✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अदानी,उर्जा आणि अमेरिका

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Fri, 11/22/2024 - 11:37  ·  लेख
लेख
अमेरिकेत गौतम अदानी ह्यांच्याविरोधात वॉरंट निघाले आणि भारतात एकच खळबळ माजली. दोषारोपात(INDICTMENT) गौतम अदानी आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतातील चार राज्यांत २००० कोटींची लाच दिली होती. अदानी एनर्जीची सौर उर्जा ह्या राज्यांनी विकत घ्यावी म्हणून ही लाच २०१९ ते २०२४ ह्या काळात दिली गेली. अर्थात हे आरोप आहेत पण त्याचे पुरावे देखील देण्यात आले आहेत असे समजते.https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline लगेच राहुल गांधी ह्यांनी अदानीना अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. ही चार राज्ये- छत्तीसगड, आंध्र प्रदेश,तामिळ नाडु आणि ओडिशा. ह्यात सर्वाधिक लाच,१२५० कोटी, आंध्रप्रदेशमध्ये २०१९-२०२४ मध्ये देण्यात आली होती असा आरोप आहे. रोख अर्थात जगन मोहन रेड्डि ह्यांच्यावर आहे. कारण मुख्य्मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय अशी मोठी कंत्राटे मंजूर केली जात नाहीत. आता ह्यावरुन राजकारण तापणार होतेच. भाजपातर्फे ह्या सगळ्या मागे 'जॉर्ज सोरोस'च आहेत असे ठामपणे सांगण्यात आले. खरे तर हे असे बोलायची गरजच नव्हती. कारण ह्या चारही राज्यांमध्ये तेव्हा भाजपा सत्तेवर नव्हता. पण 'पाश्चिमात्य देशांना भारताचे बरे झालेले बघवत नाही' ही थियरी अनेक मध्यम वर्गीयांना सहज पटते. 'चारही राज्यांतील तत्कालीन अधिकार्यांची चौकशी करा' असे सांगितले असते तरी हरकत नव्हते पण अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो. मुख्य प्रवाहातील चॅनेल्सनी सावध पवित्रा घेत बातमी दिली आहे. मराठी चॅनेल्सवर तर बोलायलाच नको. 'दादा निवडुन येणार की भाउ की अण्णा' ह्यातच ती रमली आहेत. अदानी आणि ट्रम्प ह्यांचे चांगले संबंध आहेत असे बोलले जाते. ट्रम्प निवडुन आल्यावर अदानी ह्यांनी ट्रंप ह्याच्या 'धैर्य आणि चिकाटीचे' कौतुक केले होते. १३ नोव्हेंबरला अमेरिकेत मोठी गुण्तवणुक करण्याची घोषणाही केली होती. In his congratulatory post, Mr Adani said, "If there is one person on Earth who stands as the embodiment of unbreakable tenacity, unshakeable grit, relentless determination and the courage to stay true to his beliefs, it is Donald Trump." ट्रम्प सत्तेवर यायच्या आत अदानीला अडकवायचे असा प्लान बायडेन सरकारमधील लोकांचा होता आणि तो यशस्वी झाला असेही म्हंटले जाते. आता ट्रम्प ह्यांनी शपथ घेतल्यावर ते ह्या दोषारोपाला आणि संबंधीत अधिकार्यांना कसे बाजुला काढतील ते पहावे लागेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22366 वाचन

💬 प्रतिसाद (143)

प्रतिक्रिया

तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री

आग्या१९९०
Wed, 12/04/2024 - 17:01 नवीन
तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री होता व आरोपींचा वकील होता. १ रूपयाचा सुद्धा तोटा झाला हे तो मान्य करणार होता का? आरोप करणारे स्वच्छ होते त्यांना सिद्ध का करता आले नाही ? पण २०१४ मध्ये मोदी आल्यानंतर न्यायालयाने ते वाटप रद्द करून लिलाव करायला लावला ज्यातून १,००,००० कोटीहून अधिक महसूल मिळाला. त्याला नोशनल लॉस म्हणतात. टाईम , टेक्नॉलॉजी आणि मार्केट डिमांड विचारात घेऊन हिशोब केल्याने नुकसान शून्य मान्य केले गेले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आरोप करणारे स्वच्छ होते

श्रीगुरुजी
Wed, 12/04/2024 - 17:11 नवीन
आरोप करणारे स्वच्छ होते त्यांना सिद्ध का करता आले नाही ? याची कारणे आधीच लिहिली आहेत. त्याला नोशनल लॉस म्हणतात. टाईम , टेक्नॉलॉजी आणि मार्केट डिमांड विचारात घेऊन हिशोब केल्याने नुकसान शून्य मान्य केले गेले . कोणी नुकसान शून्य मान्य केले? सिब्बलने की न्यायालयाने? शून्य नुकसान होते तर मग आधीचे खिरापतरूपी वाटप रद्द करून लिलाव करूनच तरंगलहरी द्याव्या हा आदेश न्यायालयाने का दिला? ७,५०० कोटी आणि १,००,०००+ कोटी हे दोन्ही आकडे सारखेच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

अदानी हिरवी ऊर्जा नावाचा

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 12:19 नवीन
अदानी हिरवी ऊर्जा नावाचा समभाग आज ४८ रुपे पडलाय. आदानीचे अजून नुकसान व्हावे. आनंदी आनंद गडे जिकडे तिकदे चोहिकडे :)
  • Log in or register to post comments

आदानीचे अजून नुकसान व्हावे.

वामन देशमुख
Wed, 12/04/2024 - 14:00 नवीन
आदानीचे अजून नुकसान व्हावे.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. ---
आज ४८ रुपे
रुपे ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी पेमंट सेवा आहे. मीही तिचा लाभ घेतो. इथे जाहिरात केल्याबद्धल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भुजबळ बुवा

सुबोध खरे
Wed, 12/04/2024 - 12:27 नवीन
भुजबळ बुवा तुमच्या शहरात सी एन जी २ रुपयाने महाग झालाय त्याची चिंता करा. अदानी कुठे? तुम्ही कुठे?
  • Log in or register to post comments

आता वसुली सरकार येणार

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 12:37 नवीन
आता वसुली सरकार येणार असल्याने, वसुलीदेखील झपाट्याने होणार ते माहित असल्याने असे २ रुपये वाढतीलच. पण आपला मालक १ नंबर श्रीमंत करायचा शेटचा डाव फेल जातोय ते आनंद काय वर्नावा?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जमीन मोजणी फी दुप्पट झाली.

आग्या१९९०
Wed, 12/04/2024 - 14:43 नवीन
जमीन मोजणी फी दुप्पट झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कथा अकलेच्या कांद्यांची.

कर्नलतपस्वी
Wed, 12/04/2024 - 13:28 नवीन
देशातील नामवंत उद्योगपती वटवृक्षा सारखे. असंख्य कुटुंबाचे आधार. देशाचा अर्थीक कणा, अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली धाक जमवून देशाच्या प्रगतीचे आधार स्तंभ. यांच्या चॅरिटेबल संस्थांमुळे कित्येक गरजूंचे मदतनीस. आपल्यासारखे सामान्य लोकांनी कितीही कळफलक बडवला तरी त्यांच्या ढुंगणाला खबर नसते.. केवळ राजकीय असूयेपोटी काहीही बरळायचे. हे म्हणजे अकलेचे तारे तोडण्या सारखे. सुर्या वर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती थुंकी थुकंणार्याच्या तोंडावरच पडणार. देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल.
  • Log in or register to post comments

सहमत आहे

वामन देशमुख
Wed, 12/04/2024 - 13:49 नवीन
देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल.
देशातील काही नेत्यांपासून ते निरनिराळ्या संस्थळांवर कार्यरत असणारे त्यांचे IT cell हेही, अश्या उद्योगांबद्धल नकारात्मक बोलतात ते अशाच आर्थिक दहशतवादी हल्ल्यांत सहभागी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

Patriotism is the last refuge of the scoundrel

वामन देशमुख
Wed, 12/04/2024 - 13:55 नवीन
"Patriotism is the last refuge of the scoundrel." असं तीन शतकांपूर्वीचं एक वाक्य आहे. भारतात मात्र "देशद्रोह हे देशद्रोही लोकांचं पहिलं आणि कायमचं शस्त्र असतं" असंच म्हणावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

देशद्रोह हे देशद्रोही लोकांचं

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 14:12 नवीन
देशद्रोह हे देशद्रोही लोकांचं पहिलं आणि कायमचं शस्त्र असतं +१ आणी असे. लोक स्वतःला देशभक्त म्हणवतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

देशातील नामवंत उद्योगपती हा

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 14:11 नवीन
देशातील नामवंत उद्योगपती हा लाच देणारा उद्योगपती नामवंत कधी झाला? हिंडेनबर्ग रिपोर्ट वगैरे बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही का कर्नल साहेब? की भाजप धार्जिणा म्हणजे नामवंत? अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली धाक जमवून देशाच्या प्रगतीचे आधार स्तंभ. धाक जमवून की पत घालवून? जरा टाटा बिर्ला अंबानी ह्यांच्याकडे पाहा. केवळ राजकीय असूयेपोटी काहीही बरळायचे उद्योगपतीबद्दल राजकीय असूया का असेल? सुर्या वर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती थुंकी थुकंणार्याच्या तोंडावरच पडणार. बरोबर, पण देशद्रोह्यांबद्दल सामान्य माणसाने बोलणे हे सूर्यावर थुंकणे नसते. देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल. सहमत लाच देऊन देशाची पत घालवणे, एखाद्या राजकीय पक्षाला आपला मिंधा बनवून कर्जमाफी करून घेणे कशात बसते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

अबा, तुम्ही तर कोर्ट बसवून...

कर्नलतपस्वी
Wed, 12/04/2024 - 15:11 नवीन
विना पुरावा आरोपीस फाशी दिलीत. जर अडानी नामवंत नाही तर काय तुम्हाला नामवंत म्हणायचे. अडानी यांनी लाच दिली असावी असा अंदाज बांधून फक्त परदेशी लोकांनी आरोप केलेत.असल्या आरोपांना फाट्यावर मारायला हवे. हिडनबर्ग चे पितळ उघडं पडले आणी चारी मुंड्या उताणा पडला. कोण देशद्रोही, लाखो लोकांचा पोशिंदा? काय पुरावा आहे ते सांगाल काय? भाजपकडून बोललं की काही लोकांच्या पोटात दुखायला लागते. अडानी उद्योग समुह १९८८ मधे सुरू झाला. २०१३ पर्यंत दिन दुनी रात चौगुनी अशी प्रगती केली. या पंचवीस वर्षाच्या कालावधीत काॅग्रेस सरकार होती. तेंव्हा अडानी यांचे मूल्यांकन कसे कराल.... जाऊ द्यात, मी तरी कशाला तुमच्या नादी लागतोय. हाथी चाले अपनी चाल......
  • Log in or register to post comments

जर अडानी नामवंत नाही तर काय

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 15:37 नवीन
जर अडानी नामवंत नाही तर काय तुम्हाला नामवंतm म्हणायचे. मला म्हणू नकाच मी नेहमी माझ्य नावापुढे कुप्रसिद्ध मिपाकर असे लिहितो. बाकी लाच देणारा फक्त भाजप धार्जिणा आहे म्हणून त्याला नामवंत म्हणावे का? हिडनबर्ग चे पितळ उघडं पडले आणी चारी मुंड्या उताणा पडला. कर्नल साहेब आपल्या भ्रष्ट व्यवस्थेने किती गुन्हे दाखल केले नी तपास केला?? मग तुम्ही कोणत्या बेस वर अदानीला क्लीनचिट दिली? काहीं पुरावे द्या. आहेर का? वाट पाहतो. अडानी यांनी लाच दिली असावी असा अंदाज बांधून फक्त परदेशी लोकांनी आरोप केलेत.असल्या आरोपांना फाट्यावर मारायला हवे. सर त्यानी पुरावे वगैरे गोळा करुन वॉरंट काढले आहे, ते अमेरिकन न्यायालय आहे, अमेरिकन. भाजपकडून बोललं की काही लोकांच्या पोटात दुखायला लागते. बोला की, पण सोबत एका भ्रष्ट उद्योगपतीचीही बाजू घ्यावी अशी काही भाजपची घटना आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

क्खिक्क्

वामन देशमुख
Wed, 12/04/2024 - 16:49 नवीन
ते अमेरिकन न्यायालय आहे, अमेरिकन.
"लोकांच्या तावडीत सापडलेला किरकोळ ठक सुटका करून घेण्यासाठी क्षीण युक्तिवाद करण्याचा तावातावाने प्रयत्न करीत आहे" अशी इमोजी कल्पावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पद्धतशीर पणे मुख्य प्रश्नाला बगल देत

कर्नलतपस्वी
Wed, 12/04/2024 - 16:45 नवीन
पुढे निघून गेलात. काॅग्रेस राजवटीचे पंचवीस वर्ष याबद्दल काहीच नाही. अम्रीकेत समन्स आणी वाॅरंट वेगळे. , a warrant and a summons are not the same thing in American law: Summons A letter that requires a person to appear in court for a minor offense. A summons is typically issued by a court clerk and doesn't usually require evidence. If the person doesn't appear in court, the judge may issue an arrest warrant. Warrant A court order that authorizes law enforcement to arrest a person or conduct a search. A warrant is usually issued by a judge or magistrate and requires probable cause to be established. Arrest warrants are typically valid for a specific period of time, but they can remain active indefinitely until the person is arrested or the warrant is recalled. जाऊ द्यात, तुम्ही बसा टिमकी वाजवत.
  • Log in or register to post comments

न्याय

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 12/04/2024 - 17:14 नवीन
"अडानी यांनी लाच दिली असावी असा अंदाज बांधून फक्त परदेशी लोकांनी आरोप केलेत.असल्या आरोपांना फाट्यावर मारायला हवे." एफ बी आयने तसे आरोप केले आहेत आणि आरोप्पत्र सादर केले होते. १६ ते २३ न्यायमूर्ती(ग्रँड ज्युरी)ना त्या आरोपात तथ्य वाटले आहे. दिलेल्या पुराव्यांची खात्री करून घेतल्यावर ग्रँड ज्युरींनी अदानी ह्याच्या विरोधात वॉरंट काढले आहे.
  • Log in or register to post comments

दिलेल्या पुराव्यांची खात्री

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 17:20 नवीन
दिलेल्या पुराव्यांची खात्री करून घेतल्यावर ग्रँड ज्युरींनी अदानी ह्याच्या विरोधात वॉरंट काढले आहे. अदानीभक्त हे मान्य करणार नाहीत. अश्या भ्रष्ट माणसाचे अधिकाधिक नुकसान व्हावे. तिथल्या ज्युरींच्या घरी आरत्या होतात का? होत असतील तर खोट्या डिग्रिवाला तिथेही धडकेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

शांतता कोर्ट चालू आहे.

कर्नलतपस्वी
Wed, 12/04/2024 - 17:37 नवीन
अजून खटला उभा राहीला नाही. त्या आगोदरच उत्साही वीरांनी भ्रष्ट म्हणू लेबल लावले आहे. "एक रूका हुआ फैसला" आहे.
  • Log in or register to post comments

आणखी

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 12/04/2024 - 17:49 नवीन
Sagar Adani, executive director of Adani Green and nephew of Gautam Adani, used his mobile phone to track details of the bribes offered to Indian officials, US authorities alleged. In a meeting between some Adani and Azure executives in 2022, Gautam Adani detailed aspects of the bribery scheme including steps he personally took to offer money to government officials, the US authorities said. https://www.deccanherald.com/india/explained-us-findings-related-to-adanis-bribery-charges-3286044#3 आणखी काय पुरावे हवेत? पुराव्यांची १००% खात्री पटल्यावरच वॉरंट निघाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

माई जोमात कर्नलकाका कोमात! :)

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 19:33 नवीन
माई जोमात कर्नलकाका कोमात! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

थांबा थोडं...

कर्नलतपस्वी
Wed, 12/04/2024 - 22:17 नवीन
घोडा मैदान आल्यावर कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पण काका माईनी पुरावे दिलेत

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/04/2024 - 22:20 नवीन
पण काका माईनी पुरावे दिलेत आता तरी मान्य करा. अदानी भ्रष्ट आहे की तुम्हीही डॉ. खरेंसारखे भ्रष्टाचाराचे समर्थन कराल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

आणखी काय पुरावे हवेत? पुराव्यांची १००% खात्री पटल्यावरच वॉरंट

धर्मराजमुटके
Wed, 12/04/2024 - 21:05 नवीन
आणखी काय पुरावे हवेत? पुराव्यांची १००% खात्री पटल्यावरच वॉरंट निघाले आहे.
मग, अदानींना (किंवा अदानीला) अमेरिकन कोर्टात खटला चालून काय शिक्षा मिळेल ? तुमच्या ह्यांचे ह्या बाबतीत काय मत आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माहित

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 12/05/2024 - 09:46 नवीन
माहित नाही रे धर्मराजा. तिकडचे कायदे वेगळे,शिक्षा वेगळ्या. पण ह्या प्रकरणातून अदानीना बाहेर काढणे ही ट्रम्प आणि मोदी ह्यांच्यासमोरची मोठी कसोटी असेल. त्यातही भारत सरकारपुढील आव्हाने मोठी असणार आहेत. कारण ह्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी अमेरिका/ट्रम्प खूप मोठी किंमत मागतील हे नक्की. हार्ले डेविडसन बाईक्स्,भारतात बंद पडलेल्या फोर्ड कंपनीचे पुनुरुज्जीवन... असे बरेच काही असेल असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

माई

सुबोध खरे
गुरुवार, 12/05/2024 - 10:20 नवीन
माई बहुसंख्य वृत्तपत्रातून आलेल्या माहितीप्रमाणे अडाणी यांच्यावरील खटल्याची हि सुरुवात आहे आणि याला अनेक वर्षे जातील. त्यातून श्री अडाणी यांच्यावर वैयक्तिक असे कोणतेही आरोप नाहीत. तेंव्हा अडाणी याना काही होण्याची शक्यता बहुसंख्य कायदेतज्ञांच्या मते शून्य आहे. असे अनेक लेख इकॉनॉमिक टाइम्स आणि बिझिनेस स्टॅंडर्ड मध्ये आलेले आहेत जरा वाचून पहा. बाकी भुजबळ आणि इतर फुरोगामी यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे हा शुद्ध कालापव्यय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

शक्यता आहे

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 12/05/2024 - 11:07 नवीन
अदानीला शिक्षा होण्याची शक्यता कमी आहे हे मान्य पण दुसर्या देशाने एखाद्या उद्योगपतीवर लाचखोरीचे आरोप करणे, त्याचे पुरावे देणे आणि त्याच्यावर वॉरंट निघणे.. ह्यातून त्या उद्योगपतीची पत काय उरली? आणि देशाची ईमेज? 'अदानीने भारतीय नेते/नोकरशहा ह्यांना लाच दिली आहे" असा आरोप दुसरा देश करतो आणि आपले लोक हे प्रकरण उडवुन लावतात. मोदी/जयशंकर मॅनेज करतील असे म्हणतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माई तुमचं वय झालाय हे खरं

सुबोध खरे
गुरुवार, 12/05/2024 - 11:23 नवीन
माई तुमचं वय झालाय हे खरं ज्या अमेरिकेचा अध्यक्ष निवडणुकीपूर्वीच गुन्हेगार सिद्ध झालाय आणि आताचा अध्यक्ष आपल्या मुलाला अत्यंत गहन गुन्ह्यातून माफी देतो त्या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल कशाला चिंता करायची? उद्योगपतीची पत काय उरली? अदानी याना जगभर भरपूर लोक कर्जे देतील त्याची चिंता तुम्ही करू नका? इस्रायलने अगोदरच अदानीला पाठिंबा दिला आहे https://www.reuters.com/world/india/israel-backs-indias-adani-after-us-bribery-allegations-israeli-envoy-says-2024-11-28/ ज्या देशाने आपल्या बळावर जगभर सर्वत्र काड्या करून आपली आर्थिक सत्ता कायम ठेवली आहे त्यांना का आणि कशासाठी भीक घालायची? मोदी सरकारने अमेरिकेला तीन वेळेस फाटा मारला आहे. S -४०० विकत घेताना, रशिया कडून तेल घेताना आणि चबहार बंदराचा विकार करताना. अमेरिकेने तुमचे काय वाकडे केले? आणि अगोदर पोखरण १ आणि २ केल्यावर अमेरिकेने तुमच्यावर निर्बंध टाकले. तुम्ही कुठे त्यांना भीक घातली? शेवटी बळी तो कान पिळी हेच तत्व सत्य आहे. तुमच्याकडे शक्ती असेल तर तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. सर्वे गुण: कांचनम आश्रयते ! तुम्ही श्रीमंत असलात तर तुमच्याकडे सर्व सद्गुण असतात. गज: नैव व्याघ्र: नैव सिंह: नैवच नैवच अजापुत्रो बालिम दद्यात देव: दुर्बल नाशक: हत्तीचा नाही वाघाचा नाही सिंहाचा तर नाहीच नाही बोकडाचाच बळी दिला जातो. देव सुद्धा दुर्बळाचा नाशक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

डाॅ. खरे यांच्या बरोबर सहमत.

कर्नलतपस्वी
गुरुवार, 12/05/2024 - 12:22 नवीन
हा अदानी कुठेना कुठे काहीना काही गैरउद्योग करतच असतो, आपल्या पैशाने सरकार बसलंय हे त्याला माहित आहे त्यामुळे कारवाईची भीतीही नाही. भाजप पक्ष अडाणीच्या पैशांनी मिंधा झाला आहे. त्यामुळे भारत सरकार ह्या अडाणीच्या गैरकृत्यांवर कारवाई करेल ही शक्यता शून्य. अमेरिका आरकार कारवाई करतंय ह्याचं मी एक भारतीय म्हणून स्वागत करतो. अमेरिकेने ह्याच्या नांग्या ठेचाव्यात. वापरलेली भाषा अक्षेपार्ह आहे. जर संबंधितांनी काय गैरऊद्दोग केले त्याचे पुरावे मागीतले तर.... मानहानीचा खटला दाखल केला तर... पळता भुई थोडी होईल. लेखक,वाचक आणी प्रतिसादक यांची याविषयाबद्दल माहीती वृत्तपत्रातील माहीतीवर आधारित आहे. दाखल झालेले आरोपपत्र जरी लेखा बरोबर दिले असले तरी अमेरीका व भारत यांच्या कायद्यांतर्गत असलेल्या बाबींचे ज्ञान कितपत आहे ते बघावे लागेल. आरोपपत्र सादर केले आहे. वृत्तपत्रातील माहीती हा पुरावा कितपत ग्राह्य धरावयाचा आणी विधिज्ञ त्याच्या कश्या चिंधड्या उडवतील हे बघावे लागेल. प्रत्यार्पण संधी हा एक मोठा अडसर आहे का? ब्रिटन आणी भारता मधे सतरा असे मामले प्रलंबित आहेत. अडानी हे अंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात उद्योगपती आहेत. त्यांचे अनेकांशी हितसंबंध आहेत. अशा सन्मानित व्यक्ती बद्दल बोलताना संयमित भाषेचा उपयोग करणे अपेक्षित आहे. अर्थात इतर कोणत्याही व्यक्ती बद्दल सुद्धा हाच निकष लागू पडतो. गुन्हा न्यायालयात प्रलंबित आहे. अजून सिद्ध झाला नाही. अशा परिस्थितीत भ्रष्ट, लाचखोर असे गंभीर आरोप लावणे कितपत योग्य आहे व जर याची दखल संबंधितांनी घेतली तर मानहानीचा गुन्हा दाखल होऊ शकतो हे सुद्धा प्रतिसादकांनी लक्षात ठेवले पाहीजे. प्रतिसाद देताना भाषेचा वापर अतिशयकाळजीपूर्वक केला पाहीजे.केला पाहीजे असे माझे मत आहे. सर्व मिपाखरे सुज्ञ,सुजाण आहेत हे गृहीत धरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आणि

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 12/04/2024 - 17:54 नवीन
"In March 2023, FBI special agents approached Sagar Adani with details of the grand jury's ongoing investigation into the group and other entities. They took custody of electronic devices in Sagar's possession and served him with a search warrant and served him with a search warrant and grand jury subpoena. https://www.deccanherald.com/india/explained-us-findings-related-to-adanis-bribery-charges-3286044#5
  • Log in or register to post comments

अडानी हे अंतरराष्ट्रीय

जावा फुल स्टॅक
Mon, 12/09/2024 - 11:59 नवीन
अडानी हे अंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात उद्योगपती आहेत. त्यांचे अनेकांशी हितसंबंध आहेत. म्हणून त्यांना गैरप्रकार करण्याचा अधिकार आपोआप प्राप्त होतो का? नमो नमो नमो.
  • Log in or register to post comments

आणी त्यानी कितीही झोल केले

अमरेंद्र बाहुबली
Mon, 12/09/2024 - 12:03 नवीन
आणी त्यानी कितीही झोल केले तरी ते गुजराती तसेच मोदींचे हितचिंतक असल्याने त्यांना आपोआप सन्मान प्राप्त होतो. अंधभक्तीला सीमा नाही. मिपावरील एक महात्मा ह्यानी म्हटलेच आहे की असे झोल करावेच लागतात हे आंतरराष्ट्रीय सत्य आहे वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावा फुल स्टॅक

अगदी बरोबर. गुन्हा कोणीही,

टीपीके
Mon, 12/09/2024 - 15:01 नवीन
अगदी बरोबर. गुन्हा कोणीही, अगदी कोणीही केला असेल तर त्यावर गुन्हा दाखल करून खटला चाललाच पाहिजे. न्याय हा सगळ्यांनाच सारखा पाहिजे. खरं तर ज्यांनी लाच घेतली / मागितली त्यांचीही जाहीरपणे नावं आली पाहिजेत आणि त्यांच्यावरपण त्याच वेळी खटला चालला पाहिजे. तरच न्याय यंत्रणा , सत्ताधारी , विरोधक आणि माध्यमे निःपक्ष आहेत हे सिद्ध होईल. तो पर्यंत हे आरोप फक्त राजकीय राहतील. बरोबर ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बरोबर. पण भाजपेयी अडाणीच्या

अमरेंद्र बाहुबली
Mon, 12/09/2024 - 15:09 नवीन
बरोबर. पण भाजपेयी अडाणीच्या पैशाने मिंधे झाले असतील त्यामुळे अदानीवर गुन्हा नसेल केला दाखल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

मग त्यानां त्यांची जागा

टीपीके
Mon, 12/09/2024 - 15:15 नवीन
मग त्यानां त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही जे करताय ते स्पृहणीय आहे. तुम्ही खरंच राजकीय कारणासाठी नाही तर न्यायासाठी लढता आहात हे दाखवण्यासाठी ज्यांनी लाच घेतली त्यांची पण नावे का नाही घेत? म्हणजे तुमच्या उद्दिष्टांवर कोणी शंका नाही घेऊ शकणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कराकी सगळ्यांवर गुन्हे दाखल

अमरेंद्र बाहुबली
Mon, 12/09/2024 - 15:42 नवीन
कराकी सगळ्यांवर गुन्हे दाखल लावा की ईडी अदानीला पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

बाकीचे आरोपी कोण आणि

टीपीके
Mon, 12/09/2024 - 15:48 नवीन
बाकीचे आरोपी कोण आणि त्यांच्या विरुद्ध आपण कसा प्रचार करायचा आणि गुन्हे दाखल करायचा आग्रह करायचा ? तुमचे या विषयावरील मौलिक विचार समजावून घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सगळं मी करायचं तर गृहमंत्री

अमरेंद्र बाहुबली
Mon, 12/09/2024 - 16:33 नवीन
सगळं मी करायचं तर गृहमंत्री काय गवत उपटायला आहे का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

यात गृहमंत्र्यांचा काय संबंध?

टीपीके
Mon, 12/09/2024 - 16:54 नवीन
यात गृहमंत्र्यांचा काय संबंध? आणि आपण त्या हलकट बीजेपीवाल्यांसारखा निरपेक्षपणाचा आव तर आणू शकतो ना? इतके उघड उघड पक्षपाती झालो तर जनता काय विचार करील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ज्यानी

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 12/11/2024 - 11:34 नवीन
तामिळनाडू,आंध्र,ओडिशा आणि छत्तिसगड. ह्या राज्यांच्या उच्च अधिकार्यानी/राजकीय नेत्यानी(तत्कालिन सत्ताधार्यानी) लाच घेतल्याचे आरोप आहेत. अदानीने लाच दिली हे खरे असेल तर ह्या राज्यांतील तत्कालिन सत्ताधार्याना जाब विचारला गेला पाहिजे. पण मुख्य मीडिया ह्याबाबत मूग गिळुन गप्प दिसतोय.आंध्रचे जगन मोहन रेड्डी ह्यांच्या अफाट संपत्तीबद्द्लच्या सुरस कहाण्या प्रसिद्ध आहेत. आपले मराठी विद्वान पत्रकारही ह्या प्रकरणावर बोलताना दिसत नाहीत. अदानीचे नाव आल्यावर सुरुवातीला सगळ्यांना हुरुप आला पण ह्यात बिगर-भाजपा नेते गुंतलेले आहेत हे लक्षात आल्यावर पत्रकारांनी आपली लेखणी म्यान केली. !
  • Log in or register to post comments

गोदी मीडिया आहे ती. विरोधी

अमरेंद्र बाहुबली
Wed, 12/11/2024 - 13:43 नवीन
गोदी मीडिया आहे ती. विरोधी पक्षांवर कारवाई केली तर मालकावरही कारवाई करावी लागेल. कारण लाच घेणे गुन्हा आहे तसेच देणेही गुन्हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Wed, 12/11/2024 - 16:24 नवीन
गोदी मीडिया आहे ती.... हो क्का? बर्र.... मग, सामना हे मुखपत्र कुठल्या पक्षाचे? ------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

चहा, बिस्किटे, सरकारी घर,

सुबोध खरे
Wed, 12/11/2024 - 11:38 नवीन
चहा, बिस्किटे, सरकारी घर, राज्यसभेचे सदस्यत्व, भूखंड, श्रीखंड घेणाऱ्या पत्रकारां कडून तुमची अपेक्षा काय आहे माई?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा