पाहून सयीला माझ्या....
लेखनविषय:
काव्यरस
हळुवार पावलांनी श्रावण आला अंगणी...
सयेची पैन्जने मन तारा झ्हन्कारती...
ओशाळतो पारिजातही पाहुनी सयेला माझ्या...
अन्थरुनी नक्षत्रांचे देणे लगडतो तिच्या पाया...
चिंब कुंतले तिची घेती चुंबने गालाची
घुटमळतो अल्लड वारा उडणार्या तिच्या पदराशी...
......छान पाऊस पडतोय, खिडकीत आपण उभे, आणि समोर पारिजात चिंब न्हाऊन निघतोय त्या पावसाच्या सरीत, हळुवार पाणी ओघळतय पानावरून,.....अगदी तसच जस न्हाऊन आल्यावर सयेच्या गालावरून ओघळत...
पाहून सयीला माझ्या मनी तारा झ्हन्कारती.
वाचने
1450
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
कविता सुंदर .. तरल शेवटची
मस्त वर्णन...
ओहोहो