नशिल्या गंधपहाटेस आज
दवबिंदू हलकेच स्पर्शितो
पर्णअलंकारीत शृंगार
गर्द धुक्यात सळसळतो
तरंगीत स्पंदणे रेखीव
त्रीवेणी स्तब्ध निळीशार
मखमली पाकळ्यांची येथे
अनामिक निशब्द थरथर
वसुंधरेची नितळ कांती
हलकीच वळणदार बट
मदमस्त किरणांची वेल
सोनेरी क्षणांची राजभेट
गोड सतेज या गारव्यात
आयुष्याची नवप्रभात
नाजुक रेशिम वाटेवरती
सौख्य दाटले मिठीत
--------- शब्दमेघ (८ डिसेंबर २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)
४. कोवळे झुंबर: https://www.misalpav.com/node/19685
३. स्पर्शगंध: https://www.misalpav.com/node/19398
२. स्वप्नमेघातील चांदणं: https://www.misalpav.com/node/18888
१. पहिल्या भेटीचा सुगंध: https://www.misalpav.com/node/18628
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5299
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान बहरलिय कविता - नशिल्या
छान बहरलिय कविता -
नशिल्या गंधपहाटेस आज
दवबिंदू हलकेच स्पर्शितो
पर्णअलंकारीत शृंगार
गर्द धुक्यात सळसळतो
मस्त .खूप पु.ले.शु.
"वसुंधरेची नितळ कांती हलकीच
"वसुंधरेची नितळ कांती
हलकीच वळणदार बट
मदमस्त किरणांची वेल
सोनेरी क्षणांची राजभेट"
खुपच आवड्लय्....छान
वा रे गणेशा!
मस्त कविता सुचायला लागल्या!
छान
छान
केरळ बोलतय कवितेतून.
केरळ बोलतय कवितेतून.
+१ टु वल्ली
In reply to केरळ बोलतय कवितेतून. by प्रचेतस
@-केरळ बोलतय कवितेतून.>>>
लवकरच महाराष्ट्र बोलेल अशी आशा.. ;-)
मस्त रे गणेशा
In reply to +१ टु वल्ली by अत्रुप्त आत्मा
बोलायला वेळ आहे अजुन भटजीबुवा. आधी टॅह्यॅ करेल ना ;)
आधी टॅह्यॅ करेल ना कशावरून..?
In reply to मस्त रे गणेशा by अन्या दातार
आधी टॅह्यॅ करेल ना

कशावरून..? असं हसरं सुद्धा असेल..
चित्र.. अंजावरुन साभार...
शादी के साईड इफेक्टस म्हणतात
शादी के साईड इफेक्टस म्हणतात ते हेच काय ? शुद्धलेखनाचं का बलिदान देता रे, उगा ते चुंबन घेताना हेलमेट मध्ये आल्यासारखं वाटतंय की.
तरंगीत स्पंदणे रेखीव
त्रीवेणी स्तब्ध निळीशार
मखमली पाकळ्यांची येथे
अनामिक निशब्द थरथर
'अनामिक' हा शब्द गणेशाचा खास
In reply to शादी के साईड इफेक्टस म्हणतात by ५० फक्त
'अनामिक' हा शब्द गणेशाचा खास आवडता दिसतोय.
अनामिक भटकंती, अनामिक निशब्द थरथर इ.इ.
त्याला 'नावं ठेवायला' आवडत
In reply to 'अनामिक' हा शब्द गणेशाचा खास by प्रचेतस
त्याला 'नावं ठेवायला' आवडत नसेल किंवा नाव दिल्यानं 'पोलखोल' होत असेल.... ;)
नशिल्या गंधपहाटेस आज दवबिंदू
सुदंर कडवं!!
भन्नाट
भन्नाट कल्पनाविलास मालक!!
सुंदर रचना!! वाचनखुण साठवलेली आहे. :)
मद्याच्या चषकांची ओष्ठभेट
गणेशाची माफी मागून.......
डचमळलेल्या अपरात्री या
मी लडखडतच येतो
अडखळत्या ह्या पावलांनी
मी अंधारातच धडपडतो
झिंगलेल्या मेंदूच्या ह्या धुंदित
डोके कसे सुन्न सुन्न
तर्राट झालेल्या डोळ्यांमधुनी
नशा पाझरे झिम्म झिम्म
मद्याने झिम्माड होऊनी
जाहल्या सुरु वांती
जडावलेल्या या डोळ्यांनी
निस्तेज जाहली कांती
आंबट चिंबट या वासात
होई नंतर नवप्रभात
परत ताजा होवुनी
जाई मी मद्यालयात.
वल्ली ... दारुबाज विडंबन
In reply to मद्याच्या चषकांची ओष्ठभेट by प्रचेतस
वल्ली ... दारुबाज विडंबन केलेले मला आवडत नाहि ..
याची शिक्षा म्हणुन उद्या पुण्यात भेट
माझेही चार आणे अर्थातच कवी
In reply to मद्याच्या चषकांची ओष्ठभेट by प्रचेतस
माझेही चार आणे अर्थातच कवी गणेशा यांची माफी-बिफी मागूनच हं!
नशिल्या भांगपहाटेस आज
पोलिस हलकेच झोडीतो
तर्र्र अलंकारित गटार
भल्या सकाळी मळमळतो
तरंगित रस्त्याने रेखीव
बाटली स्तब्ध निळीशार
मखमली कागदांची येथे
असंबद्ध आकडी मरमर
काचेची नितळ कांती
हलकाच वळणदार कट
मदमस्त सायंकाळची वेळ
सोनेरी वारुणीची राजभेट
कडू निस्तेज या थंडाव्यात
नेहमीचा ठरला बार
टोकदार काटे वाटेवरती
मद्य दाटले उदरात
अन्या, खाल्लीस ना माती,
In reply to माझेही चार आणे अर्थातच कवी by अन्या दातार
अन्या, खाल्लीस ना माती, बघितले नाहीस का गणेशा वर काय म्हणालाय ते.
आता उद्या सकाळीच पकड विमान कुठलेतरी आणि पोच पुण्यात.
आता काय बोलु ...चालुद्या ..
In reply to माझेही चार आणे अर्थातच कवी by अन्या दातार
आता काय बोलु ...
चालुद्या .. बघु एखादे विडंबन मलाच जमते आहे का काय ..
तुमच्या उत्साहाने मुळ कविता लिहिण्यापेक्षा त्यावर विडंबन्च देतो आता ... [:)]
बाकी छान जमले आहे तरी एक वेळ ताटली धरा पण बाटली सोडा
आता काय बोलु ...
In reply to माझेही चार आणे अर्थातच कवी by अन्या दातार
दोन्ही विडंबन आवदेश आहे
आंबट चिंबट या वासात होई नंतर
In reply to मद्याच्या चषकांची ओष्ठभेट by प्रचेतस
आंबट चिंबट या वासात
होई नंतर नवप्रभात
परत ताजा होवुनी
जाई मी मद्यालयात :drunk: वल्लीदा..मेलो... ;-) टांगा पल्टी... घोडे फरार...
तरी सांगत होतो, मद्यालयात
In reply to आंबट चिंबट या वासात होई नंतर by अत्रुप्त आत्मा
तरी सांगत होतो, मद्यालयात घोड्यांना घेउन जाउ नका, आता हुडका कुठं गेले सगळे ते...
@मद्यालयात घोड्यांना घेउन जाउ
In reply to तरी सांगत होतो, मद्यालयात by ५० फक्त
@मद्यालयात घोड्यांना घेउन जाउ नका, आता हुडका कुठं गेले सगळे ते...>>>
हुडकायला कशाला पायजे...ते गेले त्यांच्या माद्या-लयात ;-)
मधुचंद्राची रात्र...
बहुत ही हसीन होती है वोह कहता ये जमाना था..
हमे भी तो पहली बार उसे आजमाना था..
बस्स.. घुंघट ही उठा सके हम केवल..
आगे..ढेर सारा शरमाना था....
बाकी 'बाल गणेशा' ची मिपाकर आतुरतेन वाट पाहत आहेत. ;)