१. पहिल्या भेटीचा सुगंध
काव्यरस
आतुर नजरेचा... एकच कटाक्ष हलकासा...
हळुवार शिडकावा...अबोल शब्दांचा...
तरल स्वप्नांचा... उंच किनारा ...
अंगावर शहारा...थरथरत्या भावनांचा...
....................................मन हे बेधुंद झाले
....................................बावरले .. हरवले ..
....................................स्पर्श स्वप्नांचा घेवूनी
....................................नयनात सामावले !!
....................................क्षण हे गोंधळलेले
....................................थोडेशे बावरलेले
....................................अंगणात हृद्याच्या
....................................नभ अवतरलेले !!
हवी हवीशी सळसळ... कातरलेल्या वेलीची ...
चंदेरी बरसात आज... नक्षत्राच्या चांदण्यांची...
सोनेरी किरणांची... आकाशी नक्षी...
अल्हाद मोहक निर्मळ... झुळुक स्वप्नांची ...
....................................शब्द अडखळलेले
....................................ओठात हरवलेले
....................................श्वासांच्या ठेक्यावरती
....................................ह्रद्यगीत झुललेले !!
....................................प्रितफुल गंधाळलेले
....................................सप्तसूर ओथंबलेले
....................................प्रितीची साथ घेवूनी
....................................ह्रद्य धडधडलेले !!
....................................मन हे बेधुंद झाले
....................................बावरले .. हरवले ..
....................................स्पर्श स्वप्नांचा घेवूनी
....................................नयनात सामावले !!
--- शब्दमेघ (२ जुलै २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)
नोट : कविता पुनःप्रकाशित
वाचने
3142
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
गणेशा..............मस्त दरवळतोय हं पहिल्या भेटीचा सुगंध. छान ...
अशा सकारात्मक कविता आणखी येऊ देत आता!
श्रीगणेशा अल्हाददायक आहे...सुखकारक काव्य ...छान
''अशा सकारात्मक कविता आणखी येऊ देत आता!'' या प्रतिसादातला 'आता' लिहिण्याचा उद्देश कळला नाही पैसा.
मारून टाकले
जिओ गणेशा, मस्त सुरुवात केलीये. :)
गणेशा..............मस्त