मी सध्या काय करतो
मी सध्या काय करतो
गेले काही दिवस सक्तीच्या विश्रांतीसाठी अर्धेधिक जग घरात कोंडले गेले आहे त्यात आपली काय कथा? लोक आपापल्या परीने वेळेचा सदुपयोग करताहेत. घरून काम चालले आहे तरी बराच मोकळा वेळ हाताशी आहे. वाचन लेखन चालू आहे. चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे तर आहेच पण खूप दिवसात संपर्कात नसलेले मित्र आणि नातेवाईक यांना फोनवरून आणि व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून भेटणे चालले आहे. गप्पा रंगतात आहेत. कन्येची दहावीची परीक्षा तीन पेपर उरलेले असतांना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेली आहे. त्यामुळे धड अभ्यास न धड सुट्ट्या अशी परिस्थिती.
मिसळपाव