जे सत्य सुंदर सर्वथा....: (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव) ४. पंढरपूर ते बार्शी
जे सत्य सुंदर सर्वथा....: ४. पंढरपूर ते बार्शी
१५ नोव्हेंबर. काल सलग दोन दिवस पंक्चर झाल्यामुळे अजूनही अस्वस्थ वाटत आहे. पंक्चर तर मी नीट केलं आहे, पण परत होण्याची भिती आहे. काल रात्री उशीरा झोपूनही सकाळी छान वाटतंय. मुलांचा व पालवीतल्या मंगल ताईंचा निरोप घेऊन निघालो. थंडी अगदी जाणवते आहे. पंढरपूर! गावातून शेटफळचा रस्ता विचारत पुढे निघालो. ह्या प्रवासाचा रूट प्लॅन केला होता तेव्हा दररोज ८०- ८५ किलोमीटर सायकल चालवण्याचं उद्दिष्ट ठेवलं. असा रूट बनवताना अनेकदा अगदी अंतर्भागातून जाणारे रस्ते घ्यावे लागले. आजही मला अशाच रस्त्यावरून जायचं आहे.
मिसळपाव