नशिल्या गंधपहाटेस आज
दवबिंदू हलकेच स्पर्शितो
पर्णअलंकारीत शृंगार
गर्द धुक्यात सळसळतो
तरंगीत स्पंदणे रेखीव
त्रीवेणी स्तब्ध निळीशार
मखमली पाकळ्यांची येथे
अनामिक निशब्द थरथर
वसुंधरेची नितळ कांती
हलकीच वळणदार बट
मदमस्त किरणांची वेल
सोनेरी क्षणांची राजभेट
गोड सतेज या गारव्यात
आयुष्याची नवप्रभात
नाजुक रेशिम वाटेवरती
सौख्य दाटले मिठीत
--------- शब्दमेघ (८ डिसेंबर २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)
४. कोवळे झुंबर: http://www.misalpav.com/node/19685
३. स्पर्शगंध: http://www.misalpav.com/node/19398
२. स्वप्नमेघातील चांदणं: http://www.misalpav.com/node/18888
१. पहिल्या भेटीचा सुगंध: http://www.misalpav.com/node/18628
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5266
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान बहरलिय कविता - नशिल्या
"वसुंधरेची नितळ कांती हलकीच
वा रे गणेशा!
छान
केरळ बोलतय कवितेतून.
+१ टु वल्ली
In reply to केरळ बोलतय कवितेतून. by प्रचेतस
मस्त रे गणेशा
In reply to +१ टु वल्ली by अत्रुप्त आत्मा
आधी टॅह्यॅ करेल ना कशावरून..?
In reply to मस्त रे गणेशा by अन्या दातार
शादी के साईड इफेक्टस म्हणतात
'अनामिक' हा शब्द गणेशाचा खास
In reply to शादी के साईड इफेक्टस म्हणतात by ५० फक्त
त्याला 'नावं ठेवायला' आवडत
In reply to 'अनामिक' हा शब्द गणेशाचा खास by प्रचेतस
नशिल्या गंधपहाटेस आज दवबिंदू
भन्नाट
मद्याच्या चषकांची ओष्ठभेट
वल्ली ... दारुबाज विडंबन
In reply to मद्याच्या चषकांची ओष्ठभेट by प्रचेतस
माझेही चार आणे अर्थातच कवी
In reply to मद्याच्या चषकांची ओष्ठभेट by प्रचेतस
अन्या, खाल्लीस ना माती,
In reply to माझेही चार आणे अर्थातच कवी by अन्या दातार
आता काय बोलु ...चालुद्या ..
In reply to माझेही चार आणे अर्थातच कवी by अन्या दातार
आता काय बोलु ...
In reply to माझेही चार आणे अर्थातच कवी by अन्या दातार
आंबट चिंबट या वासात होई नंतर
In reply to मद्याच्या चषकांची ओष्ठभेट by प्रचेतस
तरी सांगत होतो, मद्यालयात
In reply to आंबट चिंबट या वासात होई नंतर by अत्रुप्त आत्मा
@मद्यालयात घोड्यांना घेउन जाउ
In reply to तरी सांगत होतो, मद्यालयात by ५० फक्त
मधुचंद्राची रात्र...