मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काय हाही भास आहे ?

नाहिद नालबंद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मस्त हा मधुमास आहे! काय हाही भास आहे ? पँन अन आधार जोडा काय कटकट त्रास आहे छान! सुंदर! लोक म्हणती मत तुझे मज खास आहे धीर थोडा धर जरा तू अंत आरंभास आहे लालसा, अविचार, फितुरी आपुला इतिहास आहे चांगली असतेच कविता पण गझल फर्मास आहे एकदा मिळतो म्हणे, पण जन्म मनुचा त्रास आहे

वाचने 3869 वाचनखूण प्रतिक्रिया 4

खिलजि गुरुवार, 05/31/2018 - 17:52
सरकारी कृपा सारी म्हणून हा त्रास आहे तुम्हीच ठरवा आता खास आहे बकवास आहे लिहिणे थांबवू नका कृपया लिहिणे आपले खास आहे समीक्षा नेहेमी करावी माणसाने तो लोकशाहीचा श्वास आहे सिद्धेश्वर विलास पाटणकर