकिस्तानकडे वाहण्यापूर्वी, भारत आता सीमावर्ती भागांमध्ये सिंधू नदीच्या पाण्याचा वापर करण्यासाठी आणि आपल्याच समुदायांना आधार देण्यासाठी सक्रियपणे पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.

 

भक्तीAI ने निर्माण केलेली वाक्यरचना आहे का ? 


केनिया ने टाटा केमिकल्स कंपनीला आपली सगळी ऑपरेशन्स (केनिया मधली) तात्काळ बंद करण्याचा आदेश दिला आहे

केनियन राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो ह्यांच्या नुसार टाटा केमिकल्सला कॉस्टिक सोडा निर्मिती आणि निर्यात साठी १०० वर्षांचे लीज केनियन सरकारने दिले होते पण त्या लीज मधील अटी-शर्तींमध्ये विकास टाटा केमिकल्सने त्या प्लँटच्या आजुबाजूला केला नाही त्यामुळे "आम्ही काय गुलाम आहे का ?" असा प्रश्न रूटो ह्यांनी उपस्थित केला आहे आणि टाटा केमिकल्स ऐवजी कॉस्टिक सोडा निर्मिती करता दोन नव्या (चिनी नसल्या म्हणजे मिळवले) कंपनी आणणार असल्याचे घोषित केले आहे. कॉस्टिक सोडा/ सोडा ऍश हे एक महत्वाचे औद्योगिक रसायन असून बऱ्याच इंडस्ट्रीयल एप्लिकेशन्स मध्ये त्याचे महत्व आहे, टाटा समूहातील टाटा केमिकल्स ही कंपनी जगात एक अग्रगण्य कंपनी मानली जाते ह्याच्या निर्मितीत.


मालदीव ने तिलाफुशी नावाचे एक बंदर बांधायला घेतले आहे आणि त्याच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाचे कंत्राट एका चायनीज कंपनीला दिले आहे 

 

खायच्या तांदळापासून ते प्यायच्या पाण्यापर्यंत आणि आरोग्य ते पर्यटन उद्योग भारतावर अवलंबून असणाऱ्या मालदीवने ही वेगळीच वाट चोखाळली आहे असे म्हणावे का ? मोहम्मद मुईझु हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी असे भारताच्या विरुद्ध बंडखोरीचे बोल ऐकवले, नंतर त्यांनी दिल्लीत येऊन भारतीय नेतृत्वाची भेट घेऊन दिलजमाई करत मालदीवला भारताकडून मिळणारे फुकटचे रमणे परत एकदा पुनर्स्थापित करून घेतले होते जे उदारमानाने भारतीय नेतृत्वाने मंजूर केले होते, त्यानंतर आता परत हे बांधकाम चिनी कंपनीला देणे जरा विचित्र जाणवते.

 

(देशभक्त) खोंडे


पंतप्रधान मोदींच्या बडोद्यातील कार्यक्रमाची तिकिटे बुक माय शो वर विक्रीला ठेवली असता एका तासात सगळी विकली गेली

आता ह्याच्यातून काढायला बसता तीन अर्थ निघतात 

१. मोदींना आपले कार्यक्रम बुक माय शो वर विकावी लागतात. 

२. कॉक्रोच वगैरे काही नाही मोदींचा ऑरा इंटॅक्ट आहे 

३. भाजपच्याच कार्यकर्त्यांनी तिकिटे विकत घेऊन ती जनतेत फुकट वाटली. 

 

अजून काही संभावना असल्यास मांडाव्यात

 

जो जे वांछील तो ते लाहो, होऊ दे धुरळा शा हब्बे दुलास ! 🤣🤣🤣


In reply to by वृषभ खोंडे

बुक माय शो वर तिकीटे फुकट उपलब्ध आहेत.

 बुक माय शो फक्त सीट बुकिंग साठी  वापरले आहे.