एक संघ मैदानातला - भाग १८

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
18 Jul 2016 - 6:06 pm

रस्त्याने चालताना इतरांच्या चेहऱ्यावर ‘चला सेमी फायनलपर्यंत तर आलो’ असा भाव होता आणि आमच्या चेहऱ्यावर मात्र बळीला चालेल्या बोकडाचा ! चहा घ्यायला मेसमध्ये गेलो. चहा घेत असताना मुद्दामुन उसवलेल्या टी- शर्ट कडे रेश्माचं लक्ष गेलं.
" अरे रेवा... तुझ किट उसवले आहे वाटतं... जा बाथरूममध्ये बदलून ये.. "
आता हिला काय सांगू मला मुद्दाम ग्राउंडवर दुसऱ्या टी शर्टमध्ये बसायचं आहे म्हणून हा उद्योग मी करून ठेवला आहे ते..
" आं... अरे हो गं... जाऊ दे आत्ता नको ग्राउंडवर गेल्यावर बदलते आणि तिथेच बसून टाके घालून टाकते.
" अगं.. कशाला अशी ग्राउंडवर येत आहेस बदल आधी.. "
" नको ना.. जाऊ दे ना.. तिथे गेल्यावर करते ना.. " तेवढ्यात तिने हाक मारून दीदीला सांगितलेच, त्यामुळे झक मारत चेंज करावे लागले. प्लॅन ए तर प्लॉप झाला आता प्लॅन बी इम्प्लिमेंट करावा लागणार होता. ह्यात आम्हीच मार आणि शिव्या खायची रिस्क होती पण चोर पकडायचा असेल तर चोराच्या घरात शिरावेच लागणार होते.
ह्यामुळे रूपा तुप्या आणि जागू अजूनच सावध झाल्या. चहा घेऊन आम्ही ग्राउंडच्या दिशेने चालू लागलो. रस्त्यात आजूबाजूला कोण आहे, कसं आहे, कोणाची आमच्याकडे कशी नजर आहे हे ८ डोळे मूकपणे टिपून घेऊ लागले. आमचं आधीच ठरलेलं होत की रस्त्यात काही बोलायचं नाही फक्त दिसणारे चेहरे पाहून घ्यायचे. ठरल्याप्रमाणे काम सुरू होत. सगळ्यात पुढे दीदी होती तिने मागे वळून पाहिले आणि आणि बरोबर रुपाला हाक मारली आणि म्हणाली, "रूपा जरा मीना बरोबर रूमवर जा गं.. "
" मी ? का ? काय ग झालं ?"
" रूपा दीदी चल ना रूम वर अर्जंट आहे.." आम्ही काय ते समजलो आणि गालात हसलो. लहान मुली असल्या बरोबर की हे असं होतच पण अगदी आजचाच मुहूर्त मिळावा ? मी हा विचार करेपर्यंत योग्या फीदिफिदी हसत मीनाला म्हणाली, " वेळच्या वेळी आणि जरा बर खाल्लेस तर हा असा कधीही कॉल येणार नाही.. रोज सकाळी बरोबर पोट साफ होईल.." रूपा तेवढ्यात मौका साधला आणि मीनाची रवानगी योग्याकडे केली आणि म्हणाली, " उघडलीस ना चोच... आता जा घेऊन हिला आणि पाज ज्ञानामृत... " योग्याने तोंड वाकडं केलं आणि गीताला पण बरोबर घेतलं. एवढं सगळं होईपर्यंत बाकीची पलटण पुढे निघून गेली होती. आम्ही चौघीच मागे रेंगाळलो होतो. परत आमच्या कामाला सुरुवात करत चालू लागलो.
ग्राउंड आलं पण वावगं असं काहीच दिसलं नाही. बाकीच्या सगळ्याजणी स्टेडियममध्ये जाऊन बसत होत्या. आम्ही मात्र प्रवेशद्वारापाशी जरा रेंगाळत उभ्या राहिलो. तुप्या आणि जागू जरा लांब मेडिकलच्या दुकानाजवळ थांबल्या. पाच-दहा मिनिट झाली पण कोणाचा काही पत्ता नव्हता. आम्ही जे करत होतो ते एक प्रकारे थोडासा बावळटपणाचं होता कारण जो कोणी होता तो काय आम्ही आल्यावर आमच्या समोर डायरेक्ट येणार होता ? पण तरी हा उद्योग आम्ही करत होतो. अंगातली खुमखुमी अजून काय? तो काही आला नाही पण कुठूनतरी दादा टपकले आणि आम्हाला झापडून स्टेडियममध्ये पिटाळले. आम्ही जाऊन एकदम वरच्या पायरीवर बसलो आणि खालचे निरीक्षण करु लागलो. आज पहिली कालची राहिलेली क्वार्टर फायनल मग एक सेमी आणि दुसरी सेमी असं असणार होत. आम्हाला पहिल्या मॅचमुळे वेळ मिळणार होता. आम्ही परत खाली उतरायचं ठरवलं पण दादा खालीच बसले होते. ते काही सरळ बाहेर जाऊ देणार नाही हे माहीत होत. आम्ही चालत चालत स्टेडियमच्या टोकाशी आलो आणि तिथून दुसऱ्या रस्त्याने खाली उतरलो. पण आता पुढे काय हा प्रश्न होताच. परत एकदा स्टेडियमला चक्कर मारली. उगाच इकडे तिकडे उभं राहून बघितलं पण काही उपयोग झाला नाही. कोणी आलं नाही. तुप्याच्या शिवशिवणाऱ्या हाताला काम काही मिळालं नाही. आता पहिल्या मॅचला तिसरा पुकार दिला गेला. आम्ही गुपचूप परत आलो आणि बॅगमधून सुई दोरा काढून काल मुद्दाम उसवलेलं किट शिवायला लागलो. कारण तेच आता मॅचला घालायच होत ना.. मनातून चरफडत त्या माकडाला शिव्या घालत आमचं काम सुरू होत. आम्ही खालच्या पायरीवर बसून शिवत होतो आणि सगळ्यांच्या बॅगा वरच्या पायरीवर ठेवल्या होत्या त्यामागे स्टेडियमची भिंत असल्यामुळे आमचे तिथे विशेष असे लक्ष नव्हते.
ह्या सामन्याला सुरुवात झाली आणि आम्ही वॉर्मअपच्या हेतूने खाली उतरू लागलो. टी शर्ट चेंज करण्यासाठी म्हणून बाथरूममध्ये गेलो तर आमच्या दोघींच्या बॅगमध्ये परत चिठ्ठी.. आता कशी वाचावी ही चिठ्ठी..? मी गपचून चिठ्ठी खिशात ठेवली आणि टॉयलेटमध्ये घुसले. बहुतेक रूपानेही तेच केलं. शेवटी १२ मुलींच्या घोळक्यात तीच एक हक्काची जागा होती जिथे एकांत वैगरे मिळत होता. नाहीतर इतर सगळीकडे २२ डोळ्यांचे सी सी टी व्ही कॅमेरे सतत नजर रोखून असायचे. जरा कुठे काही खुट्ट झालं की सगळी सेना त्याचा पंचनामा करायला हजर व्हायची.
"हाय.. मला बघ्याची तुला उत्सुकता लागली आहे ना ? त्यासाठीच तू तुझ्या मैत्रिणी सोबत बाहेर आली होतीस ना? पण तिला का मी सांगितलेल्या ड्रेस मध्ये आणलस? मला भेटायचे असेल तर तुझ्या तुझ्या मॅचनंतर एकटी बाहेर ये. मी नक्की भेटेन तुला... तुझाच ... "
"तुझ्या नानाची टांग साल्या... एकटी ये काय...थांब बघतेच तुला भोx x x " नकळत मी पटकन बोलून गेले.
" ऐ रेवा कशाला गं पेटलीस आत ? कोणाच्या नानाची टांग काढतेस ? कोणाला बघतेस? काय चालू आहे... चल ये लवकर बाहेर.. आत्ता कॉल देतील आपल्याला.. " दीदीने जोरदार आवाज दिला.
अरे देवा... मी जीभ चावत बाहेर आले आणि रुपाला बाथरूम बाहेर यायची खूण केली. रुपाला काय ते समजलं होत ती पटकन बाहेर आली. दोघीनी चिठ्ठया बदलल्या आणि कोणाचं लक्ष नाही असं बघून वाचल्या. परत सेम चिठ्ठी होती. ह्या माणसाला पकडायचं कसं तेच समजत नव्हतं.प्लॅन बी पण फ्लॉप गेल्यातच जमा होता.
" बचेंगे तो और भी लड़ेंगे। " मी रुपाला पाहून म्हंटल. उत्तरादाखल तिने फक्त डोक्याला हात लावला आणि माझ्या घोषणेला सुरुंग लावला.
" चला आधी पुढयातली लढाई लढूया... ठाण्याबरोबर.. "
" हा.. हा .. माहितेय.. मॅचनंतरच म्हणत आहे मी.. " तेवढ्यात सगळ्याजणी आल्या. जागूला बरोबर वास लागला तिने मला कोपऱ्यात घेऊन चौकशी केली. मी तिला चिठ्ठी नं.२ चा प्रकार सांगितला. तिने लगेचच ग म भ च ची बाराखडी सुरू केली. तिला शांत करत मॅचची आठवण करून दिली आणि म्हणाले,'तुला काय खुन्नस काढायचा आहे तो मॅचमध्ये काढ..' अंग हलकं करत आम्ही वॉर्मअपला सुरुवात केली. आज सकाळी वॉर्मअप केला नसल्यामुळे अंग जड जाणवत होत. डोकं त्याहून जड झालं होत. सध्या सगळे विचार बाजूला ठेऊन मॅच काढणं गरजेचं होत. वॉर्मअपला सुरुवात झाली.

आम्हाला तिसरा आणि फायनल कॉल दिला. नेहमीप्रमाणे शिस्तीत आम्ही ग्राउंडवर उतरलो. आमच्या आधी ठाण्याची टीम पोचली होती. टॉस उडवला गेला. ठाणे टॉस जिंकले. त्यांनी ग्राऊंड घेतले त्यामुळे आम्हाला रेड मिळाली. आज आमच्या खेळाबरोबर डोक्यात चालेल्या प्लान्सचा पण कस लागणार होता. कारण ठाण्याची टीम नुसत्या खेळापेक्षा डावपेचावर आधारित खेळ खेळण्यासाठी ओळखली जात होती. दीदीने पहिली रेड केली तिला हुकमी बोनस मिळाला. त्यांच्या पहिल्या रेडला देखील बोनस मिळाला. आता रूपा रेडला गेली. तिची पकड झाली. माझ्या हाताखाली दीदी आली. त्यांची लेफ्ट रेडर आली आणि मुद्दाम कव्हर नाचवून गेली. आता रेडला मला पाठवलं. मी स्टेपिंग करून बोनस टाकायच्या वेळी माझी बॅक काढली आणि मला ग्राउंडच्या बाहेर बसवलं गेलं. आता ठाण्याची रेड सुरू झाली. ह्यावेळी त्यांनी दीदीला मोहरा केलं आणि तिलाही आमच्या रांगेत बसवले. आता स्कोर १-४ असा झाला होता. रेश्मा, जागु, तुप्या आणि पम्मी आत होत्या. आमची ४ ची कव्हर राहिली होती. रेश्माला आत अजून एक रेडरची गरज दिसत होती म्हणून ५ मिनिटांनी संजूला उतरवायचे ठरवले तोपर्यँत कव्हर लावून धरायला सांगितलं. कारण लोण बसण्याचे पूर्ण चान्सेस दिसत होते आणि मॅचच्या सुरुवातीलाच तो बसला असता तर संपूर्ण मॅच लीडला चेस करण्यात जाते असा अनुभव असल्यामुळे आम्ही पटकन लोण घेणं टाळत होतो. बसलेले कव्हर कॉम्बिनेशन तोडण्यासाठी त्यांनी आता दोन्ही बाजूने रेडर्सना सोडले होते. आलटून -पालटून डाव्या उजव्या बाजूने त्यांच्या रेड चालूच होत्या. आणि आमची कव्हर लावणाऱ्या तुप्या, पम्मी आणि सतत रेड करणाऱ्या जागु रेश्मा आता चांगल्याच दमल्या होत्या. स्कोरबोर्ड स्टेडी होता पण ग्राउंड मध्ये चाललेली मॅच बघून बघण्याऱ्या वाटावं की किती अटीतटीच्या मॅच सुरू आहे.
दीदीने टाईम आउट घेतला त्यामुळे सगळ्यांना दम घेता आला. आता ह्यापुढची मॅच स्लो करायची आणि तुप्याला पण रेडला काढायचं ठरवलं. टाईमपास रेडला तुप्याला पाठवायचं जेणेकरून रेश्माला थोडा दम घेता येईल आणि पुढच्या रेडला ती बोनस किंवा पॉईंटसाठी पूर्ण ट्राय करू शकेल. शक्यतो हाफ टाईमच्या आधी ६ ची कव्हर करायची असं ठरवलं गेलं.
परत मॅच सुरू झाली. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे त्यांच्या रेडला कव्हर तयारीने आणि स्टेडी उभी होती. रेडर पॉईंटचा प्रयत्न करून परत गेली. रेश्माने तिच्या नेहमीच्या पेक्षा विरुद्ध दिशेने रेड केली आणि पटकन बोनस घेऊन आली. चला बऱ्याच वेळाने स्कोरबोर्ड हलला. आता स्कोर २-४ असा झाला. हाफ टाईमला शेवटची ३ मिनिट बाकी राहिली. त्यांच्या रेडला आम्ही बाहेरून बोलून प्रेशर क्रिएट करत होतो. पंचानी आम्हाला वॉर्निंग देण्यासाठी, " फक्त कॅप्टनच बोला" असं म्हंटले. " तेच करतेय सर " मीही बाहेर बसून त्याला उत्तर दिले. त्याच बहुतेक पंचांना राग आला आणि वैयक्तिक मला अशी लास्ट वॉर्निंग मिळाली. शेवटच्या दोन रेडसुद्धा नील गेल्या. ना आम्हाला ६ची कव्हर करता आली ना त्यांना आमच्यावर लोण मारता आला. हाफ टाईम संपला.
मॅच सुरू करायची शिटी वाजली. तुप्याला बाहेर बसवून संजूला उतरवले होते. आता पहिली रेड त्यांची होती. रेडरच्या स्पीडवरून कळत होत की त्यांना आता झटपट लोण द्यायचा आहे. ह्यावेळी तर त्यांची रेड नील गेली पण आता ते लोण मारण्यासाठी काही तरी करतील असे वाटत होते त्याआधी आपल्याकडून काहीतरी कृती घडणे अपेक्षित होत आणि तसाच झालं.
संजू रेडला गेली. तिने स्टेपिंग करून बोनसला आत जाताच वरून कव्हर फिरली. ती सावध असल्यामुळे तिला ३ ची भट्टी लागली आणि आम्ही सगळ्याजणी आत आलो. आता स्कोर ५-४ झाला. लगेचच पुढच्या रेडपासून त्यांनी हल्लाबोल करायला सुरुवात केली. यायचं जबरदस्त स्पीडने कव्हर नाचवायची आणि कव्हरला चूक करायला भाग पडायचं. अगदी पहिल्याच रेडला माझ्या हाताखालून बोनस केला. परत स्कोर इक्वल झाला(५-५). मीच माझ्यावरच वैतागले. त्यांची ४ ची कव्हर असल्यामुळे तिथे बोनसच प्रश्नच येत नव्हता पण आमच्याकडे संपूर्ण टीम असल्यामुळे बोनस सोडून चालणार नव्हते. तरी त्यांच्या रेडर्स प्रयत्न करत होत्या पण त्यांची डाळ शिजत नव्हती. त्यामुळे बऱ्याच रेड नील जात राहिल्या. त्या त्यांच्या परीने आणि आम्ही आमच्या प्रयत्न करत होतो पण स्कोर जैसे थे राहिला.
शेवटच्या ३ मिनिटाचा पुकार झाल्यावर परत गेमला स्पीड आला. ह्यावेळी जागू रेडला गेली असताना तिला परत २ ची भट्टी लागली. २चा लीड आमच्याकडे आला (७-५). परत काही रेड नील गेल्या. आता त्यांची रेडर आली आणि कव्हर नाचवत बोनसला येत असताना संजूने हात घातला. संजूने हात घातला म्हणून मदतीला मीही गेले दोघी आऊट झालो, पण त्या मुलीला डॅश देताना तिने मला माझ्या किटसकट ओढलं त्यामुळे ते जिथे मुद्दाम उसवलं होतं तिथूनच चांगलं वीतभर फाटलं. ह्या गोष्टीमुळे एक टेक्निकल पॉईंट आम्हाला मिळाला आणि आता आमच्याकडे एकचा लीड आला (७+१-७) आणि शेवटच्या ४ रेड बाकी होत्या. २ त्यांच्या आणि २ आमच्या. आमाची ५ ची कव्हर असल्यामुळे त्यांना बोनसचा फायदा मिळणार नव्हता त्याउलट त्यांची पूर्ण टीम असल्यामुळे आमच्यासाठी बोनस ऑन होता. दीदी रेडला गेली कहर नाचवून तिने बोनस टाकला आणि परत आली पण पाय नीट न उचलला गेल्यामुळे पंचानी बोनस नाकारला. त्यांची रेडर येऊन पॉईंट घेण्याचा प्रयत्न करून गेली. ह्यावेळी परत दीदीच रेडला गेली हट्टाला पेटल्याप्रमाणे तिने परत तिथेच बोनस केला आणि आणि आमच्याकडे पाहिले आम्ही होकारार्थी मान हलवली. तरी परत शंका नको म्हणून तिने परत प्रयत्न करताना त्यांच्या टर्नने तिचा पट काढला ती सावध होती तरीही ४ जणींच्या जोरापुढे तिचे काही चालले नाही. दीदी आऊट झाली आणि सामना संपल्याची शिट्टी झाली.
ह्या शेवटच्या पकडीमुळे नक्की कोण जिंकले ह्याबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले कारण कोणताही संघ जल्लोष करत नव्हता. सगळे जैसे थेच्या परिस्थितीत एकमेकांकडे बघत उभे होते. २ साईड स्कोअरर, १ मेन स्कोअरर आणि तिन्ही पंच आकडेमोड करत होते. दोन्ही कोच आपापले स्कोअरबुक चेक करत होते. ती मिनिटभराची शांततासुद्धा असह्य झाली. साधारण पुढच्या एका मिनिटात विजयी संघ म्हणून आमचं नाव घोषित केलं. शेवटचा स्कोअर ९-८ असा होता. शेवटच्या रेडला दीदीला बोनस मिळाला त्यांना पॉईंट. खर तर आम्हाला मिळालेल्या पण न दिसलेल्या टेक्निकल पॉईंटमुळे ही मॅच आम्ही जिंकलो होतो.
त्या आनंदातच आम्ही ग्राऊंडच्या पाया पडून स्टेडियमच्या बाहेर येऊन बसलो. हाता-पायाच्या पट्ट्या काढताना आपण कसे जिंकलो ह्यावर चर्चा सुरू झाली. काही प्रेक्षक तर आम्हाला बघायला स्टेडियमच्या मागे आले. आम्ही कपडे घालून दुसरी सेमी फायनल बघण्याच्या उद्देशाने परत स्टेडियम मध्ये जायला निघालो तेव्हा काहींनी आम्हाला सरळ सरळ विचारले की तुम्ही कसे काय जिंकलात ? मॅच तर बरोबरीत सुटायला हवी होती. दादांनी त्यांना टेक्निकल पॉईंट हा प्रकार समजावून सांगायचा प्रयत्न केला पण त्यांना आम्हीच काहीतरी केलं असावं अशी विचित्र शंका यायला लागली. आम्ही मुली मात्र सरळ जाऊन स्टेडियममध्ये बसलो. दादा संयोजकांकडे गेले आणि झालेला प्रकार त्यांना सांगितला. शेवटी दुसरी मॅच सुरू व्हायच्या आधी पहिल्या सेमी फायनलमध्ये काय घडले आणि मुंबईचा संघ कोणत्या नियमाने विजयी ठरवला गेला हे माईकवरून सांगितले.

परत स्टेडियममध्ये बसल्यावर तो चिठ्ठीवाला डोळ्यासमोर आला. आता काही तरी सोक्षमोक्ष लावायलाच हवा म्हणून जागूला फक्त कानात काही तरी सांगून रुपाला डोळ्याने खूण करून मी आणि जागू बॅगमधला दुसरा टी- शर्ट घेऊन उठलो. मी टी शर्ट घेऊन जात आहे म्हंटल्यावर इतरांनीही काही विचारले नाही. मी आणि जागू बाथरूमच्या दिशेने जात असताना जागू मधल्या मध्ये अशी काही गायब झाली की संघातल्या कोणालाही दिसले नाही पण ज्या जागेवर ती थांबली होती तिथून तिला मात्र बाथरूमपर्यंतचा रस्ता आणि विरुद्ध दिशेला बसलेल्या सगळ्या मुली दिसत होत्या. मी टी-शर्ट चेन्ज करून मुद्दाम रमत-गमत स्टेडियमच्या दिशेने चालत होते. एका डोळ्याने मी जागूवर लक्ष ठेवून होते पण मला तिच्याकडे सतत बघता येणार नव्हतं. तितक्यात जनरेटरचा पलीकडून आवाज आला. " रेवती थांब जरा... "मी चमकून त्या दिशेला पाहिले पण कोणीच दिसले नाही. मी एकदा जागूकडे बघून केसावरुन हात फिरवला आणि त्या दिशेला वळले. मला केसावरुन हात फिरवत तिथे वळलेलं बघून जागूनेही जागा बदलली. ती लपत- लपत माझ्या दिशेने येऊ लागली.

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
एक संघ मैदानातला - भाग ९ http://www.misalpav.com/node/36071
एक संघ मैदानातला - भाग १० http://www.misalpav.com/node/36205
एक संघ मैदानातला - भाग ११ http://www.misalpav.com/node/36256
एक संघ मैदानातला - भाग १२ http://www.misalpav.com/node/36281
एक संघ मैदानातला - भाग १३ http://www.misalpav.com/node/36300
एक संघ मैदानातला - भाग १४ http://www.misalpav.com/node/36406
एक संघ मैदानातला - भाग १५ http://www.misalpav.com/node/36536
एक संघ मैदानातला - भाग १६ http://www.misalpav.com/node/36579
एक संघ मैदानातला - भाग १७ http://www.misalpav.com/node/36625

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

18 Jul 2016 - 6:15 pm | अनुप ढेरे

मस्तं चालू आहे!

मॅचचे वर्णन एकदम रोमांचक. पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

18 Jul 2016 - 6:53 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

बोका-ए-आझम's picture

18 Jul 2016 - 7:08 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र! मस्त उत्कंठा निर्माण केलेली आहे.

नाखु's picture

19 Jul 2016 - 10:09 am | नाखु

होय अता त्या रेडरची पकड केली गेली पाहिजे पुढच्या भागात..

पुभाप्र

रांचो's picture

18 Jul 2016 - 7:39 pm | रांचो

सर्व भाग वाचले आहेत. अतीशय छान चालु आहे मालीका. खरोखर दखलपात्र! पु.भा.प्र.

शलभ's picture

18 Jul 2016 - 7:41 pm | शलभ

वेगवान..

अभ्या..'s picture

18 Jul 2016 - 7:41 pm | अभ्या..

बोअर झाली आता. :(
सतीश असेपर्यंत मस्त ट्वीस्ट बसत होते.
येणारे का तो आता?

धडपड्या's picture

18 Jul 2016 - 9:24 pm | धडपड्या

हा रोमिओ सतिशच असावा अशी शंका येतेय...

उडन खटोला's picture

18 Jul 2016 - 7:44 pm | उडन खटोला

छान लिहिलंय. सगळे भाग वाचून काढले.

चैतू's picture

18 Jul 2016 - 7:48 pm | चैतू

अब आयेगा मज़ा...

स्नेहश्री's picture

19 Jul 2016 - 9:49 am | स्नेहश्री

सगळे भाग वाचले.. जाम मज्जा आली...

संजय पाटिल's picture

19 Jul 2016 - 12:02 pm | संजय पाटिल

वाचतोय. पु.भा.प्र.

पक्षी's picture

19 Jul 2016 - 4:05 pm | पक्षी

छान लिहिता तुम्ही.

प्रीत-मोहर's picture

19 Jul 2016 - 4:42 pm | प्रीत-मोहर

हा ही भाग मस्त. पण का कुणास ठाउ मलाही तो मज्णू सतिश वाटतोय.

ही मॅच प्रोअ कबड्डी लीगच्या धर्तीवर स्कोअरींग ठेवुन लिहायला पाहिजे होती.. जरा तरी स्कोर वाढला असता.. इथे फारच डकाव डकाव स्कोर वाढतो... :)

सामान्य वाचक's picture

19 Jul 2016 - 8:43 pm | सामान्य वाचक

पूर्ण झाल्यावर सविस्तर प्रतिसाद देईन
तोपर्यंत हि पोच

दा विन्ची's picture

19 Jul 2016 - 11:29 pm | दा विन्ची

शेठ लवकर येऊदे पुढचा भाग. उगाच रविवारपर्यंत ताणून धरू नका. त्रास होतो राव.

क्रेझी's picture

20 Jul 2016 - 8:38 am | क्रेझी

हे बरोबर नाही हं!
उत्कंठा शिगेला पोहोचली आणि लाईट गेले असं झालं शेवटी :(
पुढचा भाग प्लीज लवकर टाका!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

31 Aug 2016 - 1:43 pm | घाशीराम कोतवाल १.२

पुढचा भाग कधी टाकताय साहेब