अदानी,उर्जा आणि अमेरिका
अमेरिकेत गौतम अदानी ह्यांच्याविरोधात वॉरंट निघाले आणि भारतात एकच खळबळ माजली. दोषारोपात(INDICTMENT) गौतम अदानी आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतातील चार राज्यांत २००० कोटींची लाच दिली होती. अदानी एनर्जीची सौर उर्जा ह्या राज्यांनी विकत घ्यावी म्हणून ही लाच २०१९ ते २०२४ ह्या काळात दिली गेली. अर्थात हे आरोप आहेत पण त्याचे पुरावे देखील देण्यात आले आहेत असे समजते.https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline
लगेच राहुल गांधी ह्यांनी अदानीना अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. ही चार राज्ये- छत्तीसगड, आंध्र प्रदेश,तामिळ नाडु आणि ओडिशा. ह्यात सर्वाधिक लाच,१२५० कोटी, आंध्रप्रदेशमध्ये २०१९-२०२४ मध्ये देण्यात आली होती असा आरोप आहे. रोख अर्थात जगन मोहन रेड्डि ह्यांच्यावर आहे. कारण मुख्य्मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय अशी मोठी कंत्राटे मंजूर केली जात नाहीत.
आता ह्यावरुन राजकारण तापणार होतेच. भाजपातर्फे ह्या सगळ्या मागे 'जॉर्ज सोरोस'च आहेत असे ठामपणे सांगण्यात आले. खरे तर हे असे बोलायची गरजच नव्हती. कारण ह्या चारही राज्यांमध्ये तेव्हा भाजपा सत्तेवर नव्हता. पण 'पाश्चिमात्य देशांना भारताचे बरे झालेले बघवत नाही' ही थियरी अनेक मध्यम वर्गीयांना सहज पटते. 'चारही राज्यांतील तत्कालीन अधिकार्यांची चौकशी करा' असे सांगितले असते तरी हरकत नव्हते पण अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो.
मुख्य प्रवाहातील चॅनेल्सनी सावध पवित्रा घेत बातमी दिली आहे. मराठी चॅनेल्सवर तर बोलायलाच नको. 'दादा निवडुन येणार की भाउ की अण्णा' ह्यातच ती रमली आहेत.
अदानी आणि ट्रम्प ह्यांचे चांगले संबंध आहेत असे बोलले जाते. ट्रम्प निवडुन आल्यावर अदानी ह्यांनी ट्रंप ह्याच्या 'धैर्य आणि चिकाटीचे' कौतुक केले होते. १३ नोव्हेंबरला अमेरिकेत मोठी गुण्तवणुक करण्याची घोषणाही केली होती.
In his congratulatory post, Mr Adani said, "If there is one person on Earth who stands as the embodiment of unbreakable tenacity, unshakeable grit, relentless determination and the courage to stay true to his beliefs, it is Donald Trump."
ट्रम्प सत्तेवर यायच्या आत अदानीला अडकवायचे असा प्लान बायडेन सरकारमधील लोकांचा होता आणि तो यशस्वी झाला असेही म्हंटले जाते. आता ट्रम्प ह्यांनी शपथ घेतल्यावर ते ह्या दोषारोपाला आणि संबंधीत अधिकार्यांना कसे बाजुला काढतील ते पहावे लागेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हम्म
अदानीने भारतात लाच दिली आहे
इकडे स्पष्ट सांगितले आहे.
अदानीला काकांची शिकवणी लावणे
अदानीला काकांची शिकवणी लावणे अतिशय गरजेचे आहे.प्रत्येक गोष्टीत मोदीना गोवणे चुकीचे आहे हे सांगून खाली बसतो.मनोरंजक प्रतिसाद....
मनोरंजक प्रतिसाद
मनोरंजक प्रतिसाद....
मनोरंजक प्रतिसाद.
https://i.ibb.co/Gk17XZR
:)
मम आत्मनः श्रुती स्मृती
महाराष्ट्र अदानीने सॉरी
PENPENCILDRAW हे काय आहे?
पेन पेन्सिल ड्रा
अमेरिकी कोर्टात अदानीच काहीही
आणि मी शेअर्स घेऊन बसलोय.
छे. आज वरच गेला.
अप्पर सर्किट :)
अभ्यासू प्रतिसाद...
मनोरंजक प्रतिसाद.
मनोरंजक प्रतिसाद....
साधे गल्लीतल्या रस्त्याचे
हा हा हा
साधे गल्लीतल्या रस्त्याचे
यासाठीच पुढे लिहिले आहे
+१
सकाळ वॄत्तपत्र अदानींच्या बाजुने उभे
हा हा
पवारांच्या शिष्याने अदानीला
अकबर बिरबलाचा एक किस्सा होता
कोणतेही सरकारी काम हे
कोणतेही सरकारी काम हे
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे.एमसी लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?कोणतेही सरकारी काम हे
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे.सुधारीत मग लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?गेली ७५ वर्षे दारूबंदी खाते
कोणतेही सरकारी काम हे
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे.बाकी भाजपची सत्ता असली की असे साक्षात्कार होतात. :) उद्या अदानीने कुणाचं मुडदा पाडला की कोणतेही सरकारी काम हे असे मुडदे पाडल्याशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. असे म्हणू नका म्हणजे झाले. माणूस चुकीचा असला पण तरीही “आपला” असला तर त्याच्या गैरकृत्यांचे कसे समर्थन होऊ लागते ह्याचे डॉ. साहेबांचे हे वाक्य दाखवून देते. :) छान प्रगती. आयरणीच्या देवा:)उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक
भ्रष्टाचाराचे समर्थन करायचे
उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक
तुम्ही अभ्यास वाढवूनही
भुजबळ बुवा
कोणतेही सरकारी काम हे
कोणतेही सरकारी काम हे
आपन अदानीच्या समर्थनात ते
एखादे सत्य लिहिणे हे त्याचे
इंदिरा गांधी की राजीव गांधी
मग लाचलुचपत विभाग कशासाठी
बोफोर्स मध्येही काही सापडले
घाईघाईने क्वात्रोकीमामाला
विरोधी पक्षांची त्यांची
विरोधी पक्षांची त्यांची
विरोधी पक्षांची त्यांची सरकारे आल्यावर पुरावे जमा करून आणायचा होता स्विडनवर दबावपुरावे पूर्ण नष्ट करून आरोपीला सुखरूप देशाबाहेर पाठवून दिल्यानंतर विरोधी पक्षांचे सरकार आले.टू जी घोट्याळातही काहीही सापडले नाही. सिब्बल सुरुवातीपासूनच सांगत होते, सरकारचे एक पैशाचे नुकसान झाले नाही.सिब्बल थापाड्या आहे. तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री होता व आरोपींचा वकील होता. १ रूपयाचा सुद्धा तोटा झाला हे तो मान्य करणार होता का? २००७ मध्ये २ जी तरंगलहरी आपल्या पाठिराख्यांना खिरापतीसारख्या वाटल्यानंतर सरकारला जेमतेम ७,५०० कोटी मिळाले होते. पण २०१४ मध्ये मोदी आल्यानंतर न्यायालयाने ते वाटप रद्द करून लिलाव करायला लावला ज्यातून १,००,००० कोटीहून अधिक महसूल मिळाला. २०११ मध्ये उच्च न्यायालयात खटला सुरू झाला. मे २०१४ पर्यंत मनमोहन सरकार होते. ३ वर्षांच्या कालावधीत व्यवस्थित पुराव्यांच्या फाईल्स गहाळ करण्यात आल्या. कोळसा खाणी घोटाळ्याच्या फाईल्स सुद्धा मे २०१४ पूर्वी अशाच गहाण केल्या होत्या.