अमेरिका
लेखनविषय:
अमेरिका अमेरिका
पहाण्याची संधी आली तर नाही म्हणू नका
कचर्याचे ढीग नाहीत
झोपड्यांचे दृष्य नाही
छोट्या छोट्या टपर्या नाहीत
थुंकीभरले रस्ते नाहीत
रिक्षा-स्कूटरचा किरकिराट नाही
ट्रेनबाहेर प्रवासी लोंबकळत नाहीत
मोटरगाड्यांची रेलचेल आहे
पण ट्राफीक जॅम होत नाही
येथे थंडी गुलाबी नसते
अंगामासात कापरं भरते
जॅकेट-कोट घातले तरी
कशाकशालाच दाद देत नसते
एसी शिवाय घर नाही
कर्पेट शिवाय फ्लोअर नाही
मोकळी जागा भरपूर आहे
पण मुलांना खेळायला वाव नाही
लोकांमध्ये शिस्त आहे
थोडीबहुत नम्रताही आहे
नाहीतरी आपण परकेच आहोत
तेव्हा जुळवून घेणे भागच आहे
आपली मुले मेहनत करतात
खडतर मार्ग पारही करतात
आधुनिक जग जाणून घेतात
प्रगतीपथ आजमावून बघतात
म्हणून ज्येष्ठांनो जरूर या
अमेरिका अमेरिका
पहाण्याची संधी आली तर नाही म्हणू नका
वाचन
2138
प्रतिक्रिया
10