शिकणं...
लहानपणी घरातले शाळेत सोडून जातात
तेंव्हा दोन पर्याय असतात समोर. एकतर आजूबाजूला रडणाऱ्या सगळ्यांसारखं भोकाड पसरून रडणे किंवा पाणी डोळ्यातच थोपवत शाळा सुटायच्या घंटेची वाट बघणे.
आपण दुसरा निवडतो. खरंच किती शिकतो ना स्वत:कडूनच?
परीक्षा देत देत मोठे व्हायला लागतो
एखादा पेपर जातो अवघड. वाटत झालं आता, मार्क्स कमी पडणार आणि ते तसे पडतातही.
वडील सहामाहीच्या प्रगतीपुस्तकावर सही करताना काही म्हणत नाहीत पण ते मार्क्स आपल्याच डोळ्यात खुपतात
मग पुढच्या चाचणीत आपण त्या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून ते जेतेपदाच्या निशाणीसारखे मिरवत आणतो प्रगतीपुस्तकावर.
मिसळपाव
दिवाळीत लक्ष्मी पूजनाची खरेदी आटपल्यावर आम्ही डेक्कन वरच्या रुपाली हॉटेल मध्ये खादाडी करायला गेलो होतो
बिल दिल्यावर काउंटर वर गप्पा मारताना क्याशीयर म्हणाला उद्या लक्षणी पूजना निमित्त हॉटेल तर्फे सर्व ग्राहकांना मोफत शिरा वाटप आहे नक्की या
मी गेलो होतो साजूक तुपातला काजू बेदाणे मिश्रित शिरा चापला हि सकाळी रांगोळी आदी सजावटीत गर्क असल्याने आली नव्हती
मालकांनी २ प्लेट शिरा पार्सल करून दिला
घरी आल्यावर तो पण चापला