'भटकंतीचा एक उनाड दिवस, पण कुटुंबासोबत'!!!
'भटकंतीचा एक उनाड दिवस, पण कुटुंबासोबत'!!!
आपण भटके पाहिजे तसं भटकु शकतो ते केवळ घरून मिळणार्या पाठींब्यामुळेच, खरं म्हणजे या गोष्टीला कुणाही भटक्याचा आक्षेप नसावा. पण असा पाठींबा मिळवण्यासाठी प्रत्येकाला त्यासाठी काहीना काहीतरी कष्ट घ्यावेच लागतात. मग घरच्यांना घेऊन हॉटेलींग, पिक्चर पाहणे असो किंवा घरची कामं, सासुरवाडीतील कार्यक्रम, मुलांचा अभ्यास घेणे असो. अर्थात माझ्यापेक्षा अनुभवी मंडळी मी सांगितलेल्या पर्यायात नक्की भर घालू शकतील यात काही शंकाच नाही. त्यातल्या त्यात लग्न झालेल्यांना तर त्यासाठी फार मोठं प्लॅनिंग करावं लागतं.
मिसळपाव