✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अदानी,उर्जा आणि अमेरिका

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Fri, 11/22/2024 - 11:37  ·  लेख
लेख
अमेरिकेत गौतम अदानी ह्यांच्याविरोधात वॉरंट निघाले आणि भारतात एकच खळबळ माजली. दोषारोपात(INDICTMENT) गौतम अदानी आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतातील चार राज्यांत २००० कोटींची लाच दिली होती. अदानी एनर्जीची सौर उर्जा ह्या राज्यांनी विकत घ्यावी म्हणून ही लाच २०१९ ते २०२४ ह्या काळात दिली गेली. अर्थात हे आरोप आहेत पण त्याचे पुरावे देखील देण्यात आले आहेत असे समजते.https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline लगेच राहुल गांधी ह्यांनी अदानीना अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. ही चार राज्ये- छत्तीसगड, आंध्र प्रदेश,तामिळ नाडु आणि ओडिशा. ह्यात सर्वाधिक लाच,१२५० कोटी, आंध्रप्रदेशमध्ये २०१९-२०२४ मध्ये देण्यात आली होती असा आरोप आहे. रोख अर्थात जगन मोहन रेड्डि ह्यांच्यावर आहे. कारण मुख्य्मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय अशी मोठी कंत्राटे मंजूर केली जात नाहीत. आता ह्यावरुन राजकारण तापणार होतेच. भाजपातर्फे ह्या सगळ्या मागे 'जॉर्ज सोरोस'च आहेत असे ठामपणे सांगण्यात आले. खरे तर हे असे बोलायची गरजच नव्हती. कारण ह्या चारही राज्यांमध्ये तेव्हा भाजपा सत्तेवर नव्हता. पण 'पाश्चिमात्य देशांना भारताचे बरे झालेले बघवत नाही' ही थियरी अनेक मध्यम वर्गीयांना सहज पटते. 'चारही राज्यांतील तत्कालीन अधिकार्यांची चौकशी करा' असे सांगितले असते तरी हरकत नव्हते पण अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो. मुख्य प्रवाहातील चॅनेल्सनी सावध पवित्रा घेत बातमी दिली आहे. मराठी चॅनेल्सवर तर बोलायलाच नको. 'दादा निवडुन येणार की भाउ की अण्णा' ह्यातच ती रमली आहेत. अदानी आणि ट्रम्प ह्यांचे चांगले संबंध आहेत असे बोलले जाते. ट्रम्प निवडुन आल्यावर अदानी ह्यांनी ट्रंप ह्याच्या 'धैर्य आणि चिकाटीचे' कौतुक केले होते. १३ नोव्हेंबरला अमेरिकेत मोठी गुण्तवणुक करण्याची घोषणाही केली होती. In his congratulatory post, Mr Adani said, "If there is one person on Earth who stands as the embodiment of unbreakable tenacity, unshakeable grit, relentless determination and the courage to stay true to his beliefs, it is Donald Trump." ट्रम्प सत्तेवर यायच्या आत अदानीला अडकवायचे असा प्लान बायडेन सरकारमधील लोकांचा होता आणि तो यशस्वी झाला असेही म्हंटले जाते. आता ट्रम्प ह्यांनी शपथ घेतल्यावर ते ह्या दोषारोपाला आणि संबंधीत अधिकार्यांना कसे बाजुला काढतील ते पहावे लागेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22366 वाचन

💬 प्रतिसाद (143)

प्रतिक्रिया

अदानीवर संकट म्हणजे भारतावर

अमरेंद्र बाहुबली
Fri, 11/22/2024 - 12:22 नवीन
अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो. खिक्क. अदानीने आपले हस्तक सरकारात पेरले. सर्वोच्च पदावरील मोदीही अदानीना मदत करतात, मोदीनी चंगच बांधलाय की अदानीना भारतातील सर्वात श्रीमंत माणूस बनवेल त्या साठी जमेल तसे नियम मोडून अदानीना एयरपोर्ट ते धारावी झोपडपट्टी सर्वच दिलं जातंय. हिंडेनबुर्ग सारख्या कंपन्या सत्य बाहेर काढून अदानीची हवा काढतात नी मोदींच्या मेहनतीवर पाणी फिरवतात. मग मोदीना चरफडत बसण्याशिवाय पर्याय नसतो, कारण हिंडनबुर्ग भारतात नाही की त्याच्यावर इडी सोडू की हिंडनबर्ग राजकीय पक्ष नाही की निवडणूक आयोगाला वापरून त्याचा काटा काढू, ना हिंडेनबर्ग कंपनीतलं कुणी आहे की खोके पोहोचवून कंपनीची दोन शकले करू. :) अंधभक्तात अडाणींचे एक वेगळे स्थान आहे. आपल्या मालकाचे मालक असल्याने अदानीवर संकट म्हणजे राष्ट्रावर संकट असे अंधभक्त मानत असावेत. शिवाय दोघेही गुजराती, मराठी भक्तांनी गुजरातचरणी निष्ठा व्हायल्याची शपथ खाल्ली असल्याने अदानी म्हणजे त्यांचा जीव की प्राण. थोडावेळ जाउद्या अंधभक्त येतीलच समर्थनाला. रच्याकने थेट मालकाशी मैत्री करावी म्हणजे नोकर आपल्यालाही मुजरा करतात हे ओळखूनच पवारानी सरळ अडाणीशी मैत्री केली असावी का?
  • Log in or register to post comments

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 12:14 नवीन
मनोरंजक प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक आयडी.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 12/07/2024 - 12:17 नवीन
मनोरंजक आयडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुमच्यासाठी नक्कीच....

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 12:23 नवीन
कारण, तुमचे प्रतिसाद फारच मनोरंजक असतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कारण,

अमरेंद्र बाहुबली
Sat, 12/07/2024 - 12:24 नवीन
कारण, तुमचे प्रतिसाद फारच मनोरंजक असतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गेल्या एक दोन दशकांपासुन

चौथा कोनाडा
Fri, 11/22/2024 - 13:24 नवीन
गेल्या एक दोन दशकांपासुन अमेरिकेचे राजकारण (किंवा अनेक देशांचे राजकारण) भारतीय थोर लोकशाही परंपरेनुसार चालले आहे असे दिसते. सत्तेवर आले की आपल्याला धार्जिणे असणारे उद्योगपती, लष्करशहा यांना पाठीशी घालून त्यांच्या विरोधातले पुरावे कमकुवत करून शुद्धिपत्र अर्थात "क्लीन चीट" देऊन आपण सत्ता गाजवत राहायची हेच धोरण. त्यामुळे अदानी काय किंवा इतर न प्रकाश प्रकाशात आलेली मंडळी काय, निरपराध सुटणार यात काही आश्चर्य वाटायचे कारण नाही आणि हे सुरू झाले की त्यांना पाठिंबा द्यायला निर्दोष ठरवायला माध्यमातले घटक पुढे येतीलच ! जय अदानी जय अंबानी जय मोदी जय अमित शहा जय राहुल गांधी जय सोनिया गांधी जय केजरीवाल आणि ....... जय जय .... सर्वांचा जयजयकार आणि आंतरराष्ट्रीय भारतीय राजकारणाचा विजय असो !
  • Log in or register to post comments

वॉशिंग मशीनचा जयजयकार ;-)

अथांग आकाश
Fri, 11/22/2024 - 13:35 नवीन
वॉशिंग मशीनचा जयजयकार ;-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

सामान्य माणसाच्या दृष्टीने -

कंजूस
Fri, 11/22/2024 - 13:26 नवीन
सामान्य माणसाच्या दृष्टीने - १)मोठ्या कामांची आंतरराष्ट्रीय निविदा म्हणजे कोण हे काम किती रकमेत किती दिवसांत करणार याची लिखीत झलक. तर खूप कमी रकमेची दिल्याने कंत्राटे अडानी गटाच्या कंपन्यांना मिळत आहेत. २) राजकारण झालेच तर ते कंत्राट मिळाल्यावर होणार. ३) कुणी सांगितले म्हणून तशा रकमा अदानी मांडत असेल का? ४) अशी मोठी कामे न मिळालेल्या कंपन्यांची पोटदुखी वाढत आहे का? .... ५) बांगला देशाला वीज पुरवणाऱ्या काही भारतीय कंपन्या आहेत . वीज देत आहेत पण बिले थकली आहेत. या पार्श्वभूमीवरसुद्धा अदानीने एक वीज पुरवण्याचे( कोळशावर वीज उत्पादन याच पद्धतीची आहेत सर्व) कंत्राट घेतले आहे हे समजले. एवढी जोखमीची उडी कोण घेणार. ६) चीनच्या कंपन्यांच्या उत्पादनामुळे अमेरिकी कंपन्यांवर दबाव येत आहे. त्यात भर म्हणजे आता भारतही शर्यतीत उतरला तर दिवाळं जवळच आहे. ७) ट्रंपने MAGA( make America great again) नारा दिला आहे - गरीब स्थानिकांना काम देणे. पण याचबरोबर "no wars" आहे. म्हणजे शस्त्रे बनवणाऱ्या कंपन्या तोट्यात. युद्ध बंद झाली तर काय कसं होणार? मग बाईडन जाताजाता मदतीला धावले झेलेन्स्कीच्या " मार तू मोठे अग्निबाण" युद्ध चिघळेल आणि मग मजाच. पण तसं ट्रंप होऊ देणार नाही. ८) एकूण अदानी आणि भारताला सतावणे हाच उद्देश दिसतो आहे. ९) नेहमीप्रमाणे राहुलबाबाने उडी घेतली आहेच.
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 11/22/2024 - 13:55 नवीन
"एकूण अदानी आणि भारताला सतावणे हाच उद्देश दिसतो आहे." सध्याच्या माहितीनुसार अदानीने बिगर-भाजपा सरकारमधील लोकांना लाच दिली होती. २०१९-२०२४ ह्या काळात. जगभरात उर्जा आणि संरक्षण कंत्राटात 'हमाममे सब नंगे' स्थिती असते. अमेरिकाही सोयीनुसार नैतिकतेवर बोलत असते. आमच्य अंदाजाप्रमाणे अदानी आणि बायडेन सरकार ह्यांच्यात काहीतरी बनाव निर्माण झाला असावा. म्हणूनच जाता जाता बायडेन ह्यांच्या प्रशासनातील अधिकार्यानी बदला घेतला असावा. कारण आता व्हाईट हाउसने आता निवेदन दिले आहे- Asserting that the relationship between India and the U.S. is built on a strong foundation, the White House has expressed confidence that it can navigate the ongoing crisis surrounding bribery charges against Indian billionaire Gautam Adani. म्हणजे 'हे ही दिवस जातील'! असेच त्यांना म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments

अदानी आणि बायडेन सरकार

शाम भागवत
Fri, 11/22/2024 - 14:04 नवीन
अदानी आणि बायडेन सरकार ह्यांच्यात काहीतरी बनाव निर्माण झाला असावा.
ते ठीक आहे हो. पण राहूल गांधी का त्यांच्या तालावर नाचताहेत. जर यातली माहिती बाहेर आली तर अगोदरची सरकारे गोत्यात येतील ना? ती भाजपाची असती तर राहूल गांधी बरोबर राजकारण खेळताहेत असं वाटलं असतं. पण जर भाजप विरोधी किंवा कधीकाळी कॉंग्रेसची सहयोगी सरकारे त्यामुळे गोत्यात येणार असतील तर ते राहूल गांधींच्या भारतातल्या राजकारणाला पूरक कसे हे काही कळत नाही. बायडेन सरकारला ती राज्य सरकारे कोणती याचे काही घेणे देणे नसल्याने ते त्यांचे राजकारण बरोबर खेळताहेत. ते ट्रंम्प पाहून घेतील.
  • Log in or register to post comments

तितकी समज त्यांना किंवा

टीपीके
Fri, 11/22/2024 - 14:14 नवीन
तितकी समज त्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना असती तर मोदींच्या अनेक चुकांचा वापर करून आत्ता पर्यंत सत्तेत आले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

थोडावेळ जाउद्या अंधभक्त

अमरेंद्र बाहुबली
Fri, 11/22/2024 - 14:11 नवीन
थोडावेळ जाउद्या अंधभक्त येतीलच समर्थनाला. :)
  • Log in or register to post comments

तपशीलवार बातमी वाचली नाही

टीपीके
Fri, 11/22/2024 - 14:12 नवीन
तपशीलवार बातमी वाचली नाही अजून, पण कंपनी भारतीय, कंत्राटं भारतीय राज्य सरकारांची, मग यात अमेरिका कुठून आली? अटक वॉरंट काढायचा अधिकार त्यांना कुणी दिला? हे भारतीय सार्वभौमत्वाला चॅलेंज नाही का? की यातही परत आंतरराष्ट्रीय राजकारणच आहे? अडाणी हिंडेनबर्ग मधून सुटले म्हणून हा नवीन आरोप?
  • Log in or register to post comments

तिथे न्याय्य पद्धती आहे. :)

अमरेंद्र बाहुबली
Fri, 11/22/2024 - 14:14 नवीन
तिथे न्याय्य पद्धती आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

समज नसेल तर फक्त अडाणी

टीपीके
Fri, 11/22/2024 - 14:18 नवीन
समज नसेल तर फक्त अडाणी गोत्यात येतात म्हणून काहीही फालतू बोलू नका आणि स्वतःचे हसे करून घेऊ नका. फक्त मोदींना शिव्याच घालायच्या असतील तर वरील वाक्यात मी २ -३ फुलटॉस दिले आहेत त्यांचा वापर करून मारा सिक्स. (जर समजले तर )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अटक वॉरंट काढायचा अधिकार

शाम भागवत
Fri, 11/22/2024 - 14:20 नवीन
अटक वॉरंट काढायचा अधिकार त्यांना कुणी दिला?
ते कोणताही देश करू शकतो हो. आपणही पन्नूविरोधात काढलं असेलच की. अनेक पाकिस्तानी अतिरेक्यांविरूध्द नक्कीच काढलं असेल. त्याला महत्व नाही. कोर्टाच्या मागे लपून, अमेरिका त्या अटक वॉरंटमागे आपली ताकद उभी करू शकते. त्यामुळे त्या अटक वॉरंटला महत्व येतं किंवा द्यायला लागतं असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments

काहीही

टीपीके
Fri, 11/22/2024 - 15:19 नवीन
काहीही अहो फिर्यादी कोण आहे? त्याला फिर्याद करायचा हक्क आहे का? असेल तर कुठे? गुन्हा कुठे घडला हे पण प्रश्न आहेत ना? जितके मला समजले त्या प्रमाणे, अडाणीने अमेरिकन बाजारातून पैसे उभे केले पण त्या वेळी पुरेशी माहिती दिली नाही किंवा चुकीची माहिती दिली त्यामुळे अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली किंवा त्यांचे नुकसान झाले म्हणून ही केस आहे. खरं तर लाच देणाऱ्याबरोबर घेणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, पण अमेरिका फक्त त्यांच्या गुंतवणूकदारांचा विचार करते आहे (आणि ते तितकेच करू शकतात कारण लाच घेणारा त्यांच्या जुराडिक्शन मध्ये येत नाही) म्हणून फक्त अडाणीचे नाव. लाच घेण्याऱ्यावर भारत सरकार गुन्हा दाखल करू शकते. अमेरिकेकडे जर पुरावे असतील तर अडाणीला नक्कीच शिक्षा व्हायला पाहिजे. आणि भारत सरकारने लाच घेणाऱ्यांवर तेच पुरावे वापरून भारतात गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि शिक्षा केली पाहिजे. पण लाच घेणारी, विरोधकांची सरकारे असल्याने विरोधक लाच घेणाऱ्याबद्दल बोलणार नाहीत. त्यांची डबल ढोलकी ते निर्लज्जपणे बडवत राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

विशेष म्हणजे अदानीने लाच दिली

अमरेंद्र बाहुबली
Fri, 11/22/2024 - 14:30 नवीन
विशेष म्हणजे अदानीने लाच दिली हे चूक केले असे कुठल्याही अंधभक्ताला वाटलेले नाहीये. :)
  • Log in or register to post comments

:)

शाम भागवत
Fri, 11/22/2024 - 14:32 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

:-)

चौथा कोनाडा
Fri, 11/22/2024 - 15:30 नवीन
:-) विनोद तावडे क्याश वाटप प्रकरण .. यात समेट झाला की काय ? नुसते आरोप आणि स्पष्टीकरण पत्रकार परिषद ... पुढं काय झालं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ट्रंपला पहिल्यांदा निवडून

कंजूस
Fri, 11/22/2024 - 14:32 नवीन
ट्रंपला पहिल्यांदा निवडून आणण्यात रशियाचा हात होता. कार्यक्रमाचे कोडींग करण्यात भारतीय कंपन्यांचा सहभाग(१३) होता म्हणे. त्यांना बाईडनने बाद करवले. मग आता पुन्हा मतदार ट्रंपला का निवडतात? - अंधुक भक्त.
  • Log in or register to post comments

एक जुनी आठवण. एनरॉनसाठी

श्रीगुरुजी
Fri, 11/22/2024 - 14:38 नवीन
एक जुनी आठवण. एनरॉनसाठी अमेरिकेच्या रिबेका मार्क यांनी भारतात येऊन कोणाला तरी ५० कोटी दिल्याचे जानूमस्तिष्क अनुयायांना स्मरत नसेलच.
  • Log in or register to post comments

बाळासाहेब ठाकरे, यांनी ती जादू केली होती...

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 12:30 नवीन
समुद्रात बुडालेली Enron बाहेर काढली... बाळासाहेब ठाकरे फार मोठे जादूगार होते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मनोरंजक प्रतिसाद.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 12/07/2024 - 14:13 नवीन
मनोरंजक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 15:10 नवीन
जरा इतिहास वाचा... बाय द वे, हे असे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे किती दिवस चालणार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक…..

अमरेंद्र बाहुबली
Sat, 12/07/2024 - 16:20 नवीन
मनोरंजक…..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 16:26 नवीन
तुम्हाला पण तो किस्सा माहीत आहे, हे वाचून बरे वाटले... बाय द वे, एक रुपयाची झुणका भाकर कधी खाल्ली आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

१. अदानी वर आरोप करायची

भीमराव
Fri, 11/22/2024 - 14:51 नवीन
१. अदानी वर आरोप करायची परवानगी अमेरिका कोर्टाने बायडन सरकारच्या वकिलाला दिली आहे, अदानी अजुन दोषी आढळला नाही. २. अमेरिका येथील न्यायव्यवस्था आपल्या पेक्षा भारी किंवा वरचढ आहे म्हणून अदानी वर खटला तिथं चालू नाही, अमेरीकन गुंतवणूकदांची गुंतवणूक अदानी मधे होती ती धोक्यात आली आहे म्हणून खटला सुरू आहे. ३. यात सगळ्यात हिंडेनबर्ग चा सहभाग लपलेला नाही. अदानी वर हिंडेनबर्ग चे आरोप झाले तेव्हा म्हणावा असा आर्थिक फायदा हिंडेनबर्ग ला झाला नाही, त्यावेळी त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये अदानी ला नुकसान होईल असे भाकीत केले होते.
  • Log in or register to post comments

कमीत कमी शब्दांत जास्तीत

शाम भागवत
Fri, 11/22/2024 - 15:02 नवीन
कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय मांडला आहे. तीन ओळीत वस्तूस्थिती स्पष्ट होते आहे. धन्यवाद. 🙏
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

एक शक्यता अशीही आहे की,

शाम भागवत
Fri, 11/22/2024 - 15:14 नवीन
एक शक्यता अशीही आहे की, बायडेन सरकारचा युनूस सरकारला पाठींबा आहे. अडानीने बांगला देशची वीज तोडली. मग अदानीच्या अमेरिकेतील धंद्याला त्रास होईल असं काहीतरी करायचं. डाव प्रतिडाव. ट्रंप सरकार आल्यावर अमेरिकेत गुंतवणूक करण्याबाबत अदानी बोलले होते. पण या समन्समुळे अदानींंना अमेरिकेत पैसे उभे करणे अवघड जाऊ शकेल. या पध्दतीने मग अदानींना बार्गेनिंगच्या टेबलावर आणायचा प्रयत्न असू शकतो. शेवटी कोणते तरी हितसंबंध असल्याशिवाय हे घडलेले नसणार. वेळ जात नाहीये तर जिंकणाऱ्या ट्रंपच्या मित्रांना करा ट्रोल असा काही प्रकार नक्कीच नसणार.
  • Log in or register to post comments

खरे आहे

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 11/22/2024 - 15:39 नवीन
शेवटी कोणते तरी हितसंबंध असल्याशिवाय हे घडलेले नसणार
१००%. अमेरिकन सरकार काय किंवा कंपन्या काय, नैतिकता,तत्वनिष्ठा.. सोयीनुसार वापरतात. अमेरिकेत पुर्वी किकबॅक हा शब्द लोकप्रिय होता. कोकाकोला,पेप्सी,औषधी कंपन्या ह्या सर्वानी दक्षिण अमेरिकेत धंद्यासाठी नितीमत्ता गुंडाळून ठेवली होती. शिवाय अमेरिकेत न्यायाधीशाची नियुक्तीही राजकारणी करतात असे वाचले आहे. सौर उर्जेच्या कंत्राटांमध्ये जिकडे अदानी जिंकले तेथे कोणत्या कंपन्या स्पर्धक होत्या ते पाहिले तर अंदाज येऊ शकेल. असो. आता महाराष्त्रातील निकाल लागले की मग हा मुद्दा चर्चेला येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

सौर उर्जेच्या कंत्राटांमध्ये

शाम भागवत
Fri, 11/22/2024 - 15:55 नवीन
सौर उर्जेच्या कंत्राटांमध्ये जिकडे अदानी जिंकले तेथे कोणत्या कंपन्या स्पर्धक होत्या ते पाहिले तर अंदाज येऊ शकेल.
स्पर्धक कंपन्यांची शक्यता मला तरी वाटत नाही. स्पर्धक कंपन्या एवढ्या काही मोठ्या नसतीत की त्या उगवत्या ट्रंपला पुढची ४ वर्षे पुरून उरून उरतील. त्याचा विरोध पत्करूनही आपला धंदा आरामात करू शकतील. कारण साधारणत: व्यावसायीक कंपन्या उगवत्या सूर्याला सुरवातीपासूनच विरोध करायला लागतील हे संभवत नाही. बायडेन जेंव्हा आले तेंव्हा त्यांनी हे केले असते तर हा मुद्दा पटण्यासारखा होता. त्यामुळे यामागे जास्ती मोठे कारण असले पाहिजे. मोठी शक्ती कार्यरत असली पाहिजे. जसे की डीप स्टेट किंवा सद्याचे अमेरिकन धोरणातील अडथळे दूर करणे वगैरे.
  • Log in or register to post comments

हा अदानी कुठेना कुठे काहीना

अमरेंद्र बाहुबली
Fri, 11/22/2024 - 16:01 नवीन
हा अदानी कुठेना कुठे काहीना काही गैरउद्योग करतच असतो, आपल्या पैशाने सरकार बसलंय हे त्याला माहित आहे त्यामुळे कारवाईची भीतीही नाही. भाजप पक्ष अडाणीच्या पैशांनी मिंधा झाला आहे. त्यामुळे भारत सरकार ह्या अडाणीच्या गैरकृत्यांवर कारवाई करेल ही शक्यता शून्य. अमेरिका आरकार कारवाई करतंय ह्याचं मी एक भारतीय म्हणून स्वागत करतो. अमेरिकेने ह्याच्या नांग्या ठेचाव्यात. हा महाराष्ट्रात सरकार बनवायच्या उद्योगासाठी लुडबुड करत असतो म्हणे. कुठे ते खानदानी अंबानी कुटुंब नी कुठे हे….
  • Log in or register to post comments

:)

शाम भागवत
Fri, 11/22/2024 - 16:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 12:32 नवीन
पैशाने भारतीय सरकार स्थापन करणे इतके सोपे आहे तर.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अहो अबा, हे अंबानी आपल्या

टीपीके
Sat, 12/07/2024 - 13:19 नवीन
अहो अबा, हे अंबानी आपल्या दृष्टीने खानदानी कधी झाले? इतके वर्ष तर आपण त्यांना शिव्या देत होतो ना? आपणच त्यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली होती ना? तुम्ही पण देशद्रोही झालात का? मनुवादी झालात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आपण? मी नव्हतो ब्वा त्यात.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 12/07/2024 - 14:14 नवीन
आपण? मी नव्हतो ब्वा त्यात. तुम्ही किंवा तुमचे कुटुंब असेल तर मला माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

अहो, असे काय करता, साहेबांनीच

टीपीके
Sat, 12/07/2024 - 14:59 नवीन
अहो, असे काय करता, साहेबांनीच निलंबित वाझेना परत नियुक्त केले होते ना. मग त्याने ती गाडी ठेवली खंडणीसाठी. उघडकीला आले तेव्हा आपण पहिल्यांदा त्याला वाचवायचा प्रयत्न केला? मग त्याने त्याच्याच मित्राचा खून केला आपला गुन्हा लपवायला. असे कसे विसरता तुम्ही. आणि आपण म्हणतो तेव्हा मी आपल्या दोघांच्या राजकीय पक्षाबद्दल बोलतोय. बरं नसेल सांगायचे तर सोडून द्या. उगाच तुम्हाला माझी अडचण नको बाय द वें मी तुमच्या सांगण्याप्रमाणे माझा upi आयडी बनवला आहे, migulam_178359@ybl. माझा नोव्हेंबर चा आलाऊन्स कधी मिळणार? उरलेले गुलामीचे, खोटे बोलण्याचे ट्रेनिंग कधी देणार तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

४० पैसे प्रतिपोस्ट. प्रतशाखेत

अमरेंद्र बाहुबली
Sat, 12/07/2024 - 16:21 नवीन
४० पैसे प्रतिपोस्ट. प्रतशाखेत बालिश खेळ खेळायला जमा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

नाही हो, तिथे काहीच पैसे आणि

टीपीके
Sat, 12/07/2024 - 23:48 नवीन
नाही हो, तिथे काहीच पैसे आणि ट्रेनिंग नाही मिळाले. म्हणून तुमच्याकडे आलो. पण 40 पैसै खूप कमी नाही वाटत? म्हणून तुम्ही इतके फालतू प्रतिसाद देता का? चला ते जाऊ दे, अंबानिंचे बोला ना, तिकडे काय गेम झाला? आता ते वंदनीय कसे झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

परमपूज्य राहुल गांधी पण अंबानी विषयी मूग गिळून आहेत.

मुक्त विहारि
Mon, 12/09/2024 - 03:24 नवीन
आता, परमपूज्य, राहुल गांधी जर गप्प बसले असतील तर, गुलाम पण गप्पच बसणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

राजकारण

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 11/22/2024 - 16:12 नवीन
राजकारण आणि त्या 'सोरोस'च्या थियर्या बाजुला ठेवू. आपली 'सेबी' काय करत आहे? हिंडेनबर्ग प्रकरणातही सेबीने हात झटकले होते. अदानीने भारतात लाच दिली आहे असा आरोप आहे. Adani gave bribes to high ranking govt officials. हे विधान दुसर्या देशाने करणे गंभीर नाही का ?निदान तोंडदेखलेपणासाठी तरी सेबीने 'प्रकरण गंभीर आहे. चौकशी करू' असे तरी म्हणायला काय हरकत आहे? कारण ते आरोप तेथील न्यायालयाला पटले आहेत. मुख्य म्हणजे दुसरा देश तुमच्या देशावर/व्यवस्थेवर लाचखोरीचे आरोप करत आहे. किती दिवस अशी उडवाउडवी करणार? उद्या अदानीने भारतात चार खून केले आहेत, असा आरोप अमेरिकेने केला तरीही गप्पच बसणार का?
  • Log in or register to post comments

माई, भाजप सरकार अडाणीच्या

अमरेंद्र बाहुबली
Fri, 11/22/2024 - 16:20 नवीन
माई, भाजप सरकार अडाणीच्या पैश्यानी बसलंय. त्यामुळे भाजप पक्ष अडाणीचा मिंधा आहे. भाजप सरकारात निवडणूक आयोग, इडी, सीबीआय, गृहखाते ह्याना किती स्वायत्तता आहे हे आपल्याला माहित आहेच. अश्या काळात सेबीने कारवाई करावी अशी अपेक्षा काशिकाय? सेबी स्वायत्त आहे असे समजणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे. भारताला फुकट नाही पाश्चात्य देश बनाना रिपब्लिक म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 12:35 नवीन
ED, Election Commission, CBI ह्या स्वायत्त संस्था आहेत... त्यात गृहखाते ऍड करू नये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ज्या राज्यात बिजेपीची सत्ता

आग्या१९९०
Fri, 11/22/2024 - 17:56 नवीन
ज्या राज्यात बिजेपीची सत्ता आहे त्यांना अदानी लाच कशाला देईल? मोटा भाय कशासाठी बसलाय? बिच्चारे! भ्रष्टाचारी विरोधी पक्षांनी अदानीकडून पैसे घेतले असतील तर त्यांची चौकशी करण्यास राहुल गांधींनी विरोध कुठे केलाय? राज्य सरकारे दोषी असतील तर अदानीही दोषी ठरतो. संबित पात्राने सेल्फ गोल केलाय हे त्याच्या उशीरा लक्षात आले.
  • Log in or register to post comments

गुंतवणूकीसंबंधी वाद कोणत्या

कंजूस
Fri, 11/22/2024 - 18:42 नवीन
गुंतवणूकीसंबंधी वाद कोणत्या कोर्टात चालेल हे कंपनीच्या स्थापनेच्या किंवा तिचा उपक्रम कोणत्या नावाने कुठे सुरू झाला त्यात विशद असते. ते कुणाला माहीत झाले का? अदानी ग्रीनचे मुख्य नोंदणीकृत कार्यालय किंवा उपक्रमाची जागा जिथे आहे तिथे असे असू शकते. अमेरिकेतल्या कोर्टात हा खटला चालू शकतो का?
  • Log in or register to post comments

जनाची नाही तर मनाची लाज वाटत

आग्या१९९०
Fri, 11/22/2024 - 19:09 नवीन
जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर भारतात चालू शकतो. निदान विरोधी पक्षांच्या राज्यांविरुद्ध नक्कीच चालवता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

निदान विरोधी पक्षांच्या

अमरेंद्र बाहुबली
Fri, 11/22/2024 - 19:37 नवीन
निदान विरोधी पक्षांच्या राज्यांविरुद्ध नक्कीच चालवता येईल. लाच देणे हा देखील गुन्हा असल्याने सरकारचे हात बांधले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

खरे आहे

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 11/22/2024 - 19:56 नवीन
खरे आहे. आता 'बटेंगे तो कटेंगे' चे नारे वॉट्स-अ‍ॅपवर कधी फिरायला लागतील ते बघुया. उदय निरगुडकर्/अविनाश धर्माधिकारी सारखे विद्वान काय थियरी मांड्तात ते बघुया. भाउ तोरसेकर/आबा माळकर ह्यांचे व्हिडोयोज पाहणे बंद केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी आत्ता जरा माहीती मिळवली

शाम भागवत
Fri, 11/22/2024 - 23:32 नवीन
मी आत्ता जरा माहीती मिळवली त्यानुसार लाच कुणी दिली नाहीये व कुणी घेतलीही नाहीये. लाचेची ऑफर दिली हा दोषारोप केलाय. वॉरंट व समन्स या दोन्हीला अमेरिकेत वॉरंटच म्हणतात. त्यामुळे आणखीनच गोंधळ उडाला आहे. समन्स बजावायला पाहिजे की नाही हे अमेरिकेत ज्युरी ठरवतात. मग त्यानुसार जज्ज निर्णय घेतो. त्यामुळे ११ पैकी कमीतकमी ६ ज्युरींना अदानींना त्यांची बाजू मांडायच समन्स बजावायला हवं असं वाटलं. मग जज्ज साहेबांनी समन्स बजावलं. हे ज्युरी कायद्यातले तज्ञ वगैरे असत नाहीत. तर मस्तच राजकारण चाललंय. असो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा