मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नको बोलु बाबा काही

गणेशा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
१. हरवली पोर माझी नको बोलु बाबा काही नको सांगु काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई हातानी तुझ्या जेंव्हा मला भरवला घास कामामध्ये असे तुझ्या फक्त माझाच ध्यास कसे विसरेल बाबा तुझी करुण कहानी फाटलेल्या सदर्‍यात विनलेली नाती धुळीमधी माखलेली तुझी जिंदगाणी आधाराची परि माझ्या प्रेमाची सावली अंगणात विसावता मायेची अंगाई वेड्या या पोरीची बाबा तुच विठाई प्राजक्ताच्या सड्यामध्ये होती ओघळली कविता सासराला जाताना तुझी रडवेली बोली फाटक्या या संसाराला ठिगळाची घाई दूराव्याच्या अंतरात जीव जाळीत राहि नको बोलु बाबा काही नको सांगु काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई !! - शब्दमेघ ( ४ मार्च २०११)

वाचन 2675 प्रतिक्रिया 0