Skip to main content

सुरक्षा विमा आहे, साहेब?

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 27/10/2018 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
कालची गोष्ट, उत्तम नगर मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेतला. दिवाळीचे दिवस साहजिक आहे, रस्त्यावर ट्राफिक वाढणारच. दिल्लीकरांची एक अत्यंत वाईट सवय, रस्त्यावर जरा हि ट्राफिक दिसले कि लगेच वाहन रॉंग साईट वर घ्यायचे. रिक्षावाला हि त्याला अपवाद नाही. पंखा रोड वर ट्राफिक पाहून, सवयीनुसार रिक्षा चालकाने, समोरून येणार्या बसची पर्वा न करता, रिक्षा रॉंग साईड वर टाकला. चालक शेजारी बसलेल्या सवारीने त्याला टोकले, रिक्षा बस खाली असती तर, तू तर वर गेला असता, सोबत आम्हाला हि घेऊन गेला असता.

धोका

लेखक परशुराम सोंडगे यांनी शनिवार, 27/10/2018 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
"गप्प मरं नुसतं तटा-तटा तोडीत..." पार्थच्या पाठीत जोरात धपाटा घालतं पल्लवी म्हणाली. गोचीड तोडून काढावा अंगावरचा तसा पार्थ तिनं बाजूला केला. ढकलूनच दिलं त्याला. जाम वैतागआला होता तिला. गोचिड अन लेकरू… एक अंगातल रक्त पितं. दुसरं दुध… दुध पण रक्ताच तयार होत असेल ना? तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हतां. पार्थतर सारखाच चिटीत होता. तिनं बाजूला केला पण त्यानं भोकाड पसरलं. लेकराला कसली कळते रात्र अन बित्र? घडयाळात पाहीलं. दोन वाजल्या होत्या. बाहेर सारा अंधारच दिसत होता. इकडं तिकडं पाहिलं. जय जवळ नव्हता. कुठं गेला जय? आता तर इथ होता तो. इथं म्हणजे त्याच्या किठ्ठीतच होती ना ती?

सिन्नर ~ गोंदेश्वर मंदिर

लेखक MipaPremiYogesh यांनी शुक्रवार, 26/10/2018 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
गोंदेश्वर सीमोल्लंघन काल नासिक ला निघालो तेंव्हाच विचार केला की गोंदेश्वर ला जमल्यास जाऊन यायचे. नाही हो करत करत, ठरवले जायचेच. आणि जेंव्हा सिन्नर मध्ये प्रवेश करून मंदिराच्या आवारात आलो, तेंव्हा एकदम आश्चर्यचकित झालो. अप्रतिम कोरीव काम आणि मंदिर बघून मनोमन त्या अनामिक कलाकारांना नमस्कार केला. सूर्य अस्ताला जात होता, आणि एकदम सुंदर वातावरण होतं. काय अप्रतिम दगडी मंदिर समुह.. बाजूला सूर्य मंदिर आणि त्यात कलत्या सूर्याची किरणे पडत आहेत..कमाल architecture..

गज़ल

लेखक MipaPremiYogesh यांनी शुक्रवार, 26/10/2018 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
गज़ल गजल म्हणजे डोळ्यांच्या काजळातील रेघ! जसे श्रावणात बरसणारे मेघ!!! गजल म्हणजे जुन्या  आठवणीतील धागा! जशी कृष्णासाठी आसुसलेली राधा!!! गजल म्हणजे पहिले प्रेम! जसा गोऱ्या गालावरील नाजूक थेंब!!! गजल म्हणजे  श्रावणातील पाऊस! जसे श्रावणातील पावसात चिंब भिजलेले केस!!! गजल म्हणजे  नक्षत्र स्वाती! जसा त्या नक्षत्रात तयार झालेला सुंदर मोती!!! गजल म्हणजे ओंजळीतील हिरवंगार पान! जशी मल्हार रागातील घेतलेली सुंदर तान!!! गजल म्हणजे  राग मेघमल्हार! जसा कोणासाठी तरी केलेला साजशृंगार!!! ~ योगेश पुराणिक

संगणक व आंतरजालाचा वापर करणार्‍या उपकरणांवरच्या डेटाची चोरी : समज-गैरसमज

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 26/10/2018 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
वैयक्तिक, व्यापारी आणि सरकारी स्तरांवर, संगणक आणि आंतरजालाचा वापर करून माहिती संकलन करणे व ती माहिती फायदेशीररीत्या वापरणे, ही गोष्ट आजकाल रोजच्या जेवणाइतकी सामान्य झाली आहे. अर्थातच, साठवलेला डेटा नष्ट होणार नाही हे पाहणे व त्याचे चोरीपासून संरक्षण करणे हे सर्वसामान्य काळजीचे विषय झाल्यास आश्चर्य ते काय? संगणक वापरून बनवलेल्या, विशेषतः चीनी बनावटीच्या उपकरणांवरच्या, (उदा : मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, सर्वर, इ) डेटाची चोरी हा सद्या सर्वसामान्य जनतेत काळजीने व भितीने चर्चिला जाणारा विषय आहे. या विषयाबाबत, लोकांच्या मनात अनेक समज, गैरसमज आणि भिती आहे.

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी)

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 26/10/2018 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
बघता मानस होते दंग ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी) ९ सप्टेंबरची पहाट. काल रात्री चांगला आराम झाल्यामुळे अगदी फ्रेश वाटतंय. आज रविवार आहे, त्यामुळे किंचित उशीरा निघायचं आहे. पण पहाटे जाग आली, म्हणून लवकर उठून बाहेर चक्कर मारली तर बाहेर सर्व शांतता आहे. चहाचं हॉटेलही बंद आहे. मग आवरून आरामात सातला बाहेर पडलो. आता हॉटेल सुरू झाली आहेत. नाश्ता करताना माझ्या सायकलीला बघून अनेक बस ड्रायव्हर आणि कंडक्टर्सनी माझी विचारपूस केली! जवळच मलकापूर बस स्टँड आहे. थोडा वेळ त्यांच्यासोबत बोलून पावणे आठला मलकापूरमधून निघालो. गेले चार दिवस काय बघायला मिळालं आहे!