ग्राम"पंचायत" लागली..!! - 9
http://www.misalpav.com/node/41789
"माउली जय हरी ", विजूबापूनी कोपऱ्याला कोपरा जोडून लांबून नानांना हात जोडले.
नानांनी पण ओठांपर्यंत हात उंचावत 'राजनीती' मधल्या मनोज बाजपेयी सारखा प्रति-नमस्कार केला.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि फायनल टच देण्याकरिता विरोधी गटाने कंबर कसली होती.
संग्राम गट मात्र कमालीचा सुस्त झालेला दिसत होता.
विजूबापू ग्रेट माणूस. विरोधी पक्षातला असला म्हणून काय झाले पण कर्तृत्वान व्यक्तिमत्व .
घरातल्या एका खोलीत चालू केलेल्या पतपिढीचा आता वटवृक्ष झाला होता.
मिसळपाव