मुंबई-पुणे-मुंबई
३१/०१/२०१९
घरच्यांचा विरोध पत्करून ३१ जानेवारीला पुण्यासाठी सायकल घेऊन पहाटे ५:४५ ला बदलापूर सोडल. अचानक पुण्याला जाण्यास कारण असे की, लंगोटी याराच्या बहिणीचं लग्न. या आधी पुण्याला ४ / २ चाकी घेऊन न गेलेला मी आता direct सायकल ने जाणार तेही एकटाच, याच सगळ्यांना tension (अगदी मलासुद्धा). तरिही मनाशी निश्चय पक्का करून सायकल घराबाहेर काढली.
मधे ४-५ स्टॉप घेणार होतो. पहाटे रस्ता नीट दिसत नव्हता, परंतु कर्जत पर्यंतचा रस्ता तोंडपाठ होता. गुलाबी थंडी enjoy करत २ तासात कर्जतला पोहोचलो. चारफाट्याला १५ मिनीटं विश्रांती घेऊन चहा टाकला.
मिसळपाव