Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गणेशा on Wed, 11/09/2011 - 13:02
काल चंद्र ओलावलेला अंगणी येवुन शहारला रागावलेल्या मिट्ट शब्दांना चंदेरी कुशीत घे म्हणाला मनी दाटली मग नाजुक सरसर जरी दूराव्याचे बंध खडतर सरता म्हंटले तरी सरेना क्षणांचे हे मोहक अंतर बोललो मग चंद्रास हळुवार मिठीत माझ्या स्वप्न अलवार नकोच काही करुस चिंता विनतो आहे प्रेमाचे तोरण स्मित करुन मग चंद्र बोलतो तुझ्याच साठी आलो इथवर अन वाटेवरती स्वप्नतारकांचे लावले बघ कोवळे झुंबर --------- शब्दमेघ (८ नोव्हेंबर २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Wed, 11/09/2011 - 13:06

Permalink

स्मित करुन मग चंद्र

स्मित करुन मग चंद्र बोलतो तुझ्याच साठी आलो इथवर अन वाटेवरती स्वप्नतारकांचे लावले बघ कोवळे झुंबर
वाह वाह ... सुंदर !!
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 11/09/2011 - 13:10

Permalink

संपादन करता येत नसल्याने आधीच्या लिंक्स येथे देतो आहे..

३. स्पर्शगंध : http://www.misalpav.com/node/19398 २. स्वप्नमेघातील चांदणं : http://www.misalpav.com/node/18888 १. पहिल्या भेटीचा सुगंध : http://www.misalpav.com/node/18628
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 11/09/2011 - 13:19

Permalink

भारीच,

विरहाचा हा समय असह्य होई, मज कोण त्राता, चिंता करू नकोस तू, दिवस जवळी आले आता.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 11/09/2011 - 13:28

In reply to भारीच, by प्रचेतस

Permalink

=)) =)) =))

हाहाहा... एक नंबर रे वल्ल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 11/09/2011 - 18:45

In reply to =)) =)) =)) by किसन शिंदे

Permalink

वल्ली, तुमचे पण दिवस संपत

वल्ली, तुमचे पण दिवस संपत आले आहेत, उगा कुणी बोलत नाही म्हणुन गमजा करु नका इथं, आम्हाला माहितंय सुट्टी कशाला काढलीय ते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 11/09/2011 - 22:21

In reply to वल्ली, तुमचे पण दिवस संपत by ५० फक्त

Permalink

केवळ फिरण्यासाठी हो मालक.

केवळ फिरण्यासाठी हो मालक. :) :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Wed, 11/09/2011 - 14:36

Permalink

मस्त!!

मालक काय लिहीलय.. व्वाह!! बोललो मग चंद्रास हळुवार मिठीत माझ्या स्वप्न अलवार नकोच काही करुस चिंता विनतो आहे प्रेमाचे तोरण क्या बात!! फिदा!! अवांतरः ते विनतो टायपो झाला वाटतं, विणतो असे म्हणायचे असेल तुला.
  • Log in or register to post comments

Submitted by विदेश on Wed, 11/09/2011 - 15:36

Permalink

वा -

चन्द्र सुद्धा छान बोलला कवितेत !
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 11/09/2011 - 19:09

Permalink

कळली नाही

मला कविता फारशी कळली नाही. :( दुराव्याचे बंध (दुराव्याचेही बंध असतात ही कल्पना आवडली) चंद्राशी का प्रेमिकेशी?
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 11/09/2011 - 21:05

In reply to कळली नाही by चित्रा

Permalink

.

काल चंद्र ओलावलेला अंगणी येवुन शहारला रागावलेल्या मिट्ट शब्दांना चंदेरी कुशीत घे म्हणाला मनी दाटली मग नाजुक सरसर जरी दूराव्याचे बंध खडतर सरता म्हंटले तरी सरेना क्षणांचे हे मोहक अंतर प्रियकर प्रेयशीवरती रागावला असल्याने, चंद्र अंगणात येउन बोलतो आहे त्या प्रियकराशी. तो बोलताना प्रियकराला ही जाणवते की त्याला ही आता करमत नाहीये तिच्याशिवाय .. ती दूर असल्याने त्याला ही वाईट वाटते.. हे क्षण त्याला आता संपावेत असे वाटते आहे. (दूराव्याचे बंध असतात.. कारण ह्या दुराव्यातील तळमळ हवीहवीशी असते ..)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 11/10/2011 - 07:45

In reply to . by गणेशा

Permalink

ओके

धन्यवाद! आणि कवितेला असलेली एक नवीनच मिती कळली त्यामुळे कविता आवडलीच :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 11/09/2011 - 21:06

Permalink

सर्वांचे मनापासुन आभार ...

सर्वांचे मनापासुन आभार ...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 11/09/2011 - 22:27

Permalink

मस्त!

छान शब्दकळा. पुढच्या महिन्यात आणखी सुंदर कविता वाचायला मिळतील या प्रतीक्षेत...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on Wed, 11/09/2011 - 23:27

Permalink

वा...!! मनी दाटली मग नाजुक

वा...!! मनी दाटली मग नाजुक सरसर जरी दूराव्याचे बंध खडतर सरता म्हंटले तरी सरेना क्षणांचे हे मोहक अंतर सुंदर.अप्रतिम ..!!
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on गुरुवार, 11/10/2011 - 08:17

Permalink

अप्रतिम

चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला......... फारच छान येउद्यात अजून...............
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 11/10/2011 - 08:23

Permalink

छान कविता आणि छान शब्द! अजून

छान कविता आणि छान शब्द! अजून येऊ दे.
  • Log in or register to post comments

Submitted by यश पालकर on गुरुवार, 11/10/2011 - 13:55

Permalink

क्षणांचे हे मोहक अंतर

अप्रतिम...... मनी दाटली मग नाजुक सरसर जरी दूराव्याचे बंध खडतर सरता म्हंटले तरी सरेना क्षणांचे हे मोहक अंतर यशवंत
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 11/10/2011 - 14:17

Permalink

सुंदर.

सुंदर.
  • Log in or register to post comments

Submitted by फिझा on Mon, 11/14/2011 - 16:31

Permalink

जमलय !!!

जमलय !!! छान आहे कविता !!
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Mon, 11/14/2011 - 19:37

Permalink

क्या बात है.....!! एकदम

क्या बात है.....!! एकदम रोमँटिक !!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5597 views

Book traversal links for ४. कोवळे झुंबर

  • ‹ ३. स्पर्शगंध ..
  • Up
  • ५. सोनेरी क्षणांची राजभेट... ›

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com