Skip to main content

पाहीले असे खूप वार

लेखक बाजीगर यांनी रविवार, 24/11/2019 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
अजित अजून गवार पाहीले असे खूप वार बोलले ते पवार बोबडेसे || कोण स्वस्त ठरणं शेतक-यांचे मरण मुतक-याचे धरण सांगा आता || शिवी-शेणाची होळी गटा गटांची टोळी 145 जणांची मोळी बांधवेना || कायद्याची बडबड 'मातोश्री'ची तडफड लोक"शाई"ची फडफड पाहवेना || माध्यमांची गरळ त्या राउताची बरळ मुख्य-स्वप्नाचे तरळ गदारोळ || काढीली एकमेक मय्या आता भूषवीती शय्या नाचे जणू ता ता थय्या ज्योकशाही || तुमचा तो काळाबाजार आमचा हा गोराबाजार खुळ्यांचा शेजार मुलाखती || आकड्यांची वजावट मग प्रेझ राजवट सगळी ही सजावट खुर्चीसाठी || सगळेच करा युती वाटून घ्या खाती सहकाराच्या खावा ताटी भरपेट ||

ओढ समुद्राची

लेखक मालविका यांनी शनिवार, 23/11/2019 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
ओढ समुद्राची आमच्या चिपळूण पासून समुद्र तसा लांबच. म्हणजे समुद्र बघायला जायचं तर जवळच्या जवळ म्हणजे गुहागर गाठायला हवं. नाहीतर जरा लांब रत्नागिरी किंवा दापोली जवळचे बीच. त्यामुळे लहानपणी समुद्रावर जाणं खूपच कमी होतं. हां पण ओढ मात्र नक्की होती. लहान असताना आमच्या बिल्डिंग मधले शेजारी एखाद्या शनिवारी त्यांच्या मुलीबरोबर मलादेखील घेऊन जायचे. दोन तीन तास समुद्रावर घालवल्यावर त्यांच्या गाडीतून येताना दमून सॉलिड झोप लागायची. वर्षातून साधारण एकदा आमची कौटुंबिक म्हणजेच आम्ही चौघे आणि अप्पा काकांचं कुटुंब, ते चौघे असे आमच्या कुलदैवताला जायचो.

सुखवार्ता

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 22/11/2019 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. अश्याच काही हटके व्यक्तीमत्वांची दखल घेवून, या सुखवार्ता शेअर कराव्या असं ठरवलंय १. मिलिंद पगारे ---- नाशकातले मिलिंदकाका पगारे बहुराष्ट्रीय कंपनीतुन केमिकल इंजिनिअर पदाहुन रिटायर झाल्यावर केवळ हौशेपोटी प्लास्टिक प्रदुषणावर जनजागृती करतायेत.

दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 22/11/2019 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा ------------------------------------------- १}जान्हवी चा मृत्यू व हुस्न्या खाटीक * दिलीप चित्रे बार मध्ये बसला होता समोर हुसेन खाटीक त्याचा जुना शाळेतला मित्र होता शून्यात बघत दिलीप ने अर्धा चिकन टिक्का चा पीस उचलला व बिअर चा घोट घेत तोंडात टाकला भाय कितना दिन मातंग मनायेगा तू ? जान्हवी भाभी थोडी ना वापस आने वाली है ?

कठीण कठीण कठीण किती

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 21/11/2019 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
यकृताची कठीणता ( Liver Cirrhosis) : भाग १ यकृत हे आपल्या उदरात उजव्या बाजूस श्वासपटलाच्या खाली वसलेले एक महत्वाचे इंद्रिय आहे. शरीरातील इंद्रियांपैकी ते सर्वात मोठे असून ते प्रौढ व्यक्तीत सुमारे दीड किलो वजनाचे असते. ते अन्नपचनात महत्वाची मदत करते. यकृतातून तयार होणारा पित्तरस हा मेदांचे पचनास आवश्यक असतो. शरीरातील एकंदरीत चयापचयात यकृत एखाद्या गृहमंत्र्याप्रमाणे महत्वाची भूमिका बजावते. शरीरात बाहेरून शिरणाऱ्या आणि चयापचयात निर्माण होणाऱ्या अनेक विषांचा ते नायनाट करते. त्याची एकूण कार्ये ५००च्या घरात आहेत ! म्हणूनच ते जगण्यासाठी अत्यावश्यक आहे.

India Deserves Better - १०. मेळघाट - कुपोषण, बालमृत्यु आणि सरकारी कागदी यंत्रणा

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 19/11/2019 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
India Deserves Better - १०. मेळघाट - कुपोषण, बालमृत्यु आणि सरकारी कागदी यंत्रणा पार्श्वभुमी विधर्भामधील, सातपुडा पर्वतरांगातील धारणी आणि चिखलदरा या तालुक्यांचा मिळुन मेळघाट विभाग बनलेला आहे. मेळघाट कुपोषण आणि बालमृत्यु हे येथील जणू समिकरणच झालेले आहे. मेळघाट हा तसा ९०% आदीवासी भाग आहे, येथील बालमृत्यु आणि कुपोषण यात घट झाल्याचा सरकार कितीही दिंडोरा पिटत असला तरीही येथील १०,००० च्या वर बालकांचा मृत्यु झालेला आहे. त्यामुळे कागदावर असलेल्या यंत्रणा , आणि कुपोषणातील घट प्रत्यक्षात मात्र दिसत नाही.

चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 19/11/2019 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
“शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥ शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥“ शिवराया बद्दल कितीही पुस्तके लिहिली आणि कथा चित्रपटात दाखवल्या तर कमीच पडेल. राजांची प्रत्येक लढाई, पराक्रम, कर्तृत्व, माणसं जिंकण्याची कला, आणि बुद्धीबळातील अजोड चाली प्रमाणे खिंडीत गाठून शत्रूवर केलेली मात यावर चित्रपट निघू शकतो.

प्रेम एक अनुभुति..सायुज्जते कडे जाण्याचा प्रवास...

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 19/11/2019 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम एक अनुभुति..सायुज्जते कडे जाण्याचा प्रवास... * प्रेम भावना हि सा~यांनाच हवि हविशी वाटणारी आहे.."पहिलिच भेट झाली,पण ओढ हि युगाची"अशी हि भावना असते..क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा" हे गडक~यांचे म्हणणे किति सार्थ आहे. आपण कुणावर तरी प्रेम करावे..अन कूणी तरी आपणावर जिव तोडुन प्रेम करावे हि मानवाचि उपजत अन निसर्ग दत्त अशी भावना आहे..असते.. * प्रेमाचि सुरवात आपल्या विचारां पासुन होते..प्रेमाच्या विचाराचे तरंग मनात आले कि प्रेमाचा विचार सुरु होतो...मनात घोळणा~या प्रेमाच्या विचाराने प्रेमाची अनुभुति, व प्रेमानुभव निर्माण होतात. * तुम्हि कुठल्याच व्यक्तिवर तो पर्यंत प्रेम करु शकत

एक घटना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 19/11/2019 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक घटना ................. दुपारची वेळ होती -मी पेपर वाचत होतो ते व्हढ्यात तिने माझी खोडी काढली एका सेन्सेटिव्ह विषया वर माझी खिल्ली उडवली मला संताप आला मी तिचा प्रिय फ्लॉवर पॉट जमिनीवर आपटत फोडून टाकाला माझ्या अनपेक्षित कृतीने ती चक्रावली व तरातरा आली अन माझ्या पाठीत चार पाच गुद्दे घातले मी काही बोललो नाही बराच वेळ आम्ही आतून धुमसत होतो मग मी शांत झालो व चपला घालून बाहेर पडलो कुठे निघालास ?? गप्प बस तुला काय करायचा ??? खर तर मला खूप वाईट वाटत होते खूप खुश असायची ती तो फ्लॉवर पॉट तिचा जीव कि प्राण होता ती त्या मध्ये आकर्षक फुले भरत असे असे करताना ती त्यात रंगून जात असे मी दुकानात आलो तसाच एक फ