Skip to main content

कस सांगू तुला

लेखक Pritam salunkhe यांनी गुरुवार, 02/04/2020 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस माझं हसणं तू माझं जगणं तू माझा ध्यास तू माझा श्वास तू कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस मला साखर झोपेत पडलेले एक गोड स्वप्न तू पहाटेची अल्लड झुळूक तू माझ्या पौर्णिमेचा चंद्र तू माझ्या सफेद आयुष्यात रंग भरणार तू  इंद्रधनुष्य आहेस.... कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस.. कोणाची तरी काळजी करायला शिकवणाऱ्या काळजीच  कारण  तू माझ्या जगण्याचा श्वास... आणि जगताना लागलेला ध्यास आहेस... कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस... कधी न पूर्ण होणार स्वप्न आहेस की कोणत्या नावाची गरज नसलेलं नात आहेस.

वीर चक्र

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 01/04/2020 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
वीर चक्र हि एक कहाणी आहे वीराची त्याच्या स्वतःच्या तोंडून ऐकलेली. १९९१ मध्ये मी एम डी करायला ए एफ एम सी मध्ये गेलो. तेथे आम्हाला असलेले सहयोगी प्राध्यापक(associate professor) कर्नल एन एन राव ( नळगोंडा नरसिम्ह राव) यांच्या खोलीच्या बाहेर पाटी होती COL N N RAO कर्नल एन एन राव Vr C , SM वीरचक्र सेना मेडल (associate professor) सहयोगी प्राध्यापक ते आमच्यासाठी व्याख्याते शिकवणारे प्राध्यापक आणि (थिसीस)प्रबंधासाठी माझ्या मित्राचे मार्गदर्शक (गाईड) होते त्यामुळे त्यांच्या खोलीत रोज जाणे येणे असेच.

"प्लेटकृती"

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 01/04/2020 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच क्षमा मागतो कि हि "पाककृती" नसून केवळ "प्लेटकृती" आहे ( म्हणजे फक्त तयार पदार्थही जुळवाजुळव आणि नवीन पदार्थाची ओळख) महाराष्ट्रात जसा वडा पाव तसाच जणू "पाय" हा पदार्थ न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये . गोल सामोसा पण तळलेला नाही तर भाजलेला आत विविध सारणे , चिकन आणि भाज्या मेंढी बीफ थाई चिकन इत्यादी याशिवाय इंग्लंड मध्ये प्रसिद्ध म्हणजे शेफर्ड्स पाय जायचात वारीं आवरण हे बटाट्याचे सोबत च्या छायाचित्रात मी त्या बरोबर ज्या चिप्स दाखवलेली आहेत त्या संत्रीचं रंगाच्या असण्याचे कारण म्हणे त्या बटाटयाच्या नसून रताळ्याच्या आहेत ! आणि हो मी जरी अगदी साहेबी पद्धतीने काटा चमचा दाखवला असला आण

प्रवास

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 01/04/2020 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
टीप: मूळ कल्पना ही मिपावरील एका अन्य आयडीने लिहिलेल्या (पण प्रकाशित न केलेल्या) कवितेवरून घेतली आहे.  ------ तुझ्याकडे मी येते तेव्हा रिक्षांना कधि नसतो तोटा हात जोडुनी तयार येण्या.. आव आणुनी खोटा खोटा दिवे  पटदिशी हिरवे होती.. तुरळक मजला भासे वर्दळ द्वारघंटिका वाजवताना फुलून येई मनात कर्दळ.. . . . तुझ्याकडून मी निघते तेव्हा, एकहि रिक्षा समोर नाही लाल दिवे मम वाट रोखती आणिक गर्दी भरुनी वाही . . . घरात शिरता समोर दिसतो प्रेमळ माझा साजण जिवलग हास्य जाणते मुखी तयाच्या घेई जवळी मजला लगबग गर्दी, रिक्षा, दिवे तांबडे क्षणात पडतो विसर मनाला तुझी स्मृती जरि मनात जागी तनु माझी मी वाही सख्या

कोरोना आणि माणूस

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/04/2020 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे डिसेंबर 2019 मध्ये कोरोना चीनच्या वुहान शहरात पसरला. चीन मधून तो इतरत्र पसरणार नाही असा अनेकांचा समज होता. आज संपूर्ण जगात कोरोनाच्या दहशतीने युध्दजन्य परिस्थिती आहे. ‘हा विषाणू म्हणजे मानवाने तयार केलेला जैविक बाँब असून तो माणसावरच बुमॅरंग सारखा उलटला’ असं बोललं जात होतं. चीन मधून कोरोनाचं उच्चाटन होताच चीनने हाच आरोप इतर देशांवर केला. कोरोना हा जैविक बाँब की नैसर्गिक विषाणू हा प्रश्न आज अनुत्तरीत असला तरी, हे जैविक संकरीत हत्यार असल्याची साशंकता काही शास्त्रज्ञांना वाटत आली. मार्च 2020 च्या सुरूवातीला कोरोना भारतात दिसू लागला. आधी तुरळक.

होसूर: एक उनाड रविवार (पुर्वार्ध)

लेखक चौथा कोनाडा यांनी बुधवार, 01/04/2020 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता जेवण करून जरा रिलॅक्स होतोय तर मोबाईल वाजला, बघितलं तर ऑफिसच्या मुरूगनाथनचा कॉल, कॉल घेत असताना थोडा चमकलोच, म्हटलं आता कसा काय याचा कॉल ? मुरूगनाथन: हॅलो, फ्री ? मी: यस, फिनिश्ड डिनर जस्ट नाऊ, व्हाट्स स्पेशल ? मुरूगनाथन: प्लॅनिंग आऊटिंग व धिस संडे. मोकळा आहेस ना रविवारी? मी: हो, काय विशेष ? कुठं जायचंय? मुरूगनाथन: माझा मेव्हणा चेन्नईहुन येणार आहे शनिवारी. मी, अनुप्रिता (मुरूगनाथनची बायको) आणि मेव्हणा नंदी हिल्सला जायचं म्हणतोय. तू पण येणार असशील तर तर आपल्याला कॅबने जाता येईल, वेळ आणि खर्च दोन्हीनं सोयीस्कर होईल ! मी: वॉव ! येईन ना मी, नक्की येईन.

सँडविच स्पर्धा!

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 01/04/2020 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
सँडविच स्पर्धा! यात मोजायला गेलं तर हजारो पाकृ बनविता येतील...

फळांचा नाश्ता

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 01/04/2020 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
फळांचा नाश्ता , सकाळी जर मसालेदार आणि तेलकट नाश्ता कार्याचा नसेल आणि अगदीच अळणी पण खायचे नसेल तर हा नाश्ता करून बघा - चुरा: रोल्ड ओट भाजून घ्या त्यात पाहिजे तर बदाम / अक्रोड यांचा भरडा चुरा पण भाजा ( काजू नको) भाजून गार करण्याआधी थोडीशी गुळी साखर घालावी आणि दालचिनी ची पूड -फळे: पीच , प्लम, पेअर सफरचंद ,माध्यम आकाराचे चिरून घ्या ( केळं घालता येईल पण ते इतर फळांची चव मारू शकते ) यातील पीच / प्लम पेअर चांगले पिकलेलं असतील तर त्यांना रस सुटेल ) वाडग्यात आधी वरील चुरा ठेवून मग टाय प्रथम रस सुटणारी फळे टाका आणि मग सफरचंद वरती योगर्ट ( साधे, गोड वाले नाही आणि क्रीम / साय पण नको ) घाला ( योग

मोगँबो - ६

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 01/04/2020 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
काहितरी करायलाच हवे, त्या खोलीला एक खिडकी होती . ती उघडायचा प्रयत्न केला. पण एकदम ज्याम होती. कधी उघडलीच नसावी. त्या खोलीत एक पलंग त्यावर मळकट चादर आणि एक बाथरूम होते. मला बसायला एक तोडकी मोडकी खुर्ची. तो माणूस यायच्या आत इथून पळून जायला हवे. खिडकी उघडतच नव्हती इथून बाहेर जायचा काहीतरी मार्ग शोधायलाच हवा. मी दारापाशीच उभी राहिले..
मागील दुवा : http://misalpav.com/node/46314 किती वेळ गेला असेल माहीत नाही. मी तशीच दाराच्या जवळ उभी राहिले. जिन्यावर कोणाची तरी पावले वाजली. दाराची कडी उघडल्याचा आवाज. हाच एक क्षण हीच एक संधी.

बास्टऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽर्ड

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 31/03/2020 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
जण्या ( एक वहीतले पान दाखवत ): गुरुजी, गुरुजी ! बास्टऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽर्ड त्याच्यातला आदेशात्मक व्याकरणाभिमानी शिक्षक जोरात किंचाळला मग स्वतःच्याच रागास गिळत समजावणीच्या स्वरात तुला नाही रे, तुझ्या अमूर्त अबोध कलेला म्हणालोय जिची एकही रेषा सरळ नाही जिचे एकही वळण बरोबर नाही सहपाठी मुरक्या मारत कुत्सितपणे जण्याला हसू लागले तोंड पाडण्याएवजी जण्याबी तोंडवर करुन हसू लागला जण्या मूर्खा गाढवा लाज नाही वाटत वर तोंड वर करुन हसतोस जण्या : त्यो अमूर्त चुकलेलं चित्तर बास्टर्ड म्हजी काडणारा स्लट!