या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा.
केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
9929
प्रतिक्रिया
159
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोबरयूगात अशा घटनांचे अजिबात
In reply to गोबरयूग आणि संसदेची गरिमा.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोबरयूगात अशा घटनांचे अजिबात नवल वाटत नाही.+१
गोबारयुगाची स्तुती करणारे अनेक सिलेंडरच्या रांगेत लागलेत कडक उन्हात! त्यांच्या नावाचा सिलेंडर आधीच बुक होऊन काळ्या बाजारात जेल सुद्धा, गोबरयुगात भ्रष्टाचाराला सीमा राहिलेली नाही, पोलीस कारवाईही होत नाही, कारण गोबरयुगीन सत्ताधारी नेतेच हे करा असतात. सगळ्याना गोबारयुगाच्या शुभेच्छा! गोबरयुग चिरायू होवो.
सध्या (डॉक, खरे सोडून) १५
सध्या (डॉक, खरे सोडून) १५ सदस्य हजर आहेत.
मुक्त विहारि
ताजे प्रेत
अमरेंद्र बाहुबली
चंद्रसूर्यकुमार
धर्मराजमुटके
गवि
श्वेता व्यास
मदनबाण
रात्रीचे चांदणे
संदिप एस
कपिलमुनी
आंबट गोड
chetanahirao
दुर्गविहारी
A.N.Bapat
मुविकका आले, आता संदेशखालीला कुणी वाली मिळाला. :)
संदेशखाली कांड के गवाह का 'एक्सिडेंट' साधारण घटना नहीं? बंगाल की
In reply to सध्या (डॉक, खरे सोडून) १५ by अमरेंद्र बाहुबली
संदेशखाली कांड के गवाह का 'एक्सिडेंट' साधारण घटना नहीं? बंगाल की राजनीति का आईना है
https://www.aajtak.in/opinion-analysis-/story/sadeshkhali-case-witness-…
मोदीजी पंतप्रधान नी अमित शहा
In reply to संदेशखाली कांड के गवाह का 'एक्सिडेंट' साधारण घटना नहीं? बंगाल की by मुक्त विहारि
मोदीजी पंतप्रधान नी अमित शहा गृहमंत्री हवे होते. अश्या घटना घडल्याच नसत्या, काय म्हणता?
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मोदीजी पंतप्रधान नी अमित शहा by अमरेंद्र बाहुबली
तुमची इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ता जन्मजात आहे, की ह्या साठी तुम्ही काही वेगळे काही शिक्षण घेतले आहे?
इत्यलम,
बाय द वे,
तुमचे प्रतिसाद, कितीही मनोरंजक असले तरी, ते प्रतिसाद, मला विचार करायला भाग पाडतात, हे मात्र नाकारता येत नाही...
झाल का? आता परत गायबा बघू.
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
झाल का? आता परत गायबा बघू. नाहीतर रतीब सुरू व्हायचा, संदेशखाली ट्याव ट्याव….
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to झाल का? आता परत गायबा बघू. by अमरेंद्र बाहुबली
तुम्हाला तर काही काळा करता, प्रवेश बंदी केली होती....
अर्थात्, कुणी किती स्वाभिमान बाळगायचा? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न...
मला वेळ मिळाला तर मी इथे येतो...
मॅथ्यू व्हॅनडाईक आणि अर्थंमंत्री निर्माला सीतारामन
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून सात परदेशी नागरिकांना अटक केली आहे.
यामध्ये सहा युक्रेनियन आणि एक अमेरिकन नागरिकाचा समावेश आहे.हे आरोपी वैध व्हिसावर भारतात आले होते, परंतु त्यांनी अनिवार्य असलेल्या रिस्ट्रिक्टेड एरिया परमिट (RAP) शिवाय मिझोराममध्ये प्रवेश केला.
NIA च्या मते, हे आरोपी त्यांच्या कारवायांसाठी युरोपमधून मिझोराममार्गे म्यानमारला मोठ्या प्रमाणात ड्रोनची बेकायदेशीर आयात करण्यात गुंतले होते.हे गट काही प्रतिबंधित "भारतीय बंडखोर गटांना" शस्त्रे आणि इतर दहशतवादी साहित्य पुरवून तसेच त्यांना प्रशिक्षण देऊन मदत करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
या प्रकरणा संबंधी अधिक माहितीसाठी Sputnik च्या पोर्टलवर किंवा त्यांच्या एक्स हँडलवर जावे.
विशेष : सुमारे २,००० युक्रेन युद्धातील व्हेटरन्स मिझोरम मार्गे म्यानमार मध्ये बंडखोरांना प्रशिक्षण देण्यासाठी गेल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
संंदर्भः
NIA arrests six Ukrainians, one from US for plotting terror activities in India
American mercenary Matthew VanDyke, 6 Ukrainians arrested in India by NIA
यातील मॅथ्यू व्हॅनडाईक (Matthew VanDyke) हा विशेष चर्चेत आहे,त्याचे मुख्य कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयाचे एक्स अकाउंट आणि केरळ भाजपाचे स्टेट प्रेसिडेंट राजीव चंद्रशेखर यांचे एक्स अकाउंट Matthew VanDyke या व्यक्तीला (जो CIA mercenary - भाडोत्री सैनिक आहे असे म्हंटले जात आहे.) एक्सवर हा घटनाक्रम चर्चेत येण्याआधी पर्यंत फॉलो करत होते!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Dil Lagana Mana Tha (Official MV) Krish & Kishore Mondal | Kunaal V, Devv S | Sanam Johar Ashi Singh
इराणला वैद्यकीय मदत...
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर शोक करायला सहा दिवस लागल्यानंतर आता इस्त्रायल अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणला वैद्यकीय मदत पाठवली आहे. या मदतीबद्दलही इराणने ट्वीट केले आणि डिलीट केले अशीही बातमी होती. मानवता वादी दृष्टीकोनातून अशी मदत वाटत असली तरी, आतंराष्ट्रीय राजकारणाचे शहाणपण आहे, अर्थात आता हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असे वाटते.
इस्त्रायल कडून संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मदत होईल भविष्यात कधी पाकिस्तानशी ऑपरेशन सिंदूर सारख्या छोट्या-मोठ्या संघर्षात इस्त्रायलच्या अत्याधुनिक शस्त्रे मिळावीत हा आपला हेतु असावा. इस्त्रायलची बाजू घेतल्यास इराणला थेट गमावणे परवडणारे नाही, त्यामुळेच राजकीय पाठींबा किंवा युद्धातील सहभागापेक्षा किंवा गंभीर चिंता व्यक्त करण्यापेक्षा मानवतावादी मदतीच्या निमित्ताने इराणसोबत आपले संबंध जिवंत ठेवू इच्छितो, अशी एक निती दिसत आहे.
इराणला सोडले तर, जी इस्लामिक सहकार्य संघटना आहे, जी जगातील मुस्लीम बहुसंख्य राष्ट्रांची संघटना आहे, तर त्यांच्यातही भारताबद्दल नकारात्मक किंवा नाराजी राहिली असती. त्या संघटनेचा सदस्य होण्याच्या अडचणीमुळे आणि आपली धर्मनिरपेक्ष असे चित्र असल्यामुळे त्या गटातील देशांशी द्वीराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्यावर आपला भर आहे, त्यामुळे ही मदत करण्याच्या प्रयत्न असावा. पुढे काय काय होते पाहात राहू या.
-दिलीप बिरुटे