एक आहे ही गोष्ट, आटपाट नगरीची
यामद्धे आहेत अर्थातच, एक राजा- एक राणी !
पूर्वी सारखं नव्हे बरं,एकच राजा आणि एकच राणी,
एकविसाव्या शतकांत असते,
प्रत्येकाची स्वतंत्र नगरी,स्वतंत्र कहाणी!
आपल्या गोष्टितल्या राजाला,राणी आवडली अगदी सहजच
आणि राणीनेही संमती दिली,थोड्या हित्गुजांताच !
दोघांची मग सुरु झाली स्वतंत्र कहाणी,
दोघांची नगरी,
हिच्या मनाचा "तो" राजा,
त्याच्या मनाची "ही" राणी,
उघड्या डोळ्यानी दोघांनी,संसाराची स्वप्नं रचली,
आई-बाबा वगैरे ठीक,पण बाळाची सुद्धा नावे ठरली !
प्रत्येक गोष्ट दोघांच्या मताप्रमाने,मनासारखी घडत होती,
राजा-राणी आणि त्यांची दुनिया एकमेकाताच गुरफतात होती !
राजाच्या घरी द