५. सोनेरी क्षणांची राजभेट...
नशिल्या गंधपहाटेस आज
दवबिंदू हलकेच स्पर्शितो
पर्णअलंकारीत शृंगार
गर्द धुक्यात सळसळतो
तरंगीत स्पंदणे रेखीव
त्रीवेणी स्तब्ध निळीशार
मखमली पाकळ्यांची येथे
अनामिक निशब्द थरथर
वसुंधरेची नितळ कांती
हलकीच वळणदार बट
मदमस्त किरणांची वेल
सोनेरी क्षणांची राजभेट
गोड सतेज या गारव्यात
आयुष्याची नवप्रभात
नाजुक रेशिम वाटेवरती
सौख्य दाटले मिठीत
--------- शब्दमेघ (८ डिसेंबर २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)
४. कोवळे झुंबर: http://www.misalpav.com/node/19685
३. स्पर्शगंध: http://www.misalpav.com/node/19398
२. स्वप्नमेघातील चांदणं: http://www.misalpav.com/node/18888
१. पहिल्या भेटीचा सुगंध: http://www.misalpav.com/node/18628
छान बहरलिय कविता - नशिल्या
"वसुंधरेची नितळ कांती हलकीच
वा रे गणेशा!
छान
केरळ बोलतय कवितेतून.
+१ टु वल्ली
मस्त रे गणेशा
आधी टॅह्यॅ करेल ना कशावरून..?
शादी के साईड इफेक्टस म्हणतात
'अनामिक' हा शब्द गणेशाचा खास
त्याला 'नावं ठेवायला' आवडत
नशिल्या गंधपहाटेस आज दवबिंदू
भन्नाट
मद्याच्या चषकांची ओष्ठभेट
वल्ली ... दारुबाज विडंबन
माझेही चार आणे अर्थातच कवी
अन्या, खाल्लीस ना माती,
आता काय बोलु ...चालुद्या ..
आता काय बोलु ...
आंबट चिंबट या वासात होई नंतर
तरी सांगत होतो, मद्यालयात
@मद्यालयात घोड्यांना घेउन जाउ
मधुचंद्राची रात्र...