मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाहीले असे खूप वार

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अजित अजून गवार पाहीले असे खूप वार बोलले ते पवार बोबडेसे || कोण स्वस्त ठरणं शेतक-यांचे मरण मुतक-याचे धरण सांगा आता || शिवी-शेणाची होळी गटा गटांची टोळी 145 जणांची मोळी बांधवेना || कायद्याची बडबड 'मातोश्री'ची तडफड लोक"शाई"ची फडफड पाहवेना || माध्यमांची गरळ त्या राउताची बरळ मुख्य-स्वप्नाचे तरळ गदारोळ || काढीली एकमेक मय्या आता भूषवीती शय्या नाचे जणू ता ता थय्या ज्योकशाही || तुमचा तो काळाबाजार आमचा हा गोराबाजार खुळ्यांचा शेजार मुलाखती || आकड्यांची वजावट मग प्रेझ राजवट सगळी ही सजावट खुर्चीसाठी || सगळेच करा युती वाटून घ्या खाती सहकाराच्या खावा ताटी भरपेट ||

वाचने 3213 वाचनखूण प्रतिक्रिया 6

बबन ताम्बे Mon, 11/25/2019 - 12:35
सगळा बाजार मांडलाय या राजकारण्यांनी गेले महिनाभर. मी तर म्हणतो पुन्हा निवडणूका लादल्या तर जनतेने "नोटा " वापरावा. बसू द्या ह्यांना बोंबलत घरी. जमेल तेव्ह्ढा राष्ट्रपती राजवटीचा अनुभव घेऊ.

गोंधळी Mon, 12/02/2019 - 11:41
कविता आवडली. पण प्रत्यक्षात आपण आपल्यालाच शिव्या देत आहोत कारण लोकशाहीत लोकच अशा लोकांना निवडुन देतात. त्यामुळे जशी लोकशाही तसेच राजकारणी मिळणार.