✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अदानी,उर्जा आणि अमेरिका

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Fri, 11/22/2024 - 11:37  ·  लेख
लेख
अमेरिकेत गौतम अदानी ह्यांच्याविरोधात वॉरंट निघाले आणि भारतात एकच खळबळ माजली. दोषारोपात(INDICTMENT) गौतम अदानी आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतातील चार राज्यांत २००० कोटींची लाच दिली होती. अदानी एनर्जीची सौर उर्जा ह्या राज्यांनी विकत घ्यावी म्हणून ही लाच २०१९ ते २०२४ ह्या काळात दिली गेली. अर्थात हे आरोप आहेत पण त्याचे पुरावे देखील देण्यात आले आहेत असे समजते.https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline लगेच राहुल गांधी ह्यांनी अदानीना अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. ही चार राज्ये- छत्तीसगड, आंध्र प्रदेश,तामिळ नाडु आणि ओडिशा. ह्यात सर्वाधिक लाच,१२५० कोटी, आंध्रप्रदेशमध्ये २०१९-२०२४ मध्ये देण्यात आली होती असा आरोप आहे. रोख अर्थात जगन मोहन रेड्डि ह्यांच्यावर आहे. कारण मुख्य्मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय अशी मोठी कंत्राटे मंजूर केली जात नाहीत. आता ह्यावरुन राजकारण तापणार होतेच. भाजपातर्फे ह्या सगळ्या मागे 'जॉर्ज सोरोस'च आहेत असे ठामपणे सांगण्यात आले. खरे तर हे असे बोलायची गरजच नव्हती. कारण ह्या चारही राज्यांमध्ये तेव्हा भाजपा सत्तेवर नव्हता. पण 'पाश्चिमात्य देशांना भारताचे बरे झालेले बघवत नाही' ही थियरी अनेक मध्यम वर्गीयांना सहज पटते. 'चारही राज्यांतील तत्कालीन अधिकार्यांची चौकशी करा' असे सांगितले असते तरी हरकत नव्हते पण अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो. मुख्य प्रवाहातील चॅनेल्सनी सावध पवित्रा घेत बातमी दिली आहे. मराठी चॅनेल्सवर तर बोलायलाच नको. 'दादा निवडुन येणार की भाउ की अण्णा' ह्यातच ती रमली आहेत. अदानी आणि ट्रम्प ह्यांचे चांगले संबंध आहेत असे बोलले जाते. ट्रम्प निवडुन आल्यावर अदानी ह्यांनी ट्रंप ह्याच्या 'धैर्य आणि चिकाटीचे' कौतुक केले होते. १३ नोव्हेंबरला अमेरिकेत मोठी गुण्तवणुक करण्याची घोषणाही केली होती. In his congratulatory post, Mr Adani said, "If there is one person on Earth who stands as the embodiment of unbreakable tenacity, unshakeable grit, relentless determination and the courage to stay true to his beliefs, it is Donald Trump." ट्रम्प सत्तेवर यायच्या आत अदानीला अडकवायचे असा प्लान बायडेन सरकारमधील लोकांचा होता आणि तो यशस्वी झाला असेही म्हंटले जाते. आता ट्रम्प ह्यांनी शपथ घेतल्यावर ते ह्या दोषारोपाला आणि संबंधीत अधिकार्यांना कसे बाजुला काढतील ते पहावे लागेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22366 वाचन

💬 प्रतिसाद (143)

प्रतिक्रिया

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 11/23/2024 - 08:26 नवीन
https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline इकडे स्पष्ट सांगितले आहे. अदानी आणि त्यांचे सहकारी कधी/कुठे भेटले. लाच कशी द्यायची,कोणत्या मार्गाने द्यायची.. ह्याचे पॉवर पॉइट सादरकरणही बनवण्यात आले. त्या आरोप्पत्रात तारीख-वार सगळे तपशील देण्यात आले आहेत. ह्यात राजकारण कुठे आले? आरोप हे आरोप असतात. अदानी आणि त्यांचे सहकारी "असे काहीही घडलेले नाही" असे सांगतील का? नाही वाटत कारण एफ बी आय ने त्यांचे एस एम एस आणी ईतर संभाषणही टॅप करुन ठेवले असणार. ह्याची खात्री अदानी ह्यांना आहे. म्हणून ते आता गप्प राहतील आणि ट्रम्प ह्यांनी शपथ घेतली की मग न्यूयॉर्कमधील मग हरीश साळवेंसारखा वकिल नेमतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अदानीने भारतात लाच दिली आहे

शाम भागवत
Tue, 11/26/2024 - 09:48 नवीन
अदानीने भारतात लाच दिली आहे असा आरोप आहे.
हे तुमचे म्हणणे आहे. मी म्हणालोय की लाच देण्याघेण्याचा प्रत्यक्ष व्यवहार झालेली नाही. तर फक्त लाच देण्याचे ठरलाय. मी ही वस्तुस्थिती फक्त पुढे आणलीय. 😁 पण एवढे सगळे पुरावे असताना भारतात केस दाखल करायची सोडून अमेरिकेत केली. त्यामुळे राजकारणाचा वास यायला लागला. तसं असेल तर अमेरिकेला काय साधायचं असेल ते शोधण्याचा प्रयत्न केला. 😁
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

इकडे स्पष्ट सांगितले आहे.

संजय खांडेकर
Tue, 12/03/2024 - 16:09 नवीन
इकडे स्पष्ट सांगितले आहे. अदानी आणि त्यांचे सहकारी कधी/कुठे भेटले. लाच कशी द्यायची,कोणत्या मार्गाने द्यायची.. ह्याचे पॉवर पॉइट सादरकरणही बनवण्यात आले. इतके पुरावे बनून लाच देण्यात येते? अदानीला काकांची शिकवणी लावणे अतिशय गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अदानीला काकांची शिकवणी लावणे

अमरेंद्र बाहुबली
Tue, 12/03/2024 - 16:14 नवीन
अदानीला काकांची शिकवणी लावणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीत मोदीना गोवणे चुकीचे आहे हे सांगून खाली बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय खांडेकर

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 12:37 नवीन
अरेरे, आपल्याला "काका" पण माहीत नाहीत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद

अमरेंद्र बाहुबली
Sat, 12/07/2024 - 14:17 नवीन
मनोरंजक प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 15:12 नवीन
तुम्हाला धड "काका" पण माहीत नाहीत. बाय द वे, हे असे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे किती दिवस चालणार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 12/07/2024 - 16:22 नवीन
मनोरंजक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

https://i.ibb.co/Gk17XZR

आंद्रे वडापाव
Tue, 11/26/2024 - 08:34 नवीन
https://i.ibb.co/Gk17XZR/Screenshot-20241125-152139-Chrome.png मम आत्मनः श्रुती स्मृती पुरणोक्त सत्ता फल प्राप्यऱर्थ प्रधान पद प्रित्यर्थ अहं अंधत्वकर्णबधिरत्वंच धारणमं करिष्ये
  • Log in or register to post comments

:)

शाम भागवत
Tue, 11/26/2024 - 09:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

मम आत्मनः श्रुती स्मृती

आंद्रे वडापाव
Tue, 11/26/2024 - 08:34 नवीन
Image removed. मम आत्मनः श्रुती स्मृती पुरणोक्त सत्ता फल प्राप्यऱर्थ प्रधान पद प्रित्यर्थ अहं अंधत्वकर्णबधिरत्वंच धारणमं करिष्ये
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र अदानीने सॉरी

अमरेंद्र बाहुबली
Tue, 11/26/2024 - 16:05 नवीन
महाराष्ट्र अदानीने सॉरी भाजपने जिंकला असल्याने अदानीला चांगलाच दिलासा मिळालेला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

PENPENCILDRAW हे काय आहे?

कानडाऊ योगेशु
Tue, 11/26/2024 - 20:26 नवीन
PENPENCILDRAW हे काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

पेन पेन्सिल ड्रा

शाम भागवत
Wed, 11/27/2024 - 04:02 नवीन
पेन पेन्सिल ड्रा पेन व पेन्सिलने काढलेले चित्र मी तरी असा अर्थ लावलाय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

अमेरिकी कोर्टात अदानीच काहीही

सुबोध खरे
Tue, 11/26/2024 - 20:00 नवीन
अमेरिकी कोर्टात अदानीच काहीही होणार नाही. अजून नुसता आरोप केलाय तो सिद्ध व्हायला भरपूर वेळ जाईल. मुळात ट्रम्प साहेबांवर दोषारोप सिद्ध होऊन सुद्धा ते अध्यक्ष होणार आहेत आणि हे खटले ४ वर्षे बासनात राहणार आहेत . तेंव्हा अडाणी यांचं अमेरिकेत काहीही होणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे. For the US to bring Adani to trial, extradition is key. The US has jurisdiction ONLY over crimes that occur on US soil or against US citizens. For extradition to take place, the alleged crime must be considered illegal in both the US and India. Apart from that, the US must present sufficient evidence to Indian authorities. The Indian authorities would then evaluate the request under domestic laws and the treaty’s terms, and Indian courts may be tasked with conducting hearings to decide if the evidence supports extradition. बसा बैलाच्या खाली दूध काढायला Extradition can be denied under certain conditions, such as if the charges are political, human rights concerns exist, or the evidence is insufficient. कसाबला पकडून पूर्ण खटला चालवून तुम्ही फाशी दिली पण अजूनही पाकिस्तान पुरावा द्या म्हणून सांगतंय कि. तो पनून तेथे बसून भारतविरोधी वक्तव्ये करतोय त्यासाठी रेड कॉर्नर नोटीस नाकारली गेली आहे. भारताची विनंती अमेरिका मान्य करत नाहीये तर भारत त्यांची विनंती का मान्य करेल भारत अमेरिकेला अदानी बाबतीत भीक घालेल असं कुणाला वाटत असेल तर ती बालबुद्धी असेल If the case proceeds, it would lead to a trial where prosecutors must prove guilt beyond a reasonable doubt. https://www.indiatoday.in/india/story/gautam-adani-bribery-case-what-arrest-warrant-by-us-court-could-mean-for-indian-tycoon-2637358-2024-11-21 यातील काहीही होणार नाहीये. तेंव्हा मी फक्त भुजबळांची बिनबुडाची विधाने वाचून हसण्यासाठी पॉपकॉर्न घेऊन बसलोय
  • Log in or register to post comments

आणि मी शेअर्स घेऊन बसलोय.

शाम भागवत
Wed, 11/27/2024 - 04:00 नवीन
आणि मी शेअर्स घेऊन बसलोय. भुजबळांमुळे आणखी खाली येण्याची वाट बघतोय,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

छे. आज वरच गेला.

शाम भागवत
Wed, 11/27/2024 - 15:06 नवीन
छे. आज वरच गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अप्पर सर्किट :)

शाम भागवत
Wed, 11/27/2024 - 15:13 नवीन
अप्पर सर्किट :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अभ्यासू प्रतिसाद...

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 12:40 नवीन
भुजबळांची बिनबुडाची विधाने वाचून हसण्यासाठी पॉपकॉर्न घेऊन बसलोय..... हो ना, त्यांचे प्रतिसाद मनोरंजक असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मनोरंजक प्रतिसाद.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 12/07/2024 - 14:18 नवीन
मनोरंजक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 15:14 नवीन
अगदी अगदी. तुमचे प्रतिसाद मनोरंजक असतात, हे तुम्हीच मान्य केले हे उत्तम... बाय द वे, हे असे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे किती दिवस चालणार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

साधे गल्लीतल्या रस्त्याचे

संजय खांडेकर
Tue, 12/03/2024 - 16:17 नवीन
साधे गल्लीतल्या रस्त्याचे कंत्राट घ्यावयाचे झाले तरी लाच द्यावी लागते, मग असे मोठे प्रकल्प लाच दिल्या / घेतल्याशिवाय मिळतात हि समजूत नक्की कोणत्या भाबड्या बाळांची आहे? प्रत्येक भक्ताला आपले देव हे धुतले तांदूळ आणि दुसऱ्याचे देव हे कोळसाच वाटतात
  • Log in or register to post comments

हा हा हा

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 12/03/2024 - 16:54 नवीन
जगभर उर्जा आणि संरक्षण कंत्राटे लाच दिल्याशिवाय मंजूर केली जात नाहीत हे सर्वाना माहित आहे. सहसा ह्या व्यवहारांचे पुरावे ठेवले जात नाहीत. इकडे पुरावे मिळाले आहेत. एन्रॉन प्रकल्पाला मंजूरी देताना मातोश्री आणि पार्टी विथ डिफ्रन्सवाल्यानी हात धुवुन घेतले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय खांडेकर

साधे गल्लीतल्या रस्त्याचे

आग्या१९९०
Tue, 12/03/2024 - 20:15 नवीन
साधे गल्लीतल्या रस्त्याचे कंत्राट घ्यावयाचे झाले तरी लाच द्यावी लागते, मग असे मोठे प्रकल्प लाच दिल्या / घेतल्याशिवाय मिळतात हि समजूत नक्की कोणत्या भाबड्या बाळांची आहे? नोटाबंदी काळा पैसा आणि भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी केली होती एका भाबड्या बाळानी , त्याला जाब विचारण्यासाठी आपल्या अंगी बळ येवो. ते आले की या इकडे काय म्हणते ते बाळ हे सांगायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय खांडेकर

यासाठीच पुढे लिहिले आहे

संजय खांडेकर
Wed, 12/04/2024 - 09:42 नवीन
यासाठीच पुढे लिहिले आहे "प्रत्येक भक्ताला आपले देव हे धुतले तांदूळ आणि दुसऱ्याचे देव हे कोळसाच वाटतात" कोणताही व्यवसाय हा लाच दिल्या / घेतल्याशिवाय होऊ शकत नाही हे दुपारच्या सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे, जे कोणी भ्रष्टाचार संपवण्याच्या गोष्टी करतात ते स्वतः जास्त भ्रष्टाचार करतात आणि जे गरिबी हटवण्याच्या गप्पा करतात ते फक्त स्वजनांचीच गरिबी हटवतात हे प्रांजळपणे कबूल करण्यास आपली ना नसावी. माझ्या वैम नुसार वरपासून खालपर्यंत प्रत्येक सत्ताकारणी हे शेणातील किडेच आहेत, आणि हे किडे पक्षातीत आहेत , आयते शेण संपल्यावर हे किडे एकमेकांचे शेण देखील आनंदाने खातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/04/2024 - 09:22 नवीन
प्रत्येक भक्ताला आपले देव हे धुतले तांदूळ आणि दुसऱ्याचे देव हे कोळसाच वाटतात. वाह ! नंबर एक. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय खांडेकर

सकाळ वॄत्तपत्र अदानींच्या बाजुने उभे

अनन्त अवधुत
Tue, 12/03/2024 - 21:51 नवीन
सकाळ वॄत्तपत्र अदानींच्या बाजुने उभे वाचून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

हा हा

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 12/04/2024 - 08:49 नवीन
सकाळ्ची मालकी पवार कुटुंबियांकडे आहे. प्रताप पवार हे जाणत्या राजाचे धाकटे बंधू.निबंध लिहिल्यासारख लेख लिहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

पवारांच्या शिष्याने अदानीला

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 09:45 नवीन
पवारांच्या शिष्याने अदानीला वाचवा म्हणूण पवारांचे पाय धरले असावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अकबर बिरबलाचा एक किस्सा होता

कानडाऊ योगेशु
Wed, 12/04/2024 - 09:27 नवीन
अकबर बिरबलाचा एक किस्सा होता आता नीट आठवत नाही पण त्याचे सार असे होते कि बिरबल अकबराला पटवुन देतो कि तू जरी राजा असला तरी खरे राज्य हे व्यापारी चालवतात.सध्याच्या काळात राष्ट्रप्रमुख वा पंतप्रधान त्या त्या राष्ट्राच्या सरकारी संस्थांना एका मर्यादेनंतर प्रमोट करु शकत नाही तेव्हा अदानी अंबानी सारख्या उद्योजकांना पुढे करुन जिथे सरकार डायरेक्ट हस्तक्षेप करु शकत नाही तिथे असे प्रकल्प वगैरे घेतले जातात. इवन स्वातंत्र्यपूर्व काळात व त स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही टाटा बिर्ला सारख्या उद्योजकांवर त्याकाळच्या नेत्यांचा विश्वास होता. आणि त्यांचा वापर करुनच भारताच्या अनेक आता अभिमानास्पद समजल्या जाणार्या प्रोजेक्टची पायाभरणी झाली होती.प्रत्येक सरकारच्या काळात त्या त्या सरकारशी निष्ठा ठेवणार्या उद्योजकांना नेहेमीच प्राथमिकता मिळाली आहे.प्रताप पवारांना हे नक्कीच माहीती असावे.
  • Log in or register to post comments

कोणतेही सरकारी काम हे

सुबोध खरे
Wed, 12/04/2024 - 09:45 नवीन
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. हे अमेरिकेला हि माहिती आहे. त्यांच्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात अनेक वर्षे आहेत. त्यामुळे हे काय आणि कसे चालते हे त्यांना व्यवस्थित माहिती असते. केवळ भारत सरकारला कात्रित पकडण्यासाठी हे अदानीचे लाच देण्याचे प्रकरण काढलेले आहे. परंतु त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे अडणींचे समभाग परत वर आले यावरून सिद्ध झालेले आहे. राफेल राफेल, चौकीदार चोर आहे सारखे अदानी अदानी घोषणा होतील आणि हवेत विरून जातील. यातील काहीही श्री मोदींना चिकटत नाही आणि त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप काही जनतेला मान्य होत नाहीत त्यामुळे विरोधकांचा कायम पोटशूळ उठलेला असतो. तो काही २०२९ पर्यंत (बहुधा २०३४ पर्यंत) शमणार नाही. तेंव्हा करा जे करायचे ते
  • Log in or register to post comments

कोणतेही सरकारी काम हे

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 10:07 नवीन
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. एमसी लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कोणतेही सरकारी काम हे

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 10:07 नवीन
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. सुधारीत मग लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गेली ७५ वर्षे दारूबंदी खाते

सुबोध खरे
Wed, 12/04/2024 - 10:11 नवीन
गेली ७५ वर्षे दारूबंदी खाते काय करत आले आहे? घटनेच्या ४४ व्य कलमात लिहिलेले असूनही गेली ७५ वर्षे समान नागरी कायदा का आला नाही? भुजबळ बुवा उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक गोष्ट टंकण्यापेक्षा अभ्यास वाढवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कोणतेही सरकारी काम हे

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 10:18 नवीन
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. बाकी भाजपची सत्ता असली की असे साक्षात्कार होतात. :) उद्या अदानीने कुणाचं मुडदा पाडला की कोणतेही सरकारी काम हे असे मुडदे पाडल्याशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. असे म्हणू नका म्हणजे झाले. माणूस चुकीचा असला पण तरीही “आपला” असला तर त्याच्या गैरकृत्यांचे कसे समर्थन होऊ लागते ह्याचे डॉ. साहेबांचे हे वाक्य दाखवून देते. :) छान प्रगती. आयरणीच्या देवा:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक

सुबोध खरे
Wed, 12/04/2024 - 10:44 नवीन
उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक गोष्ट टंकण्यापेक्षा अभ्यास वाढवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भ्रष्टाचाराचे समर्थन करायचे

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 12:20 नवीन
भ्रष्टाचाराचे समर्थन करायचे नी वरून इतरानी टंकलेले भंपक म्हणायचे. वाव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक

सुबोध खरे
Wed, 12/04/2024 - 12:24 नवीन
उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक गोष्ट टंकण्यापेक्षा अभ्यास वाढवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुम्ही अभ्यास वाढवूनही

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 12:26 नवीन
तुम्ही अभ्यास वाढवूनही भ्रष्टाचाराचे समर्थन करताय. कुठला अभ्यास करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भुजबळ बुवा

सुबोध खरे
Mon, 12/09/2024 - 19:04 नवीन
भुजबळ बुवा मी भ्रष्टाचाराचे समर्थन कुठे केलेले आहे ते दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. माझ्या प्रतिसादात नसलेला अर्थ काढू नका उगाच फालतू बडबड करण्यापेक्षा हे दाखवून द्या अन्यथा आपली निरर्थक बडबड बंद करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कोणतेही सरकारी काम हे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 12/09/2024 - 19:15 नवीन
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कोणतेही सरकारी काम हे

सुबोध खरे
Mon, 12/09/2024 - 19:23 नवीन
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. हे सत्य आहे यात समर्थन कुठे आहे? वेश्याव्यवसाय जगभर चालतो हे सत्य आहे याचा अर्थ ते समर्थन आहे असा अर्थ तुम्ही काढत असाल तर तुमच्या अकलेची कीव करावी लागेल. साधारण पणे मी कुणाची अक्कल काढत नाही परंतु आपण मला तसे करणे भाग पाडता आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आपन अदानीच्या समर्थनात ते

अमरेंद्र बाहुबली
Mon, 12/09/2024 - 19:42 नवीन
आपन अदानीच्या समर्थनात ते लिहिले. आपला प्रतिसाद आपणच पूर्ण वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एखादे सत्य लिहिणे हे त्याचे

सुबोध खरे
Mon, 12/09/2024 - 20:29 नवीन
एखादे सत्य लिहिणे हे त्याचे समर्थन आहे असा अर्थ आपण काढत असाल तर आपल्या अकलेची कीव करावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

इंदिरा गांधी की राजीव गांधी

Vichar Manus
Wed, 12/11/2024 - 06:07 नवीन
इंदिरा गांधी की राजीव गांधी नी corruption is a global phenomenon ase म्हटले होते . त्यांनी सत्तच सांगितले होते तेव्हा ते भ्रष्टाचराबाबत समर्थन करतात असे म्हटले गेले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मग लाचलुचपत विभाग कशासाठी

संजय खांडेकर
Wed, 12/04/2024 - 10:43 नवीन
मग लाचलुचपत विभाग कशासाठी असतो? बहुदा दिल्या / घेतल्या गेलेल्या लाचेतील आपला वाटा गोळा करून आपल्या खात्याच्या मंत्र्याकडे अतिरिक्त (ठरलेल्या तक्त्या / टारगेट व्यतिरिक्त ) रक्कम पोहोचवण्यासाठी असावा. लाचलुचपत विभाग नक्की कधी कारवाई करू शकतो? फक्त संशयावरून करतो / करू शकतो का ज्याच्या कडून लाच मागितली आहे अशा किंवा ज्याला जबरदस्तीने लाच दिली जात आहे अशा व्यक्तीच्या तक्रारीनंतरच कारवाई करता येते? माफ करा पण अज्ञान आणि अभ्यासाचा कंटाळा असल्यामुळे अशा शंका येतात आणि मिपा वर सर्व दीर्घ / लघु शंकाचे निराकरण होते म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बोफोर्स मध्येही काही सापडले

आग्या१९९०
Wed, 12/04/2024 - 14:48 नवीन
बोफोर्स मध्येही काही सापडले नाही. विरोधी पक्षांचे कामच आहे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे. त्यामुळे सत्ता येतेच भविष्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

घाईघाईने क्वात्रोकीमामाला

श्रीगुरुजी
Wed, 12/04/2024 - 15:00 नवीन
घाईघाईने क्वात्रोकीमामाला भारतातून बाहेर काढून सुखरूप इटलीला पाठवून दिलं, स्वीडन सरकारला पत्र लिहून बोफोर्स प्रकरणाचा तपास लांबणीवर टाकण्यास सांगितले, मामाच्या गोठविलेल्या खात्यातील ४० लक्ष डॉलर्स आपल्या कळसूत्री बाहुल्याला सांगून मुक्त केले, अर्जेंटिनाने पकडल्यानंतर न्यायालयाला व सर्व देशाला अंधारात ठेवून आपल्या सरकारमधील मंत्री पाठवून त्याला सोडविण्याची व्यवस्था केली. काहीच सापडलं नव्हतं तर इतकी लबाडी का केली होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

विरोधी पक्षांची त्यांची

आग्या१९९०
Wed, 12/04/2024 - 15:24 नवीन
विरोधी पक्षांची त्यांची सरकारे आल्यावर पुरावे जमा करून आणायचा होता स्विडनवर दबाव. टू जी घोट्याळातही काहीही सापडले नाही. सिब्बल सुरुवातीपासूनच सांगत होते, सरकारचे एक पैशाचे नुकसान झाले नाही. विरोधी पक्षाचे कामच आहे कसेही करून आपले अस्तित्व टिकवून ठेवणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

विरोधी पक्षांची त्यांची

श्रीगुरुजी
Wed, 12/04/2024 - 15:58 नवीन
विरोधी पक्षांची त्यांची सरकारे आल्यावर पुरावे जमा करून आणायचा होता स्विडनवर दबाव पुरावे पूर्ण नष्ट करून आरोपीला सुखरूप देशाबाहेर पाठवून दिल्यानंतर विरोधी पक्षांचे सरकार आले. टू जी घोट्याळातही काहीही सापडले नाही. सिब्बल सुरुवातीपासूनच सांगत होते, सरकारचे एक पैशाचे नुकसान झाले नाही. सिब्बल थापाड्या आहे. तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री होता व आरोपींचा वकील होता. १ रूपयाचा सुद्धा तोटा झाला हे तो मान्य करणार होता का? २००७ मध्ये २ जी तरंगलहरी आपल्या पाठिराख्यांना खिरापतीसारख्या वाटल्यानंतर सरकारला जेमतेम ७,५०० कोटी मिळाले होते. पण २०१४ मध्ये मोदी आल्यानंतर न्यायालयाने ते वाटप रद्द करून लिलाव करायला लावला ज्यातून १,००,००० कोटीहून अधिक महसूल मिळाला. २०११ मध्ये उच्च न्यायालयात खटला सुरू झाला. मे २०१४ पर्यंत मनमोहन सरकार होते. ३ वर्षांच्या कालावधीत व्यवस्थित पुराव्यांच्या फाईल्स गहाळ करण्यात आल्या. कोळसा खाणी घोटाळ्याच्या फाईल्स सुद्धा मे २०१४ पूर्वी अशाच गहाण केल्या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा