अजून किती राती काढू सखे अश्या झुरत .... झुरत ?
घे तुझे हे साठवलेले सगळे क्षण साभार .... परत
आता नाही उरले त्राण ... आठवणीत रमायला
आता नाही उरले प्राण ... ओवाळून टाकायला
उरले फ़क़्त वास्तव भेसूर, अन उरला रितेपणा
सरल्या सगळ्या इच्छा, अन सरला जीतेपणा
नका तीर्थ ओतू .. नका ठेऊ तुळस, वेळ आली जाण्याची
अशीच निरंतर राहूदे चव, तिच्या हातच्या पाण्याची
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1076
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता नाही उरले त्राण ...
नका तीर्थ ओतू .. नका ठेऊ
मस्त