Skip to main content

शशक- माकडांपासून सुटका!!

लेखक Cuty यांनी रविवार, 05/04/2020 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
मी काॅलेजला गेले त्यावर्षीची गोष्ट. काय झाले काय माहीत पण अचानकच गावात माकडांची संख्या खूप वाढली. जिकडेतिकडे माकडेच दिसू लागली. गावातल्या चौकात, वडाच्या पारावर, ईमारतींच्या गच्चीवर, चक्क देवळात आणि रस्त्यांवरही माकडे मुक्तपणे संचारू लागली. गावातील लोक आणि दुकानदारही त्यांच्या माकडचाळ्यांनी त्रस्त झाले. संध्याकाळी अंगणात माझी लहान भावंडे खेळत, अन या माकडांच्या टोळ्या घराभोवती हुंदडत. कधीकधी माकडे त्यांना वाकुल्या दाखवत, डोक्यावर टपली मारत, गालगुच्चा घेत. माझ्या मैत्रिणींच्या घरीदेखील हीच परिस्थिती. एकदा काॅलेजला जात असताना गर्दीत माझी ओढणी कुणीतरी मागून खस्सकन ओढली.

सोवळे ..तेव्हाचे आणि आजचे करोना सोवळे.

लेखक Jayant Naik यांनी रविवार, 05/04/2020 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
सोवळे ..तेव्हाचे आणि आजचे करोना सोवळे. करोना विषाणूच्या दहशतीने आम्ही शांतपणे घरी बसलो आहे. आमची सदनिका सहाव्या मजल्यावर. संध्याकाळी थोडावेळ सोसायटीच्या आवारात थोड्या फेऱ्या मारणे आणि औषधे किवा भाजीपाला आणण्यासाठी जवळच्या दुकानात जाणे एवढेच काय तो बाहेरचा संपर्क. सगळे सुरळीत चालले आहे असे वाटते आहे तेवढ्यात आमच्या water purifier ने लाल दिवा दाखवला. त्याचा फिल्टर राम म्हणण्याच्या बेतात आहे अशी त्याने आम्हाला समज दिली. आम्ही रीतसर तक्रार नोंदवली पण आता सर्व बंद आहे १४ एप्रिल नन्तर पाहू असा निरोप आला.

(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती

लेखक मायमराठी यांनी रविवार, 05/04/2020 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती. सध्या विरंगुळा एके विरंगुळा अणि विरंगुळा दुणे चौपट विरंगुळा हे पाढे जोरात सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, शरीरधर्म व देवपूजा इ. कार्यक्रम संपन्न झाल्यावर निवांत बसून जीव रमवायच्या नानाविध प्रयत्नांत थोडी भर घालेन म्हणतो. २००६ च्या ' वो लम्हे ' मधील ' क्या मुझे प्यार है..' किंवा 'दिल तो बच्चा है जी' मधील ' अभी कुछ दिनों से...' ऐकलंय का? तू नळीवर slow interview शोधून बघा. मुलाखत आवडणाऱ्यांना मेजवानी आहे. आपणा पैंकी अनेकांनी बघितलंही असेल. तरीही इतरांकरता निलेश मिश्राबद्दल सांगायचा मोह आवरत नाही.

Marrital Rape अर्थात वैवाहिक बलात्कार

लेखक chittmanthan.OOO यांनी रविवार, 05/04/2020 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
"उसका मन हो तो वो लेटेगी और उसका मन नही तो नही.. ऐसा कैसे चलेगा भाई..." अश्या प्रकारच्या कॉमेंट्स आपण सहज ज्या विषयावर पास करतो तो विषय म्हणजे marrital rape...!!! . हा शब्द ऐकला की अनेकांच्या भुवया उंचावतात किंवा याबद्दल बोलणं म्हणजे लग्नसारख्या पवित्र गोष्टीवर धर्मविरोधी लोकांनी उडवलेले शिंतोडे वाटतात. पण आजच्या दिवस माझ्यासोबत तिची बाजूही ऐकण्याचा प्रयत्न करा. जमलं तर यावर विचार करा नाहीतर काय फालतूपणा आहे म्हणून ही गोष्ट सोडून द्या. पहिल्यांदा तुम्हाला बलात्कार म्हणजे काय हे सांगतो.

नाभिका रे केस वाढले रे, धैर्याने उघड जरा आज सलून रे

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 05/04/2020 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
केस वाढलेत, कापायचे आहेत परंतु ह्या लॉक डाऊन मुळे नाभिक बंधूंची दुकाने बंद आहेत. त्यामुळे वैतागून "नाविका रे, वारा वाहे रे" चे विडंबन करायला घेतले.

लॉकडाऊन:- बारावा दिवस.

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 05/04/2020 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
लॉक---डाऊन! खरंच आपल्यापैकी कुणालाही वाटलं नसेल अस म्हटलं तर अभूतपूर्व म्हटलं तर चिंताजनक जीवन सध्या आपण जगत आहोत. अर्थात मला ह्यामध्ये फारसा फरक वाटत नाही. कारण पौरोहित्यात चांगले एक एक दोन दोन महिने मोकळे दरवर्षी येतात. पण तरीही इतर गोष्टींसाठी मेंदू मोकळा असतो,तो आता नाही हे मात्र खरं ! रोजचं आयुष्य घरात परिपूर्ण वेळ देता येत नसे,तो आता देता यायला लागला(च) आहे. त्यातूनही माझ्या मुलाला (वय वर्षे 3) माझ्याबरोबर धुडगूस घालायला भारी आवडतो तो त्याला आता पूर्ण मिळतो आहे,म्हणून तो मेंदूने होम क्वॉरनटाईन होण्यापासून बराचसा बचावलेला आहे.

झुकिनी पास्ता

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 05/04/2020 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
१) झुकिनी + गाजर पास्ता (झटपट) साहित्य: झुकिनी ( काकडी सारखी दिसणारी , दुधी भोपळ्यासारखी चव असणारी भाजी ) कदाचित दुधी भोपळा पण वापरता येईल लसूण- कोरडे काप , तांबडी मिरची काप, ऑलिव्ह ( काळे kallamataa किंवा हिरवे ) गाजर ऑलिव्ह तेल आणि लोणी सॉस: मी या वेळी तयार सॉस वापरले, पिझ्झा बेस सॉस पण वापरू शकता नाहीतर ताज्या टोमॅटोचे उकडून काळी मिरी, मीठ घालून , त्यात खायची तुळस घालावी - झुकिनी आणि गाजर हे "स्पगेटी " पास्त्या सारखे लांबडे चिरावे किंवा दाखवल्याप्रमाणे कटर असेल तर तो ..

मराठ्यांच्या इतिहासातील लढायांच्या संदर्भातील काही ऐतिहासिक व्यक्तिचित्रे...

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 05/04/2020 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासातील लढायांच्या संदर्भात वर्णन करताना काही व्यक्तिमत्वे कारणपरत्वे समोर येतात. त्यांचा गोषवारा सादर केला तर धागा वाचकांना पुढील मागील संदर्भ समजायला सोपे पडेल असे वाटून खालील व्यक्तींचा विश्वकोशातील परिचय सादर करत आहे. लढाईचे धागे जसे पुढे पुढे जात राहतील, तेव्हा आणखी काही व्यक्तींची त्यात भर पडेल असे असे वाटते. बाजीराव, दुसरा (७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा. रावबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. धार येथे जन्मला. लहानपणी हा हूड व विक्षिप्त होता.

कोरोना गीत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 04/04/2020 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोना गीत पुरोगामी प्रतिगामी आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक भक्त द्वेष्टे आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक सश्रद्ध अश्रद्ध आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक ईश्वर अल्ला आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक फेकु पप्पू आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक भारत पाक आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक इटली चीन आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक अम्रिका युरोप आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक मंदीर मस्जिद आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक गरीब श्रीमंत आम्हाला नाही ठाउक चल रे कोरोना टुणुक टुणुक हिंदु मुस्लिम आम्ह

हसता हसता जगणे शिका, हसण्याची सवय बनवा.

लेखक कबिर यांनी शनिवार, 04/04/2020 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
चेहऱ्यावरील हास्य सर्व तणावाना दूर करते. हसरा चेहरा सर्वाना आकर्षित करतो. अनोळखी व्यक्तीबरोबर हास्याद्वारे मैत्रीचे तार जुळतात. चेहऱ्यावरील हास्य दुसर्यांना आनंद देतेच पण स्वतःला एक आंतरिक प्रसन्नतेचा अनुभव देते. तन मनाला ऊर्जा प्रदान करते. जी व्यक्ती हसत हसत प्रत्येक समस्येवर मार्ग काढते ती व्यक्ती जीवनात सफलता प्राप्त करतात. हास्य एक व्यायामासारखे आहे, त्यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते. लहान बाळ जन्मतःच रडतो. चार पाच हप्त्याने स्मितहास्य करतो. चार पाच महिन्यांनी हसायला लागतो. लहान बाळाचे हास्य निरागस असते. खरे प्रेमयुक्त हास्याचा अभ्यास केल्यास संपूर्ण जीवनात साकारात्मक बदल दिसतात.