त्या स्वप्नांना..
त्या स्वप्नांना..
काय करु? समजत नाही.
मनास माझ्या मी
कसा आवर घालु?
हे मज आता उमजत नाही..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
काही श्रावणातल्या पावसाची
तर काही बहरलेल्या वसंताची..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
घोटभर चहाची
अन् भरपुर गप्पांची
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
शरदातल्या चांदणरातींची
हेमंतातल्या ऊबदार रजईतली
पण झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी चेतवाया जात नाही...
- दिप्ती भगत
(१५मे,२०२०)
काव्यरस
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
मंगळवार म्हणजे गणपतीचा वार !!!
आज ठरले, पालीच्या गणपतीला भेट द्यायची. विजयची संकल्पना मी उचलून धरली आणि आजची सायकल सफर सुरू झाली.
अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो.
*
कराडच्या अलीकडे 6 किमी असलेल्या आराम हॉटेल पासून पहाटेच आजची राईड सुरू झाली. सकाळी सर्वांनी स्ट्रेचिंग केले. आज 75 किमी चा पहिला टप्पा कोल्हापूर पर्यंत होता. आजचे सायकलिंग सरळसोट परंतु चढ उताराचे होते.
कराड पार केले आणि लक्ष्मणची सायकल चढाला दमछाक करायला लागली.