Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गणेशा on Tue, 07/26/2011 - 19:55
आतुर नजरेचा... एकच कटाक्ष हलकासा... हळुवार शिडकावा...अबोल शब्दांचा... तरल स्वप्नांचा... उंच किनारा ... अंगावर शहारा...थरथरत्या भावनांचा... ....................................मन हे बेधुंद झाले ....................................बावरले .. हरवले .. ....................................स्पर्श स्वप्नांचा घेवूनी ....................................नयनात सामावले !! ....................................क्षण हे गोंधळलेले ....................................थोडेशे बावरलेले ....................................अंगणात हृद्याच्या ....................................नभ अवतरलेले !! हवी हवीशी सळसळ... कातरलेल्या वेलीची ... चंदेरी बरसात आज... नक्षत्राच्या चांदण्यांची... सोनेरी किरणांची... आकाशी नक्षी... अल्हाद मोहक निर्मळ... झुळुक स्वप्नांची ... ....................................शब्द अडखळलेले ....................................ओठात हरवलेले ....................................श्वासांच्या ठेक्यावरती ....................................ह्रद्यगीत झुललेले !! ....................................प्रितफुल गंधाळलेले ....................................सप्तसूर ओथंबलेले ....................................प्रितीची साथ घेवूनी ....................................ह्रद्य धडधडलेले !! ....................................मन हे बेधुंद झाले ....................................बावरले .. हरवले .. ....................................स्पर्श स्वप्नांचा घेवूनी ....................................नयनात सामावले !! --- शब्दमेघ (२ जुलै २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ) नोट : कविता पुनःप्रकाशित

Submitted by इरसाल on Tue, 07/26/2011 - 21:23

Permalink

गणेशा..............मस्त

गणेशा..............मस्त दरवळतोय हं पहिल्या भेटीचा सुगंध. छान ...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 07/26/2011 - 21:56

Permalink

गणेशा!

अशा सकारात्मक कविता आणखी येऊ देत आता!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 07/27/2011 - 01:09

Permalink

वाहव्वा छान गणेशा

श्रीगणेशा अल्हाददायक आहे...सुखकारक काव्य ...छान
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 07/27/2011 - 06:50

Permalink

''अशा सकारात्मक कविता आणखी

''अशा सकारात्मक कविता आणखी येऊ देत आता!'' या प्रतिसादातला 'आता' लिहिण्याचा उद्देश कळला नाही पैसा.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 07/27/2011 - 09:13

Permalink

मारून टाकले

मारून टाकले
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 07/27/2011 - 09:53

Permalink

जिओ गणेशा, मस्त सुरुवात

जिओ गणेशा, मस्त सुरुवात केलीये. :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3137 views
  • २. स्वप्नमेघातील चांदणं
  • ३. स्पर्शगंध ..
  • ४. कोवळे झुंबर
  • ५. सोनेरी क्षणांची राजभेट...

Book traversal links for १. पहिल्या भेटीचा सुगंध

  • २. स्वप्नमेघातील चांदणं ›

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com