मालक मला एखादा डू आय डी द्याना!
मालक मला एखादा डूआयडी द्याना!
डू आय डी घेईन
जिलेब्या पाडीन
भक्ताना चोपीन
चाप चाप चाप!
मालक मला एखादी डूआयडी द्याना!
डू आयडी घेईन
खरडफळा गाजवीन
वादविवाद करीन
ठप ठप ठप
मालक मला एखादा डुआयडी द्याना,
डू आयडी घेईन,
चिखलफेक करीन
दोन चार आयडी उडवीन
धप धप धप!
मालक मला एखादा डू आयडी द्याना
डू आयडी घेईन
मूळ आयडी ठेवीन
पुन्हा पुन्हा येईन
ख्या ख्या ख्या!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अबा.. हा तुमचा डू आयडी नाही…
अबा.. हा तुमचा डू आयडी नाही ना? :-)
नाही, हा मूळ आयडी आहे. :)
नाही, हा मूळ आयडी आहे. :)
अ.बा.: ह.घ्या साहेब.! :-)
अ.बा.: ह.घ्या साहेब.! :-)
हि कविता वाचली आणि जुनी…
हि कविता वाचली आणि जुनी कविता आठवली …
डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप ।
डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । मिपामंडळी ।।१।।
डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें ।
डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।।
मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग ।
जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।।
वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी ।
वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।।
सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे ।
आंजालोकी माबोलोकी उरावे । पिंकरूपें ।।५।।
प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू ।
अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।६।।
ते माबो चं मिपा करून टाका ना…
ते माबो चं मिपा करून टाका ना.😊
एक आणिक एक डू आय डू …
एक आणिक एक डू आय डू शेटजीचे समर्थन साठी घ्या. दोन्ही बाजूंनी तुम्हीच वादविवाद सुरू करा आणि मजे घ्या.
हाहाहा, चामुंदराय सर आवडली…
हाहाहा, चामुंदराय सर आवडली कविता, पटाईत साहेब, हे पण ट्राय करून पाहतो. :)