Skip to main content

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 15/04/2025 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत- Bichukale https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…

वाचने 48519
प्रतिक्रिया 426

प्रतिक्रिया

नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही; व्हिसा रद्द केल्याच्या निर्णयावर नाराजी.. https://www.tv9marathi.com/videos/pahalgam-attack-india-cancels-pakista… -- आणि भारतातील काही लोक, पाकिस्तान जिंदाबाद" म्हणत आहेत... अशा लोकांना सरळ, पाकिस्तानात पाठवून द्यायचे...

In reply to by मुक्त विहारि

आणि भारतातील काही लोक, पाकिस्तान जिंदाबाद" म्हणत आहेत... अशा लोकांना सरळ, पाकिस्तानात पाठवून द्यायचे...
असे म्हटल्यास मिपावरील काही विद्वान तुम्हाला पाकिस्तान पर्यटन विभागाचे 'ब्रँड अ‍ॅम्बॅसॅडर' म्हणतील हा :)

अलिखित जातीआधारित, धर्माधारित आणि क्षेत्राधारित ( प्रादेशिक) तसेच लिंगाधारित आरक्षण उच्च अन सर्वोच्च न्यायालयात पण गेली कित्येक वर्षे आहे हे किती जणांना माहिती आहे. नीट पाहायला गेल्यास गेलं कित्येक वर्षे एक ख्रिश्चन आणि एक मुसलमान न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात आहेच आणि याना कॉलेजियम कडून धार्मिक तसेच प्रादेशिक प्रतिनिधित्व या नावाखाली निवडले जातात. त्यात मग एक दोन स्त्रियांना सुद्धा पुरुष न्यायाधीशांच्या वर आणून सर्वोच्च न्यायालयात बसवलं जातं जातीय धार्मिक आणि प्रादेशिक विविधता आणि स्त्रियांना प्रतिनिधित्व म्हणून एक न्यायाधीश केरळ कर्नाटक किंवा आसाम किंवा अशा राज्यातून निवडला जातो ज्या राज्यातील न्यायाधीश निवृत्त झाले आहेत. किंवा त्या धर्माचे प्रतिनिधित्व असावे म्हणून एक न्यायाधीश निवडला जातो. मग त्यात अत्यंत नालायक असे न्यायाधीश सुद्धा निवडले जातात. यामुळे कित्येक उत्तम कायदे तज्ञ असलेले वकील न्यायाधीश पदापासून वंचित राहतात किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात पोचत नाहीत.