बाप्पा
बाप्पा
धीन ता धीन धीन ता धीन ता धीन धीन ता धीनधीनधीनाक धीनधीनधीनाक
बाहेर ढोल ताशांचा आवाज घुमत होता . ढोल ताशा पथक मोठ्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत करत होते . बाप्पा पण मस्त आपली बॅग वैगेरे भरून आपल्या लाडक्यांकडे १० दिवसांसाठी रहायला आला होता आपल्या आईला सोडून. त्यांच्या आईने पण मस्त खाऊ वैगेरे देऊ का विचारलं बाप्पाला पण बाप्पा कसला खाऊ घेतोय आपल्या आईकडून उलट त्यानेच सांगितलं की , “ मी मस्त खाऊ खाणार आहे माझ्या भक्त्यांकडे जाऊन . काय ते उकडीचे मोदक , खोबऱ्याचे मोदक, वेगवेगळे पदार्थ , विचार करूनच तोंडाला पाणी सुटतंय .
मिसळपाव