"शिळा"लेख....

ss_sameer जनातलं, मनातलं
आमच्या कडे कधीच शिळ उरत नाही. कारण ज्या दिवशी जेवण मला आवडतं ते अन्न तिला आवडत नाही, आणि तिला आवडलेलं मी पोटभर खाऊ शकत नाही. आठवड्यातले तीन दिवस कोणीतरी एक पोटापेक्षा जास्त खाऊन तृप्त असतो तर उरलेले तीन दिवस दुसरा, कारण स्वयंपाक सरासरी एक दिवसाआड चांगला बनवला जातो. अर्थात माझ्या दृष्टीने उत्तम म्हणजे तिच्या दृष्टीने बेचव ह्या व्याख्येप्रमाणे. आठवड्याचे उरलेले तीन दिवस मी कमी जेवतो याची दोन कारणे, एक म्हणजे आमची अन्नपूर्णा इतकी देखील वाईट स्वयंपाकिण नाही की पूर्ण उपाशी राहावे लागेल. आणि दुसरं म्हणजे मला आवडलेलं तिने खाल्लं तर तिचं मन कसं भरेल? अर्थात एक दिवसाआड आकंठ जेवणामुळे आम्हा दोघांना पोटाच्या फारश्या तक्रारी नाहीत कारण समतोल राखला जातो. शिवाय जर आम्हाला पोटाला पूर्णच आराम द्यायचा असेल तर आम्ही बाहेर जेवायला जातो. स.शा.
वर्गीकरण

8 टिप्पण्या 3,083 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

चौथा कोनाडा नवीन

शिवाय जर आम्हाला पोटाला पूर्णच आराम द्यायचा असेल तर आम्ही बाहेर जेवायला जातो. >> अच्छे दिन, दुसरं काय !

चौथा कोनाडा नवीन

शिवाय जर आम्हाला पोटाला पूर्णच आराम द्यायचा असेल तर आम्ही बाहेर जेवायला जातो. अच्छे दिन, दुसरं काय ! :-)

मार्मिक गोडसे नवीन

शिवाय जर आम्हाला पोटाला पूर्णच आराम द्यायचा असेल तर आम्ही बाहेर जेवायला जातो. मी ह्याकरता आठवड्यातून एकदा 'मन की बात'ऐकतो. उँची उँची बातोसे किसिका पेट भरता नही.....

पैसा नवीन

जेवण तुम्हाला आवडत नाही त्या दिवशी "तुझ्या आईला बोलावं, मग बघू किती न काय स्वयंपाक करतात" किंवा "आई पोस्टाने जेवण पाठवते का बघ" इत्यादी तोंडीलावणे बोलले नाही तर नवऱ्याला जेवण अजिबात पचणार नाही. =))