Skip to main content

लॉकडाऊन सुरु आहे.

लेखक श्रीकांतहरणे यांनी रविवार, 17/05/2020 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
माया सारख्या कमीत कमी नव्वद टक्के लोकांचा, वर्क फ्रॉम होम म्हजे घरून ऑफिसच काम अन घरच काम अस नवीन कार्येक्रम सुरु झाला हाय. तोसंपून, किंवा त्यातून थोडा का होईना, चोरटा वेळ काढून, जर म्या वॉट्सअँप मेसेजेस वाचला नाय, त मंग माया दिवस कामी कसा लागण भाऊ? हेच त एक सोशल मीडिया, म्या सध्या पकळून ठेवल हाय. अलग अलग ग्रुप मध्ये ही पोस्ट अलाऊड नाही, ती पोस्ट अलाऊड नाही असे म्यासेज वाचले, की कितीही होबासक्या करून, ग्रुप अडमिन (गट प्रमुख) झालेला मी मला, कायची तरी भीती वाटण ना बे! मग काय पाठवू, काय नाय पाठवू, काय वाचू, काय नाय वाचू नुस्ती मनात भीती!

अल्टर्ड कार्बन- वेबसिरीज ओळख

लेखक कपिलमुनी यांनी रविवार, 17/05/2020 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मा अमर आहे, माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आत्मा हे शरीररुपी वस्त्र सोडून नवे रूप धारण करतो असे तत्वज्ञान आपण बऱ्याच वेळी ऐकलेले असते. पण नवे शरीर असले तरी आत्मा फॉरमॅट झालेला असतो, त्यामुळे गतजन्माची काहीही आठवण नसते. ते नवा गडी नवे राज्य असा प्रकार आहे. पण ...... पण जर नवे शरीर आणि तोच आत्मा असेल तर ? अर्थात पन्नाशीचा आत्मा लहान शरिरात राहून बोअर होईल, त्यामुळे शरीर सुद्धा योग्य वयाचे हवे. त्यातही सिलेक्शन असेल तर उत्तम ! जन्मत: केआरके असेल तरी नंतर एसआरके चे शरीर मिळेल . अल्टर्ड कार्बन ही याच कल्पनेवर आधारित वेब सीरिज आहे.

पुण्य

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 16/05/2020 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझा कातर स्वर आज गातो भेसूर लयीत वाट चालतो घरची काटा-काचा तुडवीत. स्वप्न पाहून मोठाली सोडला मायेचा मी गाव आलो शहराच्या खुराड्यात घालून पंखावर घाव. राब राब राबलो आटवून रक्त आणि पाणी सटवाईने लिहिली भाळी जिंदगी दीनवाणी. हात राठ झाले आणि तळव्याची चप्पल पिलं मोठी झाली त्यांना देऊ कोणती अक्कल. जग वैरी आपलं आपण जगाचे पोशिंदे गाड्या-माड्या घडवून आपल्या जगण्याचेही वांदे. कामाचं दाम फक्त जीवाचं मोल शून्य माणसासारखं जगायला काय वेगळं लागतं पुण्य? (स्थलांतर करणाऱ्या कष्टकऱ्यांना समर्पित)

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस पाचवा)२९.१०.२०१९ धारवाड ते दावनगिरी

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी शनिवार, 16/05/2020 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस पाचवा) २९.१०.२०१९ धारवाड ते दावनगिरी धारवाडच्या कृषी विद्यापीठ हॉस्टेल मधून सकाळी साडेपाच वाजता सायकलिंग सुरू केले. २० किमी राईड करून, हुबळी जवळील टोल नाक्यावर हायड्रेशन ब्रेक घेतला. चहा, बिस्किटे खाल्ली. सोपान म्हणाला, 'लवकर चला आज मोठा पल्ला मारायचा आहे'. नामदेव निघण्यासाठी चुळबुळ करत होता. तो आमचा खजिनदार असल्यामुळे चहावाल्याचे पैसे दिल्याशिवाय त्याला निघता येत नव्हते. विकास लांबूनच त्याची गंम्मत पाहत होता. सोपान आणि विकासकडे हायब्रीड सायकल होती, तर नामदेवकडे MTB, त्यामुळे नामदेवला सायकलिंग करताना जादा जोर काढावा लागत होता.

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ३

लेखक स्टार्क यांनी शनिवार, 16/05/2020 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - १ कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - २ जाने कहाँ मेरा स्वेटर गया जीsss अभी अभी यहीं था किधर गया जीsss ऑक्टोबरची कडक धूप जाऊन अचानक चांगलीच ठंड पडली होती. शिमल्यावरून निघालेला बिचारा छप्परतोड पाऊस तर निहालगंज येई येई पर्यंत वाटेतच दमून गेला पण त्याने बागवान चाचांना अनार आणि आमच्यासाठी सुकूनभरी ठंडी हवा जरूर पाठवली होती.

'नालंदा विहार' - अंदमान तुरुंगातील अपारंपरिक विद्यास्त्रोत.

लेखक अभिबाबा यांनी शनिवार, 16/05/2020 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
अंदमान - निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेला व आजही तितकाच स्वच्छ व सुंदर असलेला द्वीपसमूह. अरसिकालाही सौंदर्याची प्रेरणा देणारा हा आपला भूभाग; पण काळया पाण्याच्या शिक्षेवर दंडाबेडी घातली असताना अंदमानात पाऊल टाकणाऱ्या बॅरिस्टर सावरकरांना मात्र या ठिकाणी आढळले ते संरक्षणदृष्टया महत्वाचे असलेले हिंदुस्तानचे पूर्वेकडील प्रवेशद्वार. २०१० सालच्या मार्च महिन्यात पोर्ट ब्लेअर येथे झालेल्या स्वा.सावरकर मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अंदमानला जाण्याचा योग आला.

(अ)अपूर्ण

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 16/05/2020 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण समाधान किंवा आनंदाची आशा मनुष्याने धरूच नये. किंबहुना त्याची पूर्णत्वाची अपेक्षाच सर्वतया निरर्थक म्हणता येईल. कितीही पैसा असला तरी त्याच्या खर्चाच्या मर्यादा समाजाच्या नैतिक नियमनासमोर उघड्या पडतात. जे भौतिकाला लागु तेच भावनांनाही. प्रेम या प्राथमिक भावनेचा अनुभव कित्येकांना आयुष्याच्या शेवटापर्यंत येत नाही. ज्यांना योग्य वेळी आला त्यांना तो पचवता येतोच असे नाही. दररोज भूक शमवणारं अन्न कधीतरीच, 'व्वा! आज काय मस्त जेवण झालं' असं व्यक्त व्हायला भाग पाडतं. म्हणजे रोजच्या पोटभर जेवणातही या 'मस्त'पणाचा अभाव असतोच! आपल्याला ते सवयीने अंगवळणी पडलंय इतकंच.

गणितं..

लेखक मन्या ऽ यांनी शनिवार, 16/05/2020 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
गणितं.. आयुष्याच्या पाटीवरची गणितं माझी चुकली चुका लपवण्यासाठी मी ती पटापट पुसली मनाचा शिक्षक आहे थोर कडक शिस्तीचा पुसलेली गणितं परत परत विचारली उत्तर देता येईनात झाली पळता भुई थोडी माझे मनच होऊनी मैत्र आता माझी शिकवणी घेई शिकवणी झाली चांगली मास्तरांनी सांगितला एक जालिम उपाय जुनी शिदोरी पाठीला नवे अनुभव बांध गाठीला निर्धास्त होऊन जग मी आहेच तुझ्या सोबतीला उपाय कामी आला अन् आनंदीआनंद झाला नवे लोक नवी आव्हानं असतील रोज रोज कशाला दडायचे आता थेट भिडायचे मनसोक्त जगायचे पण ह्यावेळी गणितं सोडवताना भान मात्र ठेवायचे! -दिप्ती भगत (६ डिसेंबर, २०१९)
काव्यरस
Taxonomy upgrade extras

दोसतार - ४६

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 16/05/2020 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
झाडुन झाल्यावर कितीतरी वेळ आई नुसतीच पायरीवर बसलेली. कुठेतरी एकटक पहात. आज्जी असती तर तीने आईला असे बसूच दिले नसते. झाडलोट झाल्यावर तीला हातपाय धुवायला पाणी दिले असते आणि सोबत चहाचा कप हातात दिला असता. अर्थात आज्जी असती तर आई अशी एकटक कुठेतरी कोपर्‍यात पहात पायरीवर बसलीच नसती. न थांबता नुसती सुसाट बोलत सुटली असती. न थांबता. आज्जी काय बोलतेय ऐकतेय या कडे न लक्ष्यही देता. आज्जीचे अंगण तीच्यासारखेच लख्ख रहायला हवे.

कडं

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 16/05/2020 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यानरात्रीच्या काळोखात ते टुमदार फार्महाऊस भयाण भासत होते. आजूबाजूची मोठाड झाडे सळसळ करत हलक्या वाऱ्यात झुलत होती. हॅलोजनचा एक बल्ब पोर्चमध्ये जळत होता. मधूनच सुरु झालेल्या धप्प धप्प आवाजाने आता तिथली शांतता भंग पावत होती. टिकाव हातात धरून घामाने डबडबलेला सुरेंद्र जरा वेळ थांबला. त्याला धाप लागली होती. मान वर करून त्याने छातीत हवा भरून घेतली. कोपराच्या बाहीने त्याने घाम पुसला. खड्डा आता चांगलाच रूंदावला होता. "बस झाला एवढाच" मिनल खड्ड्यात वाकून बघत म्हणाली. तिच्या हातात टॉर्च होता. आणि म्हटलं तरी तीही आता थकली होती. "नाही.." मान हलवत सुरेंद्र म्हणाला. त्याच्या आवाजातही धाप जाणवत होती.