Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गणेशा on Fri, 08/19/2011 - 16:16
१. पहिल्या भेटीचा सुगंध : http://www.misalpav.com/node/18628 आकाशमिठीत गर्द रात्र ओली शृंगारलेली नभवेलीवर शुभ्रांकित निशिगंधीत चांदणं निशब्द ओठांवरती पारिजात धुंद स्वप्नमेघ पालवत निशिगंधीत चांदणं ओझरत्या दवबिंदूंमध्ये कातरलेला चंद्र शहारलेल्या अंगणी निशिगंधीत चांदणं नभी चंदेरी आरास नीर दर्पण शोभीवंत झावळीतून शिंपलेले निशिगंधीत चांदणं चंद्रसावलीचा प्रदेश शब्दांध वार्‍याचा झोत क्षितिजापल्याड झेपावलेले निशिगंधीत चांदणं --- शब्दमेघ (१९ ऑगस्ट २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)

Submitted by निनाव on Fri, 08/19/2011 - 16:25

Permalink

जबरा!! << ओझरत्या

जबरा!! << ओझरत्या दवबिंदूंमध्ये कातरलेला चंद्र शहारलेल्या अंगणी निशिगंधीत चांदणं >> भन्नाट!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 08/19/2011 - 19:34

Permalink

जबरा

मस्तच रे गणेशा. कविता जरी फारश्या कळत नसल्या तरी तुझी ही कविता फार फार आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on Fri, 08/19/2011 - 20:34

Permalink

गणेशा -छान सूर लागलेत निशब्द

गणेशा -छान सूर लागलेत निशब्द ओठांवरती पारिजात धुंद स्वप्नमेघ पालवत निशिगंधीत चांदणं मस्त. आणि पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत राजवाडे on Sat, 08/20/2011 - 01:54

Permalink

कोरिव कविता

कविता ऐकताना घुंगर वाजल्यासारखे वाटते. मस्तच!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 08/21/2011 - 19:38

Permalink

...

सुरेख!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2535 views

Book traversal links for २. स्वप्नमेघातील चांदणं

  • ‹ १. पहिल्या भेटीचा सुगंध
  • Up
  • ३. स्पर्शगंध .. ›

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com