उदय कॉर्लिग्झम्सचा

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
5 Sep 2017 - 12:03 am

मायकल आपल्या डोळयातील पाणी टिपत व्यासपिठावरुन खाली उतरला. प्रत्येक भाषणाच्या शेवटी तो असाच भावनिक व्हायचा. मनाच्या गाभा-यापासुन उमटणा-या भाषणांमुळेच त्याच्या चाहित्यांची संख्या वाढतच जात होती.

दरवेळेस भाषणानंतर त्याच्याभोवती लोकांचा गरडा पडायचा. व्यासपिठावर हजारो श्र्ओत्यांना साद घालणारा मायकल यावेळेस मात्र मुका होऊन जायचा. गर्दीतुन स्मितहास्याने तो तिथुन बाहेर पडायचा आणि थेट समुद्र किनारा गाठायचा. आपल्या उध्वस्त भुतकाळाच्या खुणा तो त्या समुद्रकिना-यावर शोधत असे.

कॉर्लिग नावाच्या एका लहानश्या देशात मायकल रहात असे. ह्या कॉर्लिग देशाच्या भुभागाला तिन्ही बाजुने अथांक समुद्र लाभला होता. कॉर्लिगच्या एका बाजूला मात्र अॉस्टेना नावाचा प्रचंड मोठा देश होता.
या दोन देशात दोन वेगवेगळे धार्मिक प्रवाह होते. कॉर्लिग देश हा बॅस्टेनिझमला मानणारा तर अॉस्टेना हा निथोरिझमला मानणारा. जागतिक लोकसंख्येचा विचार करता बॅस्टेनिझमला मानणारे लोक खुपच कमी होते. दुसरीकडे निथोरिझमला मानणारे लोक केवळ अॉस्टेनाच नव्हे तर आणखी दोन तीन देशात पसरलेले होते.

ऑस्टेना देशास आक्रमणाचा इतिहास होता.ऑस्टेना देशाच्या सिमाविस्ताराच्या हव्यासाचा कॉर्लिग देश बळी पडू लागला होता. कॉर्लिग देशाला जगाच्या नकाशावरुन हटवण्यासाठी मोठ्या स्तरांवर प्रयत्न चालू झाले होते.

पाच वर्षापुर्वी कॉर्लिगमधल्या एका धर्मस्थळावर दहशतवादी हल्ला झाला होता. याची पाळेमुळे अर्थातच अॉस्टेनात होती. मात्र जागतिक पातळीवर कॉर्लिगला हे सिद्ध करता आले नाही.

हळुहळू बॅस्टेनिझमच्या धार्मिक बाबींवर हल्ले वाढत जाऊ लागले.यात धार्मिक स्थळांना इजा पोहचवणे, धर्मग्रथांचे विद्रुपीकरण करणे ह्यांसारखे प्रकार वाढू लागले होते. अॉस्टिनावरती दहशतवादाचे आरोप होताच अॉस्टिना यास कॉर्लिगमधली यादवी मानत असे. एकंदरीत कॉर्लिगच्या धार्मिक इतिहासात नष्ट करणे आणि निथोरिझमचा वाढता प्रचार करणे ही अॉस्टिनाची गुप्त कारस्थाने यशस्वी होताना दिसत होती. मात्र मायकल या सर्व गोष्टींसाठी अडथळा ठरत होता.

मायकल कॉर्लिगचे कोणतेही राजकीय पद भुषवत नव्हता. तो एक साधा धर्मगुरु होता. आपल्या धर्मावरील आक्रमणाविरुद्ध तो पोडतीडकिने बोलत असे. धार्मिक अभिमान दुखावलेले कॉर्लिगन्स त्याच्या बोलाण्याने भारावून जात.

दुसरीकडे कॉर्लिगचे राजकारणी अपयशी ठरत चाललेले होते. यातुन मायकलवर राजकारणात उतरण्याचा दबाव वाढत होता. मात्र मायकलला आपल्या मर्यादेची पुर्ण कल्पना होती.

अॉस्टिनसारख्या बलाढ्य देशाविरुदध सिमेवर लढणे कॉर्लिगला परवडणारे नव्हते. या धार्मिक हल्ल्यांना तोंड देण्यासाठी धार्मिक समुपदेशन करणे हाच एक मार्ग असल्याचा मायकलचा विश्वास होता.

मायकलच्या या कारस्थानाची दखल अॉस्टिनकडून केव्हाच घेण्यात आली होती. मायकलच्या रोजच्या नित्यक्रमाची माहिती घेण्यात आली. आणि त्याच्यासह त्याच्या परिवारावर हल्ला करण्यात आला.

सुदैवाने मायकलच्या भक्तांनी मायकलला वाचवले मात्र मायकलने आपल्या परिवारास गमावले.

मायकलची ही लढाई आता वैयक्तिक पातळीवर उतरली होती.स्वताःकडे असलेले धर्माचेच अस्त्र कसे वापरावे हा एकच विचार मायकल त्या समुद्रकिनारी करत असे आणि अचानक त्याला यावरचे उत्तर सापडले.
क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

एस's picture

5 Sep 2017 - 12:42 am | एस

रोचक.

पुंबा's picture

5 Sep 2017 - 11:02 am | पुंबा

पुभाप्र..
सुरूवात उत्तम..

सिरुसेरि's picture

5 Sep 2017 - 1:24 pm | सिरुसेरि

मायकल , कॉर्लिग या नावांवरुन मायकल कॉर्लिऑन ( डॉन व्हिटो ) आठवला .

शब्दानुज's picture

5 Sep 2017 - 5:54 pm | शब्दानुज

धन्यवाद.. पुढील भाग लवकरच प्रकाशित करेन

पगला गजोधर's picture

2 Oct 2017 - 8:11 pm | पगला गजोधर

उशिरा नजर पडली या लेखावर,

छान सुरवात ...