ओंकार पत्की - काही आठवणी....
ओंकारवर लेख लिहायला घेतला होता, पण काय लिहू आणि काय नाही असं झालं....
या केवळ त्याच्या आठवतात तशा आठवणी....
त्याची आणि माझी मैत्री गेल्या तीस - बत्तीस वर्षांची. मला आठवतं आम्ही सहावीत असताना तो आमच्या शाळेत आला आणि पहिल्या दिवसापासून असा काही रमला होता की जणू माँटेसरीपासूनच आमच्याबरोबर होता! तेव्हापासूनच तो असा बिनधास्त आणि काहीसा विक्षिप्त होता. पुढे सातवी - आठवी दोन वर्ष आम्ही एका बेंचवर शेजारी बसत असल्याने बडबड केल्यामुळे कित्येकदा एकत्रं शिक्षा भोगली असेल याचा हिशेबच नाही!
मला आठवतं सातवीत असताना त्याच्या हात फ्रॅक्चर झाला होता.
बोकाशेठना श्रद्धाजली !!
मिपाकर बोका-ए-आझम उर्फ ओंकार पत्की यांना चारेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटलो. त्यानंतरही कट्ट्यानिमित्ताने वारंवार भेटी होत राह्यल्या, अधुन मधून फोनवरही बोलणं व्हायचं. अगदी पहिल्या भेटीपासून दिलखुलासपणे बोलणारा माणूस.
पण आज दुपारची त्यांच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अगदी अनपेक्षित आली आणि 'मोसाद' ही लेखमालिका डोळ्यासमोर झटकन उभी राह्यली. माझ्यासारखेच इथले बहुतांश मिपाकर त्यांच्या लेखमालिकेचे फॅन आहेत. मोसाद, स्केअरक्रो अशा अनेक उत्कृष्ट लेखमालिकांची मेजवानी त्यांच्या लेखनीतून आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळाली.
बोकाशेठना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !!
बोका-ए-आझमला भावपूर्ण श्रध्दांजली
बोका गेला. अरे ४२ हे काय जायचे वय होते का?त्याला झालेल्या आजाराविषयी ६-७ महिन्यांपासूनच कल्पना होती आणि त्यातून तो बरा होणे फारच कठिण आहे हे पण माहित होते. तरीही मानवी वेडं मन शेवटपर्यंत हार मानायला तयार होत नाही. अगदी कालपर्यंत वाटत होते की काहीतरी चमत्कार होईल आणि एक दिवस व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्याचे मेसेज बघायला मिळतील.
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १. चाकण ते केडगांव चौफुला
जे सत्य सुंदर सर्वथा.... : १. चाकण ते केडगांव चौफुला
नमस्कार! नुकतीच १४ दिवसांची व ११६५ किलोमीटरची सायकल मोहीम पूर्ण केली. आता त्याचे अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. ह्या सायकल मोहीमेची योजना कशी बनली, हे थोडक्यात सांगतो. मे २०१८ मध्ये योग प्रसारासाठी ५९५ किलोमीटर सायकल प्रवास केला होता. तेव्हा एक सामाजिक माध्यम म्हणून सायकलची क्षमता काय आहे, हे जाणवलं होतं. तेव्हा अशी आणखी सायकल मोहीम करायची इच्छा मनात होती. आणि सायकल चालवायची आहे तर एखादा सामाजिक संदेश व सामाजिक उद्दिष्ट असावं, असं वाटत होतं. परभणीचे माझे सायकल मित्र डॉ.
माझी पहिली मराठी साहस कथा : मिशन वारी
नमस्कार!
मी मिसळपाव वर पहिल्यांदाचं लिहीत आहे. जर चुकीच्या विभागात ही माहिती लिहिली असेल तर कृपया सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती.
नुकतेच मी माझे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे नाव आहे "मिशन वारी".
पंढरीच्या वारीच्या पुणे ते सासवड या टप्प्याला अतिरेकी आपले लक्ष्य करतात आणि बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखतात. मिल्ट्री इंटीलिजन्सला याचा सुगावा लागतो आणि हे आव्हान पेलण्याची जबाबदारी टाकण्यात येते कॅप्टन आकाश आणि त्याच्या टीमवर.
पंढरीच्या वारीच्या पुणे ते सासवड या टप्प्याला अतिरेकी आपले लक्ष्य करतात आणि बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखतात. मिल्ट्री इंटीलिजन्सला याचा सुगावा लागतो आणि हे आव्हान पेलण्याची जबाबदारी टाकण्यात येते कॅप्टन आकाश आणि त्याच्या टीमवर.पावलांना अंत नाही
पावलांना अंत नाही
वेदनेला गाव नाही
चालते ही व्यर्थ चिंता
थांबण्याचे नाव नाही
दूर काळोखात कोणी
गुंफली माझी कहाणी?
त्या तिथे सूर्यास सुद्धा,
उगवण्याचे ठाव नाही..
लाख स्तोत्रे अर्पुनी मी
मांडले वैफल्य माझे..
टेकला मी जेथ माथा,
मंदिरी त्या देव नाही!
अंतरीच्या शून्यतेला
गीत मी कैसे म्हणावे
गोठलेले शब्द नुसते
छंद नाही, भाव नाही!
अदिती
काव्यरस
यूं ही चला चल राही….भाग - १
श्रीनिवास, माझा नवरा, सुरवातीला ट्रेकिंग करायचा. आता त्याला सायकलिंगचा नाद लागलाय. इतकाकि मी कधी कधी त्याला सायकल वेडा म्हणते. एरवी दोघांमध्ये मीच जास्त बडबड करणारी. पण सायकलचा विषय निघाला कि श्रीनिवास एकदा जो सुरु होतो तो थांबतच नाही. कधीतरी मी सांगतेसुद्धाकि बास बाबाआता सायकल पुराण. पण तो थांबत नाही. आपण सायकलने इकडे जाऊया, मग तिथून दुसरीकडे जाऊया असे प्लॅन अखंड करत असतो. यातल्या बऱ्याच वेळेला मी दुर्लक्ष करते कारण माझ्याच्याने ते झेपणार नाही याची मला खात्री असते. श्रीनिवास सायकलची फारच काळजी घेतो.
मिसळपाव